जगावेगळे मागणे (तरही गझल)

Submitted by आनंदयात्री on 22 August, 2011 - 05:54

जगावेगळे मागणे मागते मी
मला शोध तू, फक्त तू! - हरवते मी!

पुन्हा रंग येतो नव्याने ऋतूंना
पुन्हा फूल होऊन गंधाळते मी

कवडसे, झुले, आरसे, बंद खोल्या
अशा चौकटींशीच सैलावते मी

असा मान आहे समाजात मजला -
नजर चुकवते, झेलते, सोसते मी!

नभातून येते खुळी हाक त्याची
उभी स्तब्ध जागीच नादावते मी

जरी करपते रोज मेंदी चुलीवर
बिछान्यातला चंद्र सांभाळते मी

असे साचले काय आहे तळाशी
अशी का सतत खिन्न फेसाळते मी?

कधी एकटी भांडते मी स्वतःशी
अखेरी स्वतःलाच समजावते मी

जिथे पाय माझ्यात अडतो स्वतःचा
असा उंबरा रोज ओलांडते मी!

- नचिकेत जोशी

गुलमोहर: 

असे साचले काय आहे तळाशी
अशी का सतत खिन्न फेसाळते मी?>>> व्वा!

कधी एकटी भांडते मी स्वतःशी
अखेरी स्वतःलाच समजावते मी>>> छानच!

जिथे पाय माझ्यात अडतो स्वतःचा
असा उंबरा रोज ओलांडते मी!>>> सुंदर!

Happy

चला, तुमची स्वतःचीही गझल आली, आता बक्षीस समारंभ उरकून टाकू यावेळेसच्या तरहीचा! Happy

कवडसे, झुले, आरसे, बंद खोल्या
अशा चौकटींशीच सैलावते मी>>> मनापासून दाद आली या शेरासाठी! वाहच! Happy

जिथे पाय माझ्यात अडतो स्वतःचा
असा उंबरा रोज ओलांडते मी!>> हा ही सुंदर!

जरी करपते रोज मेंदी चुलीवर
बिछान्यातला चंद्र सांभाळते मी

अफलातून...

तुमची जबरदस्त लय लागलीय .... एकाहुन एक सरस शेर .. ..जियो !!!

कवडसे, झुले, आरसे, बंद खोल्या
अशा चौकटींशीच सैलावते मी ------------ प्रचंड आवडला !

जरी करपते रोज मेंदी चुलीवर
बिछान्यातला चंद्र सांभाळते मी

असे साचले काय आहे तळाशी
अशी का सतत खिन्न फेसाळते मी?

जिथे पाय माझ्यात अडतो स्वतःचा
असा उंबरा रोज ओलांडते मी! ---------- जानलेवा !!!

जरी करपते रोज मेंदी चुलीवर
बिछान्यातला चंद्र सांभाळते मी
.....................मस्त! Happy

मस्त!:)

कणखर, बागेश्री, मुक्ता, बेफिकीर, डॉक, सुप्रिया, कुमारी, प्राजु, वीरू, गिरीशजी, झाड, हर्षदा, शामजी - धन्यवाद!

संघमित्रा, बर्‍याsssच दिवसांनी प्रतिसाद दिलात.. विशेष thanks.. Happy

असे साचले काय आहे तळाशी
अशी का सतत खिन्न फेसाळते मी?

असा मान आहे समाजात मजला -
नजर चुकवते, झेलते, सोसते मी!>>>>
काय स्वर्गीय लिहिता तुम्ही! प्रतिसाद काय द्यावा हेच कळत नाही.

जरी करपते रोज मेंदी चुलीवर
बिछान्यातला चंद्र सांभाळते मी...

जिथे पाय माझ्यात अडतो स्वतःचा
असा उंबरा रोज ओलांडते मी!...

या साठी त्रिवार सलाम...........

यात्री, पहिल्यांदा दोन वेळेला वाचूनही गझल अजिबात झेपली नाही. Sad
पण तु अर्थ समजावून सांगितल्यावर छान समजली..
सुरेख लिहिली आहेस गझल. Happy

जिथे पाय माझ्यात अडतो स्वतःचा
असा उंबरा रोज ओलांडते मी!

आहाहा.. खूप बेमालूम बोलकी गझल झालिये

फारच छान मला तर सर्वात जास्त भावलेली ,,,,या तुमच्याच ओळी वरची तुमची गझल

बाकी तुमचे लिखाण मुळातच नंबरांच्या पलीकडले आहे....

नचिकेत ..अप्रतिम गजल !!
सुरुवातच काय सुन्दर केलियेस.. मला शोध तू, फक्त तू! - हरवते मी!>> वाह .. !!

जरी करपते रोज मेंदी चुलीवर
बिछान्यातला चंद्र सांभाळते मी

क्या बात है....!

<<<<जरी करपते रोज मेंदी चुलीवर
बिछान्यातला चंद्र सांभाळते मी>>>>

हा शेर समजला नाही. Happy

केपी, विशालभौ, दक्षिणा, आर्या, उमेशराव, चेतना, मनिषा_माऊ - धन्यवाद!

बेफिकिर, चालायचंच... Happy
आपलेही आभार..

मयुरेश, लोभ असू द्यावा! Happy

केपी, विशालभौ, दक्षिणा, आर्या, उमेशराव, चेतना, मनिषा_माऊ, रोहन - धन्यवाद!

बेफिकिर, चालायचंच... Happy
आपलेही आभार..

मयुरेश, लोभ असू द्यावा! Happy