Submitted by क्रांति on 27 September, 2011 - 23:41
आज घटस्थापना. नवरात्रासाठी माय जगदंबा घरी आली, तेव्हा तिचं जे रूप दिसलं त्याचं जमलं तसं वर्णन केलं.
नवरात्र जागवित आली घरी पाहुणी
माय अंबिका देखणी || धृ ||
मांडते मी चंदनी पाट
काय आईचा वर्णू थाट
भरजरी कुसुंबी काठ, हिरवी पैठणी
माय अंबिका देखणी || १ ||
गळा शोभे माळ पुतळ्यांची
कानी कुडी मोती-पोवळ्याची
पैंजणे सोनसाखळ्यांची, रत्ने कंकणी
माय अंबिका देखणी || २ ||
साज सोन्याचा बावनकशी
चंद्रहार, वजरटिक, ठुशी
हिरकणी शोभली कशी सोन्याच्या कोंदणी
माय अंबिका देखणी || ३ ||
अंबा जगतजननी माउली
आली शकुनाच्या पाउली
नित्य राहो तुझी सावली माझ्या ग अंगणी
माय अंबिका देखणी || ४ ||
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
अंबा मातेचं सुंदर वर्णन
अंबा मातेचं सुंदर वर्णन आवडलं.
जय मातादी..जय मातादी.
जय मातादी..जय मातादी.
धन्यवाद!
धन्यवाद!
सुंदर
सुंदर
छान !
छान !
अप्रतिम वर्णन केलय मातेचे.
अप्रतिम वर्णन केलय मातेचे. अगदी साजिरं रूप डोळ्यासमोर आलं.
वर्षा, मुक्तेश्वर, टोकुरिका
वर्षा, मुक्तेश्वर, टोकुरिका धन्यवाद.
छानच आवडलं.. याला छान चालही
छानच आवडलं.. याला छान चालही लावता येईल..
जय मातादी अप्रतिम वर्णन
जय मातादी अप्रतिम वर्णन
फारच सुंदर आणि प्रासादिक!
फारच सुंदर आणि प्रासादिक!