Submitted by सुधिर मते on 24 August, 2011 - 07:17
बंद ही दारे अशी
मोकळी मी करीत आहे
या ऊजाड माळराणावर
वाट तुझी बघत आहे
कढत् आहे, सलत आहे
ऊरात हे रुतत आहे
सागराला पुर आला
आसवेही वाहात आहे
जागलो मी, पेटलो मी
विझलो कधी नव्हतोच मी
ऊत्कटता दबुन होती
ह्रुदयास ग, या आस होती
फोडेन मी तोडेन मी
बन्धने ही कारागृहाची
फडफड ही काळजाची
सहवास का! दुर्मीळ आहे
अंत आहे, ही खंत आहे
महंत मी मुळीच नाही
बेवफा तुला कसे म्हणु
तो.. दुसरा पण संत नाही
आभास हा, भास आहे
तुझाच ग सहवास आहे
ऊघडताच नयन हे..
मृगजळच नशिबात आहे
गुलमोहर:
शेअर करा
छान असतात आपल्या कवीता.
छान असतात आपल्या कवीता.:)
अंत आहे, ही खंत आहे महंत मी
अंत आहे, ही खंत आहे
महंत मी मुळीच नाही
बेवफा तुला कसे म्हणु
तो.. दुसरा पण संत नाही .......क्या बात है!
छान.
आभास हा, भास आहे तुझाच ग
आभास हा, भास आहे
तुझाच ग सहवास आहे
ऊघडताच नयन हे..
मृगजळच नशिबात आहे
हा भास आणि सहवास ... एकदम झकास
छान कविता.
छान कविता.
आभास हा, भास आहे तुझाच ग
आभास हा, भास आहे
तुझाच ग सहवास आहे
ऊघडताच नयन हे..
मृगजळच नशिबात आहे
व्वा, खूप छान !
मान्यवर, हर्शदा परब,
मान्यवर,
हर्शदा परब, विभाग्रज, मीनु, गंगाधर मुटे,वनाराई
माझ्या दोन ओळी तुम्हाला आवड्ल्या
लीहिल्याचे सार्थक झाल्यासारखे वाटते
धन्यवाद
या ऊजाड माळराणावर वाट तुझी
या ऊजाड माळराणावर
वाट तुझी बघत आहे
वा छान ....
किती वेळ वाट पाहणार माळरानावर.......