कालचा आपला टी-शर्ट वाटपाचा कार्यक्रम अती पावसामुळे गैरसोय झाल्याने नाईलाजाने पुढे ढकलावा लागला आहे....गैरसोयीबद्दल संयोजक दिलगीर आहेत.
ज्यांना कोणास यायचे जमत नाही त्यांनी राम किंवा मल्लिनाथशी संपर्क साधुन टि-शर्ट घ्यावे.
आत्तापर्यंत तुम्हा सर्वानी आम्हाला खुप सहकार्य केले आहे आणी यापुढे सुद्धा असेच सहकार्य मिळावे ही नम्र विनंती..
पुणे - स्थळ: बालगंधर्व नाट्यगृहाच्या तिकीट खिडकी शेजारील कट्टा. वेळ: २३ जुलै २०११, स. १०.३० ते १२.३०
(जर पाउस किंवा जागेची काही अडचण झाली तर तिथेच शेजारी बालगंधर्व हॉटेल मध्ये जमावे.)
धन्यवाद !
"आले आले..."
"अहो, आले आले काय ? आलो आलो म्हणा !"
"अगं मी नाही गं, 'मायबोली' टीशर्ट आले!"
"ते होय....."
"हॅ.... काय झालं ?"
"आहो, यंदा ना किनै थोडं बजेट वाढ्वुया का?"
"का ..... " (हि ना....., असं लाडे लाडे बोलुनच माझ्या बनियनची भोकं वाढलीयत. लाडात आली की झालं बोटाने कुरतडायला.)
"य़ंदा मायबोलीच्या टोप्याही आल्यात म्हणे......."
"म्हणजे तु मला टोपी घालणार.. :अओ:"
"अहो तसं नाही... हो"
"मग कसं.. ?"
"तुम्ही ना..... जा तिकडे..."
"हँ..... "
तर मंडळी, सालाबादप्रमाणे याही वर्षी मायबोलीकरांना 'मायबोली टीशर्ट' तसच टोप्या ही उपलब्ध करून देण्यात आम्हाला अत्यंत आनंद होत आहे.
यावर्षी आपली आवडती 'मायबोली' ही अक्षरं 'सुलेखन' करून घेण्यात आली आहेत प्राजक्ता थरथरे (पारीजातक)आणि पल्लवी देशपांडे(पल्ली) यांच्याकडुन .
टीशर्ट एकाच रंगात उपलब्ध आहेत- गड्द हिरवा (डार्क ऑलिव्ह ग्रिन). यामध्ये सुलेखन पुढे आणि मायबोलीचा लोगो आणि लिंक डाव्या बाहीवर येईल. टीशर्ट असा दिसेल-
वर चित्रात दर्शवल्याप्रमाणे यंदाचे टीशर्टस् राऊण्ड नेक परंतू लेडिज आणि युनिसेक्स अश्या दोन प्रकारात पुढील साईजेसमध्ये उपलब्ध आहेतः-
लहान मुलांचे टि शर्ट १४५ + २५** = १७०रु./-
२२"
२४"
२६"
२८"
३०"
३२"
मोठ्यांचे टि शर्ट १७५ + ५०**= २२५रु/-
टीशर्टची मापे पुढिलप्रमाणे:-
३६"==XS
३८"==S
४०"==M
४२"==L
४४"==XL
४६"==XXL
आणि अशी दिसेल बेस बॉल कॅप
क्याप ६० + २५** = ८५रु/-
** महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक टि-शर्ट आणि कॅपच्या किंमतीचा काही भाग आपण एका उत्तम पार्श्वभूमी असलेल्या सामाजिक कार्य करणार्या संस्थेला देतो. त्यामुळे टीशर्ट घेऊन आपण खारीचा का होईना, पण समाजासाठी एक वाटा उचलत असतो.
यंदा टीशर्ट विक्रीतून उभी राहणारी रक्कम काश्मीरातल्या अनाथ मुलींसाठी काम करणार्या श्री. अधिक कदम व त्यांच्या ’बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशन’ या संस्थेला देण्यात येणार आहे.
या संस्थेची माहिती http://www.bwfindia.org.in/index.php इथे उपलब्ध आहे.
टि-शर्टांची नोंदणी आणि पैसे ३ जुलै २०११ पर्यंत द्यायचे आहेत. तसंच, ज्यांना प्रत्यक्ष पैसे द्यायचे शक्य होणार नाही, त्यांना आपण 'ऑनलाईन पेमेन्ट ऑप्शन'ही देत आहोत. ऑनलाईन पैसे भरणार असल्यास, ईमेलमध्ये तसे लिहा, मग पुढील डीटेल्स तुम्हाला कळवण्यात येतील.
पुणे आणि मुंबई इथे ३ जुलै २०११ या एकाच दिवशी टिशर्टचे पैसे जमा केले जातील आणि १७ जुलै २०११ या दिवशी टिशर्ट आणि कॅप वितरण केले जातील.
पुणे - स्थळ: बालगंधर्व नाट्यगृहाच्या तिकीट खिडकी शेजारील कट्टा. वेळ: ३ जुलै २०११, सं. ५.३० ते ८.००
मुंबई - स्थळ: शिवाजी पार्क, उद्यान गणेश मंदिराच्या प्रांगणात. वेळ: ३ जुलै २०११, सं. ५.३० ते ८.००
ऑर्डर कशी नोंदवाल? - tshirt@maayboli.com इथे ईमेल पाठवून.
ईमेल च्या सब्जेक्ट मध्ये 'टि-शर्ट/कॅप नोंदणी' असे नमुद करण्यास विसर नका.
ईमेलमध्ये काय लिहाल?
१. आपला मायबोली आयडी
२. आपले (खरे संपूर्ण) नाव
३. आपला चालू असलेला ईमेल पत्ता
४. संपर्क क्रमांक (शक्यतो मोबाईल नंबर)
५. टिशर्ट कुठून घेणार- मुंबई/ पुणे/ इतरत्र
६. पैसे कसे देणार? - प्रत्यक्ष/ ऑनलाईन
७. टिशर्ट कसा घेणार- प्रत्यक्ष/ मित्र/ नातेवाईकांमार्फत (त्यांना संपर्काचे डेटेल्स)
८. किती टिशर्ट? लहान मुलांचे-मोठ्यांचे
९. लेडीज-युनिसेक्स कोणत्या प्रकारचे?
१०. साईझ- यांपैकी कोणता-
११ क्याप हवी का? असल्यास किती-
चला तर मग ववि साठी आपले आपल्या कुटुंबियांचे मित्रांचे टि शर्ट आणि कॅप त्वरीत नोंदवा.
अधिक माहीतीसाठी संपर्क :-
पुणे -
मल्लीनाथ (MallinathK) फोन : ९९६०३६६५६६
राम चिंचलीकर(राम) फोन : ९८५०८८५४२५
मुंबई -
आनंद चव्हाण (आनंदमैत्री) फोन : ९७६९४५४४२९
* भारता बाहेर किंवा मुंबई-पुणे बाहेर टि-शर्ट पार्सल करण्याची सुवीधा सध्यातरी नाहीय. पण तुम्ही कोणी नातेवाईक-मित्र परिवार किंवा स्वतः कधी मुंबई-पुणे आल्यास कलेक्ट करु शकत असल्यास नोंदणी आवश्य करावी.
* जर पर्सल खर्च तुम्ही करु शकत असल्यास संयोजक पार्सलची सोय करता येईल का ते नक्कीच कळवतील.
पुढच्या वर्षी वाटपाच्या दिवशी
पुढच्या वर्षी वाटपाच्या दिवशी पेप्रात नोटीस छापून आणावी की चहासद्रे आणि टोप्या सार्वजनिक विक्रीस ठेवल्या नसून फक्त मायबोलीकरांसाठी आहेत. काल पार्कात माबोकर्स कमी पण टीशर्ट केवढ्याला विचारणारे आगंतुक खूप येत होते.
सर्वांना शांतपणे उत्तर देणार्या संयोजकांचे कौतुक, आणि त्यांनी वाटपासाठी घेतलेल्या मेहनतीसाठी धन्यवाद!
चहासद्रे आणि टोप्या मस्तच आहेत!
सकाळी १०३० ते १२३०?? शनिवर्कर
सकाळी १०३० ते १२३०?? शनिवर्कर मायनॉरिटीत आहेत आम्हाला ना नेता, ना आमचा सत्तेसाठी काही उपयोग! बराय, जमवतो कसेतरी!
पोर्णीमा, आमच्याकडेही काही
पोर्णीमा,
आमच्याकडेही काही पर्याय नाहीय.
दक्षीणा... सॉरी.. आत्ता लिंक
दक्षीणा... सॉरी.. आत्ता लिंक लागली... वाढत्या वयाचे दुष्परीणाम आहेत हे..
खंडेराव... वचने निभावण्या सारखी जनता तरी कुठे राहीली आजकाल?? :)....( मुं पु मुं च्या स्वप्नील जोशींकडुन साभार)
पौर्णिमा... तुमच्या साठी दुसरा ऑप्शन दिलेला आहे..
टोप्या आणि टि शर्ट मस्तच
टोप्या आणि टि शर्ट मस्तच आहेत. धन्यवाद.
बित्तु मागच्या वर्षी आम्हाला
बित्तु मागच्या वर्षी आम्हाला पण इथे इतरांनी टिशर्ट केवढ्याला विचारून वात आणला होता
मला यावर्षी पुन्हा कॉलर वाले
मला यावर्षी पुन्हा कॉलर वाले टिशर्ट मिळाले.. धन्य जाहलो !!
बित्तु..
योरॉ, तुझा टीश फिट बस्ला का?
योरॉ, तुझा टीश फिट बस्ला का? कालर बाकी झक्कास होती...पट्टेरी!
सदरे मापात गंडले आहेत. मोठ्या
सदरे मापात गंडले आहेत. मोठ्या ( वाढत्या मापाचे ) दिलेत कि काय.. एम साईझ सांगितली होती. लार्ज दिली आहे.
टोपी कधी मिळणार?????????? टी
टोपी कधी मिळणार??????????
टी - शर्ट छान बसलेत ......
मला पन टी-शिर्ट घ्ययचा आहे.
मला पन टी-शिर्ट घ्ययचा आहे. मला आता मेळु शकेल का?
संयोजक, आजुन टोप्या मिळाल्या
संयोजक, आजुन टोप्या मिळाल्या नाहीत.. कधी मिळणार आहेत ते कळेल का??
संयोजकानी टोप्या घातल्यात ..
संयोजकानी टोप्या घातल्यात .. काय खरं नाही. पुढचा ववी ची वाट पाहायची काय ?
नक्की तसचं वाटतय अम्मि. इथं
नक्की तसचं वाटतय अम्मि. इथं प्रतिसाद पण देत नाहीयेत
टोप्या मुंबईतुन पुण्यात आल्या
टोप्या मुंबईतुन पुण्यात आल्या की वाटपसाठी ठिकाण आणि वेळ कळवण्यात येईल.
संयोजक माझे टिशर्ट मंजूडी
संयोजक माझे टिशर्ट मंजूडी यांच्याकडे पोचले आहेत का? नसल्यास मला कुठून घ्यावे लागतिल?
अल्पना, कृपया रामशी संपर्क
अल्पना, कृपया रामशी संपर्क साधा.
सर्व टि-शर्ट राम कडे ठेवले आहेत. ज्यांनी नेले नाहीय, त्यांनी रामशी संपर्क करुन घेउन जावे.
मल्लीनाथ, मुंबइतले टिशर्ट पण
मल्लीनाथ, मुंबइतले टिशर्ट पण रामकडे पुण्यात आहेत का? अल्पनाचे दीर माझ्याकडून तिचे टिशर्ट घेणार आहेत.
राम, टोप्या कधी मिळणार आहेत?
राम,
टोप्या कधी मिळणार आहेत?
अरे बापरे, टोप्या अजून
अरे बापरे, टोप्या अजून मिळायच्याच आहेत कां?
मल्लिनाथ, मी मंजूडीने
मल्लिनाथ, मी मंजूडीने लिहिल्याप्रमाणे, माझे टिशर्ट मुंबईत मंजूडी यांच्याकडे देण्यास सांगितले होते. माझा दीर त्यांच्याकडून टिशर्ट घेवून मला दिल्लीला पोचवण्याची व्यवस्था करणार होता.
जर आता माझेही टिशर्ट मुंबईऐवजी पुण्यातून घ्यायचे असतिल तर प्लिज कळवा. मला टिशर्ट कलेक्ट करण्यासाठी दुसरी व्यवस्था करावी लागेल.
अल्पना.. तुमचे टी शर्ट
अल्पना.. तुमचे टी शर्ट मुंबईमध्येच आहेत.. मी घारुआण्णांशी बोलुन ते मंजूडी यांच्या कडे पोहोचवण्याची व्यवस्था करतो आहे...
बाकी पुणेकर माबोकरांसाठी... ज्या माबोकरानी टी शर्ट वितरणाच्या दिवशी त्यांचे टी शर्ट कलेक्ट केलेले नाहीत त्यानी कृपया मला लवकरात लवकर भेटुन टी शर्ट घेउन जावेत ही विनंती..
टोप्या या आठवड्यात पुण्यात येणार आहेत .. लवकरच सर्व संबंधीताना पोच केल्या जातील सोमवार पर्यंत..
धन्यवाद राम.
धन्यवाद राम.
पुणेकरांसाठी निवेदन.....
पुणेकरांसाठी निवेदन.....
टोप्या आल्या आहेत. ज्यांची टोप्यांची ऑर्डर आहे त्यांनी कृपया संपर्क साधुन टोप्या घेउन जावेत.
ज्यांचे ज्यांचे टि-शर्ट राहीलेत त्यांनी ही संपर्क साधुन लवकरात लवकर घेउन जावे.
संयोजक, कुणाकुणाचे टी-शर्ट
संयोजक,
कुणाकुणाचे टी-शर्ट द्यायचे राहिले आहेत, त्याची यादी टाकू शकता का कृपया?
सारे वाटप आणि हिशेब झाल्यावर वरती नमूद केलेल्या संस्थेला मदत करून हा विषय संपवून टाकता येईल. कारण ववि होऊन आता दोन महिने झाले आहेत.
संयोजक, माझे टीशर्ट अजूनही
संयोजक, माझे टीशर्ट अजूनही मंजूडी कडे पोचले नाहीयेत.
मि. MallinathK, सम्पर्कासाठी
मि. MallinathK,
सम्पर्कासाठी email / mobile no. द्यावा.
धन्यवाद.
खालील माबोकरांचे टी शर्ट
खालील माबोकरांचे टी शर्ट अजुन मुंबैतुन नेलेले नाहीत.
सुमेधा पुनकर पैसे जमा आहेत ....
तानिया....
अमिता पाटील
चिंगी
प्रकाश काळेल.
असामी
तात्यांचे टी शर्ट लवकरच त्यांच्या पर्यंत पोहोचतील.
मी देखिल टी-शर्ट व कॅप नेली
मी देखिल टी-शर्ट व कॅप नेली नाही आहे.. याबाबत आनंद चव्हाण (आनंदमैत्री) यांच्याशी बोलणे देखिल झाले.. त्यांनी घारुआण्णांना contact करायला सांगितले होते.. बघुया आता कसे जमते ते..
घारू, असामीचा टीशर्ट मी
घारू, असामीचा टीशर्ट मी घेतलाय पुण्यात. तुमच्याकडचा टीशर्ट अजून कोणी इच्छुक असेल तर त्याला द्या.
(असामीचा टीशर्ट मी घेणार आहे असे कळवले होते संयोजकांना, तरी त्याचा टीशर्ट पुण्याला आला नाही, म्हणून रामने जास्तीचे टीशर्ट घेतले होते, त्यातला असामीने ऑर्डर केलेला साईझ बघून तो मला दिला.)
टोप्या कुठून न्यायच्या आहेत? साधारण भाग तरी सांगा.
Pages