पावसाने एकदा जम बसवला की हिरव्या निसर्गाचे सौंदर्य बघण्यासाठी मुंबईतील निसर्गरम्य ठिकाण म्हणजे नॅशनल पार्क(संजय गांधी राष्ट्रीय उद्यान).. तशी अधुनमधून फेरी असतेच इकडे.. पण पावसात जाण्याची मजा काही औरच असते... गेल्याच शनिवारी हे पार्क गाठले तेव्हा जवळपासचा परिसर बघून परतायचा विचार होता.. पण खुललेल्या निसर्गामध्ये दंग झालो.. नि चालता चालता थेट कान्हेरीच गाठले.. !
बसची जरी सोय असली तरी नॅशनल पार्क-कान्हेरी गुंफा-नॅशनल पार्क हे १२किमीचे अंतर चालत कापण्यात तेदेखील पावसाळ्यात म्हणजे उत्तमच नि माझ्या आवडीचे..या सिझनमध्ये विकेंडला खरेतर गाडया-गर्दी यांची जत्रा असते.. पण नशिबाने मला अपेक्षित गर्दी दिसली नाही.. नॅशनल पार्कातून लायन सफारीच्या बाजूने जाणारा रस्ता पकडला.. नि आजुबाजूचे निसर्गसौंदर्य टिपत एकटाच चालत राहीलो.. बोले तो Lonely Walk !
सोबतीला कोण.. ??
डोळ्यांना गारवा देणारा अवतीभवती पसरलेला असा हिरवा निसर्ग..ह्या निसर्गाच्या कुशीतून अधुनमधून वळणे घेत निमुटपणे जाणारा सुनसान रस्ता.. आपले विविधरंगी सौंदर्य मिरवत उडणारी फुलपाखरे.. जंगलात मोकळी सोडलेली हरणे.. 'दबंग' फेम वानरसेना.. जंगलातील शांततेत फक्त 'खळखळाट'संगीत ऐकवणारे ओढे-नाले.. आणि अर्थातच पावसाची अधुनमधून सुरु असणारी रिपरिप.. हे सगळे अनुभवत एकांतपणे चालणे ही एक आगळीच मजा.. मन एकदम ताजेतवाने होउन जाते.. ! मुंबईसारख्या गर्दीमय शहरात इथे एक दिवस काढून येणे म्हणजे एका दिवसाने आयुष्य वाढण्यासारखे.. शिवाय मनाला प्रसन्नता मिळतेच.. माझा हा Lonely Walk एक चांगलाच सुखद अनुभव देउन गेला...!
प्रचि १: पार्कात प्रवेश करून पुढे गेलो नि एक मोठा ओढा लागला.. दोन-तीन दिवसापूर्वीच मुसळधार पावसामुळे येथील पाण्याने बाजूलाच असलेला डांबरी रस्ता उखाडून वनखात्यांच्या कार्यालयात हजेरी लावली होती..
आज मात्र तसे काही नव्हते.. संथपणे प्रवाह सुरु होता.. रस्तादेखील पडून गेलेल्या पावसामुळे नि सभोवताच्या हिरवाईमुळे थंडगार पडला होता..
प्रचि २:
इथूनच थोडे पुढे गेलो जिथे हरणांचा कळप दिसेल असे वाटत होते.. नि अंदाज नेमका खरा ठरला.. फोटो काढता यावा म्हणून लगेच त्यांचा माग घेत दबक्या पावलांनी जवळ गेलो.. (जल्ला माझा बिबटया झाला होता.. ) कॅमेरा रोखला नि नेमकी त्यांची नजर माझ्याकडे गेली.. पण अनपेक्षितपणे त्यांनी धूम ठोकली नाही.. सावकाशीने दाट झाडीत शिरले..
प्रचि ३:
प्रचि ४:
इथूनच पुढे मग सभोवतालचे जंगल दाट होत जाते...
प्रचि ५:
(वरील फोटोत डावीकडचा फलक जंगलात वावरणार्या बिबटयांच्या अस्तित्त्वाची जाण करून देत होता... )
समोर स्वागत करणारा हा रस्ता पाहून सुखावलो.. इथूनच एक तिकडेच जवळपासच्या पाडयात राहणारी कोणी एक बाई आपली छत्री सुकवत जात होती.. दिसायला दृश्य खूप सुंदर होते..
प्रचि ६:
चालता चालता मोबाईलवरून जिप्सीला अनुभवत असलेल्या निसर्गसौंदर्याची माहिती देउन जळवत होतो.. पण "दिनेशदा मुंबईतच होते त्यांना घेउन जायचे ना.." असे तो बोलताच "अरे श्या.. ध्यानातच आले नाही" म्हणत चुचकारत राहीलो... तसे माझे ऐन सकाळीच जाण्याचे ठरले पण दिनेशदांच्या सोबतीने हे जंगल धुंडाळायला जास्त मजा आली असती.. असो.. वाटेत अनेक झाडांवर त्यांची नावे लिहीली आहेत.. जी बहुधा सर्वश्रुत आहेत... एखाद- दुसरे वेगळे काही नाव दिसले तर ठिक होते..
बरं..या रस्त्यात दिसणारे खास आकर्षण म्हणजे खळखळाट करणार्या प्रवाहांचे अस्तित्व....
प्रचि ७:
प्रचि ८:
इकडे रविवारी पिकनीक स्पॉट झालेला असतो.. काठाशी बसून खादाडी करत त्या पाण्याच्या प्रवाहात लोळण घालत फॅमिलीवाले मौजमस्ती करत असतात..
प्रचि ९:
ह्या ओढयांचा खळखळाट ऐकत कितीतरी वेळ काठावर बसून होतो.. एकदम रिफ्रेश !
तिकडूनच पुढे गेलो.. एकटाच होतो सो ठरवले होते आजुबाजूच्या जंगलात जास्त घुसायचे नाही.. पण दाट झाडीच्या झरोक्यातून एक मस्त जागा दिसली.. इथेही ओढाच होता.. पण काठाशी असलेला एक मोठा वृक्ष.. जमिनीतून त्याची पुन्हा वरती आलेली मोठमोठी मुळे.. नि आजुबाजूला प्रवाहामुळे सुपिक झालेली लाल माती.. शिवाय त्या वृक्षाचे नि सभोवतालच्या जंगल यांच्या आच्छादनामुळे काळोखही वाटत होता.. तिथे पोहोचायचे अंतर फारसे नव्हते.. पण तिथपर्यंत पोहोचायचे तर थोडी कसरत करत पायाखाली वा आड येणार्या झाडांवरती सर्प तर नाही ना याची खातरजमा करणे मस्ट होते.. शेवटी पोहोचलो.. नि पुन्हा क्षणभर विश्रांती.. खासच जागा वाटली.. या काठावरूनच मग एक फोटो टिपला..
प्रचि १०
पुन्हा पदाक्रमण सुरु केले.. घरी फक्त पार्कात जाउन जेवायला परत येतो म्हणून सांगितले होते... पण आता कान्हेरी गाठल्याशिवाय फिरणार नव्हतो.. आता जंगलाच्या मध्यभागी आल्याने मोबाईलची रेंजदेखिल गेली त्यामुळे आता आईचा ओरडा पडणार यावर शिक्कामोर्तब झाले.. म्हटले कान्हेरी लवकरात लवकर गाठून फोन करू..
प्रचि ११: वळण !
प्रचि १२: विविधरंगी फुलपाखरे होती खरी.. पण माझं ऐकतील तर खर ना.. कसेबसे चार-पाच फोटो मिळाले..
चालताना अधुनमधून कान्हेरीवरून परतणारे ग्रुप्स भेटत होते.. तर एकजण माझ्यासारखाच 'एकला चलो रे' करत कान्हेरीवरुन येत होता.. 'वेगमर्यादा ताशी २०किमी' हे सांगणार्या फलकाकडे दुर्लक्ष करून एखाद दुसरी बाईक वा गाडी भरधाव वेगाने रस्त्यावरील चिखलपाणी तुडवत जात होती.. तर जिथे अगदी रस्त्याला चिकटूनच ओढा लागत असे तिथे रानमेवांच्या टोपल्या घेउन बाया बसलेल्या दिसत होत्या... इथेच पुढे एक चेक-नाका लागतो जिथे बाइकवाल्यांची उपस्थित असणार्या दोन-तीन पोलीसांकडून तपासणी केली जाते.. हे सगळे सोडले तर रस्ता रिकामाच... पावसाचा अधुनमधून सुरु असलेला शिडकावा.. आकाशात ढगांची दाटी.. रस्त्याला झाडींचे आच्छादन.. साहाजिकच काळोखी वातावरण.. त्यामुळे जंगली फिलचा परिणाम जास्तच जाणवत होता.. जो मला अपेक्षित होता..! हवाहवासा वाटणारा होता.. !
काही ठिकाणी करमणूक करण्यासाठी रस्त्यात माकडं ठाण मांडून होतीच...
प्रचि १३:
प्रचि १४: प्रत्यक्षात साप जरी दिसला नाही तरी आजुबाजूच्या झाडांवर लटकणार्या फांद्या सापाइतक्याच भयावह वाटत होत्या..
प्रचि १५: झोपलाय बघा कसाss... माकडच आहे !
प्रचि १६: दुपारची वेळ झाली की मोठयांना पेंग येते.. पण बच्चापार्टीची टंगळमंगळ सुरुच असते ना.. उदाहरणार्थ
लवकरच जिथे रस्त्यावरचे झाडांचे छप्पर पुर्णपणे उडते तिथे पोहोचलो.. इथूनच समोर कान्हेरीचा विशाल डोंगर नि त्यात खोदलेल्या गुहा नजरेस पडतात.. पावसात तितका दम नव्हता अन्यथा एक छोटा फेसाळणारा धबधबादेखील दिसला असता..
प्रचि १७:
आतापर्यंत सरळ असलेला रस्ता थोडा चढणीचा होउन बसतो.. काही मिनीटांतच कान्हेरी गुंफाच्या गेट परिसरात पोहोचलो.. तिथे उपस्थित पर्यटक बघून आता कुठे माणसांत आल्यासारखे वाटले.. इथेदेखिल रानमेवा विकणार्या बाया असतातच..
प्रचि १८
इथूनच मग कान्हेरी गुंफाचे तिकीट काढून आत प्रवेश केला.. नि आतापर्यंत अनुभवलेली शांतता लुप्त झालेली दिसली.. शनिवार एंजॉय करायला पिकनीकर्स, कुटुंबे आली होती.. तरीसुद्धा म्हणावी तितकी गर्दी नव्हतीच हेही नसे थोडके.. इथे मोबाईलची रेंज मिळाली नि लगेच घरी फोन लावून आता संध्याकाळीच डायरेक्ट चहा प्यायला येतो म्हणून कळवले..
इथेही वातावरण मस्तच होते.. गुंफा आधी बर्याचदा पाहिल्या असल्याने थेट टॉपवर जाण्यास निघालो.. पावसाची आता मोठी सर येण्याची चिन्हे दिसत होती तेव्हा पटापट पुढे निघालो.. फोटो जो निकालना था.. शिवाय या परिसराच्या सर्वात उंच भागावर उभे राहून पाउस अनुभवण्यात खरच मजा असते.. दाटिवाटीने गजबजलेल्या या मुंबई शहराच्या बाहेर न पडतादेखिल कुठल्यातरी गडावरच आलोय की काय असा भास होतो हे काय कमी आहे..
प्रचि १९: इथूनच मागे वळून आतापर्यंतची वाटचाल पाहिली तर नजरेत न मावणारी हिरवाई... ! त्यामध्ये जिथे उघडीप होती तिथेच फक्त काय दिसतो तो रस्ता.. बाकी सगळे जंगल, जंगल नि जंगल.. !!
प्रचि २०: थोडे वरती चढून गेलो नि पावसाळ्यात कान्हेरीचे ठरणारे खास आकर्षण म्हणजे छोटे धबधबे नि हिरव्या शालुत नटलेल्या गुहा..
प्रचि २१:
कान्हेरीच्या उंच भागावर पोहोचलो नि सभोवताली ढगांचे आक्रमण सुरु झाले.. इथला पाउस मी आधीही अनुभवला आहे त्यामुळे पटापट फोटो काढून घेण्याची मलाही घाई झाली..
प्रचि २२:
प्रचि २३:
(समोरील जंगल नि अगदी दुरवर डोकावणारी मुंबईमधील टोलेजंग इमारती..)
इथूनच तुळशी तलावाचा परिसर देखील सुंदरच दिसत होता.. तिथे पाउस सुरु झाल्याचे दिसत होते... पण एक फोटो टिपला नि त्या पावसाची मोठी सर इथेदेखील पोहोचलीच..
प्रचि २४:
इतके चालून आल्यावर टॉपवर उभे राहून पावसाच्या सरीत चिंब भिजण्याचा आनंद मनमुराद लुटला हे सांगणे नकोच...
पाउस कमी झाला तसे मी टॉपवरून उतरायला घेतले.. आता येउन गेलेल्या पावसामुळे सभोवताली चांगलेच निसरडे झाले होते त्यामुळे तिथे आलेल्यांपैंकी कोणी ना कोणी तरी आपले बुड आपटून घेत होता..
प्रचि २५:
आतापर्यंत बर्याच वेळा इथे येणे झाले आहे.. माझा काही अभ्यास नाही वा तितके स्वारस्य नाही तरीपण या गुंफांमधील बांधकाम पाहिले की बुचकळायला होते.. विचार करायला भाग पाडते.. कसे शक्य केले असेल हे ? तेव्हाची स्थिती काय असेल ? कारागिरी तर कौतुकास्पदच.. स्तुप नि गुंफांमधील काही फोटो 'नॅशनल पार्क ते कान्हेरी गुंफा' इकडे आधी दिले होते..
प्रचि २६:
प्रचि २७:
(या विशिष्ट रचनेबद्दल बरेच बोलले जाते.. पण मला नेमके ठाउक नाही त्याबद्दल क्षमस्व.. जाणकार सांगतिलच..:) )
प्रचि २८:
(या पुलाखालूनच धबधब्याचे पाणी २०० फूट खोल दरीत कोसळते..)
जवळपास दुपारचे तीन वाजले होते.. भूकही सणकून लागली होती.. फक्त पार्कच फिरणार म्हणून खाणे-पिणे काही घेतले नव्हतेच.. तेव्हा लगेच खाली उतरलो नि कान्हेरी गेटपाशीच असलेल्या कोल्ड्रींक हाउसमध्ये गरमागरम वडापाव हादडला.. ! पुरेशी पेटपूजा उरकून परतीच्या प्रवासासाठी लेटस गो केले.. इथेही कान्हेरीची बस उभीच होती.. पण मी भलताच मुडमध्ये आलो होतो.. सो तंगडतोडलाच पसंती दिली..
परतीच्या प्रवासात देखील दबांग फेम वानरसेना भेटलीच..
प्रचि २९:
(ह्याला जरा टरकुनच टिपले. )
प्रचि ३०
तासभरात नॅशनल पार्कच्या बाहेर पडायचे ठरवून पुन्हा चालायला सुरवात केली.. पुन्हा सोबती तेच..तोच सुरकत्या पडलेला थंडगार रस्ता..
प्रचि ३१
एकंदर आजचा निसर्गाच्या संगतीने केलेला Lonely Walk निखळ आनंद देउन गेला होता.. तेव्हा ताजेतवाने होण्यासाठी पुन्हा एकदा जायलाच हवे..
सुरेख हिरवाई. आत्ताच्या
सुरेख हिरवाई. आत्ताच्या अमेरिकेतल्या हीट वेव्ह नी सगळे कंटाळलेत, त्यामुळे खरचं खूप छान वाटलं.
जगात कुठे तरी मस्त पाऊस पडतोय, सगळं हिरवं गार आहे, ढग आहेत्,गारवा आहे हे फोटोत पाहून पण प्रसन्न वाटलं.
मस्तच. आता पुढच्या भारतवरीत
मस्तच. आता पुढच्या भारतवरीत ही पायी सहल करायलाच हवी. सुरेख आहेत सगळे फोटो.
खूप सुंदर छायाचित्र आणि मस्त
खूप सुंदर छायाचित्र आणि मस्त वर्णन...
सुपर प्रचि! मजा आला!
सुपर प्रचि! मजा आला!
तो सहा नंबरचा निळा छत्रीवाला
तो सहा नंबरचा निळा छत्रीवाला फोटो खूप आवडला. बाकीचेही फोटोही खूप मस्त आलेत.
सर्व फोटो सुरेख आहेत...
सर्व फोटो सुरेख आहेत... आवडलेत :स्मित:.
मस्त फोटो. गाsssर वाटलं..
मस्त फोटो.
गाsssर वाटलं..
मस्त फोटोज !
मस्त फोटोज !
तर हे मी मिसलं !! खुप वाट
तर हे मी मिसलं !! खुप वाट बघितली तूझ्या फ़ोनची.
क्लास.... प्रचि ४ आणि १५
क्लास.... प्रचि ४ आणि १५ भारीच वर्णन खूप छान केलय...
नितांत सुंदर अनुभव शेअर
नितांत सुंदर अनुभव शेअर केलास. इतका सुंदर निसर्ग सोबत असताना हा lonely walk श्या ये बात कुछ हजम नही हुई !
ग्रेट ग्रेट पिक्स!!!!!!!!!!!
ग्रेट ग्रेट पिक्स!!!!!!!!!!! रानमेवा पण मस्त!!
मस्त हिरवाई!
मस्त हिरवाई!
सगळेच प्रचि सुंदर!!!! मला
सगळेच प्रचि सुंदर!!!!
मला प्रचि २४ जास्त आवडला
इतका सुंदर निसर्ग सोबत असताना हा lonely walk श्या ये बात कुछ हजम नही हुई !>>>>अनुमोदन
किती दिवस अजुन असा Lonely Walk घेणार
मस्त फोटो. खाली डोके वर पाय
मस्त फोटो. खाली डोके वर पाय जबरीच.
अप्रतिम !!! [ नका प्रसिद्धी
अप्रतिम !!!
[ नका प्रसिद्धी देऊं अशा प्र.चिं.ना; बिल्डर, डेव्हलपर्स च्या जातीची गिधाडं धांवतील तिथं ].
अरे वा सुरेख! प्रचि २० लै
अरे वा सुरेख! प्रचि २० लै आवडले.
आता या सप्ताहांताला जावेच म्हणते. कधीची कान्हेरीची आठवण येत होतीच.
यो मस्तच
यो मस्तच
अप्रतिम.. धन्स लवकर फोटु
अप्रतिम.. धन्स लवकर फोटु टाकल्याबद्दल..
सुर्रेख... ते lonely आता खूप
सुर्रेख... ते lonely आता खूप होतंय..! :-०
वॉव ... सहीयेत सगळे फोटो!
वॉव ... सहीयेत सगळे फोटो! त्यातल्या त्यात..क्र.२३मधे किती विरोधाभास दिसतोय्!
मस्तच!
मस्त भटकंती!
मस्त भटकंती!
Go Green.yo photo mastch re.
Go Green.yo photo mastch re. vrutant nivant vachen.
किती दिवस अजुन असा Lonely
किती दिवस अजुन असा Lonely Walk घेणार >> हो ना.. बाकी मस्तच
मस्तच..
मस्तच..
मस्त !
मस्त !
२२, २३, २४ आणि २८ आवडले.
२२, २३, २४ आणि २८ आवडले.
वाह! ताजंतवानं करणारे फोटो!
वाह! ताजंतवानं करणारे फोटो! सगळेच आवडले.
तुझ्या चालण्याच्या स्टॅमिन्याचंही कौतुक! भारी आहेस!
योयो कित्ती गोड्ड लिहले आहेस
योयो कित्ती गोड्ड लिहले आहेस !
सर्वच प्रची अप्प्रत्त्त्तिम!
त्यामुळे जंगली फिलचा परिणाम जास्तच जाणवत होता.. जो मला अपेक्षित होता..! हवाहवासा वाटणारा होता.. !>> मलाही..
प्रचि१६, त्या पिल्लाच्या चेहर्यावरचे भाव तर... एव्हरेस्ट उतरतोय सारखे.
प्रचि २४, अगदी भन्नाट आहे रे.... अगदी कविंच्या कल्पनेतले...खुप काही सांगुन जातोय्...फार फार फार म्हणजे फारच आवडले.
धन्स या क्षणांसाठी..
जियो योगी !
जियो योगी !
Pages