राखी : रक्षाबंधन

Submitted by अबोली on 26 July, 2011 - 07:09

नमस्कार मायबोलीकर मित्रमैत्रिणींनो,

स्वहस्ते बनवलेल्या राख्या सादर करताना खूप आनंद होतोय!

DSCN2145.JPGDSCN2130.JPG240720114475.jpgतुमच्या भावाचे नाव राखीवर हवे आहे का?

DSCN2390.JPG

धन्यवाद.

गुलमोहर: 

तुम्ही बनवल्यात? मस्तच आहेत राख्या.

आणि ते तांदळावर कसे लिहिलेत?
मागे एकदा एका राजस्थानी रेस्टॉरन्टमध्ये गेलो होतो. तिथे एका तांदळावर अख्खं नाव कोरून देणारे कारागीर होते. साध्या डोळ्यांनी दिसतही नव्हती ती अक्षरं. तो तांदुळ मग ते एका अतिशय अरुंद अशा काचेच्या पारदर्शक नळीत कसल्याश्या द्रवात बंद करून द्यायचे. त्यातून ती अक्षरे वाचता येत.

सर्वांना धन्यवाद.
गजानन, राख्या मी स्वतः बनवलेल्या आहेत. तांदळावरही मीच लिहिले आहे.
ती एक खास कला आहे. अगदी पुराणकाळापासून ती प्रचलीत आहे. त्याबद्दल तुम्हाला इंटरनेट वर सर्व माहिती मिळेल.
हे फोटो क्लोज अप असल्यामुळे अक्षरे दिसत आहेत. प्रत्यक्षात खूपच छोटी आहेत.
यासाठी खास आर्किटेक्ट वापरतात तो टेक्नीकल पेन वापरला आहे. फारच बारीक लिहितो तो. हाताच्या फाइन हालचालींवर खूप नियंत्रण ठेवावे लागते. माझे नेत्रशल्य कौशल्य (eye surgeries performed under microscope) इथे उपयोगी पडले!
आणि हो, तो पारदर्शक द्रव बेबी ऑईल असते. त्यामुळे तांदळावरची अक्षरे किंवा नक्षी magnified दिसतात.

सर्वांना धन्यवाद!

हँडमेड पेपरवर फुलाच्या आकारात कुंदन फॅब्रिक ग्लू ने चिकटवून घेतले. त्याभोवती सोनेरी जर्दोसी बारीक तारेने व सुईने शिवली. कागद नेमका फुलाच्या आकारात कापुन घेतला आणि सोनेरी रिबीनवर चिकटवला. शेवटी हिरवे कुंदन चिकटवून रिबीन सजवली. तोच हँडमेड केशरी कागद, रिबीन आणि हिरवे कुंदन वापरून 'म्याचिंग' शुभेच्छा कार्ड बनवले.
बाकी दोन राख्या बनवताना कागदावर scaopped किनारी कापून दोर्‍याने जाळी बनवली. त्यावर लाल कार्ड पेपर वर सोनेरी मणी शिवून त्यावर पुन्हा गोल लाल चकती चिकटवली. तांदुळावर नाव लिहून foecep च्या सहाय्याने तो अलगद पण पक्का चकतीवर ग्लू लावून बसवला आणि त्याभोवती सोनेरी टिकल्या आणि मणी सजवले. ही राखी मग धाग्यावर मधोमध चिकटवली. धाग्याच्या दोन्ही बाजुने रंगीत मणी ओवले. राखी तयार!
(मला तंतोतंत कृती सांगता येत नाही पण थोडी आयडियाची कल्पना आली असेलच.)

अबोली, हो, झूम केलेले आहेत हे लक्षात आले होते.

हाताच्या फाइन हालचालींवर खूप नियंत्रण ठेवावे लागते. <<< अगदी!

अरे वा ! मस्तच !
अन हो आता तू माझी लेक झालीस बरं का Happy माझ्या लेकाचे नाव निखिल आहे ना म्हणून Happy
त्याला खुपच आवडली त्याची राखी Happy

Pages

Back to top