कबीर. एका संपन्न घरातला, बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा. थोडा मनस्वी. अजून सडाफटिंग. पण नुकताच एका इंटेरियर डिझायनरला प्रपोज 'करून बसलाय'. आपली दोघांची कामे एकमेकांना पुरक आहेत- त्यामुळे आपले जमेल असे तो तिला सांगतोय. तीही खुश. एवढे तिला सांगितले हेच नशीब. कारण हा थोडा अबोल, इंट्रोव्हर्ट. मनातलं सहज दुसर्याला न सांगणारा.
अर्जून. हा वर्कोहोलिक. म्हणजे कॉलेजात असताना प्रेमबिम कधीकाळी केलेलं. पण पैशाच्या मागे धावणं, कामाला वाहून घेणं आड आलं. मग प्रेमभंग. त्यानंतर ते विसरण्यासाठी कदाचित, कामाला आणखीच वाहून घेतलं. पैसा है तो जहान है. लंडनमध्ये एका कंपनीत अत्यंत बिझी फायनान्शियल ब्रोकर म्हणून काम करतोय. बर्यापैकी पैसेही कमवतो.
इम्रान. हाही हळवा. कवीमनाचा, मनस्वी. पण उपजतच उत्तम विनोदबुद्धी लाभलेला. आणखी एक म्हणजे, याच्या बापाबद्दल याला बराच तरूण झाल्यावर कळते- ही एक सतत दुखरी नस घेऊन वावरणारा. ते विसरण्यासाठीच की काय, पण सतत गलछबूपणा करण्याची सवय, हौस. पण कवीमनाच्या सार्यांसारखीच याचीही गोची. जगण्यासाठी काम कसलं करतोस?- या प्रश्नाचं नीट उत्तर याला देता येत नाही.
या तीन मित्रांची कहाणी- म्हणजे झोया अख्तरचा 'जिंदगी मिले ना दोबारा'. स्वीट अँड क्युट अभय देओल, बिगेस्ट हंक ऋतिक रोशन आणि सो-कॉल्ड-गाय-नेक्स्ट-डोअर फरहान अख्तर- असली तगडी रिफ्रेशमेंट. सोबत सुप्रसिद्ध कतरिनाबाई, देव-डी फेम काल्की. जावेद अख्तरचे संवाद आणि कविता. शंकर-एहसान-लॉयचं संगीत. झोया अख्तरचं तरूणाईला भावणारं अत्यंत फ्रेश टेकिंग. काय बिशाद आहे पिक्चर आपटण्याची?
***
कबीरचं लग्न ठरतं, तसा तो अस्वस्थ होतो. आपले सडाफटिंग दिवस आता संपतील, याची हळहळ. सांगणार कुणाला? तर कॉलेजातल्या एकेकाळच्या त्या दोन जीवलग मित्रांना. पण तेही असं अॅक्रॉस टेबल बसून भडाभडा पाच मिनिटात बोलून टाकणं त्याच्यासारख्याला कसं शक्य आहे? तर नीट वातावरण निर्मिती होऊ देत. जरा आठ दिवस कॉलेजचे दिवस आठवत गुजगोष्टी होऊ देत. मग सख्खे मित्र असतील, तर ओळखतीलच मनीचा सल.
कॉलेज संपून दहा वर्षे झाली, पण त्याने मनात प्लॅन करून ठेवलेली 'बॅचलर्स ट्रिप' अजून होऊ शकलेली नाही. आता थोडेच दिवस राहिलेत, तर ही ट्रिप होणं त्याला फार फार आवश्यक वाटू लागलंय.
मग स्वतःच कार्याध्यक्ष बनून दोघांना फोन करून सांगतो. इम्रान बापडा तयारच असतो, पण बिझी अर्जूनभाऊंना इमोशनल ब्लॅकमेल करून रडातराऊतच घोड्यावर बसवावं लागतं. काम आहे, पैसे कमवायचेत- हे कारण तर आहेच, पण इम्रानसोबत असलेला जुना हिशेब हेही.
तर असं एकदाचं एकत्र गाठोडं बांधल्यावर टीम लीडर कबीर तिघांना घेऊन सहलीला निघतो. जुनी भांडणे, रुसवेफुगवे, रागवारागवी, गुजगोष्टी, पार्ट्या, डान्स आणि कतरिना- हे सारे होत असतानाच काही प्रसंग असे घडतात, की तिघांनाही जगण्याकडे वेगळ्या दृष्टीने बघण्याचे आपापल्या परीने साक्षात्कार होतात. वेगळे पर्स्पेक्टिव्ह मिळतात. एकमेकांसोबत घालवलेल्या क्षणांना नुसत्याच 'मित्रांचे हितगुज' यापलीकडे आणखीही वेगळा अर्थ मिळतो. आता जगलेले हे अफाट क्षण, जगणं श्रीमंत करून टाकण्याची ताकद असलेली, नव्याने मिळालेली वेगळी दृष्टी घेऊन तिघे निरोप घेतात.
***
अगदी साधीसोपी सरळ कथा. अत्यंत प्रेडिक्टेबल. मुळात 'कथा' म्हणावं की नाही, असाच प्रश्न पडेल. पण हेच या सिनेम्याचे बलस्थान ठरते. त्या मित्रांच्या जगण्याला, त्यांच्या जाणीवांच्या अख्ख्या संचाला नवे आयाम देणारे निरनिराळे प्रसंग आपल्याला स्पर्शून जातात. झोया अख्तर रियली हॅज डन अ फँटॅस्टिक जॉब. स्पेनमधल्या निसर्गाचे चित्रपटात केलेले चित्रण अत्यंत मोहक, हिप्नॉटायझिंग. सर्वांच्या चांगल्या अभिनयाने सजलेली एकूण एक फ्रेम जिवंत वाटेल, याची पूर्ण काळजी घेतली आहे.
ऑफ बीट सिनेम्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या अभयदेओलने या कमर्शियल सिनेम्यातही मस्त कमाल केली आहे. मी गेलो होतो फक्त त्याच्यासाठी (आणि सिनेमा संपल्यावर सर्वात जास्त लक्षात राहिलाही तोच), पण कंप्लीट पॅकेज वॉज अ स्वीट रिफ्रेशमेंट. ऋतिकच्या चाहत्यांनाही मेजवानी. मस्त दिसतो आणि वावरतो. कतरिनाचे दिसणे-वावरणे तिच्या आजवरच्या सार्या सिनेम्यांपेक्षा जास्त आवडले. फरहान अख्तरच्या आजवर इरिटेटिंग वाटण्यार्या आवाजातल्या कवितांमुळे कथानकाला एक वेगळेच सखोल परिमाण मिळते. 'वक्त के गहरे सन्नाटे, वक्त ने सभी को है बांटे..' सारख्या जावेदअख्तरसिग्नेचरस्टाईलमुळे ते सारे प्रसंग कमालीचे परिणामकारक वाटतात. अभिनय, ते सारे कथानकातल्या प्रसंगांचे तुकडे, संवाद, गाणी कुठेही उथळ होत नाहीत. दोन प्रसंगांत कुठेही सिनेमा रेंगाळल्याचे जाणवत नाही. अत्यंत ओघवत्या शैलीत चित्रित झालेले छोटेछोटे सस्पेन्सेसही रंगत आणतात. उगाच आपल्याला 'थ्रिल्ड' करून सोडण्यासाठी त्याचा वापर केला नाही, हे जाणवतं आणि आवडतंही. शंकरएहसानलॉयचं संगीत आधीच फेमस झालं आहे. 'सेनोरिटा..' गाणं आपल्याला ताल धरायला, रक्त सळसळायला लावणारं.
या सार्यापुढे क्वचित कुठेतरी वाटलेल्या अतर्क्य गोष्टींकडे आणि इतर तांत्रिक गोष्टींकडे फारसं लक्ष गेलं नाही.
पोहायला येत नसलेला, स्कुबा डायविंग मधल्या एन्लायटनिंग शांततेनंतरचा ऋतिक. आकाशात उडण्याचा, उंचीचा फोबिया असलेला, पण ते करून करून झाल्यानंतर जग जिंकल्याच्या आवेशातला फरहान. 'बुल-रन'साठी आयुष्य पणाला लावायला तयार झालेला, हेही करून बघायचेय- म्हणणारा अभय. नासिरुद्दीनला भेटल्यानंतर 'प्रश्न हा मुळी प्रश्न नव्हताच!' हा साक्षात्कार झालेला फरहान. टोमाटिना फेस्टिव्हल मध्ये 'आता ही शेवटचीच मस्ती, पुन्हा होणे नाही!' अशा थाटात सामील झालेले सारे.. किती साधे प्रसंग. पण पुन्हा पुन्हा आठवणारे. अस्वस्थ करणारे. आश्वस्तही करणारे.
***
आपल्याला आयुष्यात शेवटी हवं असतं तरी काय? तर याचं उत्तर नीट स्वतःलाच पटेल असं कुणी देऊ शकेल असं वाटत नाही. भुतकाळाची भुतं मानगुटीवर वागवत आणि भविष्याची चिंता करत आपला अख्खा जन्म जातो. जगणं हातातून कधी निसटून गेलं तेच शेवटपर्यंत कळत नसावं.
'शेवटी एकदा वाटून गेलं, जगणं हे जगणं नव्हतंच..
निकराने जगण्याच्या लायकीचं, हे आयुष्य नव्हतंच!'
असं सार्यांचं होत असेल का? आला क्षण साजरा करणं आयुष्यभर सार्यांचंच राहून जात असेल का?
आत्ता, आत्ताचा हाच एक क्षण आपला आहे. नंतरचं काही खरं नाही. गो फ्रेंड्स. इट्स अ बिग ट्रीट.
***
बाकी ते स्वतःच्याच
बाकी ते स्वतःच्याच सापु/लग्नात स्वतःच एकटे नाचत यायचे हे मात्र सॉलिड>>>> त्यावेळी होणारी बायको नातेवाईकांच्या गराड्यात नटून लाजत उभी असते ना!
त्यामुळे एकटेच नाचावे लागते!
बाकी सगळे ज्यापद्धातीने आपले मुद्दे ल्;आवून भान्डताहेत ते पाहून सगळ्यांना हे नक्कीच पटले असावे की 'जिन्दगी ना मिलेगी दोबारा'!
i am enjoying reading
i am enjoying reading this.....
पिक्चर शेवट पर्यंत बघायचा
पिक्चर शेवट पर्यंत बघायचा असेल तर इंटर्व्हल च्या 'ब्रेक' चा उपयोग करा, काय ती घाई असते लोकांना बाहेर पडायची ...
रुनी, प्रज्ञा, DJ,शर्मिला,
रुनी, प्रज्ञा, DJ,शर्मिला, खंडेराव,
अभयची कथा बघतांना माझे लक्ष ' अस्मानात ' नसून अभयकडेच होते, ( आण्खी कुठे असणार? अरे हो ह्रुतिक कडे आणि फरहानकडे पण होते नाही का !) हे सिद्ध केल्याबद्दल धन्यवाद !
(No subject)
चित्रपट न आवडल्याचे ३
चित्रपट न आवडल्याचे ३ कारनं:
१. साजिराने लिहिल्या प्रमाणे - predictable. पुढे काय होणार याची तसू भर पण उत्सुकता न्हवती. इतकच काय तर फरहानचा बापू नसिरूद्दीन असेल हे पण ओळखाव नाही लागल. BPL, बॅगवती, असे एक दोन नवीन आविष्कार सोडली तर नवीन काही नाही!
२. देसी चित्रपट जेव्हा देसी राहत नाही. धर्मा प्रो. यश राज प्रो. ह्या सगळ्यांना भारतात चित्रपट बनवायची इतकी काय लाज वाटते? या चित्रपटा मधे लोक londonला राहणारी, आणि ट्रिप करायला spain ला जाणारी. भारतातल अभय देओल च घर पण काय राजमहाल! वास्तव्यापासून हजार कोस दूर. 'मी कोण आहे?', आणि 'आला क्शण साजरा करायला' किती लोंकाकडे spain ला जायला पैसे असतात? हेच सगळ जर भारता रहून, असेल त्या परिस्थितीत कस साधता येते ते दाखवल असत तर मानल असत.
३. स्कूबा डायव्हींग, स्काय डायव्हींग, spain ची यात्रा हे सगळ discovery channel आणि travel channels वर professionals नी ऊत्कृष्ट रित्या दाखवलेल इतक्यांदा बघितल आहे की, हे बघायला theater मधे का आली असा प्रश्न पडला.
रस मलाई, अहो, जातात हल्ली
रस मलाई,
अहो, जातात हल्ली भारतातले लोक स्पेनमध्ये वगैरे. आणि डिस्कव्हरीवरचे लोक कतरिना असतात का?
भारतात अती श्रीमंत लोक
भारतात अती श्रीमंत लोक राहतात. आज काल शाळांच्या ट्रिपा नासा-बिसाला येतात. त्यामुळे बॅचलर पार्टीसाठी स्पेन गाठणे अगदीच अशक्य नाही.
सिंडरेला, काय झालं? एकदम
सिंडरेला, काय झालं? एकदम झक्क्यावतार ?
>> किती लोंकाकडे spain ला
>> किती लोंकाकडे spain ला जायला पैसे असतात?
अहो, सिनेमाचं नाव 'चलो स्पेन' आहे का?
झक्कीवतार नाही, खरच सांगतेय.
झक्कीवतार नाही, खरच सांगतेय. मी आत्ता भारतात आले होते तेव्हा विमानात २५-३० मुलं मुली होती. आठवी वगैरे यत्तेतली. सगळी म्हणे नासा ट्रिपवर आली होती.
रस मलाई प्रत्येक सिनेमामधे
रस मलाई प्रत्येक सिनेमामधे भारतातल्या गरीबालाच परवडेल अश्या गोष्टी दाखवायच्या का हो?
फार प्रगल्भपणा होतोय ब्वा.. मजा जाऊ लागली..
हम्म
हम्म
नीधप, रॉयल्टीचा चेक पाठवून
नीधप, रॉयल्टीचा चेक पाठवून दे.
स्पेन ला जा हा मेन प्वाइंट
स्पेन ला जा हा मेन प्वाइंट थोडीच आहे
आयुष्याचा प्रत्येक क्षण आनंदानं जगा, लिव्ह लाइक देअर इज नो टुमॉरो संदेश देतो मुव्ही .. लोकेशन डजन्ट मॅटर :).
बाई, वाटच बघत होते बघा...
बाई, वाटच बघत होते बघा... तुमचे टिशर्ट पाठवणारच्चेय की..
स्वाती, ग्रे मा
स्वाती, ग्रे मा
धागा काय अन बोलतोय
धागा काय अन बोलतोय काय>>.
नताशा एक फूल यांच्या प्रतिसादातून स्फुर्ती घेऊन खालील विधान करत आहे.
===================================================
झक्क्यावतार व झक्कीवतार अशा दोन टर्म्स वाचल्या, सिंडरेला व नताशा यांच्याकडून! यातील फरक काय आहे ते नवोदितांना समजेल का असे विचारायचे होते. (दिवा)
==================================================
अवांतर प्रतिसादाबद्दल दिलगीर!
@चिनुक्स - जिंदगी वगरे
@चिनुक्स - जिंदगी वगरे प्रगल्भपणा ठिक आहे, चला कटरिनाला बघू.....
@स्वती - सिनेमाचं नाव 'चलो स्पेन' आहे का? --> नाहीना, जिंदगी वगरे काही तरी भारी नाव आहे, पण स्पेन का दाखवत आहेत?
@नीधप - प्रत्येक सिनेमामधे भारतातल्या गरीबालाच परवडेल अश्या गोष्टी दाखवायच्या का हो? - नाही...पण प्रत्येक आणि प्रत्येक (हल्लीचे काही चांगले अपवाद सोडून) अनिवासीय भारतीयांचिच life style दाखवायची का?
बघायला मजा येते बा ती लाइफ
बघायला मजा येते बा ती लाइफ स्टाइल...
नाहीतर पाणी गेलं, ट्रेन बंद पडल्या, कामवाली आली नाही.... हेच बघण्यात काय मज्जा ना!
विचारा की.
विचारा की.
डिज्जे मागे तो स्लमडॉग
डिज्जे
मागे तो स्लमडॉग मिलिओनेअर सिनेमा आला तेव्हा प्रत्येक आणि प्रत्येक सिनेमात भारतीयांची गरीबीच का दाखवतात असंही कोणीतरी विचारलं होतं.
कुठला सामाजिक वर्ग, कुठली स्थळं, कुठला काळ इ.इ. हिंदी सिनेमात दाखवलेलं चालेल त्याची एक यादीच बनवा बघू.
मागे तो स्लमडॉग मिलिओनेअर
मागे तो स्लमडॉग मिलिओनेअर सिनेमा आला तेव्हा प्रत्येक आणि प्रत्येक सिनेमात भारतीयांची गरीबीच का दाखवतात असंही कोणीतरी विचारलं होतं.
एक यादी बनवा बघू. कुठला सामाजिक वर्ग, कुठली स्थळं, कुठला काळ इ.इ. हिंदी सिनेमात दाखवलेलं चालेल त्याची. दिवा घ्या
<<
इथे पण ग्रे मा, अगदी तेच लिहिता लिहिता राहिले :).
भारतातल्या श्रीमंत लोकांची लाइफस्टाइल नको, मराठी कामवाली नको, स्लमडॉग्स नकोत, मैत्रीणीच्या लग्नात दारु पिउन ओकणारी नायिका नको, शिव्या देणारे युवक नकोत, लिव्ह इन नको, कमी ओळख असताना हॉटेल वर (मुलांना भेटायला गेलेली) मुलगी नको ( कॅज्युअल पार्टीला गेली असली तरी).. नकोचीच लिस्ट मोठी दिसते
स्वाती , डीजे
स्वाती , डीजे
उडाण, wakeupsid, कुठे गरिबी
उडाण, wakeupsid, कुठे गरिबी होती, आणि चित्रपट फार वाईट पण नव्ह्ते बहुदा
उडाण, wakeupsid, दबंग(एक गान
उडाण, wakeupsid, दबंग(एक गान सोडून<<<<
काय लिस्ट आहे.
@स्वाती, दीपांजली - तुमच्या
@स्वाती, दीपांजली - तुमच्या नकोच्य लिस्ट मधे -भारतातल्या श्रीमंत लोकांची लाइफस्टाइल हा माझा मुद्दा आहे, आणि त्याच स्पष्टिकरण देण्याचा प्रयत्न करते (बाकीच्या मुद्दां साठी त्या त्या लोकांना संपर्क साधणे)
कल हो ना होच्या आधिपासून ते जिंदगीच्या किती तरी नंतर पर्यंत ही लाईफस्टाईल दाखवण्यात येणार आहे. १,२,१०,५० चित्रपत ठीक आहे हे दखवायला, त्यामुळे ९०% भारतीय जे गरीब अस्तील, ते आपण पण अस आयुष्य जगू शकतो याची स्वप्न बघू शकतो. या बर्याच चित्रपटांमधे, कथानकाच आणि location च काही एक संबंध नसतो. कधी कधी तर वाटत दिग्दर्शक युद्ध आहे.त्याने austria मधे चित्रीत केला काय, तर मग मी spain मधे करेल अस वाटत. या सर्व भांडगडीत आपले भारतातले दैंदीन जिवन क्यामेर्या मधे टिपून जायचे राहून जातात. 'दो दुनी चार' या चित्रपटा मदे एका मध्यम वर्गीय कुटूंबाच जीवन दाखवल आहे, ते बघताना अस वाटल अरे आपल्या कडे असच व्हायच की. आणि तो चित्रपट खूप जवळचा वाटतो. सगळेच चित्रपट भारतातच बनले पाहिजे अस अट्टहास नाही आहे, पण ९०% टक्के चित्रपट हे भारताच्या बाहेर बनले पाहिजे याचे काय कारण? जर कथानक तस असेल तर जरूर बनवा, पण भारताच्या minority class ची लाईफस्टाईल (श्रिमंत) प्रत्येक चित्रपटात दाखवायच कारण? आणि शेवटी प्रत्येक चित्रपट प्रत्येकालाच आवडेल अस नाही. आणि कोणि ते बोलून दाखवल म्हणून दुसर्या चित्रपटा बद्दल कोण काय बोलल ते इथे लिहून त्याची यादी बनवून विषयांतर केल्य पेक्शा, 'भारतातल्या श्रीमंत लोकांची लाइफस्टाइल ' हा विषय सुरू असेल तर त्या विषयी बोलाव
नकोचीच लिस्ट मोठी दिसते>>>
नकोचीच लिस्ट मोठी दिसते>>> म्हंजे काय, आपली संस्कृती 'रसातळा'ला जाते अशाने
दाखवा हो काहीही! स्पेन असो
दाखवा हो काहीही! स्पेन असो नाहीतर बत्तीस शिराळे. पण सिनेमा चांगला काढा.
कौटुंबिक समस्याप्रधान काढा म्हणावं, कतरीनाला भाकर्या बडवतानाही नाही पाहिले.
>> ९०% टक्के चित्रपट हे
>> ९०% टक्के चित्रपट हे भारताच्या बाहेर बनले पाहिजे याचे काय कारण?
या एकाच चित्रपटापुरतं बोलू मग. (बाकीच्या टक्केवारीबद्दल त्या त्या डायरेक्टर्सशी संपर्क साधणे. :P)
>> जर कथानक तस असेल तर जरूर बनवा
इथे माझ्यामते कथानक तसं आहे. (नाहीतर कतरीना त्या मुलांच्या रूममधे आलेली दाखवता आली असती का? :P)
जोक्स अपार्ट, पण रसमलाई, लोकेशन्स फॅन्सी आहेत म्हणूनच केवळ सिनेमा चांगला म्हणणं जितकं चूक तितकाच उलटपक्षी मला तुमचा मुद्दा चुकीचा वाटला म्हणून लिहिलं.
Pages