Submitted by आनंदयात्री on 12 July, 2011 - 00:31
"खोल खोल आतवर तुझी नजर" या तरहीसाठी माझा सहभाग -
खोल खोल आतवर तुझी नजर
पोचते तिथे जिथे तुझेच घर
आसवांत वाहिल्या तुझ्या खुणा
साचले रूमालभर तुझे शहर!
विरह वाढता रडायचीस तू
(मी असायचो उगाच थेंबभर)
आठवांत राहती जुन्या व्यथा
सांग मग पडेल का तुझा विसर?
चालतो तसेच पाय ओढुनी
वाट हरवली कधीच दूरवर
जीवना तुझा लळाच लागला
मरणही तुझीच वाटते कुसर
तू निवांत वाच एकदा कधी
मी तुझेच पत्र अन् तुझी खबर
- नचिकेत जोशी
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
धन्यवाद छायाताई!
धन्यवाद छायाताई!
चालतो तसेच पाय ओढुनी वाट
चालतो तसेच पाय ओढुनी
वाट हरवली कधीच दूरवर
आवडला.
जबरदस्त ....! मान गये उस्ताद.
जबरदस्त ....! मान गये उस्ताद.
फारच सुंदर गझल्.....मनाला
फारच सुंदर गझल्.....मनाला भिडली.
विरू, सखी - थँक्स! गंगाधरजी,
विरू, सखी - थँक्स!
गंगाधरजी, बरेच दिवसांनी? आपणासही धन्यवाद!
वेड!
वेड!
मस्त लिहता राव तुम्ही.
मस्त लिहता राव तुम्ही. छान.....
पुन्हा वाचली ..पुन्हा आवडली.
धन्यवाद!
धन्यवाद!
खोल खोल आतवर तुझी नजर पोचते
खोल खोल आतवर तुझी नजर
पोचते तिथे जिथे तुझेच घर
आसवांत वाहिल्या तुझ्या खुणा
साचले रूमालभर तुझे शहर!
......वा सुंदरच ....
व्वाह! सुरेख गझल !
व्वाह! सुरेख गझल !
लय भारी !!!!
लय भारी !!!!
धन्यवाद विद्यानंद, प्रकाश,
धन्यवाद विद्यानंद, प्रकाश, दगडू!!
Pages