हॅरी पॉटर

Submitted by चिमुरी on 2 August, 2011 - 23:04

हॅरी पॉटरवर बोलण्यासाठी हा धागा....

'स्पॉयलर अलर्ट' : ज्यांनी पुस्तके वाचली नाहियेत किंवा सगळे मूव्ही बघितले नाहियेत पण वाचायची किंवा बघायची इच्छा आहे आणि ज्यांना कोणतेही सस्पेन्स आधी कळायला नको आहेत त्यांच्यासाठी हा अलर्ट... वाचताना जरा जपुन वाचा.. कोणत्याही पोस्टला आता सस्पेन्स कळेल अशी अंधुकशीही शंका आली तर पुढे वाचु नका... ज्यांचे सगळी पुस्तके वाचुन झाली आहेत आणि मूव्हीज बघुन झाले आहेत अश्यांनी सगळ्या पोस्ट्स वाचायला हरकत नाही....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हम भी हूं. फॅन. फॅन.
सध्या मी तिसर्‍यांदा सगळी पुस्तकं वाचून काढली. जोशात. देथली हॅलोज माझे कोणीतरी ढापलेय, Sad (लोकं पुस्तकं का परत देत नाहीत. का?) ते आले परत किंवा निदान वाचायला मिळाले की लेख लिहीणार.

माझ्या साडेतिनवर्षाच्या मुलीला हॅरीच्या शाळेसारखी शाळा हवीये. ती कुठुन आणु आता Proud

रैना Happy माझंही ७वं पुस्तक मैत्रिणीकडे आहे.. अजुन परत मिळालं नाहिये.. Sad
माझ्या साडेतिनवर्षाच्या मुलीला हॅरीच्या शाळेसारखी शाळा हवीये.>>> मला पण अशी शाळा मिळाली ना तर मी परत शाळेत जायला तयार आहे Happy

मला एकदा सगळी पुस्तकं एका पाठोपाठ वाचुन काढायची आहेत आणि सगळे मूव्हीज थिअटर मधे एका पाठोपाठ बघायचे आहेत.....

चिमुरी ऑपरेट नाही. अ‍ॅपारेट म्हणजे एका जागेवरून ऑटोमॅटिक दुसर्‍या जागी जाता येणं.
तुम्ही अजून हॉगवर्टसच्या पाचव्याच वर्षात आहात का? वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यावरच करता येतं ते.
Wink

पहिलाच पॉटरपट परत बघताना ती पोरं किती गोंडस दिसतात नाही? विशेषतः हॅरी.
मी १-५ ची पारायणे केलीत. पुढे काय झालंय हे माहीत असूनही पुस्तक संपेपर्यंत ठेववत नाही.
६-७ एकेकदाच वाचलंय.
सहाव्या भागात ड्रॅको मॉल्फॉयची दया येते.

भरत, मला ती स्पेलिंग मिसटेक वाटली.. सॉरी..
वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यावरच करता येतं ते.>>> मला वाटतं १७ वर्षे.. त्यांच्याकडे १७ ला अडल्ट होतात.. Happy

पहिलाच पॉटरपट परत बघताना ती पोरं किती गोंडस दिसतात नाही? विशेषतः हॅरी.>>>>>>>>>>>>>>> अगदी खरं Happy

सहाव्या भागात ड्रॅको मॉल्फॉयची दया येते.>>> आणि सातव्या भागात त्याच्या आईची...

मी पण, मी पण

मी Prisoner of Azkaban सगळ्यात आधी वाचलं, मग Chamber of Secrets आणि मग Philosophers' Stone Lol
नंतरची मात्र आली त्या ऑर्डरमधे

आसपास काळा कुत्रा दिसला की मी पटकण म्हणून जाते - सिरियस ब्लॅक Happy

हल्ली शिरीन रस्त्यात काही दिसलेलं मागायला लागली की मी म्हणते Accio वस्तू करून नाही गं येत वस्तू हातात.....

हॅरी पॉटर - सगळी पुस्तकं आहेत माझ्याकडे. फॅन. (इथे क्लब नाही का? Proud )
ही पुस्तकं मी कोणालाही देत नाही, देणार नाही Proud

मी पण तुमच्यामध्ये. Happy
पण मी सगळे चित्रपट नाही बघितले . शेवटचे तिन थिएटरमध्ये बघता नाही आले. Sad पुस्तकांची मात्र सलग पारायणं झाली आहेत.

रैना, इराला हॅरी पॉटर माहितिये? व्वा...:)

शैलजा, धाग्याचं नाव फॅन क्लबच करणार होते.. पण नको म्हटलं Happy

ही पुस्तकं मी कोणालाही देत नाही, देणार नाही >>>>> मी देते कारण पहिली सहा पुस्तकं मी कोणाकोणाकडुन एक-दोन दिवसाच्या बोलीवर आणुन वाचली होती... नंतर पारायणं करायची म्हणुन १-४ भाग मी विकत घेतले आणि ५-६ भाग मैत्रिणीने.. आणि ७वं पुस्तक मात्र ते ज्या दिवशी आलं त्यादिवशी माझ्याकरता मैत्रिणीने घेवुन स्वतः १ दिवसात वाचुन नंतर मला दिलं.. phd च्या अ‍ॅडमिशनच्या मुलाखतीसाठी गेले होते तरिही ते पुस्तक वाचत बसले होते.. मुलाखतीत काय झालं हे सांगायलाच नको.. Happy
त्यामुळे जे कोणी हॅरी पॉटरचे फॅन आहेत आणि केवळ पुस्तके नाहीत म्हणुन जे वाचत नाहियेत त्यांना मी देते पुस्तकं..

शेवटचे तिन थिएटरमध्ये बघता नाही आले.>>> Sad सो सॅड अल्पना... हे मूव्हीज थिअटरमधे बघायला जास्त मजा येते...

कोनी अगदी तंतोतंत पुस्तकाप्रमाणे मूव्ही काढला आणि तो अगदी १०-१२ तासाचा झाला तरिही मी बघायला तयार आहे...

मगल्सना हा धागा दिसणार नाही असं काही करता येईल का?>>> भरत, आपण स्वतःला विझार्ड समजता का??? Wink

खरं तर असा धागा असावा असं मला केव्हापासून वाटत होतं, पण स्वतः उघडायची हिंमत नव्हती. चिमुरी तुमचं अभिनंदन आणि आभार Happy

म्हणजे पूर्ण २४ तास वाचनात का?>>> ऑलमोस्ट... कारण पुस्तक तिने घेतल्याच्या दुसर्‍या दिवशी दुपारी ते माझ्याकडे होते.. Happy

खरं तर असा धागा असावा असं मला केव्हापासून वाटत होतं, पण स्वतः उघडायची हिंमत नव्हती. >>>>>>> घाबरायचं काय यात... ग्रिफिन्डर्सला शोभत नाही हे Happy

पुस्तके मी वाचली नाहीयेत पण सिनेमे सगळे पाहिलेत.
आत्ता शेवटचा ३डी पाहिला. ३डी मधे हॉगवर्डस अफलातुन दिसतेय.

चित्रपट बघता न आल्याबद्दल खूप काही वाईट वाटत नाही मला. कारण तसंही हॅपॉ चित्रपट बघण्यात तितकी मजा नाही जितकी पुस्तकांमध्ये आहे. Happy

सावली, मूव्हीज आवडले असतील आणि वेळ असेल तर पुस्तकं नक्की वाच... पुस्तकं खूप छान आहेत...

कारण तसंही हॅपॉ चित्रपट बघण्यात तितकी मजा नाही जितकी पुस्तकांमध्ये आहे.>>>>>>>>>> अगदी अगदी... पण तरिही बघ जमल तर कारण नंतर सीडीवर बघायला तितकी मजा येत नाही..

मी हफलपफ मधे आहे ना>>> हो का? मला माहित नव्हत Happy

http://www.pottermore.com/>>> मी नाही गेलेय तिथे...

हॅरीपट broke my heart (तरीपण काही पाहिलेत Sad ). त्यानंतर मी त्या चित्रपटांचा नादच सोडला. माझ्या मनातील रॉन, रॉनची आई, फ्रेड ,जॉर्ज,जिनी & आख्खी वीझली फॅमिली, हेग्रीड, पेटुनिया मावशी - हे सर्वच वेगळे होते.
त्यातल्यात्यात हॅरी आणि हर्मायनी मात्र ओके.

फॅन नसलेले मगल्स >> Happy
ही पुस्तकं मी कोणालाही देत नाही, देणार नाही >> मीपण आता देणार नाहीये. सातातील ३ गायब आहेत. त्या लोकांना मी शाप दिलाय यु नो. Proud
चिमुरी- २४ तास Happy

मला तर नेहमी वाटतं की हॉगवर्टस सारखी शाळा असावी. मी तर हॅरी पॉटर थीम पार्क्स कुठे आहेत का हे पण गुगललंय. आहेत म्हणे. तिथं जाऊन एक दिवसतरी त्यांच्या सारखं आयुष्य जगायला मिळालं पाहीजे असं वाटतं.

चित्रपटांविषयी बोलायचं म्हटालं तर शेवटचा ३डी भाग हा हॅरी पॉटरच्या सर्व भागांपेक्षा उच्च झाला आहे. तो पाहून मी अक्षरशः भारावून गेलो होतो. या एकाच भागाने पुस्तकाशी सर्वात जास्त ईमान राखलंय. नाहीतर ईतर भाग पाहिल्यावर 'कुछ जम्या नही ' , 'पुस्तकच बरं' असं म्हणतंच सिनेमागृहातून बाहेर पडायचो.

मात्र आता पुन्हा हॅरी पॉटर भेटणार नाही ही हुरहुर फार लागलीय हो मनाला. Sad

ता.क. - सर्वच्या सर्व पुस्तकांची आजवर कमीत कमी १५-२० वेळातरी पारायणं केली आहेत मी. Happy

Pages