एक वाटी काबुली चणे, २ मध्यम आकाराचे कांदे, एक मोठा टॉमेटो, एक इंच आल्याचा तुकडा, २-३ हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, १ चमचा गरम मसाला, १ चमचा जीरेपुड, २ चमचे छोले मसाला, एक चमचा आमचुर पावडर, हळद, मीठ
काबुली चणे रात्रभर भिजवत ठेवावेत. सकाळी साधारण: १५-२० मिनीट कुकरमध्ये मीठ घालून कमी पाण्यात शिजवून घ्यावेत.
एका भांड्यात बारीक चिरलेला कांदा, टॉमेटो, हिरव्या मिरच्या आणि आलं काढावं. त्यात हे शिजलेले चणे अर्धवट मॅश करून घालावेत. आता बाकीचे सगळे मसाले कपभर पाण्यात मिक्स करून छोल्यांमध्ये घालावे. गरज असेल तर थोडं मीठ घालावं. गॅसवर ठेवून कमी आचेवर १५-२० मिनीट किंवा त्यापेक्षा जास्तही शिजू द्यावे.
मधून अधून हलवत रहावं. पाणी आटल्यास वरून अजून थोडं पाणी घालता येईल. याची कन्सिसटंसी पावभाजीच्या भाजीसारखी असते. जितका जास्तवेळ गॅसवर हे शिजेल तितकी छान चव येते. वरून कोथिंबीर घालायची. हवं असल्यास कच्चा कांदा उभा चिरून वर घालता येईल.
हे असे छोले इथे कुलच्यांबरोबर खायला मिळतात. बॉन या कंपनीचे रेडीमेड कुलचे बेकरी सेक्शनमध्ये मिळतात. (मला औरंगाबादला पण मिळाले होते. ) तव्यावर बटर लावून हे कुलचे गरम करायचे आणि त्याबरोबर हे छोले खायचे. सोबत मिठी किंवा नमकीन लस्सी आणि किसलेल्या मुळ्याची कोशिंबीर.
हे छोले करताना तेल अजिबात घालायचे नाही. याची चव हे जसंजसे शिजत जातात तसतशी वाढत जाते. बाहेर हे चोले ज्या भांड्यात बनवतात ते पुर्णवेळ गॅसवर असते.
मसाल्याचं प्रमाण चव घेवून कमी जास्त करता येतं.
मसाला मिक्स करून शिजवताना गॅसऐवजी मायक्रोवेव्हमध्ये शिजवले तर १०-१५ मिनीटं लागतात.
सहिये, मी बरेच दिवस आठवायचा
सहिये, मी बरेच दिवस आठवायचा प्रयत्न करत होते ही रेसिपी, एकदा टिव्हीवर बघीतली होती तेव्हा लगेच करुन बघीतले होते.
अल्पना तुमच्याकडे ते चना पुरी(नैवेद्याला) करतात त्यातले चन्याची रेसिपीपण टाक ना इथे
सही! तोपासु
सही! तोपासु
काल केले होते हे छोले. मस्त
काल केले होते हे छोले. मस्त झाले. इतक्या सोप्या आणि छान रेसिपीबद्दल धन्यवाद.
आज करुन बघेन रात्रीला.
आज करुन बघेन रात्रीला.
अल्पना, आज करून बघितले मस्त
अल्पना, आज करून बघितले मस्त झालेत. माझ्याकडून पाणी किंचीत जास्त झाले पण चव मस्त होती. इथला कांदा शिजायला फार वेळ लागला त्यामुळे पुढच्यावेळी शॅलेट्स (देशी कांदे) वापरून करणार.
मला टोमॅटो घातलेले छोले खुप आवडत नाहीत पण हे आवडले.
वॉव मिनोती, मस्तच दिसतायत
वॉव मिनोती, मस्तच दिसतायत छोले. उद्या करून बघण्याच्या विचारात आहे मी पण.
अल्पना, टोमॅटो घातला तरी
अल्पना, टोमॅटो घातला तरी आमचूर पावडर घालावीच लागते का?
मंजू???? आँ? तुझे प्रश्न
मंजू???? आँ?
तुझे प्रश्न आहेत हे सगळे ??????????????
रैना, मी प्रश्न विचारू नयेत
रैना, मी प्रश्न विचारू नयेत असं काही आहे का?
टोमॅटो आणि आमचुराचा आंबटपणा वेगवेगळा असतो. ह्या पाकृत टोमॅटो आणि आमचूर दोन्ही घालायचं आहे म्हणून मी विचारलं. अशी आंबटपणाकडे झुकणारी चव असेल तर मी तरी आमचूर पावडर घालणार नाही. त्यासाठी हा प्रश्न विचारणं मला आवश्यक वाटलं.
व मस्त रेसिपी आणि छान फोटो
व मस्त रेसिपी आणि छान फोटो पण.
मिनोती, मस्त फोटो आलाय. जर
मिनोती, मस्त फोटो आलाय.
जर शिजवताना पाणी खूप जास्त झालं तर मी ते पाणी काढून घेते आणि कणिक भिजवायला वापरते किंवा त्यात जीरे आणि मीठ घालून आयामला प्यायला देते. थोडं जास्त असेल तर मात्र जास्तवेळ गॅसवर /मावेमध्ये ठेवून आटवून टाकते.
हो मंजु, टॉमॅटो एकच आहे ना त्यामूळे त्याचा खूप काही आंबटपणा जाणवत नाही. घरची बनवलेली आमचूर पावडर असेल तर चमचाभर आणि विकतची असेल तर अर्धा चमचा (विकतची जास्त आंबट असते). खूप काही आंब्बटढाण नाही होणार.
(जर आमचूर घालायची नसेल तर वरून अर्धं लिंबु पिळलंस तरी चालेल)
अल्पना, या छोल्याची चव
अल्पना, या छोल्याची चव नेहमीच्या छोल्यापेक्शा वेगळी लागते का? की तशीच लागते?
वेगळी लागते चव.
वेगळी लागते चव.
अल्पना, मी काल केले हे छोले.
अल्पना, मी काल केले हे छोले. मस्त चव आली आणि मला आवडले. अजिबातच खटपट नव्हती. बारीक गॅसवर खूप वेळ शिजवत ठेवले. लेकीनेही मिटक्या मारत खाल्ले. चांगल्या रेसिपीबद्दल धन्यवाद.
अल्पना, आज केले छोले असे. छान
अल्पना, आज केले छोले असे. छान झालेले चवीला. बरोबर कुलच्यांच्या ऐवजी ओनियन पराठा.
अल्पना,खुपच छान...मला हे साधे
अल्पना,खुपच छान...मला हे साधे बिनामसालेदार छोले खुपच आवडतात..इमलीका खट्टा टाकुन हे छोले छान लागतात..बरोबर पराठे .असतात.....
मस्त आहे पाकृ, तेलविरहित
मस्त आहे पाकृ, तेलविरहित शिवाय. रविवारी करण्यात येइल, सोबत साधे पराठे.
आज केले मी हे छोले खूप छान चव
आज केले मी हे छोले खूप छान चव आली होती चण्यांची !! विशेष म्हणजे तेल नसल्याने छोले, कांदा, टोमॅटो , सगळे मसाले यांचा ओरिजिनल स्वाद घेऊन खाताना खूप मस्त वाटलं. खूप पूर्वी दिल्लीला रस्त्यावर द्रोणातून हा प्रकार खाल्ल्याचं अंधुकसं आठवलं धन्स अल्पना रेसिपीबद्दल
मस्तच रेसिपी.. एक तर तेल
मस्तच रेसिपी.. एक तर तेल नाही.. त्या मी करूनही बिघडली नाही..
मला स्वतःला चाट चवीचे पदार्थ आवडतात.. सो लसून आणि मसालेदार नसलेले हे छोले मस्तच!
हिट रेसिपी! अतिशय आवडली.
हिट रेसिपी! अतिशय आवडली.
पूनम, फोटो भारीच! नवऱ्याला
पूनम, फोटो भारीच!
नवऱ्याला फोनवरून ही कृती सांगितली. त्याने लगेच करून पाहिली आणि 'झ क्का स' असा रीपोर्ट दिला.
आता राहवत नाहीये त्यामुळे मी उद्या चवळीवर प्रयोग करून बघते.
(मला मृण्मयीची फार्फार आठवण येतेय )
पूनम, तुझ्या फोटोंत कांदा
पूनम, तुझ्या फोटोंत कांदा वगैरे चांगला मॅश व्हायला हवा होता आणि आणखीन शिजायला हवे होते असं वाटतंय.
रेसिपी आवडली. पण सचित्र असती
रेसिपी आवडली. पण सचित्र असती तर पोटपुजा (डोळ्यांची) ही झाली असती.
मी हेच लिहीणार होते सायो. मी
मी हेच लिहीणार होते सायो. मी परवा केली तेव्हा छोले अर्धवट मॅश करून घातले. त्यामुळे एवढे टळटळीत छोले नव्हते दिसत.बर्यापैकी पावभाजी सारखी रंगाने आणि टेक्ष्चरवाईज झाली होती. माझं चुकलं असेल काय कारण अल्पनाने तसचं लिहिलय न तिच्या रेसिपीत.
अल्पना, आता तूच करून एकदा फोटो टाक बाई.
खुपच छान रेसिपी आजच करून
खुपच छान रेसिपी आजच करून पाहिली. खरच का वापरतो आपण तेल
धन्स अल्पना
हो सावनी, माझेही. मी कुकरला
हो सावनी, माझेही. मी कुकरला शिजवून पावभाजीच्या मॅशरने अर्धे छोले मॅश केले. आणि भरपूर शिजवले त्यामुळे मस्त मिळून आलेले आणि मसाला मस्त मुरला त्यात.
सायो, सावनी तुमचे चुकले नाही.
सायो, सावनी तुमचे चुकले नाही. पूनमच्या फोटोत आख्खे छोले जास्त दिसताहेत. तसे खायला पण काही हरकत नाही. पण जितके जास्त शिजून मसाल्याबरोबर मिळून येतिल तितकी चव वाढते.
ही कृती आम्ही काळ्या चण्यां
ही कृती आम्ही काळ्या चण्यां सोबत न पाणी घालता अॅपटायझर म्हणून नेहमी करतो. अल्पना, सेलूच्या चन्यांसारखे लागतात. ते ही तेल न घालता.
पण काळ्याच्या व्हेरिएशन मध्ये टोमॅटो चांगले लागत नाहीत.
सायोला अनुमोदन.. माझी अगदी
सायोला अनुमोदन.. माझी अगदी पावभाजीसारखी झाली होती नि मस्त चटपटीत झाली होती.
ब्लेंडर मारलं तर???? छोले
ब्लेंडर मारलं तर????
छोले भिजत घातलेत. उद्या करून बघेन
Pages