ये देश है तुम्हारा नेता तुम्ही हो कलके

Submitted by नितीनचंद्र on 22 July, 2011 - 13:15

पहाता पहाता पुन्हा जुलै महिना संपेल. पाउस थोडासा ओसरेल आणि दिल्ली पासुन गल्ली पर्यंत वेध लागतील स्वातंत्रदिनाचे.

काश्मिरमधल्या ठराविक सरकारी स्वातंत्र्यदिनाच्या कार्येक्रमाशिवाय अन्य कोठेही तिरंगा दिसणार नाही. तिथल्या जनतेला त्याचे औत्सुक्य ही असणार नाही. काश्मिर शिवाय अन्य ठिकाणी जन्माला आलेल्याच काय काश्मिरातल्या नविन पिढीला सुध्दा हे माहित नाही की असे का ? त्यांना फक्त एकच शब्द माहित असेल स्वयंनिर्णायाचा अधिकार.

जनसंघाचे पहिले अध्यक्ष कै.डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी आंदोलन केल्यामुळे या राज्याची ओळख आता अतिविषिष्ठ राजकिय दर्जा असलेले राज्य म्हणुन आता आहे. अन्यथा काश्मिरच्या मुख्यमंत्र्याला काश्मिरचा पंतप्रधान म्हणले जायचे.

हा दर्जा सुध्दा ३७० कलमाचे अनावश्यक घुसडणे या कारणामुळे अस्तित्वात आला आहे. या लेखाचा उद्देश्य याची कारण मिमांसा करणे नसुन नव्या पिढीला याची जाणिव करुन देणे आहे की आपण कितीही प्रयन्त केला तरी आपणच काय भारताचे राष्ट्रपतीसुध्दा १ इंच जागा काश्मिरात विकत घेऊ शकत नाही.

भारतीय जनता पक्षाला सुध्दा केंद्रात सत्ता नसताना १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी शिवाय याची आठवण होत नाही. दोनचार वर्षांनंतर आलटुन पालटुन दोनचार नेते श्रीनगरला रस्त्यावर तिरंगा फडकावयाला निघतात. त्याला विरोध होतो. सत्ताधारी काँग्रेसला गुळणी धरण्याशिवाय पर्याय नसतो. काँग्रेसी राजेशाही अजुनही चालुच रहाणार आणि झालीच तर नेहरुंची बदनामी होणार त्या पेक्षा भाजपाच्या आंदोलनाला राजकीय हेतुने प्रेरीत म्हणले म्हणजे सगळा मामला खलास. मनु संघवी सारखे प्रवक्ते या कामात अगदी हुशार आहेत.

हे झाल काश्मिरच म्हणजे उर्वरित भारत हा काही देशप्रेमींचा भारत आहे असे नाही. नोकरदार मंडळी १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला मिळणार्‍या पगारी सुट्टीवर खुष असते. राजकिय मंडळी सरकारी नोकरांच्या माध्यमातुन ध्वजारोहण करुन कुठेतरी भाषण ठोकायला आणि जमल्यास सॅल्युट मारुन घ्यायला सोकावलेली आहे. पुन्हा वर्षभर कुठेतरी जवानांच्या शवपेट्यांचा भ्रष्टाचार तर पोलीसांना मिळालेल्या बुलेट्प्रुफ जॅकेटच्या आरपार गेलेल्या गोळ्या चघळायला विषय असतोच.

सामान्य माणुस थोडासा का होईना कर चुकवतोच. त्यांचा आदर्श कोणितरी क्रिकेटियर असतो जो सरकारकडे बक्षीस मिळालेल्या गाडीवर करमाफी मागत असतो. रहदारीच्या नियमांपासुन सामान्य नियम प्रत्येकाला जाचक वाटतात.

१५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी शिवाय तिरंगा सहज पणे दिसत नाही आणि कोणीही देशभक्तीच्या भावनेने त्याकडे पहात नाही. भारतमाझा देश आहे ही प्रतिज्ञा शाळेच्या पुस्तकाबाहेर अनुभवताना क्वचितच दिसते. देशप्रेमाने प्रेरीत होऊन मरण पत्करलेल्यांच्या पोलिसांच्या कुटुंबांचे पुनर्वसन व्हायला दोन वर्षे जावी लागतात. त्यांचे खुनी राष्ट्रपतींच्या दयेच्या अर्जामागे असलेला लालफितीचा कारभार ओळखुन खुशाल बिर्याणी खात बसतात.

शाळा कॉलेज आणि सरकारी कार्यालयात एकदा ध्वजवंदन झाले. देशभक्तीपर गीतांच्या फैरी स्पीकर्स वरुन झडल्या म्हणजे सर्वांनाच मोठे समाधान लाभते. या निमित्ताने वाहिन्या सुध्दा सरफिरोश सारखे सिनेमे दाखवुन मोकळे होतात.

काय करतोय आपण. काही वेगळा विचार करता येईल का या उद्देशाने हा लेख लिहण्याचा प्रपंच आहे.

गुलमोहर: 

जे सज्जन आहे ते सज्जनच राहतील याचा आटोकाट प्रयत्न करावा लागेल. दुर्जनांना सुधारणे महाकठीण आहे. अपेक्षा ठेवणे गैर आहे.

जे सज्जन आहे ते सज्जनच राहतील याचा आटोकाट प्रयत्न करावा लागेल. दुर्जनांना सुधारणे महाकठीण आहे. अपेक्षा ठेवणे गैर आहे. >>>> एकदम बरोबर
आताचा अनुभव एका महाभागाने सिग्नल तोडुन एकदम चोकात चार चाकी गाडी ऊभी केली.. झाले सगळ ट्रॅफीक जाम..
त्या हिरो ला जाउन विचारले.. काय करतोय असे,, सिग्नल फॉलो करत जा.. तर वरतुन मलाच ऊर्मठपणे ऊत्तर
मिळाले.. तु कोण मला सांगणारा.. माझ्या बापाचा सिग्नल आहे.. कर काय करायचे ते Sad
आता ही जर परिस्थीती असेल तर सरकार तरी काय करणार .. शेवटि लोक १ बोट सरकार कडे दाखवत असतील तर ऊरलेली ४ बोटे स्वता:कडे आहेत हे का लक्षात घेत नाही..
आणी बादवे कश्मीर मधे जागा घेता येत नाही हे एका द्रुष्टीने चांगलेच आहे ना.. नाहीतर साहेबांनी तिकडे सुध्दा
अर्धा कश्मीर विकत घेऊन ठेवला असता Sad

हे सगळे पाहुन संत तुकारामाच्या ओळी आठवतात

नीचपण बरवे देवा! न चले कोणाचाही हेवा. !!!
----------------------------------------------------

नितीनजी,
सडेतोड, चाबुकफोड लेख.
अगदी अस्सल लिहिताय तुम्ही.
असा विचार करणारे तुमच्या सारखे लोकही (शहरात) आहेत, खुप बरं वाटतं.
हेही नसे थोडके !
Happy

देशप्रेमाने प्रेरीत होऊन मरण पत्करलेल्यांच्या पोलिसांच्या कुटुंबांचे पुनर्वसन व्हायला दोन वर्षे जावी लागतात. त्यांचे खुनी राष्ट्रपतींच्या दयेच्या अर्जामागे असलेला लालफितीचा कारभार ओळखुन खुशाल बिर्याणी खात बसतात.
हे तर सगळ्यात संतापजनक आहे...

बॉम्बहल्ल्यात सामान्य लोक अगदी भयानकपणे मरतात, यांना मारणारे किती निवांत जगतात बघा.

नितीनजी,
मला वाटतं, आपल्या देशाबद्दल (शिल्लक असलेलं) असणारी खरी देशनिष्ठा, ज्वाजल्य बहुतेक प्रेम पहायच असेल तर त्या दिवशी देशातल्या सगळ्यां खेड्यांत जाव लागेल.

आपला लेख खुप चांगला आहे. आवडले विचार.
जम्मू काश्मीरचे त्यावेळचे गव्हर्नर ह्यांनी माय फ्रोझन टर्ब्युलन्स इन काश्मीर हे पुस्तक ह्या कलमावर खुप छान प्रकाश घालते ते मराठीत सुद्धा अनुवादीत आहे काश्मीर मधले धुमस्ते बर्फ. फक्त काश्मीर मध्येच आहे असे नाही, हिमाचल प्रदेशात सुद्धा आपल्याला जागा घेता येत नाही. जो पर्यन्त काश्मिरची डेमोग्राफी बदलनार नाही तो पर्यन्त काश्मीरचा प्रश्न सुटनार पण नाही. ह्या गोष्टीवर एक लेख लिहिला होता पुर्वी
http://www.maayboli.com/node/23779
http://www.maayboli.com/node/21320