Submitted by आनंदयात्री on 22 August, 2011 - 05:54
जगावेगळे मागणे मागते मी
मला शोध तू, फक्त तू! - हरवते मी!
पुन्हा रंग येतो नव्याने ऋतूंना
पुन्हा फूल होऊन गंधाळते मी
कवडसे, झुले, आरसे, बंद खोल्या
अशा चौकटींशीच सैलावते मी
असा मान आहे समाजात मजला -
नजर चुकवते, झेलते, सोसते मी!
नभातून येते खुळी हाक त्याची
उभी स्तब्ध जागीच नादावते मी
जरी करपते रोज मेंदी चुलीवर
बिछान्यातला चंद्र सांभाळते मी
असे साचले काय आहे तळाशी
अशी का सतत खिन्न फेसाळते मी?
कधी एकटी भांडते मी स्वतःशी
अखेरी स्वतःलाच समजावते मी
जिथे पाय माझ्यात अडतो स्वतःचा
असा उंबरा रोज ओलांडते मी!
- नचिकेत जोशी
गुलमोहर:
शेअर करा
असे साचले काय आहे तळाशी अशी
असे साचले काय आहे तळाशी
अशी का सतत खिन्न फेसाळते मी?>>> व्वा!
कधी एकटी भांडते मी स्वतःशी
अखेरी स्वतःलाच समजावते मी>>> छानच!
जिथे पाय माझ्यात अडतो स्वतःचा
असा उंबरा रोज ओलांडते मी!>>> सुंदर!
चला, तुमची स्वतःचीही गझल आली, आता बक्षीस समारंभ उरकून टाकू यावेळेसच्या तरहीचा!
कवडसे, झुले, आरसे, बंद
कवडसे, झुले, आरसे, बंद खोल्या
अशा चौकटींशीच सैलावते मी>>> मनापासून दाद आली या शेरासाठी! वाहच!
जिथे पाय माझ्यात अडतो स्वतःचा
असा उंबरा रोज ओलांडते मी!>> हा ही सुंदर!
फेसाळते आणि ओलांडते हे शेर
फेसाळते आणि ओलांडते हे शेर मस्तच!!
कुठला आवडला म्हणून सांगू?
कुठला आवडला म्हणून सांगू? हॅट्स ऑफ..
जरी करपते रोज मेंदी
जरी करपते रोज मेंदी चुलीवर
बिछान्यातला चंद्र सांभाळते मी
अफलातून...
तुमची जबरदस्त लय लागलीय ....
तुमची जबरदस्त लय लागलीय .... एकाहुन एक सरस शेर .. ..जियो !!!
कवडसे, झुले, आरसे, बंद खोल्या
अशा चौकटींशीच सैलावते मी ------------ प्रचंड आवडला !
जरी करपते रोज मेंदी चुलीवर
बिछान्यातला चंद्र सांभाळते मी
असे साचले काय आहे तळाशी
अशी का सतत खिन्न फेसाळते मी?
जिथे पाय माझ्यात अडतो स्वतःचा
असा उंबरा रोज ओलांडते मी! ---------- जानलेवा !!!
अफाट गझल. खूप्च सूंदर!! काय
अफाट गझल.
खूप्च सूंदर!!
काय बोलू!
तुमच्याच ओळीवर तुमची
तुमच्याच ओळीवर तुमची तरही....
व्वा..व्वा.
तिही अगदी जबराट....
अफलातून...... आवडली .
अफलातून...... आवडली .
अप्रतिम!!! खूप सहज आणि तरल
अप्रतिम!!! खूप सहज आणि तरल आलेत सगळेच शेर. मस्तच.
छान आहे.. मेंदी ,खुळी हाक आणि
छान आहे..
मेंदी ,खुळी हाक आणि कवडसे,झुले..
हे खूपच आवडले.
वाह. सगळेच शेर अलवार आणि
वाह.
सगळेच शेर अलवार आणि सहज.
आवडली गझल.:)
जरी करपते रोज मेंदी
जरी करपते रोज मेंदी चुलीवर
बिछान्यातला चंद्र सांभाळते मी
.....................मस्त!
मस्त!
मस्त!:)
कणखर, बागेश्री, मुक्ता,
कणखर, बागेश्री, मुक्ता, बेफिकीर, डॉक, सुप्रिया, कुमारी, प्राजु, वीरू, गिरीशजी, झाड, हर्षदा, शामजी - धन्यवाद!
संघमित्रा, बर्याsssच दिवसांनी प्रतिसाद दिलात.. विशेष thanks..
व्व्वा ! मस्त गझल.
व्व्वा ! मस्त गझल.
अफाट!!! एकसे एक आहेत शेर!!
अफाट!!! एकसे एक आहेत शेर!!
नंद्या, आर्या - मनापासून
नंद्या, आर्या - मनापासून थँक्स!
आवडली.
आवडली.
असे साचले काय आहे तळाशी अशी
असे साचले काय आहे तळाशी
अशी का सतत खिन्न फेसाळते मी?
असा मान आहे समाजात मजला -
नजर चुकवते, झेलते, सोसते मी!>>>>
काय स्वर्गीय लिहिता तुम्ही! प्रतिसाद काय द्यावा हेच कळत नाही.
जरी करपते रोज मेंदी
जरी करपते रोज मेंदी चुलीवर
बिछान्यातला चंद्र सांभाळते मी...
जिथे पाय माझ्यात अडतो स्वतःचा
असा उंबरा रोज ओलांडते मी!...
या साठी त्रिवार सलाम...........
यात्री, पहिल्यांदा दोन वेळेला
यात्री, पहिल्यांदा दोन वेळेला वाचूनही गझल अजिबात झेपली नाही.
पण तु अर्थ समजावून सांगितल्यावर छान समजली..
सुरेख लिहिली आहेस गझल.
नादावते आणि सांभाळते
नादावते आणि सांभाळते जबरदस्त...
आवडलीच !
जिथे पाय माझ्यात अडतो
जिथे पाय माझ्यात अडतो स्वतःचा
असा उंबरा रोज ओलांडते मी!
आहाहा.. खूप बेमालूम बोलकी गझल झालिये
फारच छान मला तर सर्वात जास्त भावलेली ,,,,या तुमच्याच ओळी वरची तुमची गझल
बाकी तुमचे लिखाण मुळातच नंबरांच्या पलीकडले आहे....
नचिकेत ..अप्रतिम गजल
नचिकेत ..अप्रतिम गजल !!
सुरुवातच काय सुन्दर केलियेस.. मला शोध तू, फक्त तू! - हरवते मी!>> वाह .. !!
जरी करपते रोज मेंदी
जरी करपते रोज मेंदी चुलीवर
बिछान्यातला चंद्र सांभाळते मी
क्या बात है....!
<<<<जरी करपते रोज मेंदी
<<<<जरी करपते रोज मेंदी चुलीवर
बिछान्यातला चंद्र सांभाळते मी>>>>
हा शेर समजला नाही.
केपी, विशालभौ, दक्षिणा,
केपी, विशालभौ, दक्षिणा, आर्या, उमेशराव, चेतना, मनिषा_माऊ - धन्यवाद!
बेफिकिर, चालायचंच...
आपलेही आभार..
मयुरेश, लोभ असू द्यावा!
केपी, विशालभौ, दक्षिणा,
केपी, विशालभौ, दक्षिणा, आर्या, उमेशराव, चेतना, मनिषा_माऊ, रोहन - धन्यवाद!
बेफिकिर, चालायचंच...
आपलेही आभार..
मयुरेश, लोभ असू द्यावा!
वाह !! सुंदर !!!
वाह !! सुंदर !!!