भारत वि. इंग्लंड - २०११ -

Submitted by नंद्या on 3 July, 2011 - 22:15

England v India 2011

इथे या मालिकेसंदर्भात चर्चा करूयात.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>> लॉर्ड्स चा पण उगाच बोलबाला केलेला आहे असे माझे मत. समजा नाहि मारली तिथे सेंचुरी तर काय मोठा फरक पडतो.

गावसकरचे हेच मत होते लॉर्डसविषयी. "लॉर्डस हे काही जगातले असे काही ग्रेट मैदान नाही, की, जिथे शतक केले नाही तर आयुष्यात काही तरी हरवल्यासारखे वाटेल", असे त्याचे मत होते. किंबहुना ते क्रिकेटसाठी एवढे चांगले नाही, कारण त्या मैदानात एका बाजूने उतार आहे, हेही त्याने सांगितले होते.

त्याला एकदा लॉर्डसवर पॅव्हेलियनमध्ये जाताना, सूट घातला नसल्यामुळे, आत जाऊन दिले नव्हते. तेव्हापासून त्याचा इंग्लंडवर एकंदरीत रागच आहे. त्या रागातच त्याने एमसीसी ने दिलेले सन्माननीय सदस्यत्व नाकारले होते. त्याने सदस्यत्व नाकारल्याचा राग एमसीसीच्या ऐवजी बेदीला आला होता व त्यानंतर त्या दोघात शाब्दिक चकमक झाली होती.

>>> पण एकंदरीत मालिका अत्यंत चुरशीची होईल असेच वाटते. मालिका सुरू व्हायच्या आधी आकडे लावताय का कुणी?

माझा अंदाज - एकदिवसीय सामन्यांची मालिका भारत जिंकणार (४-१ किंवा ३-२). कसोटी सामन्यांची मालिका भारत हरणार (०-१ किंवा १-२. ०-१ ची शक्यता जास्त आहे.). एकमेव T20 सामना भारत जिंकणार.

केदार, मी इतिहासाबद्दलच विचारत होतो.. तुला भविष्य कुठं दिसलं?

DRS वजा हॉक आय आहे.

मास्तर, मला आपण हरण्याची शक्यता वाटत नाही. आपण जिंकण्याची शक्यता जास्त १-०. वर्स्ट केस ड्रॉ १-१.

>>> सचिनने सिरीजच्या पहिल्याच मॅच मधे आत्तापर्यंत किती वेळा शतकं ठोकली आहेत कुणाला माहिती आहे का?

(१) ०६ जून १९९६, विरूध्द इंग्लंड, मैदान - बर्मिंगहॅम, मालिकेतल्या पहिल्या कसोटीत सचिन २४ आणि १२२,
(२) ०२ ऑगस्ट १९९७, विरूध्द श्रीलंका, मैदान - कोलंबो, मालिकेतल्या पहिल्या कसोटीत सचिन १४३,
(३) २६ डिसेंबर १९९८, विरूध्द न्यूझीलँड, मैदान - वेलिंग्टन, मालिकेतल्या पहिल्या कसोटीत सचिन ४७ आणि ११३,
(४) २८ जानेवारी १९९९, विरूध्द पाकडे, मैदान - मद्रास, मालिकेतल्या पहिल्या कसोटीत सचिन ० आणि १३६, (सामना हरल्यामुळे सचिन रडलेला हाच तो सामना),
(५) १० ऑक्टोबर १९९९, वि किवीज, मैदान - मोहाली, मालिकेतल्या पहिल्या कसोटीत सचिन १८ आणि १२६,
(६) १८ नोव्हेंबर २०००, वि झिंबाब्वे, मैदान - दिल्ली, मालिकेतल्या पहिल्या कसोटीत सचिन १२२ आणि ३९,
(७) ३ नोव्हेंबर २००१, वि द आफ्रिका, मैदान - ब्लॉमफाँतेन, मालिकेतल्या पहिल्या कसोटीत सचिन १५५ आणि १५,
(८) २१ फेब्रुवारी २००२, वि झिंबाब्वे, मैदान - नागपूर, मालिकेतल्या पहिल्या कसोटीत सचिन १७६,
(९) २८ मार्च २००४, वि पाकडे, मैदान - मुलतान, मालिकेतल्या पहिल्या कसोटीत सचिन १९४ ,
(१०) १० डिसेंबर २००४, वि बांगलादेश, मैदान - ढाका, मालिकेतल्या पहिल्या कसोटीत सचिन २४८,
(११) १८ मे २००७, वि बांगलादेश, मैदान - चितगाव, मालिकेतल्या पहिल्या कसोटीत सचिन १०१,
(१२) ११ डिसेंबर २००८, वि इंग्लंड, मैदान - मद्रास, मालिकेतल्या पहिल्या कसोटीत सचिन ३७ आणि १०३,
(१३) १८ मार्च २००९, वि किवीज, मैदान - हॅमिल्टन, मालिकेतल्या पहिल्या कसोटीत सचिन १६०,
(१४) १६ डिसेंबर २००९, वि श्रीलंका, मैदान - अहमदाबाद, मालिकेतल्या पहिल्या कसोटीत सचिन ४ आणि १००,
(१५) १७ जानेवारी २०१०, वि बांगलादेश, मैदान - चितगाव, मालिकेतल्या पहिल्या कसोटीत सचिन १०५ आणि १६,
(१६) १६ डिसेंबर २०१०, वि द आफ्रिका, मैदान - सेंच्युरियन, मालिकेतल्या पहिल्या कसोटीत सचिन ३६ आणि १११,

थोडक्यात याही सामन्यात पहिल्या डावात ४० तर दुसर्‍या डावात शतक..? Happy बघुया..
सन्नी भाय चा लॉर्डस वरचा राग समजू शकतो... Happy

मास्तर तुझा पेशन्स दांडगा आहे! म्हणजे सचिनची सेंचरी होण्याची शक्यता १६/५१ * १०० = ३१% असं म्हणायला जागा आहे.

>> त्याला एकदा लॉर्डसवर पॅव्हेलियनमध्ये जाताना, सूट घातला नसल्यामुळे, आत जाऊन दिले नव्हते. तेव्हापासून त्याचा इंग्लंडवर एकंदरीत रागच आहे.

पण इंग्रजांना मधेच नियमांचं शक्य तितक्या काटेकोरपणे पालन करायचा झटका येतो.. मागे एकदा बोरिस बेकरला विंबल्डन मधे प्रॅक्टिस करायला जाऊ दिलं नव्हतं कारण तो पास विसरला होता. त्यानं विचारलं 'तू मला ओळखत नाहीस का?' त्यावर तो गेटकीपर म्हणाला 'हो ओळखतो. पण पासाशिवाय जाऊ देता येत नाही मला!'. तर तसा काहितरी विक्षिप्त नियम असेल लॉर्डसचा! आणि तो मेंबर आहे असं मला वाटतं कारण त्यानं मेंबरशिप वापरून ८३ च्या विजयाला २५ वर्षं झाल्याबद्दल लॉर्डसचं बुकिंग केलं होतं अख्ख्या टीमसाठी!

मी इतिहासाबद्दलच विचारत होतो.. तुला भविष्य कुठं दिसलं? >>. समजा एकुण ३० पैकी १० सामन्यात सचिनने शतक मारले तरी त्यामुळे तो येत्या सामन्यात शतक मारायचे चान्सेस इतके इतके आहेत असे मला म्हणता येत नाही. एवढाच मुद्दा. म्हणून विचारले की काय फरक पडतो त्या आकडेवारीने.

हां उद्या तू म्हणालास की द्रविडने फक्त ३० शतक आणी ४० अर्धशतक मारली, तो काही कामाचा नाही, तर मग मी आकडेवारी मांडेल. Happy

वाटल्यास पुढचे दोन पोस्ट मी आकडेवारीत बोलणार नाही. भलेही मग कोणी सच्याने १०० काढले की आपण हारतो असे म्हणाले तरी. Happy

सचिनच्या कामगिरीबद्द्ल काही बोलत नाही कारण शनिवारी लॉर्ड्सवर चाललो आहे. पावसानं दूर राहावं आणि इंग्लंडची पहिली फलंदाजी यावी अशी प्रार्थना करतो आहे - जेणेकरून सच्याची बॅटिंग बघायला मिळेल! Lol

सॉमरसेटविरूद्धच्या भारतीय संघाच्या कामगिरीवरून मी तरी पूर्ण मालिकेचा निष्कर्ष काढणार नाही. वास्तविक आणखी एक सरावा सामना असायला हवा होता. हां पण ट्रेम्लेट फारच सुंदर बोलिंग टाकतो आहे. तो त्रास देऊ शकतो आपल्या फलंदाजांना. अ‍ॅण्डरसनला लय मिळाली तर तोही खतरनाक ठरू शकतो पण द्रवीड, सच्या नि लक्षूभाय सहज खेळतील त्याला असं वाटतंय. स्वान या ओव्हररेटेड बोलरबद्दल उगाच कौतुकाचे काय कसलेच चार शब्द वाया घालवणे मनाला पटत नाही माझ्या! Wink ब्रॉडऐवजी फिनला घ्यायला हवं होतं.

आपल्या बोलिंगबाबत आशादायी चित्र फार वर्षांनी दिसू लागलंय! झहीराला लौकर एखादी विकेट मिळाली तर त्याच्यावर चढून बसणं इंग्लिश फलंदाजांना कठीण जाणार आहे. इशांताचा कॉन्फिडन्स प्रचंड असणार, माझ्यामते प्रथमच इशांत आपला स्ट्राईक बोलर आणि झहीरचा त्याला सपोर्ट असं चित्र दिसावं. प्रवीण कुमार ऊर्फ पानवाल्याला स्वतःला प्रूव्ह करण्याची आणखी एक संधी आहे - तसा तो गुणी बोलर आहे. स्विंगवर कंट्रोल मिळवायला हवा. मुनाफ पटेल ऊर्फ दूधवाल्याला संधी मिळण्याची शक्यता कमीच आहे.

मालिका चुरशीची होणार यात शंका नाही, 'तीन सामन्यांचा निकाल लागेल' - हे आमचं भाकीत. मन सांगतंय भारत २-१. त्रयस्थपणे विचार केल्यास इंग्लंड सरशी साधून जाईल असं वाटतंय! बघूया काय होतं ते!

आगरकरचा विषय आलाच आहे म्हणुन ऑस्ट्रेलियात २००२ मध्ये आपण २० विकेट कशा काढ्णार हा प्रश्ण होता पण पहिल्या डावात द्रविडचे द्विशतक आणि आगरकरच्या दुसर्या डावातिल ४१/६
यामुळेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपण पहिल्यांदाच त्यांच्या देशात टेस्ट जिंकली होती.

निलिमा धन्यवाद. वरच्या पोस्ट वाचत वाचत येत होतो आणि विचारच करत होतो की आगरकर च्या त्या दोन तीन महत्त्वाच्या कामगिरींबद्दल कोणीच कसे लिहीले नाही. फक्त ती मॅच २००३ मधली अ‍ॅड्लेड ची. आणि ऑस्ट्रेलियात आपण त्या आधीही टेस्ट जिंकल्या आहेत.

देवचार, जरूर ऑखो देखा हाल लिही. मी जून मधे लॉर्ड्स बघून आलो. जबरी फिलिंग येते तेथे. गावस्कर ने मला आठ्वते त्याप्रमाणे एम सीसी ची मेम्बरशिप नाकारली होती. नंतर घेतली असेल तर माहीत नाही.

अ‍ॅडलेड टेस्ट आधी द्रविड-लक्ष्मण च्या ३००+ भागीदारीने गाजली, पण ऑस्ट्रेलियाच्या ५५६ धावांपुढे आपण ५२३ गेल्यावर ड्रॉ च्या दिशेने चालली होती. पण चौथ्या दिवशी आगरकर ने ६ विकेट्स काढून "ओपन" केली. मग पुन्हा द्रविड ने ७२ नाबाद करून जिंकून दिली होती.

ओव्हरमधे ४ चांगले बॉल्स टाकून मग एक दोन भिकार टाकणे हाच त्याचा मेन प्रॉब्लेम. नाहीतर इतर बोलर्सच्या मानाने तो चांगला फिट असतो, फिल्डिंग ही चांगली करतो. अझर, सचिन, गांगुली, द्रविड या सर्व कप्तानांच्या संघात तो असायचा.

त्याने १९९८ आल्याआल्या भारतीय, लंकेच्या, शारजाच्या 'डेड' पिचेस वर जबरदस्त बोलिंग केली होती. पण त्याच वर्षी बहुधा अती क्रिकेटमुळे त्याला काहीतरी दुखणे आले (आणि १९९८ डिसेंबरची न्यू झीलंड टूर हुकली होती) आणि तेव्हापासून त्याचा परफॉर्मन्स घसरला.
१९९६ मधे वर्ल्ड कप जिंकल्यानंतर लंकेला सुमारे दोन वर्षे कोणीही त्यांच्या घरी मेजर स्पर्धेत हरवले नव्हते. जुलै १९९८ च्या इन्डिपेन्डन्स कप मधे आगरकर ने खूप महत्त्वाच्या विकेट्स काढून भारताला जिंकून दिले. त्या फायनल मधे तर पाटा पिच वर तेंडुलकर, गांगुली, डि सिल्वाने शतके ठोकली पण आगरकरने मोक्याच्या वेळेस जयसूर्या, कालू, डि सिल्वा आणि रणतुंगा हे चार जण टिपले आणि मॅच जिंकून दिली. लंका तेव्हा पहिल्यांदा हरली त्यांच्या त्या वेळच्या फॉर्म मधे.

आगरकरच्या त्या ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या रेकॉर्डची ही एक मजा आहे. १९९९-०० च्या सिरीज मधे सलग बर्‍याच वेळा तो तेथे शून्यावर आउट झाल्याने त्याला बॉम्बे डक म्हणत. मग २००३ मधे जेव्हा ब्रिस्बेनला गांगुलीने शतक मारून भारताला आघाडी मिळवून दिली तेव्हा आगरकर खेळायला आला आणि त्याने जेव्हा पहिला रन काढला तेव्हा पॅव्हिलियन आणि प्रेक्षकांकडे बघून शतक ठो़कल्यावर करतात तसे अभिवादन केले होते Happy

>>> आगरकरचा विषय आलाच आहे म्हणुन ऑस्ट्रेलियात २००२ मध्ये आपण २० विकेट कशा काढ्णार हा प्रश्ण होता पण पहिल्या डावात द्रविडचे द्विशतक आणि आगरकरच्या दुसर्या डावातिल ४१/६

हा सामना जानेवारी २००४ मध्ये झाला होता. दुसर्‍या डावातही द्रविडने नाबाद ७० धावा केल्या होत्या.

>>> यामुळेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपण पहिल्यांदाच त्यांच्या देशात टेस्ट जिंकली होती.

१९७७-७८ मध्ये आपण आस्ट्रेलियात ऑस्ट्रेलियाविरूध्द २ कसोटी सामने जिंकले होते. तो ऑस्ट्रेलियाचा दुय्यम संघ होता कारण लिली, चॅपेल बंधू, डग वॉल्टर्स, रॉडनी मार्श इ. महत्वाचे खेळाडू पॅकर सर्कसमध्ये खेळत होते. त्यामुळे ९ वर्षांपूर्वी निवृत्त झालेल्या ४५ वर्षीय बॉबी सिम्पसनला कर्णधार म्हणून पाचारण करण्यात आले. मालिकेतले पहिले २ सामने ऑसीजने जिंकले, पुढचे २ भारताने जिंकले व शेवटचा परत ऑसीजने जिंकला. दुय्यम संघ व ४५ वर्षीय कर्णधार घेऊन ऑसीजने मालिका जिंकली. भारताचा कर्णधार बेदी होता. सुनीलने पहिल्या तीनही कसोटीत दुसर्‍या डावात शतक केले होते. ५ व्या कसोटीत भारताला जिंकायला ४७५ धावा हव्या असताना भारताने ४५० पर्यंत मजल मारली होती. ऑसीजना याचे मालिकेत अ‍ॅलन बॉर्डर, किम ह्यूज हे भारी खेळाडू सापडले. भारताच्या मदनलाल, मोहिंदर अमरनाथ, चेतन चौहान यांचे पुनरागमन याच मालिकेत झाले.

१९८३ च्या मालिकेत सुध्दा भारताने तिसरा कसोटी सामना जिंकला होता. कपिलने अंगात ताप असताना भन्नाट गोलंदाजी करून ५ बळी घेऊन ऑसीजला ८३ धावांत गुंडाळले होते.

२००४ मध्ये जिंकलेला हा ऑसीजच्या भूमीवरचा ४ था सामना होता. त्यानंतर २००८ मध्ये परत एक कसोटी सामना भारताने जिंकला होता.

त्याला एकदा लॉर्डसवर पॅव्हेलियनमध्ये जाताना, सूट घातला नसल्यामुळे, आत जाऊन दिले नव्हते.
नुकतेच द्रवीडला मात्र तिथेच सरावाच्या कपड्यांमधे आत येऊ दिले आहे.

योग्या साहेब प्रेम नाही रे, मला त्यात 'तो' विनोद दिसला!

गावश्याला कशाला आवडेल लॉर्डस? त्याची एक पण सेंचुरी नाही इथे! Wink

बाकी इंटरनेटवर लोकांची मत घेतली तर मुंबईतल्या शिवाजी पार्कला पण लॉर्डस पेक्षा जास्त मतं मिळतील. Proud

मला वाटतं प्रविणकुमार स्विंग व टप्प्यावरील नियंत्रणामुळे झहीरच्या जोडीने इंग्लंडमधे खूप प्रभावी ठरेल.
आपल्या डावाच्या सुरवातीला इंग्लंडने तीन/चार स्लीप, दोन गली. लेगस्लीप असं क्षेत्ररक्षण लावलेलं बर्‍याच काळानंतर पहायला मिळेल. द्रविड ,सचिन व लक्ष्मण याना फलंदाजीत बचाव व आक्रमण याचं प्रदर्शन करतानाच नवोदिताना मार्गदर्शन व सेहवागला सबूरीचे धडे द्यावे लागणारच आहेत. सामन्याच्या चौथ्या-पांचव्या दिवशी आपली बोथट फिरकी गोलंदाजी आपल्याला विजयापासून वंचित करूं शकते, अशीही भिती वाटते. आपल्या संघाच्या गुणवत्तेविषयीं शंका नसली तरी सराव सामन्यांचा अभाव सुरवातीला अडचण निर्माण करेल असं गृहीत धरणं योग्य. युवी व गंभीरपेक्षां रैना चमकेल असं वाटतंय खरं.
मजा येणार हे निश्चित.

गावश्याला कशाला आवडेल लॉर्डस? त्याची एक पण सेंचुरी नाही इथे!>> unofficial match जी बहुतेक MCC vs Rest of World का काहितरी होती त्यात केली होती अगदी शेवटी.

द्रविड ,सचिन व लक्ष्मण याना फलंदाजीत बचाव व आक्रमण याचं प्रदर्शन करतानाच नवोदिताना मार्गदर्शन व सेहवागला सबूरीचे धडे द्यावे लागणारच आहेत. >>सेहवागला खरच अशा धड्यांची गरज आहे ? तो जसा आहे तसा असणेच जरुरीचे नाहि का ?

गावश्याला कशाला आवडेल लॉर्डस? त्याची एक पण सेंचुरी नाही इथे! >>>>. इट्स नॉट अबाऊट सेंच्युरी. इट वॉज नेव्हर! गावस्कर हा भारतीय क्रिकेट मधील एक ध्रूव तारा तर आहेच पण तो सच्चा भारतीय आहे. जिथे जिथे गोर्‍यांनी केवळ कातडीमुळे किंवा भारतीय असल्यामुळे वागणूक दिली, तिथे तिथे त्याने आवाज काढला आहे. ही वॉज डिफरंट. आणि म्हणूनच त्याने लॉर्डस चे आणि इडन्स चे कम्पॅरिझन करून लॉर्डस हे इडन समोर टूकार आहे हे मांडले. सेंच्युरी मुळे नाही. गौतम भट्टाचार्यांनी त्याची मुलाखत घेतली आहे. ती मुळातून वाचली असती तर असे कदाचित म्हणाला नसतास.

बायदवे सच (SACH) हे पुस्तक क्रिकेट प्रेमींनी वाचावे असे आहे. गावस्कर, तेंडुलकर आणि धोणी (स्पेशाली गावस्कर, तेंडुलकर) जनरेशन आणि क्रिकेट मधील बद्लाव, ऑन फिल्ड, ऑफ फिल्ड हे त्यात इतके डिटेल मध्ये मांडले आहेत की बास. गावस्करच्या जनरेशनच्या अडचणी, मानसिकता हे सुंदर प्रकारे आली आहे त्यात.

अमेरिकेत कुणाला हवे असेल तर मी देईन.

http://www.espncricinfo.com/magazine/content/current/story/523973.html >> Thorpe, Emburey चे comments sensible वाटतात. Too hard to predict anything at the moment. I personally believed RSA had better bowling and batting options than Poms but that series ended up in draw (with Viru not contributing so much) Not sure why same can not happen here ? inexperienced Lankan batting were able to cope up against Pom so there is certainly hope there Happy

गावसकर बद्दल केदारशी सहमत. पूर्वी कोणीतरी इंग्लिश माणसाने तेंडुलकर ची तुलना डब्ल्यू जी ग्रेस शी केली तर हा म्हणाला ग्रेस ची तुलना फार फार तर ग्रेहॅम हिकशी होईल (कधी इंग्लंड बाहेर न खेळणे वगैरे रास्त मुद्दे होते), सचिन खूप लांब राहिला Happy

>>जिथे जिथे गोर्‍यांनी केवळ कातडीमुळे किंवा भारतीय असल्यामुळे वागणूक दिली, तिथे तिथे त्याने आवाज काढला आहे. ही वॉज डिफरंट.

अगदी अगदी... सन्नीभाय म्हणूनच महान आहे! समालोचन करताना पण तो एकही संधी सोडत नाही शालजोडीतले मारण्याची आणि आपला मुद्दा बरोबर आहे हे पटवून देण्याचे कसब/अनुभव त्याच्याकडे आहे.
drs आहे म्हणजे पुन्हा असली तरी काँट्रोव्हर्सी होतीलच.. असो. हाईप झालाचे आहे या मालिकेबद्दल प्रचंड आता प्रत्यक्षात काय होते याची उत्सुकता आहे.
(केदार, हा विकांत प्रवासात आहे पुढील आठव्ड्यात बोलुया.)

>>> नवोदिताना मार्गदर्शन व सेहवागला सबूरीचे धडे द्यावे लागणारच आहेत.

सेहवाग इंग्लंडला गेलाय?

>>> गावश्याला कशाला आवडेल लॉर्डस? त्याची एक पण सेंचुरी नाही इथे!>> unofficial match जी बहुतेक MCC vs Rest of World का काहितरी होती त्यात केली होती अगदी शेवटी.

बरोबर. गावसकरचा शेवटचा कसोटी सामना मार्च १९८७ मध्ये पाकड्यांविरूध्द होता. त्यात त्याने एकाग्रतेची पराकाष्ठा करून शेवटच्या डावात ९६ धावा केल्या होत्या. पण भारत १६ धावांनी तो सामना हरला (याच सामन्याची पुनरावृत्ती मार्च १९९९ मध्ये पुन्हा एकदा पाकड्यांविरूध्दच झाली. या सामन्यात सचिनने १३६ धावा करून सामना जवळजवळ जिंकत आणला होता. पण तो बाद झाल्यावर पुढचे ३ खेळाडू केवळ ४ धावांत तंबूत परतले व भारत सामना १५-१६ धावांनी हरला.). त्यानंतर ऑगस्ट १९८७ मध्ये जागतिक संघ विरूध्द (बहुतेक एमसीसी) असा सामना लॉर्डसवर होता. त्यात गावसकरने १७१ धावा केल्या व सामना संपल्याच्या दिवशीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली (अर्थात कसोटीतून. त्यानंतर २ महिन्यांनी तो विश्वचषक स्पर्धेत खेळून संपूर्ण निवृत्त झाला.). बहुतेक लॉर्डस वर शतक झाल्यावर (अनधिकृत सामन्यात का होईना) आपल्या कारकीर्दीचा शेवट करण्याची हीच योग्य वेळ आहे असे त्याला वाटले असावे.

पण गावसकरच्या लॉर्डसवरच्या रागाचा व तिथे न करता आलेल्या शतकाचा काही संबंध आहे असे मला वाटत नाही. त्याला एकदा सूट नव्हता म्हणून जाऊ दिले नव्हते (अभिनेता शशी कपूरला सुध्दा झब्बा-सुरवार या कपड्यांत अडविले होते. पॅव्हेलियनमध्ये फक्त राष्ट्रीय पोषाख असलेल्यांनाच प्रवेश असतो असे त्याला सांगण्यात आले. त्यावेळी त्याने हा आमचा राष्ट्रीय पोषाख आहे असे सांगून रक्षकाला न जुमानता आत जाऊन बसला होता.) व अजून एकदा तिथल्या सिक्युरिटी गार्डने त्याला न ओळखल्यामुळे जाऊन दिले नव्हते. त्यावेळी भारतीय संघाच्या व्यवस्थापकांना तिथे येऊन त्याची ओळख द्यावी लागली होती. त्यापूर्वी सुधीर नाईक प्रकरणामुळे सुध्दा त्याला इंग्लंडचा राग आला होता. भरीत भर म्हणून भारताचा कसोटीतला नीचांक (४२) हा त्याच दौर्‍यात इंग्लंडविरूध्द झाला. १९७५ विश्वचषकात सुध्दा इंग्लंडविरूध्दच गावसकरला तब्बल ६० षटके फलंदाजी करून फक्त नाबाद ३६ धावा करता आल्या होत्या. या सर्व वाईट गोष्टींचा गावसकरच्या लॉर्डसवरच्या रागाशी संबंध असावा.

>> गावस्कर हा भारतीय क्रिकेट मधील एक ध्रूव तारा तर आहेच पण तो सच्चा भारतीय आहे. जिथे जिथे गोर्‍यांनी केवळ कातडीमुळे किंवा भारतीय असल्यामुळे वागणूक दिली, तिथे तिथे त्याने आवाज काढला आहे.

याबद्दल मला काही शंका नाही.

पण लॉर्डस या ग्राउंड बद्दल बोलणं चाललेलं आहे त्याच्या ध्रुवगिरी किंवा आवाजाबद्दल नाही. लॉर्डस हे एक जुनं ग्राउंड आहे त्यामुळेच त्याला क्रिकेटची पंढरी म्हणतात. आणि पंढरीची दुसर्‍या कशाचिही तुलना होत नाही. खर्‍या भाविकाला जसं पुण्यातल्या विठोबाच्या देवळाला जाण्यात ते समाधान मिळत नाही जे पंढरीला जाऊन मिळतं.

इडन्स अतिशय उत्तम ग्राउंड असेल. आणखी काही वर्षांनी डझनभर तयार होतील. पण लॉर्डसचा इतिहास त्यांना कसा मिळणार? उद्याचा सामना तिथला २००० वा सामना आहे. इडन्सवर २०० तरी झाले आहेत का?

>>> उद्याचा सामना तिथला २००० वा सामना आहे. इडन्सवर २०० तरी झाले आहेत का?

अरे हा कसोटी क्रिकेटच्या आतापर्यंतच्या इतिहासातला २००० वा सामना आहे. लॉर्डसवरचा नव्हे. लॉर्डसवर दरवर्षी सरासरी २ या हिशेबाने गेल्या १२५ वर्षात फारतर २५० सामने झाले असतील.

Pages