कबीर. एका संपन्न घरातला, बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा. थोडा मनस्वी. अजून सडाफटिंग. पण नुकताच एका इंटेरियर डिझायनरला प्रपोज 'करून बसलाय'. आपली दोघांची कामे एकमेकांना पुरक आहेत- त्यामुळे आपले जमेल असे तो तिला सांगतोय. तीही खुश. एवढे तिला सांगितले हेच नशीब. कारण हा थोडा अबोल, इंट्रोव्हर्ट. मनातलं सहज दुसर्याला न सांगणारा.
अर्जून. हा वर्कोहोलिक. म्हणजे कॉलेजात असताना प्रेमबिम कधीकाळी केलेलं. पण पैशाच्या मागे धावणं, कामाला वाहून घेणं आड आलं. मग प्रेमभंग. त्यानंतर ते विसरण्यासाठी कदाचित, कामाला आणखीच वाहून घेतलं. पैसा है तो जहान है. लंडनमध्ये एका कंपनीत अत्यंत बिझी फायनान्शियल ब्रोकर म्हणून काम करतोय. बर्यापैकी पैसेही कमवतो.
इम्रान. हाही हळवा. कवीमनाचा, मनस्वी. पण उपजतच उत्तम विनोदबुद्धी लाभलेला. आणखी एक म्हणजे, याच्या बापाबद्दल याला बराच तरूण झाल्यावर कळते- ही एक सतत दुखरी नस घेऊन वावरणारा. ते विसरण्यासाठीच की काय, पण सतत गलछबूपणा करण्याची सवय, हौस. पण कवीमनाच्या सार्यांसारखीच याचीही गोची. जगण्यासाठी काम कसलं करतोस?- या प्रश्नाचं नीट उत्तर याला देता येत नाही.
या तीन मित्रांची कहाणी- म्हणजे झोया अख्तरचा 'जिंदगी मिले ना दोबारा'. स्वीट अँड क्युट अभय देओल, बिगेस्ट हंक ऋतिक रोशन आणि सो-कॉल्ड-गाय-नेक्स्ट-डोअर फरहान अख्तर- असली तगडी रिफ्रेशमेंट. सोबत सुप्रसिद्ध कतरिनाबाई, देव-डी फेम काल्की. जावेद अख्तरचे संवाद आणि कविता. शंकर-एहसान-लॉयचं संगीत. झोया अख्तरचं तरूणाईला भावणारं अत्यंत फ्रेश टेकिंग. काय बिशाद आहे पिक्चर आपटण्याची?
***
कबीरचं लग्न ठरतं, तसा तो अस्वस्थ होतो. आपले सडाफटिंग दिवस आता संपतील, याची हळहळ. सांगणार कुणाला? तर कॉलेजातल्या एकेकाळच्या त्या दोन जीवलग मित्रांना. पण तेही असं अॅक्रॉस टेबल बसून भडाभडा पाच मिनिटात बोलून टाकणं त्याच्यासारख्याला कसं शक्य आहे? तर नीट वातावरण निर्मिती होऊ देत. जरा आठ दिवस कॉलेजचे दिवस आठवत गुजगोष्टी होऊ देत. मग सख्खे मित्र असतील, तर ओळखतीलच मनीचा सल.
कॉलेज संपून दहा वर्षे झाली, पण त्याने मनात प्लॅन करून ठेवलेली 'बॅचलर्स ट्रिप' अजून होऊ शकलेली नाही. आता थोडेच दिवस राहिलेत, तर ही ट्रिप होणं त्याला फार फार आवश्यक वाटू लागलंय.
मग स्वतःच कार्याध्यक्ष बनून दोघांना फोन करून सांगतो. इम्रान बापडा तयारच असतो, पण बिझी अर्जूनभाऊंना इमोशनल ब्लॅकमेल करून रडातराऊतच घोड्यावर बसवावं लागतं. काम आहे, पैसे कमवायचेत- हे कारण तर आहेच, पण इम्रानसोबत असलेला जुना हिशेब हेही.
तर असं एकदाचं एकत्र गाठोडं बांधल्यावर टीम लीडर कबीर तिघांना घेऊन सहलीला निघतो. जुनी भांडणे, रुसवेफुगवे, रागवारागवी, गुजगोष्टी, पार्ट्या, डान्स आणि कतरिना- हे सारे होत असतानाच काही प्रसंग असे घडतात, की तिघांनाही जगण्याकडे वेगळ्या दृष्टीने बघण्याचे आपापल्या परीने साक्षात्कार होतात. वेगळे पर्स्पेक्टिव्ह मिळतात. एकमेकांसोबत घालवलेल्या क्षणांना नुसत्याच 'मित्रांचे हितगुज' यापलीकडे आणखीही वेगळा अर्थ मिळतो. आता जगलेले हे अफाट क्षण, जगणं श्रीमंत करून टाकण्याची ताकद असलेली, नव्याने मिळालेली वेगळी दृष्टी घेऊन तिघे निरोप घेतात.
***
अगदी साधीसोपी सरळ कथा. अत्यंत प्रेडिक्टेबल. मुळात 'कथा' म्हणावं की नाही, असाच प्रश्न पडेल. पण हेच या सिनेम्याचे बलस्थान ठरते. त्या मित्रांच्या जगण्याला, त्यांच्या जाणीवांच्या अख्ख्या संचाला नवे आयाम देणारे निरनिराळे प्रसंग आपल्याला स्पर्शून जातात. झोया अख्तर रियली हॅज डन अ फँटॅस्टिक जॉब. स्पेनमधल्या निसर्गाचे चित्रपटात केलेले चित्रण अत्यंत मोहक, हिप्नॉटायझिंग. सर्वांच्या चांगल्या अभिनयाने सजलेली एकूण एक फ्रेम जिवंत वाटेल, याची पूर्ण काळजी घेतली आहे.
ऑफ बीट सिनेम्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या अभयदेओलने या कमर्शियल सिनेम्यातही मस्त कमाल केली आहे. मी गेलो होतो फक्त त्याच्यासाठी (आणि सिनेमा संपल्यावर सर्वात जास्त लक्षात राहिलाही तोच), पण कंप्लीट पॅकेज वॉज अ स्वीट रिफ्रेशमेंट. ऋतिकच्या चाहत्यांनाही मेजवानी. मस्त दिसतो आणि वावरतो. कतरिनाचे दिसणे-वावरणे तिच्या आजवरच्या सार्या सिनेम्यांपेक्षा जास्त आवडले. फरहान अख्तरच्या आजवर इरिटेटिंग वाटण्यार्या आवाजातल्या कवितांमुळे कथानकाला एक वेगळेच सखोल परिमाण मिळते. 'वक्त के गहरे सन्नाटे, वक्त ने सभी को है बांटे..' सारख्या जावेदअख्तरसिग्नेचरस्टाईलमुळे ते सारे प्रसंग कमालीचे परिणामकारक वाटतात. अभिनय, ते सारे कथानकातल्या प्रसंगांचे तुकडे, संवाद, गाणी कुठेही उथळ होत नाहीत. दोन प्रसंगांत कुठेही सिनेमा रेंगाळल्याचे जाणवत नाही. अत्यंत ओघवत्या शैलीत चित्रित झालेले छोटेछोटे सस्पेन्सेसही रंगत आणतात. उगाच आपल्याला 'थ्रिल्ड' करून सोडण्यासाठी त्याचा वापर केला नाही, हे जाणवतं आणि आवडतंही. शंकरएहसानलॉयचं संगीत आधीच फेमस झालं आहे. 'सेनोरिटा..' गाणं आपल्याला ताल धरायला, रक्त सळसळायला लावणारं.
या सार्यापुढे क्वचित कुठेतरी वाटलेल्या अतर्क्य गोष्टींकडे आणि इतर तांत्रिक गोष्टींकडे फारसं लक्ष गेलं नाही.
पोहायला येत नसलेला, स्कुबा डायविंग मधल्या एन्लायटनिंग शांततेनंतरचा ऋतिक. आकाशात उडण्याचा, उंचीचा फोबिया असलेला, पण ते करून करून झाल्यानंतर जग जिंकल्याच्या आवेशातला फरहान. 'बुल-रन'साठी आयुष्य पणाला लावायला तयार झालेला, हेही करून बघायचेय- म्हणणारा अभय. नासिरुद्दीनला भेटल्यानंतर 'प्रश्न हा मुळी प्रश्न नव्हताच!' हा साक्षात्कार झालेला फरहान. टोमाटिना फेस्टिव्हल मध्ये 'आता ही शेवटचीच मस्ती, पुन्हा होणे नाही!' अशा थाटात सामील झालेले सारे.. किती साधे प्रसंग. पण पुन्हा पुन्हा आठवणारे. अस्वस्थ करणारे. आश्वस्तही करणारे.
***
आपल्याला आयुष्यात शेवटी हवं असतं तरी काय? तर याचं उत्तर नीट स्वतःलाच पटेल असं कुणी देऊ शकेल असं वाटत नाही. भुतकाळाची भुतं मानगुटीवर वागवत आणि भविष्याची चिंता करत आपला अख्खा जन्म जातो. जगणं हातातून कधी निसटून गेलं तेच शेवटपर्यंत कळत नसावं.
'शेवटी एकदा वाटून गेलं, जगणं हे जगणं नव्हतंच..
निकराने जगण्याच्या लायकीचं, हे आयुष्य नव्हतंच!'
असं सार्यांचं होत असेल का? आला क्षण साजरा करणं आयुष्यभर सार्यांचंच राहून जात असेल का?
आत्ता, आत्ताचा हाच एक क्षण आपला आहे. नंतरचं काही खरं नाही. गो फ्रेंड्स. इट्स अ बिग ट्रीट.
***
दिनेशदा, तुम्ही म्हणताय ती
दिनेशदा, तुम्ही म्हणताय ती एक्स्ट्रिम्स नकोत पण निदान 'दिचाहै' मधे जाणवणारी सहजता तरी हवी.
खुलवता आला असता.पण निट खुलवला
खुलवता आला असता.पण निट खुलवला गेला नाही प्रत्येकाला हात लावण्याच्या प्रयत्नात पाठशिवणिचा खेळ झाला दिल चाहता है मधे सगळ्यांची कथा सुरुवाती पासुन ते शेवट पर्यन्त सांगीतली गेली
यात सुरुवात तर नाहीच नाही .उलट शेवट ही नाही शेवटच्या नामावली मधे काय तो दाखवला..तो पन अर्धवट..एक लग्न झालेला..एक दुकटा झालेला. आणि एक परत दुकट्यावरुन एकटा झालेला. ..( तो पर्यन्त हॉल मधे थांबवावे लागते)
जी मैत्री दाखवली आहे ती असे वाटते की हा आहे एक मित्र , काहीतरी ठरवलेले सगळ्यांनी मिळुन, सो कोल्ड टाइप, अतिपणा नाही आहे पण जिव्हाळा ही नाहीच आहे एक दोन वाक्य विचारलीत की आला जिव्हाळा >????
गाणी दोन सोडली तर बाकीचे लक्षात राहतच नाही सॅनोरीटा आणि उडे आसमान मे परिंदे हीच काय छान आहेत
बाकिच्यां वर रॉक ऑन चा प्रभाव आहे. असे सतत जाणवते. नायिका असुन नसल्यासारख्या आहेत
पाहीला एकदाचा असे भाव येतात बघितल्या वर
मला आवडला. मस्त वाटला
मला आवडला. मस्त वाटला (ब्रिलियंट नाही)
फरहान रॉक्स. जुबाँ साफ आहे त्याची. कविता म्हणताना अमिताभ सारखी ओळी म्हणतानाची सहजता आणि इंटेंसिटीही आहे त्याच्यात. ते लिरीकल गद्य त्याला शोभते. (कविता बर्या आहेत की. अगदी 'साहिर'ची अपेक्षा जावेद काकांकडून कधीच नव्हती).
अभयदेओल ने न लाजता जरासा 'चेंपु' रोल मस्त केलाय. है शाब्बास.
हृतिक बोर वाटला.
संगीत महाबोर लेटडाऊन. शाअलॉ चा निषेध !!!!!
एकुणात पिक्चर फ्रेश वाटला, लै हसले. मज्जा आली.
It kind of lit up my mundane existence and though at times predictable did not treat me like dirt as a viewer.
अजून थोडी कापाकापी चालली असती.
छान लिहिले आहेस. चित्रपट
छान लिहिले आहेस. चित्रपट आवडलाच.
"वक्त के गहरे सन्नाटे...... " या ओळीला आणि काही ओळींना आपोआप 'आह्' निघालाच! हृतिकबद्दल अनुमोदन. तो अंमळ हृतिकच वाटत राहतो. (अनेका/कींसाठी हा चित्रपटाचा सद्गुण असू शकतो.) फरहान भारीच पडतो, अभयचा वावर, अभिनय नैसर्गिक वाटतो. (त्यामुळे हृतिक अजूनच...... असो.) गाणी प्रचंड महान वाटली नाहीत मलाही.
अनेक बाबी अतिश्रीमंतांच्याच अखत्यारीत येत असल्या तरी चित्रपटाचा पाया असलेले तिघांमधील प्रगल्भ, गतीमान नाते मात्र सगळ्यांचे.
क्षणांना किंमत असते की क्षणांच्या अव्याहतपणाला? क्षणांचे अखंडत्व इतके अंगवळणी पडते की किंमत उरत नाही. साखळीमधली कुठलीतरी कडी किंचितशी निसटली तरच त्या माळेच्या अखंडतेची किंमत पटते. तिथून पुढे प्रत्येक कडी, प्रत्येक मोती, प्रत्येक क्षण निरखला जाणार. साखळीला हे झटके कधी ना कधीतरी पाहिजेतच आणि ते झटके देण्याची/मिळण्याची ठिकाणे प्रत्येकाने आपापली शोधावीत. बुडण्याचे, कोसळण्याचे, पळण्याचे ठिकाण त्यांचे. ठिकाणांचा शोध मात्र सगळ्यांचाच.
तीन मित्रांच्या खूप कथा
तीन मित्रांच्या खूप कथा पाहिल्या अलिकडे . आता मैत्रिणींच्या कथेची वाट पाहतेय.
"बिनधास्त" चित्रपटाची आठवण
"बिनधास्त" चित्रपटाची आठवण आली.
मला आवडला जिंदगी........ मस्त
मला आवडला जिंदगी........
मस्त आहे......... जगण्यावर प्रेम करणारया मनाला समाधान देईल असा पिक्चर खूप दिवसांनी बघितला.....
हलकाफुलका तरिही मनाला साद घालणारा.......
अॅड्व्हेंचर स्पोर्ट्सकडे
अॅड्व्हेंचर स्पोर्ट्सकडे जास्त लक्ष दिलय असे वाटले. त्यात ते दोस्तीबिस्तीचे राहुनच गेले वाटतं आगावा.
मस्त चित्रपट आहे, एकदम आवडला.
मस्त चित्रपट आहे, एकदम आवडला. दुसर्या हाफ मधे जरा स्लो झाला, पण एकूण सुंदर आहे.
माझ्या दृष्टीने हा हृतिक आणि कतरिना चा पिक्चर. फरहान ने काम अतिशय चांगले केले आहे यात वादच नाही. त्याचे विनोदाचे टायमिंगही चांगले आहे. पण दुसर्या कोणीतरी (दहा वर्षांपूर्वी आमिर ने) हा रोल आणखी वेगळ्याच लेव्हलला नेला असता असे वाटले. ते कविता-टाईप संवाद त्यांच्या आवाजात अजिबात फिट झाले नाहीत. तरी त्याच्या वाट्याला चित्रपटातील बेस्ट संवाद आले आहेत.
घरचा चित्रपट नसता तर हा रोल इतर कोणी आवर्जून त्याला दिला असता असे वाटत नाही.
अभय देओलने नेहमीप्रमाणेच मस्त काम केले आहे. ती कल्की जरा बोअर झाली. तिचे हिन्दीही ऑकवर्ड आहे.
पण हृतिक आणि कतरिना मला सर्वात आवडले यात. (फक्त हे वगळता: हृतिक नुसता चालत जात असला तरी बॅचलरेट पार्टीत चालतोय असे शूटिंग घेतले आहे प्रत्येक वेळेस. . तसेच तो जेव्हा इमोशनल झालेला दाखवलाय तेव्हा त्याच्या चेहर्यावरचे भाव आणि त्यावेळची बॉडी लॅन्ग्वेज एकदम feminine वाटते बघताना. त्यावेळचे गाण्यांचे शब्दही तसेच वाटले, आता लक्षात नाहीत. हे सर्व कदाचित महिला दिग्द. असल्याने असावे )
पहिल्यांदा स्कूबा डायव्हिंग करताना समोर कतरिना असताना त्याच्या डोळ्यात फक्त भीती दिसते. त्याच्या व्यक्तिरेखेत होणारा बदल सर्वात ठळकपणे दिसतो. त्याचा सर्वात आवडलेला डॉयलॉग म्हणजे - फरहान त्याला त्याला आधीच टोमॅटो मारताना टमाटिना चे नियम सांगतो, तेव्हा "आत्तापर्यंत कधी तू नियम पाळले नाहीस आणि आत्ता तुला नियम आठवतायत काय" म्हणून टोमॅटो घेउन त्याच्या मागे लागतो तो. इतर दोघांपेक्षा तो फिल्मी हीरो जास्त वाटतो.
कतरिना "lights up every frame she is in"! सध्या तरी तिच्यासारखे व्यक्तिमत्त्व असलेली दुसरी कोणी नसावी. एकदम चपखल या रोलमधे. ती दाखवलीय लंडनमधली, उच्चार अमेरिकन (म्हणूनच ती स्वतःची ओळख हाफ यूएस हाफ इंडियन सांगते) व बोलते भारतातही फक्त अमिताभ आणि वाजपेयी बोलत असतील एवढे अस्खलित हिंदी :). पण तिने काम चांगले केले आहे, आणि केवळ प्रसन्न व्यक्तिमत्त्वावर तिची निवड चपखल आहे.
आजकाल चित्रपटात विनोद दाखवताना हॉलीवूड स्टाईलने दाखवायची पद्धत आलेली दिसते. देल्ही बेली मधेही होते तसे. उदा: लग्नानंतर तुला असे मित्रांबरोबर जाता येणार नाही असे मागच्या सीटवर कल्की म्हणते तेव्हा पुढच्या सीटवर फरहान आणि हृतिक जसे फक्त हळूच एकमेकांकडे बघतात, तो शॉट जबरी आहे. असे अनेक धमाल शॉट्स आहेत. नाहीतर बर्याच हिन्दी चित्रपटां विनोद म्हणजे लोकांना कळत नाहीत हे गृहीत धरून अंगावर आपटेपर्यंत समजवत राहतात. एकूण या चित्रपटातील मित्रांच्या विनोदांत "Friends" चा खूप प्रभाव जाणवतो.
सॅन्योरिटा गाणे बरे आहे. पण किमान नंतर त्या गाण्यात हे मधेच घुसून बल्ले बल्ले, शावा शावा करून त्याचे पंजाबी गाणे करत नाही (ब्लू स्टाईल) हेच क्रेडिटेबल आहे
सिनेमा आवडला. (ट्रॅफिकमध्ये
सिनेमा आवडला. (ट्रॅफिकमध्ये अडकल्यामुळे सुरूवात चुकली. टायटल्सपासून पहायला मिळाला.)
इतर सर्वांना अपवाद म्हणून - कतरिना लै बोअर झाली. अख्ख्या सिनेमाभर एकच एक भाव आहेत तिच्या चेहर्यावर - डोळे बारीक करून, गाल उचलून हसण्याची तिची जी स्टाईल आहे ना, त्यात ती फार वेळ बघवत नाही. कुठलाही संवाद असेल तरी तोच चेहरा... (त्यापेक्षा मला ती राजनीतीमध्ये जास्त आवडली होती.)
त्यापेक्षा काल्कीने आपल्या मर्यादा लक्षात घेऊन व्यवस्थित काम केलं आहे.
ते कविता-टाईप संवाद त्यांच्या आवाजात अजिबात फिट झाले नाहीत >>> अगदी!! मी हेच लिहिणार होते. कवितावाचनासाठी एखादा सॉलिड, धीरगंभीर आवाज हवा होता. (आठवा - मै और मेरी तनहाई अक्सर ये बातें करतें हैं) फरहानचा आवाज त्या तुलनेत फडफडणार्या कागदासारखा आहे.
ह्रुतिक आणि कतरिना खुल्या आकाशाखाली पहुडलेले असतात तेव्हाचा हृतिकचा एक संवाद - जीना कोई तुमसे सीखें - फारच छापील वाटला. बाकी सिनेमातली, प्रसंगांतली सहजता हृतिकच्या त्या point of realisation पुरतीच का गायब आहे कोण जाणे. त्या संवादानंतर कतरिना त्याचा हात हातात घेऊन नुसता हळूवारपणे थोपटत राहते ते मात्र लाजवाब.
रणबीर कुठेही फिट झाला नसता. (kind attn - पराग :फिदी:)
'दिल चाहता है'च्या पुढच्या वयोगटाचा हा सिनेमा आहे. त्यापुढच्या वयोगटाचाही आता एक काढावा फरहाननं.
फारएन्डशी अतिशय आनंदाने सहमत
फारएन्डशी अतिशय आनंदाने सहमत आहे.
अभिनयात रितीक- अभय अत्युत्तम आले आहेत. फरहानचे संवाद जास्त चटकदार असल्याने तो लक्षात राहतो.
जावेदसाहेबांच्या कविता चांगल्या आहेत, पण फरहानने त्यांना पुरेसा न्याय दिलेला नाही असेच मलाही वाटते. पॉज घेत घेत गद्य वाचल्यासारखे वाटते.
एकूण मुव्ही चांगला, पण डी.सी.एच. शी तुलना? प्लीईईईई ज !:)
'दिल चाहता है'च्या पुढच्या
'दिल चाहता है'च्या पुढच्या वयोगटाचा हा सिनेमा आहे.
ललिता, वयोगट कोणाचा, पात्रांचा की प्रेक्षकांचा?
अनीवे, नुसताच वयोगट वाढलेला आहे..
मला आवडला. कत्रिना एअर
मला आवडला. कत्रिना एअर होस्टेस छाप हिन्दी बोलते. पण खरेच छान दिसते. शेवट्च्या शॉट मध्ये तर अगदी एंजेलिक. फरहानचे विनोद अगदी चपखल बसले आहेत. फॉस्टर पेरेंट, खरे पेरेंट हे इश्यूज ज्यांना असतात त्यांना त्याची उलघाल नक्की समजेल. नसीर समोर तो जसे मैं हूं ... फिरभी आप कभी मुझसे नहीं मिले म्हण्तो ते खरे वाट्ते. अभय देओलची व्यक्तिरेखा पण छान आहे. काल्की इज पिटस.
तश्या पार्टीत किंचाळणार्या व रिंग पाहुन हरखणार्या मुली आजकाल खूप दिसतात. पुढे सगळा वैतागच असतो.
पॅराजंपींग मस्त आहे पण टेक्निकली ते शॉट्स एका जंपचे नसणार कारण एका जंप मध्ये तितका वेळ हवेत राहणे अवघड वाट्ते. मग लगेच सिनोरिटा सुरू होते ते जरा अॅब्रप्ट वाट्ते. एक सेकंद पूर्ण काळा पड्दा आहे. देर लगी लेकिन गाणे मस्त आहे. आजिबात स्लो वाटला नाही. कंटेंपररी भारतियांचे चित्रण वाट्ते. सुरुवातीला ह्रितिक व फरहान पॅकिन्ग करताना दाखविले आहेत तेव्हा त्यांच्या स्वभावातील फरक लक्षात येतोच. मजा वाटते. ह्रितिक चा आज मी क्ष कमिशन अर्न केले आहे. चला मला तर एंजॉय करायचा हक्क आहे. ही मानसिकता समजू शकते. सर्वांचे कपडे लक्षणीय रीत्या नॉन फिल्मी आहेत ते अगदी बरे वाट्ते. इजी ऑन द आइज. दिल चाहता है शी तुलना केलीच नाही कारण आता काळ किती बदलला, पुढे गेला आहे. हे सर्व वेगळेच आहे. आताचे आहे. याक्षणाचे.
फरहान ने काम चांगले केले आहे
फरहान ने काम चांगले केले आहे यात शंकाच नाही. पण काही वर्षांपूर्वी आमिरने त्याचे विनोदी शॉट्स आणखी छान केले असते. स्क्रिप्टमधे भाव दिलेला असो वा नसो, काही काही रोल्स मधे त्या त्या अॅक्टर्सनी वेगळीच उंची दिलेली आहे - अमिताभ चा अॅन्थनी (किंवा इतर अनेक), भिकू म्हात्रे, रंगीला, दि.चा.है चा आमिर, मुन्नाभाई चा अर्शद वारसी हे काही आठवतात. फरहान त्यामानाने कमी पडतो असे माझे मत.
काल्की चे हिन्दी म्हणजे काय ते आता बरोबर आठवले : नेहमी इंग्रजी बोलणारे लोक "आम्ही तसे इंग्रजीच बोलतो पण तुम्हाला कदाचित फक्त हिन्दी कळेल म्हणून हिन्दी बोलतोय" अशा condescending tone मधे बोलतात तशी ती कायम बोलते असे वाटते. असेच आणखी एक उदाहरण म्हणजे बॅण्ड बाजा बारात मधली ती कोणतरी यशस्वी वेडिंग प्लॅनर जिच्याकडे ते दोघे पहिल्यांदा जातात पण रागावून सोडून देतात ती.
त्यामुळेच तर कल्की एकदम
त्यामुळेच तर कल्की एकदम टिपिकल साउथ बॉम्बे स्नॉब वाटते ना...
फरहान बद्दल फारएण्ड शी १००%
फरहान बद्दल फारएण्ड शी १००% सहमत. त्याला आवर्जून हा रोल नसता दिला. शिवाय ते कवितांचं पण त्याच्या आवाजात इतकं नाही अपील झालं.
ह्रितिक मात्र द बेस्ट.
<<<< ते कविता-टाईप संवाद
<<<< ते कविता-टाईप संवाद त्यांच्या आवाजात अजिबात फिट झाले नाहीत. तरी त्याच्या वाट्याला चित्रपटातील बेस्ट संवाद आले आहेत.
घरचा चित्रपट नसता तर हा रोल इतर कोणी आवर्जून त्याला दिला असता असे वाटत नाही. >>>>>>
है शाब्बास फारेंडा .
<<< अगदी!! मी हेच लिहिणार होते. कवितावाचनासाठी एखादा सॉलिड, धीरगंभीर आवाज हवा होता. (आठवा - मै और मेरी तनहाई अक्सर ये बातें करतें हैं) फरहानचा आवाज त्या तुलनेत फडफडणार्या कागदासारखा आहे. >>>>
है शाब्बास ललिता .
मै और मेरी तनहाईशी कंपॅरिझन
मै और मेरी तनहाईशी कंपॅरिझन नकोच.. लता बाईं पेक्षा त्याच्या डॉयलॉग्स नी गाण्याला उठाव आणलाय त्या गाण्याला .. हि इज द गॉड :).
फरहान अख्तरच्या आजवर
फरहान अख्तरच्या आजवर इरिटेटिंग वाटण्यार्या >>> साजिर्या याद राख फरहानच्या विरुद्ध एक अक्षर बोलशील तर.. त्याचा आवाज अजिबात इरिटेटिंग नाहीये आधीच सांगतेय तुला. बाकी सगळा रिव्ह्यू परफेक्ट. आणि फरहान "आऽऽय हाऽऽय उऽऽऽप्स" मी प्रेमात... बाकी पिक्चर सुरेख वगैरे आहेच. स्पेन फार भारी. कतरिना चक्क आवडते या सिनेमामधे. क्रेडीट गोज टू झोया आणि हृतिक त्याच्यासारखा हँडसम हंक समोर असेल तर रेडा आपलं रेडीपण चांगला अभिनय करेल
कतरिनाचे कपडे पाहिलेत का? फार
कतरिनाचे कपडे पाहिलेत का? फार मस्त आहेत. तिला तिघांनी घरी जेवायला बोलविले असते. ती आपणहून जात नाही. हे एकतर. त्यावेळीचा निळा ड्रेस सुरेख आहे. एक पांढरा फ्रॉक पण सुरेख आहे. जातीच्या सुंदर मुलीला फारसे एंबेलिशमेंट लागत नाही हे माझे मत आहे त्यामुळे जर्दोजी, लेहेंगे वगैरे नसलेला कपडे पट सुरेख आहे. साजून दिसतो मुलीस. पहिल्या सीन मधील ड्रेस पण छान आहे. ती काहीतरी फिरवत असते.
फरहान तिला अॅप्रोच करतो त्यावेळचा.
संदर्भः दीपिका पादुकोण हीस कितीही चांगली साडी/ लेहंगा नेसवा, भयाणच दिसते.
त्याच्यासारखा हँडसम हंक समोर
त्याच्यासारखा हँडसम हंक समोर असेल तर रेडा आपलं रेडीपण चांगला अभिनय करेल
<<< राइट मीन्वा
रोमान्स करणे सोपच गेलं असणार कट्रिनाला पण खरं चॅलेंज ह्रितिक शी ब्रेक अप करणार्या त्या फ्लॅशबॅक मधल्या सोनिया कि जी गर्लफ्रेंड दाखवलीये तिला ( ह्रितिकच्या बिझी स्केड्युल ला कंटाळलेली).. अवघड गेल असणार तिला तो सोडून जाण्याचा अभिनय करणे
जाम आवडला हा सिनेमा. इथले
जाम आवडला हा सिनेमा. इथले रीव्ह्युज मुद्दाम आधी वाचले नव्हते. 'डीसीएच' सारखा असेल अशी अपेक्षाही नव्हती. नेत्रसुखद आहे आणि प्रत्येक अॅड. स्पोर्ट्स च्या वेळचं 'धक धक' वालं हार्टबीट्स चं बॅकग्राउण्ड म्युजिक सहीच.
रोमान्स करणे सोपच गेलं असणार
रोमान्स करणे सोपच गेलं असणार कट्रिनाला पण खरं चॅलेंज ह्रितिक शी ब्रेक अप करणार्या त्या फ्लॅशबॅक मधल्या सोनिया कि जी गर्लफ्रेंड दाखवलीये तिला ( ह्रितिकच्या बिझी स्केड्युल ला कंटाळलेली).. अवघड गेल असणार तिला तो सोडून जाण्याचा अभिनय करणे>> अनुमोदन. ती फारच ओरड्ते असे वाटलेले मला बरे त्याने नवे घर घेतले आहे. तो नेस्टिन्ग करणयातच आहे. तिने थोडा धीर धरला अस्ता तर ?
अनुमोदन. ती फारच ओरड्ते असे
अनुमोदन. ती फारच ओरड्ते असे वाटलेले मला बरे त्याने नवे घर घेतले आहे. तो नेस्टिन्ग करणयातच आहे. तिने थोडा धीर धरला अस्ता तर ?
<< धरायलाच हवा होता, हि वॉज टोटली वर्थ वेटिंग :).
रोमान्स करणे सोपच गेलं असणार
रोमान्स करणे सोपच गेलं असणार कट्रिनाला <<<<
ते सोपं गेलं नाहीये हे एका शॉटमधे समजतं.
पण तरी 'तो अंमळ हृतिकच वाटत
पण तरी 'तो अंमळ हृतिकच वाटत राहतो..' हे लक्षात घ्या. अभय देओलसमोर. अर्भाटा, कमी शब्दात भारी मांडलेस. या संदर्भात 'तू साले क्युं जज बन रहा है?' या ऋतिकच्या प्रश्नावर अभयचे 'और कोण है यहां?' हे उत्तरकम-प्रश्न बरेच काही एक्स्प्रेस करणारे आहे. अभयची अभिनयातली सहजता इतर दोघांना थोडी कमीच जमली आहे; म्हणून हा सिनेमा जास्त 'अभय'चा आणि एकंदर 'पात्रां'चा विचार केला तरी कबीरचा सिनेमा आहे, असं वाटलं
मुळात ते तीघे जिगरी दोस्त आहेत हेच कुठे जाणवत नाही. >> आगाऊ, तिघांची जुनी आणि आता मॅच्युअर (म्हणजे प्रगल्भ) झालेली मैत्री हेच सतत बॅकग्राऊंडला आहे, असं मला वाटलं. कॉलेज संपून दहा वर्षे होऊनही कबीरला त्या सो-कॉल्ड बॅचरल ट्रिपसाठी या दोन जुन्या मित्रांव्यतिरिक्त दुसरे कुणी सुचले नाही.
दुसरे, मुळात त्या तिघांची मैत्री- हा विषय नाहीच आहे सिनेमाचा.
**
वरच्या मामींच्या आणि डीजेच्या पोस्टसवरून सहज आठवले म्हणून-
ऋतिक नवीन अपार्टमेंट घेतो, तेव्हा त्यात रमायला त्याची (जुनी) गर्लफ्रेंड नको म्हणते- हे ऋतिकला खुपते, आणि आता लग्न होणार म्हणून नवीन घराच्या इंटेरियरला एखादे वर्ष तरी लागणार म्हणून आपले काम सोडून द्यायला कल्की तयार होते- ते अभयला खुपते!
जिंदगी रॉक्स!
मुळात त्या तिघांची मैत्री- हा
मुळात त्या तिघांची मैत्री- हा विषय नाहीच आहे सिनेमाचा. >>> अनुमोदन
मला भारीच्च आवडला सिनेमा. मी अभय देओलच्या प्रेमात हृतिकबद्दल मी नव्याने उसासे टाकणं सोडून दिलंय.
कतरीनाला पडद्यावर पाहिलं की मला 'माझा'चीच जाहिरात आठवते, त्यात तिचा दोष नाही, ती सगळ्यांना सारखाच न्याय देते. पण या सिनेम्यात तिने बाईक चालवणं जबरी दाखवलंय... अशा रस्त्यांवरून बाईक चालवायला मिळणं यासाठी मोठंच पुण्य हवं. पण त्या सीनचा शेवट अगदीच बंडल...
झोया अख्तरला हॅट्स ऑफ!!
मुळात ते तीघे जिगरी दोस्त
मुळात ते तीघे जिगरी दोस्त आहेत हेच कुठे जाणवत नाही.>> असे कसे?
त्याला कबीरा म्हणणे, हे शाळे पासून असणार. आपल्या सर्वांची अशी खास मित्रांसाठी खास नावे असतात.
सोनाली मुळात कशी होती हे अभयने दोघे प्रेमात पड्ताना निरीक्षण केले असणार. तिनेतुम्हा दोघांचा वापर करून घेतला हे त्याने ज्या स्वच्छ पणे सांगितले ते
गाडी चालविताना फरहानने ह्रितिकला घोडे दाखविणे. अगदी सहज पण मित्राला सूख होइल हे समजून.
बॅग सहित फरहान ला बघून ही इज व्हेरी मच इन टच विथ हिज फेमिनाइन साइड म्हणणे. व त्याने ते चालवून घेणे.
मैत्री जाणवून द्यायला लागते का? ती असते तरी नाहीतर नसतेच.
मुळात त्या तिघांची मैत्री- हा
मुळात त्या तिघांची मैत्री- हा विषय नाहीच आहे सिनेमाचा>>> सिनेमाचा तो विषय आहे असे मी कधी म्हणालो? पण सिनेमा ज्या प्लॅटफॉर्मवर उभा केला आहे तोच तकलुपी वाटतो.
मैत्री जाणवून द्यायला लागते का? >>> आपण एका सिनेमाबद्दल आणि त्यातील पात्रांच्या नात्याबद्दल बोलत आहोत प्रत्यक्ष आयुष्यात काय होते त्याबद्दल नाही असा माझा समज आहे. आणि हा सिनेमा पाहताना दर्शक म्हणून मला असे काही जाणवले नाही, पिरिअड.
ठीकठाक चित्रपट. फरहानबद्दल
ठीकठाक चित्रपट.
फरहानबद्दल फारेंडला मोदक आणि रितीकच्या feminine दिसण्याबद्दल अन अभयच्या काही न जमलेल्या संवाद+अॅक्शनबद्दलही मोदक. फरहानने कवितेच्या ओळी जावेद अख्तरना द्यायला तरी हवे होते. त्याचा आवाज काही जमला नाही, पण मग तो लिहितो हे दर्शकांना कळवायला अजून काहीतरी करावे लागले असते.
मी हे लिहितेय यावर विश्वास बसत नाही पण खरंच कतरीनाला बरचसं जमलयं, किंवा ती त्या रोलला suit झाली असं म्हणावं लागेल.
काही दोस्तीचे मस्तीचे सीन्स आवडलेत. नसीरसाहब, टू गुड!
फरहान अख्तरचे सल्मान हबीबला न भेटता ऐनवेळी कच खाणे सहीच. तसेच अभय देओलचे काही सीन्स छान.
Pages