कबीर. एका संपन्न घरातला, बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा. थोडा मनस्वी. अजून सडाफटिंग. पण नुकताच एका इंटेरियर डिझायनरला प्रपोज 'करून बसलाय'. आपली दोघांची कामे एकमेकांना पुरक आहेत- त्यामुळे आपले जमेल असे तो तिला सांगतोय. तीही खुश. एवढे तिला सांगितले हेच नशीब. कारण हा थोडा अबोल, इंट्रोव्हर्ट. मनातलं सहज दुसर्याला न सांगणारा.
अर्जून. हा वर्कोहोलिक. म्हणजे कॉलेजात असताना प्रेमबिम कधीकाळी केलेलं. पण पैशाच्या मागे धावणं, कामाला वाहून घेणं आड आलं. मग प्रेमभंग. त्यानंतर ते विसरण्यासाठी कदाचित, कामाला आणखीच वाहून घेतलं. पैसा है तो जहान है. लंडनमध्ये एका कंपनीत अत्यंत बिझी फायनान्शियल ब्रोकर म्हणून काम करतोय. बर्यापैकी पैसेही कमवतो.
इम्रान. हाही हळवा. कवीमनाचा, मनस्वी. पण उपजतच उत्तम विनोदबुद्धी लाभलेला. आणखी एक म्हणजे, याच्या बापाबद्दल याला बराच तरूण झाल्यावर कळते- ही एक सतत दुखरी नस घेऊन वावरणारा. ते विसरण्यासाठीच की काय, पण सतत गलछबूपणा करण्याची सवय, हौस. पण कवीमनाच्या सार्यांसारखीच याचीही गोची. जगण्यासाठी काम कसलं करतोस?- या प्रश्नाचं नीट उत्तर याला देता येत नाही.
या तीन मित्रांची कहाणी- म्हणजे झोया अख्तरचा 'जिंदगी मिले ना दोबारा'. स्वीट अँड क्युट अभय देओल, बिगेस्ट हंक ऋतिक रोशन आणि सो-कॉल्ड-गाय-नेक्स्ट-डोअर फरहान अख्तर- असली तगडी रिफ्रेशमेंट. सोबत सुप्रसिद्ध कतरिनाबाई, देव-डी फेम काल्की. जावेद अख्तरचे संवाद आणि कविता. शंकर-एहसान-लॉयचं संगीत. झोया अख्तरचं तरूणाईला भावणारं अत्यंत फ्रेश टेकिंग. काय बिशाद आहे पिक्चर आपटण्याची?
***
कबीरचं लग्न ठरतं, तसा तो अस्वस्थ होतो. आपले सडाफटिंग दिवस आता संपतील, याची हळहळ. सांगणार कुणाला? तर कॉलेजातल्या एकेकाळच्या त्या दोन जीवलग मित्रांना. पण तेही असं अॅक्रॉस टेबल बसून भडाभडा पाच मिनिटात बोलून टाकणं त्याच्यासारख्याला कसं शक्य आहे? तर नीट वातावरण निर्मिती होऊ देत. जरा आठ दिवस कॉलेजचे दिवस आठवत गुजगोष्टी होऊ देत. मग सख्खे मित्र असतील, तर ओळखतीलच मनीचा सल.
कॉलेज संपून दहा वर्षे झाली, पण त्याने मनात प्लॅन करून ठेवलेली 'बॅचलर्स ट्रिप' अजून होऊ शकलेली नाही. आता थोडेच दिवस राहिलेत, तर ही ट्रिप होणं त्याला फार फार आवश्यक वाटू लागलंय.
मग स्वतःच कार्याध्यक्ष बनून दोघांना फोन करून सांगतो. इम्रान बापडा तयारच असतो, पण बिझी अर्जूनभाऊंना इमोशनल ब्लॅकमेल करून रडातराऊतच घोड्यावर बसवावं लागतं. काम आहे, पैसे कमवायचेत- हे कारण तर आहेच, पण इम्रानसोबत असलेला जुना हिशेब हेही.
तर असं एकदाचं एकत्र गाठोडं बांधल्यावर टीम लीडर कबीर तिघांना घेऊन सहलीला निघतो. जुनी भांडणे, रुसवेफुगवे, रागवारागवी, गुजगोष्टी, पार्ट्या, डान्स आणि कतरिना- हे सारे होत असतानाच काही प्रसंग असे घडतात, की तिघांनाही जगण्याकडे वेगळ्या दृष्टीने बघण्याचे आपापल्या परीने साक्षात्कार होतात. वेगळे पर्स्पेक्टिव्ह मिळतात. एकमेकांसोबत घालवलेल्या क्षणांना नुसत्याच 'मित्रांचे हितगुज' यापलीकडे आणखीही वेगळा अर्थ मिळतो. आता जगलेले हे अफाट क्षण, जगणं श्रीमंत करून टाकण्याची ताकद असलेली, नव्याने मिळालेली वेगळी दृष्टी घेऊन तिघे निरोप घेतात.
***
अगदी साधीसोपी सरळ कथा. अत्यंत प्रेडिक्टेबल. मुळात 'कथा' म्हणावं की नाही, असाच प्रश्न पडेल. पण हेच या सिनेम्याचे बलस्थान ठरते. त्या मित्रांच्या जगण्याला, त्यांच्या जाणीवांच्या अख्ख्या संचाला नवे आयाम देणारे निरनिराळे प्रसंग आपल्याला स्पर्शून जातात. झोया अख्तर रियली हॅज डन अ फँटॅस्टिक जॉब. स्पेनमधल्या निसर्गाचे चित्रपटात केलेले चित्रण अत्यंत मोहक, हिप्नॉटायझिंग. सर्वांच्या चांगल्या अभिनयाने सजलेली एकूण एक फ्रेम जिवंत वाटेल, याची पूर्ण काळजी घेतली आहे.
ऑफ बीट सिनेम्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या अभयदेओलने या कमर्शियल सिनेम्यातही मस्त कमाल केली आहे. मी गेलो होतो फक्त त्याच्यासाठी (आणि सिनेमा संपल्यावर सर्वात जास्त लक्षात राहिलाही तोच), पण कंप्लीट पॅकेज वॉज अ स्वीट रिफ्रेशमेंट. ऋतिकच्या चाहत्यांनाही मेजवानी. मस्त दिसतो आणि वावरतो. कतरिनाचे दिसणे-वावरणे तिच्या आजवरच्या सार्या सिनेम्यांपेक्षा जास्त आवडले. फरहान अख्तरच्या आजवर इरिटेटिंग वाटण्यार्या आवाजातल्या कवितांमुळे कथानकाला एक वेगळेच सखोल परिमाण मिळते. 'वक्त के गहरे सन्नाटे, वक्त ने सभी को है बांटे..' सारख्या जावेदअख्तरसिग्नेचरस्टाईलमुळे ते सारे प्रसंग कमालीचे परिणामकारक वाटतात. अभिनय, ते सारे कथानकातल्या प्रसंगांचे तुकडे, संवाद, गाणी कुठेही उथळ होत नाहीत. दोन प्रसंगांत कुठेही सिनेमा रेंगाळल्याचे जाणवत नाही. अत्यंत ओघवत्या शैलीत चित्रित झालेले छोटेछोटे सस्पेन्सेसही रंगत आणतात. उगाच आपल्याला 'थ्रिल्ड' करून सोडण्यासाठी त्याचा वापर केला नाही, हे जाणवतं आणि आवडतंही. शंकरएहसानलॉयचं संगीत आधीच फेमस झालं आहे. 'सेनोरिटा..' गाणं आपल्याला ताल धरायला, रक्त सळसळायला लावणारं.
या सार्यापुढे क्वचित कुठेतरी वाटलेल्या अतर्क्य गोष्टींकडे आणि इतर तांत्रिक गोष्टींकडे फारसं लक्ष गेलं नाही.
पोहायला येत नसलेला, स्कुबा डायविंग मधल्या एन्लायटनिंग शांततेनंतरचा ऋतिक. आकाशात उडण्याचा, उंचीचा फोबिया असलेला, पण ते करून करून झाल्यानंतर जग जिंकल्याच्या आवेशातला फरहान. 'बुल-रन'साठी आयुष्य पणाला लावायला तयार झालेला, हेही करून बघायचेय- म्हणणारा अभय. नासिरुद्दीनला भेटल्यानंतर 'प्रश्न हा मुळी प्रश्न नव्हताच!' हा साक्षात्कार झालेला फरहान. टोमाटिना फेस्टिव्हल मध्ये 'आता ही शेवटचीच मस्ती, पुन्हा होणे नाही!' अशा थाटात सामील झालेले सारे.. किती साधे प्रसंग. पण पुन्हा पुन्हा आठवणारे. अस्वस्थ करणारे. आश्वस्तही करणारे.
***
आपल्याला आयुष्यात शेवटी हवं असतं तरी काय? तर याचं उत्तर नीट स्वतःलाच पटेल असं कुणी देऊ शकेल असं वाटत नाही. भुतकाळाची भुतं मानगुटीवर वागवत आणि भविष्याची चिंता करत आपला अख्खा जन्म जातो. जगणं हातातून कधी निसटून गेलं तेच शेवटपर्यंत कळत नसावं.
'शेवटी एकदा वाटून गेलं, जगणं हे जगणं नव्हतंच..
निकराने जगण्याच्या लायकीचं, हे आयुष्य नव्हतंच!'
असं सार्यांचं होत असेल का? आला क्षण साजरा करणं आयुष्यभर सार्यांचंच राहून जात असेल का?
आत्ता, आत्ताचा हाच एक क्षण आपला आहे. नंतरचं काही खरं नाही. गो फ्रेंड्स. इट्स अ बिग ट्रीट.
***
आयुष्यात पहिल्यांदा हा
आयुष्यात पहिल्यांदा हा चित्रपट मी फ़र्स्ट डे फ़र्स्ट शो बघितला.मला खुप आवडला हेच लिहायला आलो होतो.पण ती दुसरी नटी मला आवडली नाही. तसेच अगदी शेवटच्या गाण्याने परिणाम कमी होतो असे वाटले.
हा चित्रपट मुलाना घेवुन
हा चित्रपट मुलाना घेवुन जाण्यासारखा आहे का? कि पुन्हा देल्ली बेली स्टाइल?
मस्तच लिहलय परीक्षण...
मस्तच लिहलय परीक्षण... बघितलाच पहिजे आता हा चित्रपट
साजिरा छान परिक्षण ,
साजिरा छान परिक्षण , सगळ्यांचीच कामं छान झालीत ,पण सगळ्यात जास्त लक्षात राहिला तो फरहान.
मस्त परीक्षण साजिरा! नक्कीच
मस्त परीक्षण साजिरा! नक्कीच बघायचा आहे.
साजिरा मस्तच परीक्षण !
साजिरा मस्तच परीक्षण ! सिनेमाबद्दल बरंच ऐकलं होतं.
साजिर्या मस्त लिहिलं आहेस..
साजिर्या मस्त लिहिलं आहेस.. !!
आत्ता हा चित्रपट बघून येईपर्यंत हे वाचायचं ठेवलं होतं.. आल्या आल्या लगेच वाचलं..
चित्रपट खूप आवडला.. अभय देओल आणि स्पेनबद्दल अगदी अगदी.. !
फरहान, ऋतिक, कॅट सगळेच एकदम मस्त वावरलेत.. नसरुद्दिन शहा बद्दल काय बोलणार ? केवळ एक सीन असुनही भाव खाऊन गेला आहे..
नंतर विचार करताना रणबीरला ह्यात कुठे फिट करता आलं असतं का असा उगीच विचार आला..
सिनेमातले निरनिराळे प्रसंग
सिनेमातले निरनिराळे प्रसंग इ.बद्दलच्या अनेक पोस्टी मुद्दाम वाचल्या नाहीयेत. सिनेमा पाहून आल्यावर वाचणार
नंतर विचार करताना रणबीरला ह्यात कुठे फिट करता आलं असतं का असा उगीच विचार आला >>> पराग, माझ्या डोक्यात किडा सोडलास. बघ, आता सिनेमा पाहताना हा विचार करतच बघितला जाणार
मस्त आहे परिक्षण, आत्ता
मस्त आहे परिक्षण, आत्ता बघायलाच हवा लवकरात लवकर.
रणबीर तसा बच्चा दिसतो, यातले
रणबीर तसा बच्चा दिसतो, यातले ३ हिरो करिअर मधे सेट्ल् होउन काही वर्षं गेलेल्या एज गृप मधले,तिशीच्या आस पास नक्कीच दाखवायचे असतील :).
तरीही जर फिट करायचीच वेळ आली असती तर फरहान चा रोल अर्थात !
Btw, साजिर्याने दिलेल्या फोटोत काट्रिना बर्यापैकी गुटगुटीत बालिका दिसतेय.. :).. पण या मुव्ही मधे चक्क बरं काम केलय .
ती कल्की भारतीय सिनेमाच्या 'सुंदर अॅक्ट्रेस' कॅटॅगरीत बसत नाही पण पर्सनॅलिटी छान आहे तिची.. सुंदर नाहीये पण तिला दिलेल्या स्टाइल्स-फॅशन्स मस्त कॅरी करते.. गुड स्क्रिन प्रेझेन्स !
सुयोग, मूलांना बघण्यासारखा
सुयोग, मूलांना बघण्यासारखा आहे. (मी देलही बेल्ली पण बघितला, तो खरेच किळसवाणा आहे. यापेक्षा किळसवाणे हॉलीवूडचे सिनेमे मी बघितलेत, पण भारतातले नायक तेवढे निर्लज्ज होऊ शकत नाही. मग ना घर का ना घाट का, अशी परिस्थिती असते त्यांची. दिग्दर्शक परदेशी शिकून आलाय ते कळतंच. प्रासंगिक विनोदासाठी, मला जाने भी दो यारो, नंतर निखळ हसवणारा चित्रपटच आठवत नाही. हेराफेरी वगैरे ठिक होते, पण तो दर्जा नाहीच.)
तरीही जर फिट करायचीच वेळ आली
तरीही जर फिट करायचीच वेळ आली असती तर फरहान चा रोल अर्थात !<<< ना मुन्ना ना!!
फरहान मे जो बात है वो रणबीरमे कहां..
पण या मुव्ही मधे चक्क बरं काम केलय .<< तिच्या non existent अभिनयक्षमतेकडे बघता याला अनुचमोदन..
कल्की बद्दल अगदी अगदी.
फरहान मे जो बात है वो रणबीरमे
फरहान मे जो बात है वो रणबीरमे कहां
<<< ते आहेच गं म्हणूनच म्हंटलं 'करायची वेळ आली तर'
छान आहे परिक्षण, बघायलाच हवा
छान आहे परिक्षण, बघायलाच हवा सिनेमा लवकर.
अभय देओलचा भलताच मोठा फॅनक्लब
अभय देओलचा भलताच मोठा फॅनक्लब आहे की. तो एकदक क्युट आहे. मला सोचा न था पासुनच आवडला होता त्याचा अभिनय. तेव्हाच कळलं होतं कि हा तर लंबी रेस का घोडा आहे.
प्रतिसाद वाचताना मधेच तर हा AD चा फॅक्ल धागा वाटायला लागला होता मला.
चित्रपट आणि परीक्षण दोन्हीही
चित्रपट आणि परीक्षण दोन्हीही मस्त
शर्मिला, स्वाती, संघमित्रा,
शर्मिला, स्वाती,
संघमित्रा, अभय देओल हा माणूस मला त्यांच्या अत्यंत सहजसोप्या 'आपल्या वाटणार्या' डॉयलॉग डिलीव्हरी आणि बॉडी लँग्वेजसाठी लक्षात राहिला आहे. देवडी मध्ये त्याने माझ्या डोक्याला दिलेले अफाट शॉट अजूनही लक्षात आहेत. त्या तुलनेत जिंनामिदो काहीच नाही.
नी, डीजे, रणबीर कपूर.. नॉट ऑफ दॅट टाईप- एवढंच म्हणावंसं वाटतं. मी विचार करून बघितला. तिघांपैकी कुठेही सुट नाही होत आहे.
सार्यांनी सारे वाचा. पिक्चर बघितलेला असो नसो. नो प्रॉब्लेम.
कुठे काहींचं कन्फ्युजन झालं असावं / होईल असं वाटलं म्हणून-
कबीर= अभय, अर्जून = ऋतिक, इम्रान= फरहान.
मूव्ही मस्तच आहे..... मस्त
मूव्ही मस्तच आहे..... मस्त एन्जॉयला आम्ही
तरीही जर फिट करायचीच वेळ आली
तरीही जर फिट करायचीच वेळ आली असती तर फरहान चा रोल अर्थात ! >>>>> ह्म्म्म्म्म्म... फरहानला काढून नाही चालणार असं वाटलं मला तरी.. कारण त्याचे पंचेस सही आहेत.. जे तोच चांगले करू शकेल रणबीरपेक्षा.. शिवाय नसरूद्दीनबरोबरच्या सीनसाठी पन तोच हवा..
रणबीरला बसवायचच झालं तर ऋतिकच्याच जागी बसवता येइल खरं.. त्याचा अंजना अंजानी मधला रोल साधारण तसा होता.. शिवाय तो बोटीवरचा डो.ट.पा. सीन सोडता त्या कॅरॅक्टरला अॅक्टींगचा कस लागेल असे सीन नाहियेत विषेश.. ( अर्थात ह्यावरून माझ्यावर ऑलरेडी तुक पडले आहेत पण ऋतिककडे "बघण्याच्या" माझ्या आणि माहिलामंडळाच्या दृष्टीकोनातला फरक हेच काय ते कारण असावं.. )
ललिता.. गूड.. आता सांग मग तुला काय वाटलं ते..
पण या मुव्ही मधे चक्क बरं काम केलय . >>> हो.. अक्सेंटपण थोडा कमी वाटला..
अभय देओल हा माणूस मला त्यांच्या अत्यंत सहजसोप्या 'आपल्या वाटणार्या' डॉयलॉग डिलीव्हरी आणि बॉडी लँग्वेजसाठी लक्षात राहिला आहे >>>> अगदी अगदी.. सोचा ना था द बेस्ट होता !!
स्कुबा डायव्हिंगनंतरचा तो
स्कुबा डायव्हिंगनंतरचा तो (शर्मिला म्हणाली तसं) शांतता झिरपत असताना ब्रह्मज्ञान मिळाल्याचा शॉट फक्त ऋतिकच करू शकतो. बाकी कुणी नाही.
सिंधूदुर्गावर पहिल्याप्रथम स्नॉर्केलिंग केल्यावर समुद्राच्या थंड पाण्यातून कुडकुडत बाहेर निघाल्यानंतरचा, नंतर तासभर शांत बसलेला मी आठवला मला आता.
मी पण अभय देओल ची पंखी.
मी पण अभय देओल ची पंखी. परवाच त्याचा "रोड मूव्ही" पाहिला यू ट्युब वर. शेवट अजून पहायचा राहिलाय.
रणबीरला बसवायचच झालं तर
रणबीरला बसवायचच झालं तर ऋतिकच्याच जागी बसवता येइल खरं
शी... काय भयाण वेडेपणा.... मी अजिबात पाहिला नसता मग..
कुठे तो तोंडावर कायम बारा वाजल्याचे भाव घेऊन बसलेला रणबीर नी कुठे ऋतिक.... शी....
अर्थात ह्यावरून माझ्यावर ऑलरेडी तुक पडले आहेत पण ऋतिककडे "बघण्याच्या" माझ्या आणि माहिलामंडळाच्या दृष्टीकोनातला फरक हेच काय ते कारण असावं..
कैच्या कैच...
छे छे.. हॉट ऐवजी क्युट नाही
छे छे.. हॉट ऐवजी क्युट नाही चालणार पराग...ते म्हणाजे मिटक्या मारत कोल्हापुरी चिकन खायला बसलो पण ताटात पडली गुळपट भाजी होईल
रणाबीर funny guy होउ होउ शकतो पण hot नाही .. त्याचा जॉनरच वेगळाय..जाउ दे नकोच चालवायला रणबीर ला इथे.. नो क्युट ब्वाइज प्लिज...
अभय देओल हा माणूस मला
अभय देओल हा माणूस मला त्यांच्या अत्यंत सहजसोप्या 'आपल्या वाटणार्या' डॉयलॉग डिलीव्हरी आणि बॉडी लँग्वेजसाठी लक्षात राहिला आहे>>देव डी मधे कल्की नि माही गीलच्या भावखाऊ रोलपुढे लूसर देवदास कसला जमवलाय त्याने. आणि शेवटचा शॉट तर एकदम भारी.
jeethe....DIL CHAHATA HAI
jeethe....DIL CHAHATA HAI sampato....tithun haa movie chalu hoto.....
जाउ दे नकोच चालवायला रणबीर ला
जाउ दे नकोच चालवायला रणबीर ला इथे.. >>>>
नो क्युट ब्वाइज प्लिज...<<<
नो क्युट ब्वाइज प्लिज...<<< करेक्ट ही इज अ बॉय स्टिल. डज नॉट लुक लाइक अ मॅन यट!
मी चिल्लर पार्टीचे ट्रेलर
मी चिल्लर पार्टीचे ट्रेलर बघितले. निदान त्या ट्रेलरमधे तरी रणवीरचे "आयटम सॉंग" आहे.
टांय टांय फ़िट असे काहिसे शब्द आहेत. ते झाल्यावर ती मुलं म्हणतात. "अरे इससे कुछ
नही होनेवाला, चल सल्लू को पुछते है."
मला ह्रुतिक आणि रणवीर दोघेही आवडतात. पण आपापल्या जागीच !!!
साजिर्या, छान लिहिलं आहेस.
साजिर्या, छान लिहिलं आहेस.
बाकी, हृतिक आणि अभयच्या ऐवजी रणबीर आणि इम्रान हेच निवडले होते. पण दोघांनीही चित्रपट नाकारला. फरहान त्यांच्यापेक्षा मोठा दिसतो म्हणून.
छान लिहिलंय परीक्षण..
छान लिहिलंय परीक्षण..
Pages