Submitted by चिमुरी on 2 August, 2011 - 23:04
हॅरी पॉटरवर बोलण्यासाठी हा धागा....
'स्पॉयलर अलर्ट' : ज्यांनी पुस्तके वाचली नाहियेत किंवा सगळे मूव्ही बघितले नाहियेत पण वाचायची किंवा बघायची इच्छा आहे आणि ज्यांना कोणतेही सस्पेन्स आधी कळायला नको आहेत त्यांच्यासाठी हा अलर्ट... वाचताना जरा जपुन वाचा.. कोणत्याही पोस्टला आता सस्पेन्स कळेल अशी अंधुकशीही शंका आली तर पुढे वाचु नका... ज्यांचे सगळी पुस्तके वाचुन झाली आहेत आणि मूव्हीज बघुन झाले आहेत अश्यांनी सगळ्या पोस्ट्स वाचायला हरकत नाही....
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
हे ते वादग्रस्त ट्वीट.
ही बातमी वाचली होती पण ते
ही बातमी वाचली होती पण ते 'trans' प्रकरण काय असतं हे भारतात समजण्यासारखं नाही. मला काही समजलं नाही अजून की काय म्हणते रोलिंग बाई.
भारतात कशाला? रोलिंग बाईना
भारतात कशाला? रोलिंग बाईना दुदैवाने सेक्स आणि जेंडर मधला फरक समजला नाही, आणि त्यांनी तो शिकण्याची तयारीही दाखवली नाही. रोलिंगबाई ट्रांसफोबिक नसतील कदाचित, पण इग्नोरंट नक्की आहेत.
मराठीत सेक्स आणि जेंडरला वेगळे शब्द तयार करण्यापासून तयारी आहे. तर ते असो.
मानव, वेलकम टू हॉगवर्ड्स!
मला झेपलच नाही नक्की
मला झेपलच नाही नक्की
रोलिंग आणि ट्रान्स प्रकरण-
रोलिंग आणि ट्रान्स प्रकरण- मला थोडक्यात समजलं त्यानुसार-
ट्रान्स- त्यातही स्पेसिफिकली जन्माने पुरुष असलेले लोक जे नंतर बाईप्रमाणे कपडे करतात आणि काही वेळा तसं ऑपरेशन करून घेतात - त्यांना नॉर्मल नैसर्गिक बाईचे सर्व राईट्स तसेच्या तसे हवे आहेत.
(जन्माने बाई आणि नंतर पुरुष झालेले ट्रान्स त्या तुलनेत गरीब आहेत. फारसे vocal दिसत नाहीत.)
तर या ट्रान्सना बायकांच्या स्पोर्ट्समध्ये भाग घ्यायचा असतो. पण हे जन्माने पुरुष आहेत. त्यांची बॉडी पुरुषाची आहे.
यामुळे त्यांनी पुरुषांच्या कॅटेगरीतून किंवा आपली तिसरी कॅटेगरी निर्माण करून त्यातून भाग घ्यावा असं बायकांचं म्हणणं आहे.
ट्रान्सना बायकांच्या रेस्टरुम वापरायच्या असतात. बायकांना सेपरेट रेस्टरूम्स नकोत असा ते हट्ट करतात. तेही बऱ्याच जणांना मान्य नाही. 13-14 वर्षांची पोरगी रेस्टरूममध्ये गेली, तिथे कोणी भीतीदायक ट्रान्स आला/आली/आलं, त्याने तिला काही अपाय केला तर त्याची जबाबदारी कोण घेणार हा पालकांनाही प्रश्न पडतो. त्यापेक्षा तिसरी बाथरूम बांधा हे योग्य. पण आम्ही 'तिसरे' नाही, आम्ही बायकाच आहोत असं ट्रान्स व्यक्तींचं म्हणणं आहे.
ट्रान्स व्यक्तींनी लेडीज डब्यातून प्रवास करणं, लेडीज बाथरूम वापरणं यात नॉर्मल बायकांना uncomfortable, unhygienic, असुरक्षित वाटणे, गर्दी वाढणे असे अनेक इश्यूज आहेत.
इतकंच काय, एखाद्या नॉर्मल पुरुषाने नॉर्मल नैसर्गिक स्त्रीशी डेटिंग करणं, लग्न करून मुलंबाळं प्लॅन करणं- हेही आता transphobic मानलं जातं. नॉर्मल स्ट्रेट पुरुषाला ट्रान्स व्यक्तीबद्दलही सेमच आकर्षण वाटायला हवं असा दबाव वाढतो आहे. त्याचप्रमाणे दोन नॉर्मल सुंदर स्त्रियांनी एकमेकांशी लेस्बियन रिलेशन ठेवण्यालाही ट्रान्स चा विरोध आहे. तसं करणं पण transphobia आहे म्हणे.
रोलिंग बाईंनी या सगळ्या विकृतपणाविरुद्ध आवाज उठवला म्हणून आता त्यांच्यावर सर्व प्रकारचे हल्ले होत आहेत.
इथे 'नॉर्मल' हा शब्द वापरने
इथे 'नॉर्मल' हा शब्द वापरने योग्य आहे का मूळात?
माझ्यामते वेगाला धागा काढून चर्चा करा.
>>> खाद्या नॉर्मल पुरुषाने
>>> खाद्या नॉर्मल पुरुषाने नॉर्मल नैसर्गिक स्त्रीशी डेटिंग करणं, लग्न करून मुलंबाळं प्लॅन करणं- हेही आता transphobic मानलं जातं.
हा निष्कर्ष कशावरून निघाला आहे?
परागला अनुमोदन - ही चर्चा निराळ्या धाग्यावर व्हावी.
स्वाती,
स्वाती,
https://mashable.com/article/no-trans-people-preference-transphobic
https://www.advocate.com/commentary/2019/12/14/refusing-date-trans-peopl...
दोन्ही लिंक्स पाहिल्या.
दोन्ही लिंक्स पाहिल्या. दोन्ही लेखांचा मला कळलेला सारांश असा:
ट्रान्स व्यक्तींना पार्टनर्सच काय, डेट्ससुद्धा मिळणं अवघड असतं, कारण सहसा (स्वत: कोणतीही जेन्डर आयडेन्टिटी वा कल असणारी, इन्क्लुडिंग सिस्जेन्डर स्ट्रेट ) मंडळी अशा व्यक्तींशी डेटिंग करणं टाळतात. एखाद्या व्यक्तीशी सूर जुळणं हे लिंगनिरपेक्ष असू शकत नाही का? निदान सर्व व्यक्तींना तशी संधी मिळायला नको का? बोलाचालींची सुरुवातच 'आज ना उद्या आपण शारीरिक संबंधांपर्यंत पोचणारच, तेव्हा नकोच तुमच्या भानगडीत पडायला' अशीच होणं हे नाकारल्या जाणार्या व्यक्तीसाठी किती वेदनादायक असू शकेल याचा आपण विचार करतो का? बरं शरीरसंबंधांचाच विचार प्रामुख्याने करणं ही सहजप्रवृत्ती असेल - त्याहीपुढे जाऊन नॉनट्रान्स लोकांशीच संबंध ठेवावेसे वाटणं हीच सहजप्रवृत्ती असेल तर ट्रान्स-पोर्न इतकं लोकप्रिय का?
तुम्ही त्या लेखांतले काहीच शब्द विनासंदर्भ उचलून त्यांचा विपर्यास करत आहात - ते हेतुपुरस्सर नसेल अशी आशा करते.
ट्रान्सजेन्डर म्हणजे काय, आणि ती विकृती का नाही, हे खरंच समजून घ्यायची इच्छा असेल तर माझा हा लेख वाचा अशी विनंती करेन.
हो वेगळा धागा काढला तर बरे
हो वेगळा धागा काढला तर बरे होईल. हॅपॉ च्या धाग्यावर ही चर्चा अवांतर आहे.
त्या दोन्ही लिन्क्स मधले लेख वाचले. डेटिंग संदर्भात ट्रान्स लोकांना कशी वागणूक मिळते त्याचा अभ्यास करायचा प्रयत्न केलेला आहे. कोणी कोणाशी डेटवर जावे आणि नाही गेलात तर तुम्ही कसलेतरी फोबिक असा कोठेही आव नाही. उलट त्या दुसर्या लेखात तसा स्पष्ट खुलासाही आहे.
बाकी कोणत्याही मूव्हमेण्ट मधे एकदम रॅडिकल मते असलेले काही नग असतातच. त्यांची मते त्याला सपोर्ट करणार्या सर्वांचीच प्रातिनिधिक मते नसतात. म्हणजे हरिद्वारला त्या कोणत्यातरी सनातनी संमेलनात जे काही बोलले गेले ते "आजकाल हिंदू लोक असेच म्हणतात" म्हंटल्यासारखे होईल.
होय वेगळा धागा काढलेला उत्तम
होय वेगळा धागा काढलेला उत्तम
मला फक्त रोलिंग बाईंचे ट्विट समजले नाही इतकंच म्हणायचं होतं
त्यानंतर व्हाइटहॅट यांचा प्रतिसाद वाचून ऑ असंच झालं
हे सगळं कुठं होतंय म्हणे?
एकाच धाग्यावर हॉगवर्ट्स ते
एकाच धाग्यावर हॉगवर्ट्स ते हरिद्वार असा प्रवास पुर्ण झाल्यामुळे मी आता सुडोमी.
वेगळा धागा काढला आहे -
वेगळा धागा काढला आहे -
https://www.maayboli.com/node/80876
ज्या कोणी लोकांनी त्यांना
ज्या कोणी लोकांनी त्यांना इमोशनल झाल्याचे लिहिले आहे त्यांना अनुमोदन. Same here!
खुपच मजा आली परत सगळं बघायला आणि पडद्यामागचे फूटेज आणि गमती एकायला. मग परत सगळे पिकचर एका मागून एक बघून काढले. फारच अवघड आहे त्या विश्वातून परत बाहेर निघून आपल्या दैनंदिन जीवनात परत सेटल व्हायला. माणूस २-३ दिवस जरा हवेतच असतो.
वैद्यबुवा! फक्त २-३ दिवसच? तर
वैद्यबुवा! फक्त २-३ दिवसच? ती सगळी पुस्तके वाचल्यापासुन(ऐकल्यापासुन) गेली २-३ वर्षे माझे मन अजुनही हॅरी पॉटरच्याच विश्वात रेंगाळत आहे. जिम डेल माझ्या गाडीत कायमचा अडकुन पडला आहे..
मानव पृथ्वीकर, अजुन तुम्ही फक्त पहिलेच पुस्तक वाचले आहे, सगळी पुस्तके वाचुन झाल्यावर जे तुम्हाला वाटेल ते इथे येउन आम्हा सगळ्या हॅरी पॉटर फॅन्सबरोबर शेअर करण्यास विसरु नका! फक्त १ विनंती करतो.ती सगळी पुस्तके इंग्रजीतच वाचा! एका अदभुत दुनियेत तुम्ही शिरला आहात! सातवे पुस्तक, डेथली हॅलोज तर सगळ्यात कळस!
कोणी हॉगवॉर्ट टुर्नामेंट ऑफ हाउसेस( हेलन मिरन ने होस्ट केलेला) हा क्विझ शो बघीतला का? ठिक होता. बरेचशे प्रश्न फारच बाळबोध होते. आपण इथल्या या धाग्यावरच्या डाय हार्ड फॅन्सची टिम बनवली असती तर सहज जिंकलो असतो
अमीतव, मुकुंद धन्यवाद.
अमीतव, मुकुंद धन्यवाद.
नक्की शेअर करेन मुकुंद.
लॉकडाऊन लागले तेव्हा लायब्ररी बंद आणि सुरवातीला ऑनलाइन काहीही (पुस्तकं सुद्धा) मागवायचे नाही ठरवले होते. वेब सीरिज चित्रपट बरेच पाहून झाले तरी लोकांना काय चांगलं पहायला विचारून विचारून पाहु लागलो. आणि मग वाचनाची सवयच मोडली.
तेव्हा किंडल सबस्क्रिप्शन का घेतले नाही, कळतच नाही. तेव्हा हॅरी पॉटर हाती पडला असता तर दिवस रात्र वाचता आला असता.
मुलासाठी म्हणून रोज एक तास
मुलासाठी म्हणून रोज एक तास हैरी पॉटरसिनेमा ची पारायणं सुरू आहेत सध्या.
गॉब्लेट ऑफ फायर सुरू आहे सध्या.
मुलगा पहिल्यांदा पाहतोय. एन्जॉय करतोय.
काल पहिला भाग आणि आज दुसरा
काल पहिला भाग आणि आज दुसरा भाग बघितला पहिल्यांदाच. मला फिक्शन फारसे आवडत नाही, पण दोन्ही भाग आवडले. रोज १ असे उरलेले बघायचा विचार आहे.
Please raise your wands for
Please raise your wands for Michael Gambon aka Albus Dumbledore
मला नेहमी पहिल्या दोन
मला नेहमी पहिल्या दोन भागांतले डंबलडोअर जास्त आवडायचे पण गॅम्बन सुद्धा भारीच होते. दोघांमध्ये बराच फरक होता. पहिले डंबलडोअर जास्त मिश्किल आणि प्रेमळ वाटायचे, तर दुसरे थोडेसे आक्रमक. ह्याबाबत सर्वात विनोदी किस्सा चौथा सिनेमात आहे. जेव्हा हॅरीचे नाव गॉब्लेट ऑफ फायर मधून निघते तेव्हा डंबलडोअर आणि इतर काही मंत्री येऊन त्याला "तू तुझे नाव टाकलेस का" असे विचारतात. पुस्तकात वाक्य आहे "Dumbledore asked calmly". सिनेमात मात्र ते पळत येतात, हॅरीची कॉलर पकडून त्याला कपाटला धडकवून जोरात ओरडून विचारतात. ह्या फरकावर एक जबर विनोदी व्हिडीओ आहे : https://youtu.be/xSxQcAm3PE8?si=GVVRmkqM_SQZ5HuV
Albus Percival Wulfric Brian
Albus Percival Wulfric Brian Michael Gambon!
न्यू यॉर्क टाइम्स मधे
न्यू यॉर्क टाइम्स मधे पहिल्याच परिच्छेदात अँगस डंबलडोअर लिहिले होते : कपाळबडवती:
"It is our choices, Harry,
"It is our choices, Harry, that show what we truly are, far more than our abilities."
पहिला डंबलडोर मिश्किल आणि हुषार होता. पण गॅम्बिनची पण सवय झालेली.
"It is our choices, Harry,
"It is our choices, Harry, that show what we truly are, far more than our abilities."
अमितव, हेच नाही तर हॅरी आणी डंबलडोर मधे जे अनेक फिलॉसॉफिकल संवाद झाले आहेत, खासकरुन हाफ ब्लड प्रीन्स व डेथली हॉलोज भागात, ते सगळेच,पुस्तकात जेके बाइंनी खुप मस्त रंगवले आहेत. सिनेमात तश्या संवांदाना पुरेसा न्याय मिळाला नाही असे मला नेहमी वाटत राहीले आहे. त्यामुळे पुस्तकातला डंबलडोर मनाला खुप भावुन जातो. पण Michael Gambon ने चित्रपटांमधे डंबलडोर मस्तच उभा केला आहे यात वादच नाही! वाइट वाटले या बातमीने.
डंबलडोर ही हॅरी पॉटर पुस्तक मालीकेमधली माझी सगळ्यात जास्त आवडती व्यक्तिरेखा होय! हाफ ब्लड प्रिंस पुस्तकात जेव्हा प्रचंड पराक्रमी व मोस्ट पॉवरफुल विझर्ड असणार्या डंबलडोरचा म्रुत्यु होतो तेव्हा उद्वेगाने आता पुस्तक वाचायचे सोडुन द्यावे असे वाटु लागले होते. आता हॅरीला कोण वाचवणार अस वारंवार मनात येउ लागले. जोपर्यंत डंबलडोर जिवंत होते तोपर्यंत व्होल्डोमोर्टच काय पण कोणीही हॅरीच्या केसालाही धक्का लाउ शकणार नाही याची खात्री वाटत होती.
डॉबी व डंबलडोरला जेके बाइंनी उगाच मारले असे मला अजुनही वाटते.
एनिवे! डंबलडोरची भुमिका चित्रपटात साकार करणार्या या नटाला श्रद्धांजली!
डॉबी व डंबलडोरला जेके बाइंनी
डॉबी व डंबलडोरला जेके बाइंनी उगाच मारले असे मला अजुनही वाटते. +१ आणि ब्लॅक ला पण!
अरे! त्याची काय चातुर्मासातील
अरे! त्याची काय चातुर्मासातील कहाणी करायची आहे का? उगाच मारले काय?
डंबलडोरला उगा त्या प्लॅटफॉर्मवर येऊन सगळे राहिलेले हातचे वगैरे घेऊन समिकरणं सोडवलेली वाचताना किती भारी वाटलं तरी ते मला अनेकदा दुसरं आणखी काही ब्रिलियंट न सुचल्याने केलेलं गिमिकही वाटतं.
अरिआना/ अॅबरफोर्थ आणि डंबलडोअरचे मातीचे पाय हा कळस होता. परत डंडोला न आणता काही करता आलं असतं तर असा विचार अनेकदा केला आहे.
फ्रेडला उगाच मारलं म्हटलं तर समजू शकतो. पण डॉबी आणि डंबलडोरचा आणि सिरिअसचा एक्झिट ही भारी घेतला आहे.
काल हॅरी पॉटर अँड द सॉर्सरर्स
काल हॅरी पॉटर अँड द सॉर्सरर्स स्टोन वाचून्/ऐकुन पूर्ण केले.
आज चेंबर ऑफ सिक्रेट्स सुरु केले आहे.
Pages