कबीर. एका संपन्न घरातला, बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा. थोडा मनस्वी. अजून सडाफटिंग. पण नुकताच एका इंटेरियर डिझायनरला प्रपोज 'करून बसलाय'. आपली दोघांची कामे एकमेकांना पुरक आहेत- त्यामुळे आपले जमेल असे तो तिला सांगतोय. तीही खुश. एवढे तिला सांगितले हेच नशीब. कारण हा थोडा अबोल, इंट्रोव्हर्ट. मनातलं सहज दुसर्याला न सांगणारा.
अर्जून. हा वर्कोहोलिक. म्हणजे कॉलेजात असताना प्रेमबिम कधीकाळी केलेलं. पण पैशाच्या मागे धावणं, कामाला वाहून घेणं आड आलं. मग प्रेमभंग. त्यानंतर ते विसरण्यासाठी कदाचित, कामाला आणखीच वाहून घेतलं. पैसा है तो जहान है. लंडनमध्ये एका कंपनीत अत्यंत बिझी फायनान्शियल ब्रोकर म्हणून काम करतोय. बर्यापैकी पैसेही कमवतो.
इम्रान. हाही हळवा. कवीमनाचा, मनस्वी. पण उपजतच उत्तम विनोदबुद्धी लाभलेला. आणखी एक म्हणजे, याच्या बापाबद्दल याला बराच तरूण झाल्यावर कळते- ही एक सतत दुखरी नस घेऊन वावरणारा. ते विसरण्यासाठीच की काय, पण सतत गलछबूपणा करण्याची सवय, हौस. पण कवीमनाच्या सार्यांसारखीच याचीही गोची. जगण्यासाठी काम कसलं करतोस?- या प्रश्नाचं नीट उत्तर याला देता येत नाही.
या तीन मित्रांची कहाणी- म्हणजे झोया अख्तरचा 'जिंदगी मिले ना दोबारा'. स्वीट अँड क्युट अभय देओल, बिगेस्ट हंक ऋतिक रोशन आणि सो-कॉल्ड-गाय-नेक्स्ट-डोअर फरहान अख्तर- असली तगडी रिफ्रेशमेंट. सोबत सुप्रसिद्ध कतरिनाबाई, देव-डी फेम काल्की. जावेद अख्तरचे संवाद आणि कविता. शंकर-एहसान-लॉयचं संगीत. झोया अख्तरचं तरूणाईला भावणारं अत्यंत फ्रेश टेकिंग. काय बिशाद आहे पिक्चर आपटण्याची?
***
कबीरचं लग्न ठरतं, तसा तो अस्वस्थ होतो. आपले सडाफटिंग दिवस आता संपतील, याची हळहळ. सांगणार कुणाला? तर कॉलेजातल्या एकेकाळच्या त्या दोन जीवलग मित्रांना. पण तेही असं अॅक्रॉस टेबल बसून भडाभडा पाच मिनिटात बोलून टाकणं त्याच्यासारख्याला कसं शक्य आहे? तर नीट वातावरण निर्मिती होऊ देत. जरा आठ दिवस कॉलेजचे दिवस आठवत गुजगोष्टी होऊ देत. मग सख्खे मित्र असतील, तर ओळखतीलच मनीचा सल.
कॉलेज संपून दहा वर्षे झाली, पण त्याने मनात प्लॅन करून ठेवलेली 'बॅचलर्स ट्रिप' अजून होऊ शकलेली नाही. आता थोडेच दिवस राहिलेत, तर ही ट्रिप होणं त्याला फार फार आवश्यक वाटू लागलंय.
मग स्वतःच कार्याध्यक्ष बनून दोघांना फोन करून सांगतो. इम्रान बापडा तयारच असतो, पण बिझी अर्जूनभाऊंना इमोशनल ब्लॅकमेल करून रडातराऊतच घोड्यावर बसवावं लागतं. काम आहे, पैसे कमवायचेत- हे कारण तर आहेच, पण इम्रानसोबत असलेला जुना हिशेब हेही.
तर असं एकदाचं एकत्र गाठोडं बांधल्यावर टीम लीडर कबीर तिघांना घेऊन सहलीला निघतो. जुनी भांडणे, रुसवेफुगवे, रागवारागवी, गुजगोष्टी, पार्ट्या, डान्स आणि कतरिना- हे सारे होत असतानाच काही प्रसंग असे घडतात, की तिघांनाही जगण्याकडे वेगळ्या दृष्टीने बघण्याचे आपापल्या परीने साक्षात्कार होतात. वेगळे पर्स्पेक्टिव्ह मिळतात. एकमेकांसोबत घालवलेल्या क्षणांना नुसत्याच 'मित्रांचे हितगुज' यापलीकडे आणखीही वेगळा अर्थ मिळतो. आता जगलेले हे अफाट क्षण, जगणं श्रीमंत करून टाकण्याची ताकद असलेली, नव्याने मिळालेली वेगळी दृष्टी घेऊन तिघे निरोप घेतात.
***
अगदी साधीसोपी सरळ कथा. अत्यंत प्रेडिक्टेबल. मुळात 'कथा' म्हणावं की नाही, असाच प्रश्न पडेल. पण हेच या सिनेम्याचे बलस्थान ठरते. त्या मित्रांच्या जगण्याला, त्यांच्या जाणीवांच्या अख्ख्या संचाला नवे आयाम देणारे निरनिराळे प्रसंग आपल्याला स्पर्शून जातात. झोया अख्तर रियली हॅज डन अ फँटॅस्टिक जॉब. स्पेनमधल्या निसर्गाचे चित्रपटात केलेले चित्रण अत्यंत मोहक, हिप्नॉटायझिंग. सर्वांच्या चांगल्या अभिनयाने सजलेली एकूण एक फ्रेम जिवंत वाटेल, याची पूर्ण काळजी घेतली आहे.
ऑफ बीट सिनेम्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या अभयदेओलने या कमर्शियल सिनेम्यातही मस्त कमाल केली आहे. मी गेलो होतो फक्त त्याच्यासाठी (आणि सिनेमा संपल्यावर सर्वात जास्त लक्षात राहिलाही तोच), पण कंप्लीट पॅकेज वॉज अ स्वीट रिफ्रेशमेंट. ऋतिकच्या चाहत्यांनाही मेजवानी. मस्त दिसतो आणि वावरतो. कतरिनाचे दिसणे-वावरणे तिच्या आजवरच्या सार्या सिनेम्यांपेक्षा जास्त आवडले. फरहान अख्तरच्या आजवर इरिटेटिंग वाटण्यार्या आवाजातल्या कवितांमुळे कथानकाला एक वेगळेच सखोल परिमाण मिळते. 'वक्त के गहरे सन्नाटे, वक्त ने सभी को है बांटे..' सारख्या जावेदअख्तरसिग्नेचरस्टाईलमुळे ते सारे प्रसंग कमालीचे परिणामकारक वाटतात. अभिनय, ते सारे कथानकातल्या प्रसंगांचे तुकडे, संवाद, गाणी कुठेही उथळ होत नाहीत. दोन प्रसंगांत कुठेही सिनेमा रेंगाळल्याचे जाणवत नाही. अत्यंत ओघवत्या शैलीत चित्रित झालेले छोटेछोटे सस्पेन्सेसही रंगत आणतात. उगाच आपल्याला 'थ्रिल्ड' करून सोडण्यासाठी त्याचा वापर केला नाही, हे जाणवतं आणि आवडतंही. शंकरएहसानलॉयचं संगीत आधीच फेमस झालं आहे. 'सेनोरिटा..' गाणं आपल्याला ताल धरायला, रक्त सळसळायला लावणारं.
या सार्यापुढे क्वचित कुठेतरी वाटलेल्या अतर्क्य गोष्टींकडे आणि इतर तांत्रिक गोष्टींकडे फारसं लक्ष गेलं नाही.
पोहायला येत नसलेला, स्कुबा डायविंग मधल्या एन्लायटनिंग शांततेनंतरचा ऋतिक. आकाशात उडण्याचा, उंचीचा फोबिया असलेला, पण ते करून करून झाल्यानंतर जग जिंकल्याच्या आवेशातला फरहान. 'बुल-रन'साठी आयुष्य पणाला लावायला तयार झालेला, हेही करून बघायचेय- म्हणणारा अभय. नासिरुद्दीनला भेटल्यानंतर 'प्रश्न हा मुळी प्रश्न नव्हताच!' हा साक्षात्कार झालेला फरहान. टोमाटिना फेस्टिव्हल मध्ये 'आता ही शेवटचीच मस्ती, पुन्हा होणे नाही!' अशा थाटात सामील झालेले सारे.. किती साधे प्रसंग. पण पुन्हा पुन्हा आठवणारे. अस्वस्थ करणारे. आश्वस्तही करणारे.
***
आपल्याला आयुष्यात शेवटी हवं असतं तरी काय? तर याचं उत्तर नीट स्वतःलाच पटेल असं कुणी देऊ शकेल असं वाटत नाही. भुतकाळाची भुतं मानगुटीवर वागवत आणि भविष्याची चिंता करत आपला अख्खा जन्म जातो. जगणं हातातून कधी निसटून गेलं तेच शेवटपर्यंत कळत नसावं.
'शेवटी एकदा वाटून गेलं, जगणं हे जगणं नव्हतंच..
निकराने जगण्याच्या लायकीचं, हे आयुष्य नव्हतंच!'
असं सार्यांचं होत असेल का? आला क्षण साजरा करणं आयुष्यभर सार्यांचंच राहून जात असेल का?
आत्ता, आत्ताचा हाच एक क्षण आपला आहे. नंतरचं काही खरं नाही. गो फ्रेंड्स. इट्स अ बिग ट्रीट.
***
काल बघितला. आवडला. फ्रेश
काल बघितला. आवडला.
फ्रेश वाटला.
परिक्षण जास्त छान लिहिलंय चित्रपटापेक्षा.
काल पाहिला. कसा वाटला माहित
काल पाहिला. कसा वाटला माहित नाही कारण मी बराच वेळ फक्त hritik roshan आणि उरलेला वेळ अभय आणि फरहान ला पाहिले.
हं.........पहायला हवा
हं.........पहायला हवा "जिंदगी........."
फरहानने कवितेच्या ओळी जावेद
फरहानने कवितेच्या ओळी जावेद अख्तरना द्यायला तरी हवे होते
दोघांचाही आवाज सारखाच आहे. आणि मला दोधांचेही आवाज आवडतात. चित्रपटात तो कवी आहे आणि त्याला जसे जमते तशा त्या ओळी येतात. आता सगळ्याच कवींचे आवाज अमिताभसारखे असणार का?
शिवाय चित्रपटात त्याच्या कविता या त्यावेळचे त्याचे विचार म्हणुन येतात. तो मुद्दाम व्यासपिठावर उभा राहुन सादर करत नाही. त्यामुळे चालते. मला तरी पाहताना काही खटकले नाही. अर्थात मला चित्रपटात काहीच खटकले नाहीय, त्यामुळे हे खटकण्यासारखे असले तरी ते खटकले नाही. उलट ते तसेच यायला हवे होते असे वाटले. जसे कल्कीचे स्नॉब असणे, कतरिनाचे युएसधाटणीचे हिंदी बोलणे... ती कॅरेक्टर्सच तशी आहेत. त्यामुळे त्यांचे बोलणे वागणे खटकत नाही, मला तरी नॅचरल वाटले.
ऋतिक नवीन अपार्टमेंट घेतो, तेव्हा त्यात रमायला त्याची (जुनी) गर्लफ्रेंड नको म्हणते- हे ऋतिकला खुपते,
ऋतिकला काहीच खुपत नाही. त्याच्या गर्लफ्रेंडला अपार्टमेंट खुपत नाही तर त्याला एक मोठा जपानी क्लायंट मिळायचे चान्सेस असतात म्हणुन तिच्या वाढदिवशी इटलीला जायचा प्लान तो रद्द करतो हे खटकते. (जो त्याला नंतर मिळतोच.. मोशी मोशी ) तिला त्याचे उद्याच्या रिटायरमेंट प्लॅनसाठी आजच्या जगण्यावर पाणी ओतणे खटकते. तर त्याला तिचा आजचा वाढदिवस पुढच्या महिन्यात साजरा केल्यास काय बिघडणार हे कळत नाही त्याचे पर्यवसान शेवटी ब्रेकप मध्ये होते.
नुसता प्लॅन कॅन्सल करत नाही,
नुसता प्लॅन कॅन्सल करत नाही, तिला न विचारता/सांगता तिकिटं कॅन्सल करून मोकळा होतो. त्याचं काम महत्त्वाचं आहे, त्याची धडपड जेन्युइन आहे, त्याचे इश्श्यूज मोठ्ठे आहेत, आणि हे सगळं तिने (न सांगतासुद्धा) समजून घ्यायलाच हवं, नाही का? मग महिन्याभराने तो तिकिटं काढेल (असं समजूया, शक्यता कमीच!) तेव्हा तिने स्विच ऑन केल्यागत रोमॅन्टिकही व्हायला हवं. तिच्या आयुष्यात कधी काय चाललंय याचा संबंधच नाही.
खरा प्रॉब्लेम असं 'गृहित धरलं जाण्याचा' असतो.
काल शेवटी हि बकवास फिल्म
काल शेवटी हि बकवास फिल्म पाहिली. २०० रुपये वाया गेले. इतकी सामान्य फिल्म बरेच दिवसांनी पाहिली.
दिल चाहता है चा सीक्वेल.
चार वर्षाचे भांडण - परत तेच - तिथे आमीर अक्षय - इथे फरहान - रोशन
आमीरचा nughty/cool character - इथे फरहान
confused सैफ - इथे अभय
एका मुलीबरोबर (किंवा मुलाबरोबर) लग्न ठरलेले असताना शेवटी अचानक दिवे पेटुन दुसरीशी लग्न करणे हा formula किती वेळा बघायला लागणार अजुन माहित नाहि.:फिदी:
अजुन एक formula - अचानक कोणीतरी भेटणे - त्यांच्याबरोबर पुढचा प्रवास - स्कुबा डायविंग वाली ट्रेनर ३ पोरांबरोबर एकदम त्यांच्या रुम मधे येते. (हा नक्किच करन जोहर टच आहे ):फिदी:
आमीर चे DCH मधील character सारखा अभिनय करण्याचा फरहानचा केविलवाणा प्रयत्न हास्यास्पदच वाटतो. आमीरला त्याच्या जागी ठेवुन पाहात होतो आणी लगेच कळ्ले की फरहानच्या जागी आमीर असता तर त्याने हे character कुठल्या कुठे नेले असते. पण त्यासाठी तेवेढे talent लागते.
खरा प्रॉब्लेम असं 'गृहित धरलं
खरा प्रॉब्लेम असं 'गृहित धरलं जाण्याचा' असतो
हो..... लक बाय चान्स च्या शेवटी 'त्याच्या मते पश्चातापदग्ध' फरहान जी बडबड करतो ती ऐकुन मी तर 'आता ही बाई ह्या बडबडीला भुलून गळ्यात कायमची ब्याद घालुन घेतेय की काय' असा विचार करुन धसकले होते. आपली परंपराच आहे ना ती.. पण नशिब.. तिची विचार करण्याची क्षमता शिल्लक होती.
एका मुलीबरोबर (किंवा
एका मुलीबरोबर (किंवा मुलाबरोबर) लग्न ठरलेले असताना शेवटी अचानक दिवे पेटुन दुसरीशी लग्न करणे हा formula किती वेळा बघायला लागणार अजुन माहित नाहि.>>>>>>>>>>
अभयचा दिवा अचानक पेटत नाही ( करन जोहर टच सारखा ). तो लग्न ठरल्यानंतरचं नताशाचं ( कल्की ) वागणं पाहतो. त्या वागण्यानं हबकतो. बराच बराच विचार केल्यावर (" invitation cards छप चुके है,""families involve हो चुकी है " इ.संवाद आठवावेत ) नकाराच्या निर्णयावर येतो. ह्या मुलीशी लग्न करुन आपण नसती आफत ओढवून घेत आहोत हे जाणवल्यामुळे तो हा निर्णय घेतो. दुसर्या मुलीच्या प्रेमात पडल्यामुळे नव्हे. ( करन जोहर, शाहरुख खान आमिर खान, प्रिती झिंटा इ. इ. टच प्रमाणे.)
शेवटी अभय पुन्हा सिंगलच दाखवलाय की .
<<<<<<<<<<स्कुबा डायविंग वाली ट्रेनर ३ पोरांबरोबर एकदम त्यांच्या रुम मधे येते. (हा नक्किच करन जोहर टच आहे )>>>>>>>>>
हे कथानक out of india वाढलेल्या पात्रांचं आहे आणि ते out of india घडतांना दाखवलेलं आहे.
हे कथानक out of india
हे कथानक out of india वाढलेल्या पात्रांचं आहे आणि ते out of india घडतांना दाखवलेलं आहे. >>> आउट अओफ ईंडिया मध्येही असेच कोणीही कोणाबरोबर जात नाहि. निदान मी तरी पाहिले नाहि (हिंदि सिनेमा सोडला तर)
शेवटी अभय पुन्हा सिंगलच दाखवलाय की . >>> तुम्हि पिकचर निट पाहिला नाहि म्हणजे.!
अभयचा दिवा अचानक पेटत नाही ( करन जोहर टच सारखा ). >>>>
आणी थोडे थोडे फरक दाखवणारच की फरहान प्रतेय्क पिक्चरमध्ये. एवढी (एवढिच) अक्कल आहे त्याला. पण प्रेषकांना नाहि.
मला आपला म्हणा >>>> अमित,
मला आपला म्हणा
>>>>
अमित, म्हणजे तुला पण नगिना पार्ट ४ मध्ये रोल हवाय असंच ना.......
शेवटपर्यंत सस्पेन्स टिकवलाय
शेवटपर्यंत सस्पेन्स टिकवलाय त्यांनी. शेवटच्या गाण्यात नीट बघितलेत तर त्या कल्की दुसर्याच कोणाबरोबर तरी दाखवली आहे. अभय एकटा दाखवलाय शेवटी.
अभय आणि कल्की एकत्र आहेत असे वाटणारे काही सिन्स त्या गाण्यात आहेत पण तसे नाहीये
अर्थातच अभय एकटा आहे शेवटी.
अर्थातच अभय एकटा आहे शेवटी. अस्मानीला बरोबर कळलीय कथा. भुंगा आणि चाणक्य दोघेही भरकटलेत.
अभयची कथा चालू असताना आपले
अभयची कथा चालू असताना आपले लक्ष्य बहुधा "अस्मानात" असावे..... पुन्हा एकदा पाहा पिक्चर,...
अभयची कथा तुम्हाला कळलेलीच नाहिये>>>> नक्की का? मला वाटतं ज्यांना अभय आणि कल्कीचं लग्न होत आहे किंवा जमलंय असं वाटतंय त्यांनीच पुन्हा बघावा तो शेवटचा सीन. त्यात कल्की अभयबरोबर नाहिये. मधे मधे नाचताना/ फोटो काढताना येतात दोघं एकत्र, पण अभय शेवटी सिंगलच दाखवलाय.
तद्दन फिल्मी नाहिये ते! ३ नायकातला एक नायक असा सिंगल दाखवायला नक्कीच जास्त अक्कल लागते जी दिग्दर्शकाजवळ आहे!
आस्मानीला सांगणार्या लोकांना
आस्मानीला सांगणार्या लोकांना जो वाटतोय तो शेवट नाहीये.
शेवटच्या सीन ला ह्रितिक्-कट्रिनाचं लग्न दाखवलय , कल्की दुसर्या बरोबर दाखवलीये (जरी अधे मधे येउन अभय बरोबर नाचत असली तरीही) , फरहान त्या स्पॅनिश बेब बरोबर, अभय एकटाच दाखवलाय.
अभय शेवटी सगळ्या कपल्स चे फोटो काढताना दाखवलाय, आधी ह्रितिक्-कट्रिना , मग फरहान्-स्पॅनिश बेब आणि शेवटी कल्की आणि तिचा नवा 'तो', शेवटचा फोटो काढून अभय देओल चा एक क्षण क्लोज अप आहे .. गुड एक्प्रेशन्स त्या वेळी :).
त.टि. मला चॅलेंज करु नये, थिएटर मधे शेवटच्या क्षणा पर्यंत पाहिलाच आहे, अता कायमचा घरी आणलाय
धन्यवाद !!!
अभय एकटाच आहे शेवटी. झोया
अभय एकटाच आहे शेवटी. झोया अख्तरला तेवढी अक्कल असावीच. नसता तर भावला नसता, मला तरी.
चाणक्य, पिक्चर न आवडल्यामुळे आवडलेल्यांना मुर्खांच्या गणतीत सोडून का देत नाहीस तू? (हे सोपे आहे) ते नसेल करायचे तर, नाहीतर मग 'देव नाहीच' असे सप्रमाण सिद्ध करण्यासाठी अखेरपर्यंत प्राणपणाने लढणार्या इथल्याच त्या महान आयड्यांगत काहीतरी फँटॅस्टिक स्टफ तरी ओत इथे. (हे अवघडे भाऊ. गॉड ब्लेस यू.)
दुसरी गोष्ट, 'शेवटचे गाणे' म्हणून आजकाल जे दाखवतात, त्यात पिक्चर बनवणार्यांना आणि प्रेक्षकांना पूर्ण स्वातंत्र्य देऊन काहीही (खरेतर दाखवायचा ट्रेंड सुरू झाला आहे. यात एडिट झालेले, समावेश न केलेले, संस्कार न केलेले, रॉ शॉट्सही) दाखवले जाते. 'आपलां' पिक्चर कुठें संपलां, हें आपलें आपण ठरवावें. कसें? उगाच टेक्निकल खुस्पटे काढली की डोक्यास त्रास होतो.
डीजे प्रज्ञा, मी लिहीपर्यंत
डीजे
प्रज्ञा, मी लिहीपर्यंत तुझी पोस्ट आली. अक्कल हा शब्द किती युनिव्हर्सल आहे नाही? आणि किती एकटा नि दुर्मिळ बिचारा?!
खंडेराव
खंडेराव
इथल्या सगळ्यांच्या पोस्ट
इथल्या सगळ्यांच्या पोस्ट वाचल्या.. मला मिन्वा दीपांजली वगैरे काही लोकाना एवढीच वॉर्नींग द्यायची आहे की कटरीना बद्दल कुणी काही बोलायचे काम नाही.. जर कुणी काही बोलले तर मी तुमच्या हृतीकच्या मठ्ठ पणावर खुप खुप मोठ्ठा म्हणजे अगदी माबोवरच्या कादंबर्यांपेक्षा मोठ्ठा लेख लिहीन...
हो त्या गाण्याचा आणि पिक्चरचा
हो त्या गाण्याचा आणि पिक्चरचा काही संबंध नाही. शोलेच्या वेळेस असा ट्रेण्ड असता तर गब्बर, ठाकुर हातात हात, जय आणि राधा गळ्यात गळे घालून रॅप करताना, वीरू, बसंती, धन्नो व मौसी समूह नृत्य करताना टाकीवर दिसले असते व खाली आधीच मेलेले "तीनो हरामजादे", हन्गल चा भाचा ई. लोक एक्स्ट्रॉ मधे नाचताना दिसले असते
लालूला अनुमोदन. अतिशय उथळ
लालूला अनुमोदन. अतिशय उथळ वाटला सिनेमा.
मला आवडला.... प्रवास आवडला...
मला आवडला.... प्रवास आवडला... लोकेशन्स जबरी ... आयुष्यात कधीतरी जायला आवडेल.
आजचा दिवस जगा मनासारखा... उद्याची कशाला चिंता...
बहुधा कतरिनाला बघण्यात गुंग
बहुधा कतरिनाला बघण्यात गुंग झाल्याने माझाच काहीतरी घोळ झालेला दिसतोय.... इतक्या पोटतिडकिने दिपांजलीने चॅलेंज दिलाय.... पुन्हा बघावा लागणार सिनेमा........
मावळ्या, म्हणूनच म्हटलय
चाहत के दो पल भी मिल पाये
दुनिया मे ये भी कम है क्या
दो पल को तो आओ खो जाये
भुले हम होता गम है क्या
फारएण्डा
फारएण्डा
धागा काय, वाद कशावरून! ओल्ड
धागा काय, वाद कशावरून! ओल्ड मंकचीच आठवण झाली. पण माझे ८०% वेळा असते तसे चाणक्य यांना अनुमोदन, शैलीला नव्हे तर मुद्याला!
चित्रपटावरून स्फुर्ती घेऊन
चित्रपटावरून स्फुर्ती घेऊन नोव्हेंबरमधे मी माझ्या दोन जिवश्च कंठश्च मित्रांबरोबर "बॅचलर पार्टी टूर"वर जाणार आहे गोव्याला..........
फक्त कहानी मे एकच ट्विस्ट आहे, आम्ही तिघेही "मॅरीड" आहोत
चला आता फरहानला अजून एक आयडिया मिळाली दिल चाहता है चा पार्ट ३ बनवायला.....
"मॅरीड मित्रांची बॅचलर पार्टी"
मॅरीड मित्रांची बॅचलर
मॅरीड मित्रांची बॅचलर पार्टी>> भुंगा, सामान्य मध्यमवर्गीयाने फक्त स्वप्न पाहूनच स्वप्नपुर्ती झाल्यासारखे हसावे तसे का हासताय? (दिवा)
असे कित्येकवेळा केले असेल की तुम्ही?
बघीतला मी पण, छायाचित्रण
बघीतला मी पण, छायाचित्रण चांगले आहे. बाकी चित्रपट ठिकच आहे.
बेस्ट डायलॉग : (ह्रतिक ने
बेस्ट डायलॉग : (ह्रतिक ने फरहान ला .....कतरिनाला बघत) ........ पहले मॅने देखा है.
टेक्नीकल : ९० % सीन हे जरा लांबीने मोठे असावेत ते Editing मध्ये खूपच कापले गेलेत.......त्यामुळे तो खर्या दोस्तीचा इफेक्ट आला नाही.
बाकी ह्या सीनेमातून काय घेतलत? .......(लोकांसमोर इंप्रेशन म्हणून).......
येणार्या जीवनाचं प्लनींग करत मनाला नी शरीराला थकवून सोडण्यापेक्षा........जीवन हे ह्या क्षणातच दडले आहे त्याचा आजच आनंद लूटा.
.......(स्वगत).......
जर अशी स्पेन टूर करायची असेल तर खूप खूप पैसे कमवायला पाहिजेत. त्या साठी खूप खूप काम केले पाहिजे.
हा स्वतःचाच विचार स्वतःला आवडला नि बायको, मुलगा नि बहिण यांच्या सोबत घरी न जाता संध्याकाळी ६.१२ मि. मी कोटेशन टाईपाला ऑफिस गाठले.
(मंगळावार ची Vodafone ची स्कीम आहे १ टिकीटावर १ टिकीट फ्रि फेम मध्ये.......मी दोन मित्रांचे मोबाईल घेऊन गेलेलो)
डीजे, अस्मानी आभार, मला
डीजे, अस्मानी आभार, मला थिएटरमधे शेवटपर्यंत बघता आला नाही. कारण त्यावेळी लाईट लावले गेले आणि सफाईवाले आत शिरले होते !!
शेवटाबद्दल मलाही आधी थोडे
शेवटाबद्दल मलाही आधी थोडे गोंधळायला झाले होते. पाहुण्यांनी भरलेल्या मांडवात ऋतिक नाचतनाचत येतो आणि त्यावेळी स्टेजवर अभय नी कल्की असतात हे पाहुन मला त्यांचेच लग्न लागतेय असे वाटलेले पण नंतर कल्की दुस-याबरोबर दाखवलीय आणि अभय एकटा फोटो काढत फिरतोय..... बाकी ते स्वतःच्याच सापु/लग्नात स्वतःच एकटे नाचत यायचे हे मात्र सॉलिड
फारएण्ड, शोलेचे सॉल्लीड.. आणि हंगलभाचा नी हरामजादे एकत्र नाचताहेत हे डोळ्यासमोर आल्यावर जाम हसायला आले.
बेस्ट डायलॉग : (ह्रतिक ने फरहान ला .....कतरिनाला बघत) ........ पहले मॅने देखा है.
त्यावर फरहान - लेकीन बात पहले मैने की है
मला कतरीनाचा - मुझे अफसोस करना नही आता...
आणि यावर ऋतिकचे - और करनाभी नही चाहीये..
हेही खुप आवडले
या संवादाआधीचा कतरीना नी नुरियाचा शॉटही खुप छान आहे. नुकतेच जे घडुन गेलेय त्यावर विचार करत असलेल्या दोन मैत्रिणी.. खरेतर दोधीही आहेत एकाच खोलीत पण मने मात्र त्यांच्या स्वतःच्या जगात फिरताहेत. असा शॉट आधी कधी पाहिला नव्हता.. आता वाटले कदाचित स्त्री दिग्दर्शिकाच असा विचार करु शकत असेल....
Pages