Submitted by saavni on 21 July, 2008 - 02:20
तुम्हाला खास वाटलेल्या / न आवडलेल्या जाहिरातींबद्दल ईथे लिहा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तुम्हाला खास वाटलेल्या / न आवडलेल्या जाहिरातींबद्दल ईथे लिहा.
लिमकाच्या पण जाहिराती मस्त
लिमकाच्या पण जाहिराती मस्त आहेत.. त्यांचे जिंगल्स एकदम कॅची असतात... उदा. सध्या लागणारी...चलो ना बारीश के पीछे..
>>>
अगदी अगदी......... मी हेच लिहायला इथे आले होते.
पोण्ड्स ची अॅड सुद्धा छान
पोण्ड्स ची अॅड सुद्धा छान आहे............मुलगी मुलाला पळवुन घेउन चाललेली असते अनि मुलगा उदास होउन घरा कडे पाहत असतो....मग ति म्हणते... " शादी भागकर कर रहे है...रिशेप्शन सब के साथ करेंगे..."
असा समाज कधी पुढे जाणार......?..............मी वाट बघत बसलोय......
ती डोमेक्स ची किळसवाणी अॅड
ती डोमेक्स ची किळसवाणी अॅड कुणी पाहिलीये का?? टॉयलेटच्या पॉटला वगैरे हात लावून दाखवते ती बाई.... ईईई यक्स....
खरंच ती डोमेक्स ची एड अतिशय
खरंच ती डोमेक्स ची एड अतिशय किळसवाणी आहे.
२-३ दिवसांपासून काही
२-३ दिवसांपासून काही चॅनेल्सवर तळाला आयबीएफ इंडियाची जाहिरात येतेय. एखादा भाग आक्षेपार्ह वाटल्यास त्यांना कळवावा अशी सूचना येते. इथे टिचकी मारली तर माहिती मिळेल - http://ibfindia.com/guidelines.php
हे जाहिरातींना पण लागू होतं का ते माहित नाही कारण मी ह्या गाईडलाईन्स पूर्ण वाचल्या नाहीत.
क्लोरमिन्टची अॅड मस्त आहे -
क्लोरमिन्टची अॅड मस्त आहे - बॅन्केवर दरोडा पडतो ती.
मला नेचर फ्रेश अॅक्टि लाइट
मला नेचर फ्रेश अॅक्टि लाइट तेलाची जाहिरात आवडली. बाई समोशांना म्हणते ..इतकं का पिता? लोकांसमोर माझी लाज जाते...
अमूल माचो बद्दल पूर्वी चर्चा
अमूल माचो बद्दल पूर्वी चर्चा झाली असल्यास क्षमस्व!
सैफ अली खानची जाहिरात पाहून मनात येणारी प्रतिक्रिया इकडे सौम्य (सभ्य) शब्दांत व्यक्त करता येत नाही. तोच तो अमूल माचो घालून (?) रेस मध्ये धावणारा (?) सैफ अली खान! बहुधा त्याचा 'रेस' दणकन आपटल्यावर ही जाहिरात त्याने केली असावी.
आधीच सैफ, त्यात अमूल माचो घालून आला!
गार्नियर फ्रुक्टिस शांपूने
गार्नियर फ्रुक्टिस शांपूने केस धुणारी बाई केसांनी ट्रक ओढते.
आपल्या वेटलिफ्टरना हा शांपु सुचवला पाहिजे. बिचारे उगाच ड्रग्ज बिग्ज घेतात.
>>अमूल माचो घालून (?) रेस
>>अमूल माचो घालून (?) रेस मध्ये धावणारा (?) सैफ अली खान!
त्याला बघून अमूल माचो घालून उंदीर चाललाय असं वाटतं. एव्हढी बनियन घालून मिरवायची हौस आहे तर निदान शरीरयष्टी तशी ठेवावी. उगाच लोकांच्या डोळ्यांना त्रास
जॉन्सन अँड जॉन्सन च्या अॅड्स
जॉन्सन अँड जॉन्सन च्या अॅड्स कित्ती क्यूट असतात ना.
हल्ली झी मराठी वर टी.म.वि. ची सुहास जोशी ची अॅड येते. हास्यास्पद वाटते ती अॅड मला.
गार्नियर फ्रुक्टिस शांपूने
गार्नियर फ्रुक्टिस शांपूने केस धुणारी बाई केसांनी ट्रक ओढते. >> म्हणजे गार्नियर वाल्यांना असे म्हणायचे आहे का त्यांच्या शांपूने केसांचे दोरखंड होतात?
केस मजबूत होतात हे ठीक आहे,
केस मजबूत होतात हे ठीक आहे, पण ट्रक ओढायला मानेचे स्नायू पण दणकट होत असतील.
अमूल माचोची 'बडे आरामसे' ही
अमूल माचोची 'बडे आरामसे' ही सैफची जाहिरात मला आवडते बुवा....
सुमित राघवन आणि 'तारक मेहता'
सुमित राघवन आणि 'तारक मेहता' मधला जेठा या दोघांची एक जाहिरात लागते. ते दोघे मस्त 'घेत' बसले असतात. सुमित राघवनला त्याच्या बायकोचं नाव आठवत नसतं. तो फुलांची नावं विचारत, शेवटी 'रोज' (गुलाब) पर्यंत येतो..... मस्त आहे ती जाहिरात.
सुमित राघवनची अॅक्टिंग जबरीच....
जेठा=दिलीप जोशी. गंमत ही आहे,
जेठा=दिलीप जोशी.
गंमत ही आहे, की दिलीप जोशी सुमीतला काल कोणत्या रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेला होतात ते विचारत असतो. ते त्याला स्वतःला आठवत नाहीच, वर जिला विचारायचं त्या बायकोचं नावही एका फुलाचं आहे एवढंच आठवतं.
आल्पेलिबेलची पोपटाची अॅड पण
आल्पेलिबेलची पोपटाची अॅड पण मस्त आहे.
इथे कर्नाटकात एका ज्वेलरची
इथे कर्नाटकात एका ज्वेलरची अॅड येते लोकल केबलवर. मल्याळम आणि कानडी अशा दोन्ही भाषेत्डब केलेली आहे. मला ती अॅड तिच्या ट्रीटमेंटमुळे फार आवडली.
एक नविन लग्न झालेले नवरा बायको त्या नवर्याच्या मूळ गावाला गेले आहेत. तिथे तो नवरा (बहुतेक मल्याळी अॅक्टर आहे) आपल्या बायकोला सर्व नातेवाईकाना ओळख करून देतो. (इथे प्रतुएक नातेवाईकाच्या वय्/पद्/आवड इत्यादिचा वापर करून वेगवेगळ्या प्रकारची ज्वेलरी दाखवली आहे, उदा. व्हाईट गोल्ड, हीरे, ट्रॅडीशनल, मॉडर्न इत्यादि)
शेवटी ती नवरी आपल्या खोलीत आल्यावर कौतुकाने नवर्याला म्हणते "कित्ती नातेवाईक आहेत तुझे!"
नवरा अगदी गोड शब्दात म्हणतो "नाती म्हणजे सोन्यासारखी, किती असली तरी कमीच!"
पंचलाईन छान आहेच, त्याचबरोबर पूर्ण अॅडचे व्हिज्युअल मस्त घेतलेय. गावाच्या घराचा लूक, भरपूर नातेवाईक, सर्वाच्या नजरेतले नविन सुनेचे कौतुक हे सर्व कॅप्चर करत असतानाच कुठेही प्रॉडक्ट डोळ्यावर येऊन आदळत नाही. त्याउलट प्रत्येक फ्रेममधे दागिन्याचा एक वेगळा प्रकार दाखवून त्या दागिन्याचा टारगेट कस्टमर आयडेंटीफाय केलेला दिसतो. कुठलाही दागिना बटबटीतपणे न दाखवता नाजुकरीत्या दाखवला जातो.
बर्याच मराठी ज्वेलर्सच्या जाहिराती या बटबटीतपणाकडे झुकतात. त्याना असल्या जाहिराती सुचल्या तर बरेच!!
>>> बर्याच मराठी
>>> बर्याच मराठी ज्वेलर्सच्या जाहिराती या बटबटीतपणाकडे झुकतात. त्याना असल्या जाहिराती सुचल्या तर बरेच!!
<<
'स्वर्ग' ज्वेलर्सच्या जाहिराती म्हणजे बटबटीतपणाचा कहर असतो.
सोन्याच्या जाहिरातींचा विषय
सोन्याच्या जाहिरातींचा विषय निघालाय म्हणून....
मन्नापूरम् गोल्ड लोन च्या अक्षय कुमारच्या जाहिराती पथेटिक क्याट्यागरीत मोडतात (तश्या अक्षय कुमारच्या सगळ्याच जाहिराती त्याच क्याट्यागरीत येतात म्हणा). कोणीतरी गायक रेकतो 'जब घर में पडा हो सोना, फिर काहे को रोना' आणि त्यावर म्हातारा अक्षय हातात काठी घेऊन __/\__ असे हात करत भीषण पद्धतीनं नाचतो....... !
एक अक्षय कुमार सहन होत नाही, त्यात तर म्हातारा आणि तरुण (?) असे २-२ आहेत.
olx.in (यहा सब कुछ बिकता है)
olx.in (यहा सब कुछ बिकता है) च्या लेटेस्ट २ अॅड्स पाहिल्या का?? एक बाईक विकण्यासंदर्भातली आणि दुसरी डेस्कटॉप विकण्यासंदर्भातली. दोन्ही मस्त आहेत.
>>जब घर में पडा हो सोना, फिर
>>जब घर में पडा हो सोना, फिर काहे को रोना
ह्याचं मराठी भाषांतर "जर घरात आहे सोनं, तर कशाला आहे रडणं" ऐकवत नाही अगदी. पूर्वी एफएम फीव्हर वर रामायणाच्या वेळी बॅक-टू-बॅक ३ वेळा लावायचे
मिनिटमेड निंबु फ्रेशची अॅड
मिनिटमेड निंबु फ्रेशची अॅड मस्त आहे. भावाबहिणीच्या नात्याचं सुंदर सादरीकरण केलंय
मिनिटमेड निंबु फ्रेशची अॅड
मिनिटमेड निंबु फ्रेशची अॅड मस्त आहे. भावाबहिणीच्या नात्याचं सुंदर सादरीकरण केलंय
पण ते प्यायलत तर अॅड विसरून जाल. जास्त झालेल लिंबू अग्दी सालासकट पिळल्यावर जो कडवटपणा येतो तशी चव आहे
ते बहीण भाऊ
ते बहीण भाऊ आहेत.....??????????????????
हायला, मला वाटलेलं ते लहान पणाचे मित्र-मैत्रिण आणि पुढे जाऊन त्यांचे लग्न होते...
शेवटच्या सीनमध्ये (मोठे झाल्यावर) तिच्या डोळ्यातले भाव काय बहीणीसारखे आहेत...
का हा माझाच दृष्टीदोष आहे?
आशु, मलाही तेच वाटलेलं
आशु, मलाही तेच वाटलेलं
आशु मंदार अनुमोदन असाच धक्का
आशु मंदार
अनुमोदन
असाच धक्का मला 'तुझ्या गळा माझ्या गळा' हे बहीण भावंडांच गाण आहे कळाल्यावर बसलेला
मला पण बहीण भाऊ च वाटलेले ते
मला पण बहीण भाऊ च वाटलेले ते दोघं .. शेवटी असं वाटलं की ती बहिण माहेरी आलीये आणि भाऊ खोड्या काढतोय लहानपणीसारख्या
भावाने खोड्या काढल्यावर बहीण
भावाने खोड्या काढल्यावर बहीण अशी लाजेल का...
मला पण ते भाऊ बहिणच वाटले
मला पण ते भाऊ बहिणच वाटले होते. पण नवर्याला नवरा बायको..
Pages