माझ्या आईची शिवणकला.
माझ्या आईला शिवणकामाची फारच हौस! सध्या तर तिच्या उत्साहाला अजूनच उधाण आलेलं आहे.
माझ्या आज्जीला (आईची आई) शिवणकामाची आवड. तोच वारसा आईकडे आला. मात्र, तिला मोठ्याचे कपडे वगैरे शिवायला आवडत नाही. तिचे स्पेशलायझेशन लहान बाळाच्या कपड्यामधे आहे. दरवर्षी तिचा चातुर्मासाचा नेम पाच बाळगोपाळाना "ड्रेस देणे" असा असतो. :)सध्या तिने एकूणात ८० दुपटी, २५ झबली आणि अजून बरंच बरं काय काय शिवलय. अजून इकडे तिकडे दुकानात जाऊन बघून यायचं आणी घरी येऊन शिवायचं हे तिचं चालूच आहे.
डिसेंबरमधे आईची अँजिओप्लास्टी झाली होती. त्यानंतर फक्त आणि फक्त शिवणकाम, चालणे आणि आहारावर नियंत्रण यावर तिने शुगर,वजन, बीपी सर्व कंट्रोलमधे ठेवलय.
आईने शिवलेल्या काही बाळंतविड्याचे हे फोटो.
================================================
हे पिंपळपान.
=================================================
चॉकोलेट पाह्यजे???
=================================================
कार्टूनचा शर्ट!!
=================================================
ही कुंची.
=================================================
दिसतय ना छान??? बाळूच्या अंगावर घालायला शाल आहे.
=================================================
टोपडे आणि झबले.
=================================================
अजून दोन झबली.
=================================================
हे लाळेरं, बाळाचा रूमाल आणि हातमोजे.
=================================================
अजून एक टोपडं, झबलं आणि लंगोट.
=================================================
आणि ही लोकरीची शाल. माझी आईने नव्हे, माझ्या आत्याने माझ्यासाठी विणलेली. घरामधे असलेली सर्व उरलीसुरली लोकर घेऊन बसल्या बसल्या एका दिवसात तिने विणली.. म्हणे!!!
आता पुढच्या महिन्यात आत्या येणार आहे, तेव्हा "घरात उरले सुरले लोकर चिंध्या सर्व जोडून ठेव, मी येऊन शिवेन काय शिवायचे!!" असं पत्र आधीच पाठवलय. (आत्या अजूनपण पत्र लिहिते, वकिलाची पत्नी असल्याने "पत्राचा पुरावा राहतो, फोनवर बोलण्याचा राहत नाही" असा तिचा युक्तिवाद असतो)
=================================================
आणि ही आज्जीनेच शिवलेली कुंची. वेल्वेटचे कापड आणि त्यावर मोती लावलेले. खास माझ्या बारश्यासाठी आज्जीने शिवली होती. आता ती असती तर अजून एकदा तिने उत्साहात शिवली असती. आता ती नाही पण तिच्या अशा बर्याच आठवणी आईने जपून ठेवल्या आहेत.
=================================================
माझा झब्बु थंडीत बाळाच्या
माझा झब्बु
थंडीत बाळाच्या छातीला ऊब रहावी म्हणून ही पेटी:
![untitled2.JPG](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u28554/untitled2.JPG)
मी शाळेत असताना शिवलेले झबले:
![untitled3.JPG](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u28554/untitled3.JPG)
संक्रांत स्पेशल फ्रॉक, अंगा आणि टोपडे:
![untitled4.JPG](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u28554/untitled4.JPG)
संक्रांत स्पेशल झबले:
![untitled5.JPG](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u28554/untitled5.JPG)
ओढणीचे शिवलेले दुपटे:
![untitled6.JPG](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u28554/untitled6.JPG)
गुलाबी टोपडे अगदी राजेशाही
गुलाबी टोपडे अगदी राजेशाही आहे. मस्त दिसत असेल. त्यात वर दोन गोंडे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
निंबे, खुपच गोड आहेत सगळे
निंबे, खुपच गोड आहेत सगळे अंगे! तू शिवलेलं तर झकासच आहे!
निंबूडा, धन्यवाद!! त्या
निंबूडा, धन्यवाद!!
त्या गुलाबी टोपड्याला सशाची कुंची म्हणतात. आणि ते बांधल्यावर एकदम मस्त दिसते.
मानुषी, माझ्या आजोबाची कुंची (त्याच्या वडलाची आहे म्हणे ती!!) पण अशीच जपून ठेवलिये. बाळाला बांधली नाहीतरी चालेल पण पाळण्याजवळ ठेवायचीच, असा नियम आहे.
अर्थात ती कुंची फार मोठी आहे, पूर्वी बाळं चांगली तीन चार वर्षाची होइस्तोवर कुंची बान्धायचे म्हणे!! आताची तीन चार दिवसाची बाळं त्या कुन्चीतून कान बाहेर काढतात.
किती सुंदर दिसतायेत! माझ्या
किती सुंदर दिसतायेत!
माझ्या बाळासाठी नव्हते शिवले पण भावाकडे बाळ येणार आहे तेव्हा नेईन असे शिवून.
छान छान झब्बू टाका बरं पटकन.
ही काही अजूनः कॉटनच्या
ही काही अजूनः
कॉटनच्या हिरव्या पट्टेरी ओढणीचे दुपटे background ला दिसत आहे.
![Green1.JPG](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u28554/Green1.JPG)
त्याच ओढणीचे झबले + टोपडे + लंगोट शिवून घेतले होते. (सबंध सेट होता. लंगोट आणि टोपडे दुसर्या एका बाळासाठी देऊन टाकलेत.)
![Green2.JPG](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u28554/Green2.JPG)
वा वा माणसाला आवडणारं काम
वा वा माणसाला आवडणारं काम करायला मिळालं ना की आपोआप तब्बेत ठणठणीत राहते.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
एकदम मस्त
एकदम मस्त
अरे वा छान आहेत हा
अरे वा छान आहेत हा
व्वा!
व्वा!
वा मस्त आहे
वा मस्त आहे
नंदिनी आणि निंबुडा, मस्त आहेत
नंदिनी आणि निंबुडा, मस्त आहेत बाळंतविडे!! तुमची पोरं कसली लकी म्हणायची एवढी हौस पुरवणार्या आया/आज्या भेटल्यावर!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Pages