नुसता [(तरीही) पझल]

Submitted by मंदार-जोशी on 9 August, 2011 - 07:53

झोप लागे ज्यावर तो पलंग द्याना
का देत मजला तो खाट नुसता?

जाहली ढेकणे तयावरी उदंड
चावणे तयांचे हा त्रास नुसता

मारण्या तयांना बेगॉन मारले
भयानक तयाचा येई वास नुसता

सूक्ष्मजीव ते येती कष्टानेच हाती
तोपर्यंत गादीत आपुला नाच नुसता

होत सुटका शेवटी रामप्रहरी जरी
भूक त्यांची मिटे आपुला भास नुसता

का दिली तरही ही तुम्ही मला
ही रचना गझल? हा पझल नुसता.

सूक्ष्मजीव ते येती कष्टानेच हाती
तोपर्यंत गादीत आपुला नाच नुसता>>> Proud

पण काकाक हे सदर आहे म्हणून इतकं काकाक लिहायच? Proud

Pages