उन्हाळा सरत चालला नि आम्हा भटक्या मंडळींना ट्रेक्सचे वेध नाही लागले तर नवलच.. त्यात भटक्या मायबोलीकरांची बोलणी सुरु होतीच.. कुठे जायचे म्हणून.. यंदाच्या सिजनमधला पहिलाच ट्रेक साधा छोटा असावा म्हणून "सांधण दरी" ठरले.. साम्रद (तालुका:अकोले, जिल्हा: अहमदनगर)या छोट्या गावाजवळ असलेली ही सांधण दरी.. सुमारे दोनशे फूट खोल नि अंदाजे दिडकिलोमीटर पर्यंत विस्तार असलेली ही दरी म्हणजे नैसर्गिक चमत्कारच म्हणावा.. या दरीतून चालणे म्हणजे भूगर्भातून मार्ग काढतोय असे भासते.. थोडक्यात जमिनीला पडलेली भेगच म्हणायची.. पण हा मार्ग नक्की वाहत्या पाण्यामुळे झालाय की भुगर्भातील हालचालीमुळे झाला आहे हे काही माहित नाही... मागे मायबोलीवर 'डोंगरवेडा' आयडीने या सांधण दरीचे फोटो टाकले होते तेव्हाच आम्हा भटक्यांचा इथे जाण्याचा प्लॅन शिजला होता..
ठरले एकदाचे.. मायबोलीवर कठोर (!!) नियमांसकट बाफ उघडला गेला.. जेमतेम ८-१० च्या आसपास संख्या होईल तेव्हा दोन गाड्या करुन जाता येइल अशी आखणी होती. पण मुंबईकर-पुणेकर मिळून संख्या १२ झाली.. तेव्हा तीन गाडया सज्ज झाल्या.. इंद्रा नि विन्या यांनी हल्लीच नविन गाडया घेतल्या होत्या.. तेव्हा त्या गाडयांना आता बारा गावची माती दाखवणे आवश्यक होते...तर एकीकडे गिरीची गाडी सरावलेली होतीच.. ठरल्याप्रमाणे सगळ्यांनी शनिवारी रात्री भांडुप स्टेशन गाठले.. नि एकमेकांशी हस्तांदोलन- ओळख करत (बरेचजण एकमेकांना प्रथमच भेटत होते !) पुढे सरावलो..
जाण्याचा मार्ग तसा कोणालाच पक्का ठाउक नव्हता.. पण नकाशे घेतले होते सो टेंशन नव्हते.. पण आमच्या गाडया काही एकत्र येत नव्हत्या.. खो-खो सत्र सुरु होते.. शेवटी आता डायरेक्ट कसारा घाटा अगोदर लागणार्या 'बाबा दा धाबा' इथे एकत्र येण्याचे ठरले.. आम्हा मायबोलीकरांच्या मागे केलेल्या कुलंग ट्रेकमधील येथील आठवणी ताज्या होत्याच.. तेव्हा यावेळी गरमागरम डाल-रोटी ची भक्कम ऑर्डर दिली.. नाश्ता-चहा आटपून पुन्हा मार्गी लागलो..मुंबई नाशिक महामार्गावर कसारा घाट गेला की टोल नाका लागतो.. तिथूनच पुढे उजवीकडे (मुंबईहून नाशिक रुट) घोटीला जाण्यास मार्ग आहे.. इथून पुढे गेलो असता रेल्वे फाटक लागते.. ते पार केले की उजवीकडे 'अलंग-मदन-कुलंग' या सह्याद्रीच्या उंच त्रिकुटाला भेट देण्यासाठी जाण्याचा मार्ग.. जो आंबेवाडी गावात घेउन जातो.. तर डावीकडे जाणारा मार्ग भंडारदरासाठी.. एकंदर मार्ग ठरला होता.. 'कसारा घाट-घोटी-वसळी फाटा-शेंडी भंडारदरा-उधवणे-साम्रद गाव '
साधारणत: पहाटे तीन-साडेतीन ला पोहोचू असा अंदाज होता.. म्हणजे दोन तास विश्रांती करुन उनाडक्या करायला मोकळे.. घोटीवरून भंडारदर्याच्या रस्त्याला लागलो.. नि मग नुकताच पाउस पडून गेल्याने रस्त्यावर साचलेले पाणी तुडवत, अधुनमधून लागणार्या धुक्यांमधून मार्ग काढत काळोखातून त्या सुनसान रस्त्यांवरून आमच्या तीन गाडया सुसाट सुटल्या होत्या.. कोणी रस्ता चुकू नये म्हणून तिन्ही गाडया ठराविक अंतरामध्ये ठेवत होतो.. पुढे थांबलो ते शेंडी भंडारादर्याला.. जिथून एक मार्ग भंडारदाराकडे वळतो तर एक पुढे उधवणेकडे..
इथे अंधारात गाडीतून सगळे बाहेर पडले नि सगळ्यांचे डोळे चमकले.. !! खरे तर आमच्या डोळ्यांसमोर चमकत होते.. अगणित काजवे.. !! दृश्य अवर्णनिय होते.. सभोवतालच्या झाडांवर लाइटींग केल्यासारखे वाटत होते.. तर बाजूलाच असणार्या दरीत तर बस्स ...तारे जमिनपर !!.. एकाचवेळी चमकणारे नि एकाचवेळी विझणारे. काय तो टायमींग.. सॉल्लिड.. डोळ्यांचे पारणे फिटले.. रोहीत तर या दृश्याला आपल्या कॅममध्ये बंदीस्त करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होता.. काही मिनीटांतच पुढे मार्गस्थ झालो..
उधवणे गाठले.. नि आता पुढचे लागणारे साम्रद गावच म्हणत आम्ही गाडी गावात घेतली.. चार - पाच घर वगळता काहीच दिसले नाही.. गावच्या ओळखीची खूण असलेली शाळा दिसली पण मारुतीचे मंदीर दिसत नव्हते.. तेव्हा थोडा गोंधळच उडाला.. पण काहितरी चुकलोय म्हणत आम्ही पुन्हा आधीचा रस्ता धरला नि पुढे गेलो.. पुन्हा चार- पाच घरांची वस्ती लागली.. पण इथे तर अजून संभ्रमात पडलो.. एकतर रस्त्यावर विजेचे दिवेही नव्हते.. सारा परिसर अंधारात लपला होता.. कोणाची जागही नव्हती..इथे तिथे हुडकून पाहिले पण नक्की त्याच गावात पोहोचलोय का ते कळत नव्हते... एका गावकर्याचा (ज्याला नाश्ता-जेवणाची ऑर्डर दिली होती) त्याचा मोबाईल नंबर होता पण रेंजदेखील नव्हती.. शेवटी उजाडेपर्यंत तिथेच रस्त्यावर आम्ही आडवे होउ म्हणून मॅट टाकली नि मस्तपैंकी झोकुन दिले.. पण मायबोलीकर एकत्र आले की शांतपणे बसतय कोण.. गप्पाटप्पा चालूच राहिल्या..... पाउस नव्हता म्हणून निभावले..
काहिवेळातच एका घरातून टॉर्च बाहेर पडली नि विचारपूस केल्यावर कळले त्याच रस्त्याने पुढे पाचेक मिनीटांवर गाव आहे..! पहाटेचे साडेचार -पाच वाजत असतील.. आम्ही लगेच आवरुन पुढे निघालो.. साम्रद गावात पोहोचताच दोन मोठ्या प्रायवेट बसेस, दोन गाडया असा ताफा बघून आमच्या मनात शंकेची पाल चुकचुकलीच.. ट्रेकर्सलोकांची इथे पण जत्रा भरली की काय वाटले.. पण नंतर कळले ते शनिवारीच आले होते नि आता सकाळी परतीला निघणार होते.. म्हटले बरे झाले.. तिथेच मग आम्ही त्या गावकर्याचा (श्री.दत्ता भांगरे) यांचे घर गाठले.. साम्रद गावसुद्धा छोटेच आहे.. एक शाळा, मारुतीचे मंदीर नि जवळपास सात आठ घरे असतील.. इतकाच काय तो विस्तार.. बाकी आजुबाजूला विस्तीर्ण माळरान.. नि क्षितीजाला लपवू पाहणार्या उंचच्या उंच सह्याद्रीरांगा.. !
आम्ही पोहोचलो तेव्हा किंचीतसे उजाडले होते.. पण त्या अंधूक प्रकाशात ह्या सह्याद्री रांगा मात्र लक्ष वेधुन घेत होत्या.. त्या डोंगरांच्या खांद्यावरती निजलेले ढग देखील सुंदरच दिसत होते..
प्रचि १:
(आमचे तीन रथ)
पुर्वेकडे तांबडे फुटले नि सारे काही कुंचल्याने रंगवल्यागत वाटू लागले..
प्रचि २
प्रचि ३
(इंद्रा, गिरी, विन्या नि बॅकग्राउंडला डोकावतोय तो 'अलंग' )
प्रचि ४ : टोपीवाले काका
असली सुंदर पार्श्वभूमी मिळाली की आम्ही क्षणाचाही विचार न करता 'उडीबाबा' कार्यक्रम आटपून घेतो.. दणादण उडया मारून झाल्या.. नि मग आम्ही नाश्त्यासाठी दत्ताच्या घरी वळालो.. चहा-पोहे असा फक्कड नाश्ता झाला नि आमची ढिनच्यॅक तयारी(!!!) सुरु झाली.. डोक्यावर कपडा नाहीतर कॅप, डोळ्यांवर गॉगल, बर्मुडा घाल, ट्रॅक पँट घाल असे अनेक नखरे करत एकदाचे 'लेटस गो' करण्यासाठी सज्ज झालो.. नेहमीप्रमाणे खाण्यासाठी ज्याची सर्वात छोटी सॅक असते तीची निवड करतो.. मग त्यात भरलेले खाणे, पाणी इत्यादी बोझा त्याला उचलावा लागतो.. अर्थातच ती पाळी प्रगोवर आली.. (हा आमचा अप्रकाशित नियम समाजाव... :P) निघेपर्यंत चांगलेच उजाडले होते.. गावाकडची गुरे रतनगडाच्या दिशेने चरण्यासाठी बाहेर पडली..
प्रचि ५:
तर एकीकडे आम्ही सांधण दरीची दिशेने चालू पडलो..
प्रचि ६
ढगांनी आपला मुक्कम उठवल्यामुळे आता सह्याद्री रांग मस्त उठून दिसत होती...
प्रचि ७ : खुटा (डावीकडचा) नि रतनगड
प्रचि ८: माझे सर्वात आवडते.. 'अलंग, मदन नि कुलंग' हे त्रिकुट.. ही रांग मस्तच दिसते इथून..
या त्रिकुटाला पाहिले की आपण हे त्रिकुट सर केले आहे याचे मला अप्रुप वाटते.. नि तिथे पुन्हा पुन्हा जावेसे वाटते..
प्रचि ९ : त्याच त्रिकुटाच्या रांगेत पुढे पसरलेली कळसुबाईची डोंगररांग देखील मस्तच
(वरील फोटोत मध्यभागी जो उंचवटा दिसतोय तेच महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर.. कळसूबाई शिखर)
आम्ही पंधरा- वीस मिनीटांतच दरीत येउन पोहोचलो.. नि 'लहान मोठाले दगडधोंडे.. जिकडे तिकडे चोहीकडे' गाणे म्हणावेसे वाटले.. आमची जपून वाटचाल सुरु झाली.. आदल्या रात्री भरपूर पाउस पडून गेला होता.. त्यात सकाळची वेळचे पडलेले धुके.. साहाजिकच खडक फार गुळगुळीत झाले होते.. कधी पाय घसरेल याचा नेम नव्हता..
प्रचि १२:
चार-पाच पावले पुढे पडली नि ट्रेक हा प्रांत नवा असलेल्या 'डुआय' या आयडीधारक मायबोलीकराने 'आयकान्ट' हा नविन आयडी धारण केला.. खरे तर आता कुठे ट्रेकला सुरवात झाली होती. पण त्याचे फ्लोटस त्याला काय स्थिर उभे राहू देत नव्हते.. शिवाय त्याला चांगलाच घामटा फुटला होता... पण आमच्यात असले चालत नाही.. तेव्हा 'चल, आम्ही आहोत पाठीशी.. टेंशन मत ले' म्हणत त्याला आमच्या स्पेशल नजरेखाली चालते केले.. इंद्रदेवांनी तर त्याला स्वतःचे शुज देण्याचे ऑप्शन दिले होते.. आम्ही एकमेकांची किती कित्ती म्हणून काळजी घेतो ना..
आमच्यात सर्वात पुढे आनंदयात्री, सुकी जात होते..
प्रचि १३
आम्ही जसजसे पुढे सरकत होतो तशी दरी अरुंद होत होती.. शिवाय ढगांनी दरीमध्ये अचानक शिरकाव सुरु केला.. एकंदर वेगळ्याच दुनियेत प्रवेश केल्यासरखे वाटत होते..
पुढेच पाण्याचे पहिले डबके लागले.. नि मग उजवीकडून खडकाला धरत तो सोप्पा टप्पा पार केला..
प्रचि १४:
(डेविल कडेकडेने जाताना..)
ढगांचे अचानक झालेले आक्रमण.. त्यामुळे अंधुक झालेला परिसर....कुठल्या तरी पक्ष्याची दरीमध्ये घुमणारी शीळ... वाटेत दिसणारे बेडूक नि खेकडे... नि आम्हा मायबोलीकरांचा आवाज.. यापलिकडे काही नव्हते.. पण अचानक पुढे दगड पडल्याचा जोरात आवाज आला.. ! नि सगळे थबकलेच.. वाटले वरतून माकडं तर नाही ना काही चाळे करताहेत.. शेवटी चाहूल घेउन आम्ही पुढे जाउ लागलो...
प्रचि १५ :
(सांधण दरीमधील मी उभा म्हणणारा रोहीत.. एक मावळा)
प्रचि १६
सगळे जण मस्तपैंकी धमाल करत पायाखालील खडकाळ वाटेला तुडवत जात होते.. घाई कुणालाच नव्हती..
प्रचि १७
कॅमेर्यातून क्लिकींग सुरु होतेच.. पण धुसर वातावरणामुळे हवे तशे फोटो काही निघत नव्हते.. त्यामुळे थोडी निराशाच झाली.. आमचे खरेतर टायमिंग चुकले होते.. भरदुपारी इथे भेट द्यायला हवी होती.. कारण इकडे ऊन-सावलीचा खेळ बघण्याची मजा काही और असते..
असो.. आम्ही जसजसे पुढे जात होतो तसे दरीचा वरतून उघडा असलेला भाग अरुंद होत जात होता... साहाजिकच वाटही अरुंद बनत होती.. नि इकडून चालताना मस्तच वाटत होते..
प्रचि १८
पुन्हा आम्हाला वाटेत दरीमधले पाण्याचे दुसरे डबके लागले.. ह्या दोन्ही डबक्यांमधील पाणी सुर्यकिरणांचा जास्त शिरकाव होत नसल्याने बारामहीने साठून राहते.. पहिले डबके अंदाजे दोन फुटी असावे.. दुसरे डबके मात्र थोडे खोल आहे असे ऐकून होतो.. त्यात आदल्या रात्री पाउस पडल्याने किती फूट पाणी साचलेय याचा अंदाज येत नव्हता... त्यामुळे साहाजिकच धांदल उडणार होती.. इथे मात्र आमच्या सेनेतील 'बाजीराव्_अवि' पुढील वाटेचा ताबा घेण्यास पुढे सरावला.. आम्ही रोप आणला होताच.. तेव्हा एका हातात काठी नि रोप घेउन बाजीराव पुढे गेला.. त्याच्या छातीपर्यंत पाणी लागले तेव्हा पुर्ण भिजणार याची खात्री झाली.. नि सगळे आपापल्या कॅमेर्याची पॅकींग करू लागले.. कॅमेरा मानेभोवती गुंडाळणे भाग होते.. बाजीराव जसा पुढे गेला तसे पाणी कमी होते गेलो सो अडथळा शर्यत फक्त डबक्याच्या मध्यभागीच होती.. पुढे मग रोहीत गेला नि चालताना तोल जाउ नये म्हणून एका टोकीला दोरी घेउन उभा राहीला.. खोली नव्हती.. पण छातीपर्यंत पाणी.. तेदेखिल अगदी बर्फासारखे थंडगार.. पाण्यात पायाखाली लागणार्या छोट्या-मोठ्या खडकांची गर्दी.. तोल गेला तर कॅमसकट पुर्ण भिजणार होतो... शिवाय खाद्य भरून घेतलेली सॅकही होतीच.. शेवटी वाटेचा अंदाज घेत एकेक करून कसरत करत पाण्यातून पुढे जाऊ लागले..
प्रचि १९
प्रचि २०
(वाह.. क्या पोझ है.. ( रोमा, गिरी, विन्या, डेविल, डुआय नि इंद्रा) )
प्रचि २१
(हा 'डुआय' मनापासून हसतोय का ते तुम्हीच ठरवा.. )
इथून पुढे गेलो नि आम्ही दरीच्या मध्यभागी येउन पोहोचलो.. नजरेपुढे दरीचा सर्वोत्तम टप्पा होता.. हे पुढील प्रचिंमधून कळेलच.. सांगणे नकोच..
प्रचि २२
प्रचि २३
प्रचि २४
खरच अदभुत दरी... कसे झाले असेल हे सगळे..! इथून जाण्याचा अनुभव आगळाच.. याच दरीमध्ये काही ठिकाणी पाणी ठिबकत होते..
प्रचि२५
लवकरच आम्ही सांधण दरीच्या शेवटच्या टोकाला पोहोचलो.. जिथे सांधण दरीचे तोंड उघडते..
प्रचि २६
मी पोहोचलो तर टोकाशी आनंदयात्री मस्तपैंकी पहुडले होता.. इथे जाण्यास मोठमोठ्या खडकांचा सामना करत थोडेसे खाली उतरावे लागते..
प्रचि २७
प्रचि २८
(क्षणभर विश्रांती)
हे टोक गाठले म्हणजे सांधण दरी ट्रेक पुर्ण होतो.. पुढे वाट खालच्या बाजूने उतरत जाते.. जिथे दोन तीन रॉक पॅचेस आहेत.. तिथूनच मग करोळी घाट गाठता येतो.. आम्ही इथूनच माघारी फिरणार होतो तेव्हा पेटपूजेचा कार्यक्रम सुरु केला.. डुआयने वरतीच राहणे पसंत केले होते.... त्यामुळे 'त्याला खायला ठेवा रे' असे एकीकडे फॉर्मेलिटीने सांगत सगळेच सरळ आडवा हात मारत होते... वाटले डुआय आता तर कर्माने उपाशी राहणार.. खरच आम्ही किती कित्ती म्हणून काळजी घेतो ना..
अर्ध्यातासातच परतीचा प्रवास चालू केला.. येताना मात्र वातावरण बर्यापैंकी सुधारले होते.. त्यामुळे दरी अधिकच खुलून दिसत होती..
प्रचि २९
प्रचि ३०
(वरील प्रचिमध्ये दिसणार्या दगडधोंडयांमध्ये 'प्रगो'ला शोधा.. )
प्रचि ३१
प्रचि ३२
(दिनेशदांनी खालून दरीचा वरच्या भागाचा फोटो घेण्यास सांगितले होते.. तेव्हा हा झेंडा टिपला गेला.. )
प्रचि ३३
परत येताना वाटेचा अंदाज आल्याने त्या दुसर्या डबक्यात रोप वापरलाच नाही.. खरेतर तशी गरजच नव्हती..
प्रचि ३४
संपूर्ण दरी धुंडाळून आम्ही सकाळी अकराच्या सुमारास बाहेर आलो.. दमछाक न झाल्याने ट्रेक कधी सुरु झाला नि संपला ते कळलेच नाही.. साम्रद गावाकडे परतताना आकाशातील ढगांचे तांडवनृत्य लक्ष वेधून घेत होते.. सह्याद्रीरांगेलादेखील ढगांचे ग्रहण लागले होते...
प्रचि ३५
(ढगांनी गिळंकृत केलेला अर्धा अलंग)
प्रचि ३६
(उजवीकडील 'आजोबा' डोंगर गरम झाल्यागत ढगांच्या वाफा सोडत होता)
एकंदर पावसास अनकुल वातावरण बनत होते.. साहाजिकच गावाकडे शाकारणीचे काम जोमाने सुरु होते..
प्रचि ३७
आम्ही जेवण तयार होईपर्यंत कपडे बदलून घेतले नि तिन्ही गाड्यांना आमच्या ओल्या कपडयांनी सजवून टाकले.. त्यानिमित्ताने गाडीवरची धूळही पुसली जात होती.. काही वेळातच मस्त जेवण झाले... नि मग वामकुक्षी घेणे क्रमपाप्त झाले.. काहींनी झोप घेणे पसंत केले.. इथूनच आम्हाला कोकणकडा बघायला जायचे होते.. शेवटी पंधरा- वीस मिनिटांच्या विश्रांतीनंतर वामकुक्षीवाले मोजके मायबोलीकर उठले नि कोकणकडेच्या दिशेने चालू लागलो..
या कोकणकडयाची तुलना जरी हरिश्चंद्रगडाच्या कोकणकडयाशी होत नसली तरी हा कोकणकडा मस्त आहे.. इथून आजोबा डोंगर, बाण पिनॅकल अगदी जवळून दिसतात..
प्रचि ३८
प्रचि ३९
(इथे इंद्राला क्लिकींगची ड्युटी देउन मी कोकणकडा न्याहाळू लागलो )
प्रचि ४०
(हाही फोटो इंद्राने क्लिक केलाय.. इथूनच समोरील विस्तीर्ण प्रदेशात पडणारा पाउस दिसत होता...)
तिथला पाऊस इथे पोहोचेस्तोवर आम्हाला पुन्हा गावाकडे जाणे भाग होते.. परतताना दिसणारी डोंगररांग मात्र काही नजरेआड होत नव्हती.. आम्हाला भेट द्यायलाच पाहिजे असे ते डोंगर सारखे खुणावत होते.. मग आम्हीसुद्धा जायचेच म्हणून कट शिजवलाय.. कधी ते माहीत नाही..:P
प्रचि ४१
आम्ही गावात पोहोचेस्तोवर बाकीच्यांनी आवारायला सुरवात केली होती.. सुकत घातलेले कपडे एव्हाना कोरडे झाले होते.. काही अवधीतच आम्ही सुंदर अश्या या साम्रद गावाच्या परिसराला अलविदा केला.. आता इथून घाटघरजवळचा कोकणकडा नि डॅम बघून मुंबईत परतीला निघायचे ठरले.. नि वाटेत नदी लागली तर पाण्यात डुंबण्याची संधी दवडायची नव्हती..
घाटघरजवळील कोकणकडा देखील मस्तच.. इथून घाटघर डॅमचा परिसर नजरेस पडतो..
प्रचि ४२
(इथे वीजनिर्मितीचा प्रकल्प उभारण्यात आला आहे..)
काही मिनीटांतच आम्ही परतीला निघालो.. म्हटले इथे आलो तर घाटनदेवीचे मंदीर देखिल बघूया.. तिथे जाण्यास गाडी वळवली पण वाटेत कळले की ते एकदम टोकाला आहे... तेव्हा पुन्हा मागे फिरलो.. याच परिसरात 'भंडारदराचे बॅकवॉटर नि मागे उभे असलेले कुलंग, मदन, अलंग हे त्रिकुट नि कळसुबाईची डोंगररांग' हे दृश्य मस्तच वाटते..(इकडचा फोटो घेण्यास विसरलो.. पण विन्याने घेतलाय )
आम्हाला नशिबाने लवकरच साम्रद गावाअलिकडच्या पुलाखाली डुंबण्यासाठी मस्त जागा सापडली.. मग काय.. लगेच पुलाच्या कडेला गाडया पार्क करून गेलो डुंबायला.. खोल नसल्याने माझ्यासारख्या न पोहता येणार्यांची चंगळच झाली.. सुक्याने तर माझ्यासाठी लागलीच 'दोन मिनीटात फटाफट पोहायला शिका' असा कोर्स काढला... पण जल्ला कितीही हात मारले तरी मी काय पुढे जात नव्हतो... पण थंड पाण्याने आम्ही मस्तच फ्रेश झालो.. फक्त डुआयने मात्र आग्रह करूनही काठावर ठाण मांडून सनबाथचा आस्वाद घेण्यात धन्यता मानली...
प्रचि ४३: मौजाही मौजा !
इथेच मग काठावर बसून आणलेले कलिंगड खाल्ले नि अंतिम प्रवासास सुरवात केली.. आमच्यावर वरुणराजा भलताच खुष होता.. संपुर्ण ट्रेकमध्ये कुठेही त्रास दिला नाही.. मुंबईला परतण्यास निघालो तेव्हा कुठे सुरवात केली.. साहाजिकच परतीच्या वाटेत सुंदर नजारा पाहण्यास मिळाला.. कसारा घाट ओलांडला नि मग जवळच लागलेल्या एका धाब्यावर आम्ही शेवटचा एकत्रित चहा-नाश्त्याचा कार्यक्रम उरकून घेतला... भर पावसात नाश्त्याचा मेनू हा गरमागरम भजी नि वडापाव असल्याने अख्ख्या ट्रेकमध्ये करण्यात आलेल्या पेटपूजेचा शेवट मस्तच झाला..
इथेच मग गाडयांसकट आतापर्यंत न घेतलेला ग्रुप फोटो झाला.. 'मस्त मस्त झाला ट्रेक... पुन्हा केव्हातरी भेटू' म्हणत एकमेकांचा निरोप घेण्यात आला..
प्रचि ४४
(उभे :डुआय, बाजीराव्_अवि, डेविल, रोहीत.. एक मावळा, आनंदयात्री, प्रगो(टग्या, पंत), गिरीविहार
बसलेले: विनय भीडे, यो रॉक्स, कुणाल (इंद्राचा मित्र), सुर्यकिरण नि इंद्रधनुष्य )
धन्यवाद _/\_
वा मस्त ट्रेक आणि मस्त फोटो.
वा मस्त ट्रेक आणि मस्त फोटो.
मस्तच रे. वाट बघायला लावलीस,
मस्तच रे. वाट बघायला लावलीस, पण त्याची चीज झाले.
आणि अगदी मला हवे ह्ते तसे फोटो आहेत हे.
वा, अप्रतिम नजारा. याहून
वा, अप्रतिम नजारा. याहून रांगड्या डोंगरांगा मी नाही पाहिल्या. अफलातून ट्रेक आणि जबराट वृतांत. ट्रेक कितीही अवघड असले तरी ते सहज आणि सोपे करून पुर्ण करणे आणि करवून घेणे यात माहिर झालायेत तुम्ही. टोपीवाले काका आणि दरीचा फ्रेश फोटो मस्त आलेत.
जल्ला ते डबक्यातून वरती आलेले पाय नेमके कुणाचे हे शोधा.
मस्त रे.. पावसाच्या बातम्या
मस्त रे.. पावसाच्या बातम्या ऐकून कधी एकदा ट्रेकला जातो अस झालय... आणि त्यात असे हे फोटो.... !!
मस्त फोटो.
मस्त फोटो.
मस्त वृतांत आणि फोटो
मस्त वृतांत आणि फोटो (नेहमीप्रमाणेच :-))
नेहमीप्रमाणे खाण्यासाठी ज्याची सर्वात छोटी सॅक असते तीची निवड करतो.. मग त्यात भरलेले खाणे, पाणी इत्यादी बोझा त्याला उचलावा लागतो>>>>>>>ह्म्म्म्म!!! नोटेड
वाचून लई मस्त वाटलं, फोटू
वाचून लई मस्त वाटलं, फोटू अप्रतिम, लिवणं अफलातून !
प्रचंड हेवा व त्याहून प्रचंड कौतुकही वाटलं !
प्रचि २१ मध्ये 'डुआय' चे
प्रचि २१ मध्ये 'डुआय' चे एक्स्प्रेशन्स, "कुठे झक मारली नी आलो ह्यांच्यासोबत' असे आलेत.
सहीच वृत्तांत आणि प्रचि.
मस्त रे मी मीस केल
मस्त रे मी मीस केल
यो मस्तच वृतांत आणी फोटो
यो मस्तच वृतांत आणी फोटो
मस्त रे यो ... भारी
मस्त रे यो ... भारी लिव्हलयस..
फोटो पण लय भारी ...
त्या टोपीवाल्या काकांचा फोटो छान टिपलायस
सहीच वृ आणि प्रचि
सहीच वृ आणि प्रचि
अफलातुन फोटो. ही दरी/भेग कशी
अफलातुन फोटो. ही दरी/भेग कशी काय निर्माण झाली असेल?
दिपकचा फोटो सही आलाय त्याच्या मागे दिसणारे बुटके खडक मगरीसारखे दिसतायत.
दगडूमामा सही वृत्तांत. फोटो
दगडूमामा सही वृत्तांत. फोटो एकदम ढिंच्याक. आम्ही सर्वात पुढे होतो कारण .. मलाही भितीच वाटत होती.. पटपट जाऊन दरी संपावी असं वाटत होतं पण संपायलाच तयार नाही. वरून दगड पडला तेव्हा आम्हीच होतो पुढे.. तिथून खरा ट्रेक सुरु झाला असं म्हणायला हरकत नाही. ड्युआय ने कसाबसा पूर्ण केला ट्रेक. पण गडी एकदम भक्कम आहे कितीदा पडला तरी कैच झालं नाही त्याला.. असं तो म्हणत होता .. नाश्तापाणीच्या वेळेस तर धम्मालच. दरीच्या तोंडाशी निवांत बसलो तेव्हा तो दिसणारा आजोबा गड आणि सांदण व्हॅलीचा सर्वात अवघड टप्पा सही दिसत होता. मजा आला.. मामा तुला पोहायला शिकवणं फार कठीण रे बाबा.
फोटोच्या लिंक्स पाठवा ईमेल मधून आणि पुढच्या ट्रेकच्या तारखा आणि जागा ठरवा आता. शेवटच्या फोटोमधे ड्युआयची पोझ जबरीच आहे.
जबरदस्त ट्रेक आणि फोटो.
जबरदस्त ट्रेक आणि फोटो.
ट्रेकच शेवट अप्रतिम होता...
ट्रेकच शेवट अप्रतिम होता... मुसळधार पावसातील गरमागरम कांदाभजी आणि चहा... व्वाह!
यो... डुआयला प्रशस्तिपत्रक देऊनच टाक... काय :p
काय जबरदस्त लोकेशन आहे!!!!
काय जबरदस्त लोकेशन आहे!!!! एकदम thrilling!!!
मी यापूर्वी कधीच इथले फोटो पाहिलेले नाहीत.
भर पावसाळ्यात जाणं धोक्याच असेल नाही?
यो, जबरी व्रुत्तांत अन
यो, जबरी व्रुत्तांत अन प्रचि.....:-)
लवकरच पुढच्या ट्रेकची तयारी करा....
आता सुखरुप आल्यावर, १२७ अवर्स
आता सुखरुप आल्यावर, १२७ अवर्स अवश्य पहा !
खूप खूप धन्यवाद.. ही दरी/भेग
खूप खूप धन्यवाद..
ही दरी/भेग कशी काय निर्माण झाली असेल? >> अके.. जाउन बघच एकदा..
योडी..
जिएस.. कधी जायचे..
सॅम.. लोकेशन खूपच छान आहे.. नि या व्यतिरीक्त तिकडे बघण्यासारखे बरेच काही आहे.. नुसते भंडारदरा बॅकवॉटर बघायचे म्हटले तरी दंग होउन जाल.. एकदा तरी सवड काढून जायलाच हवे या ठिकाणी.... बाकी सांधण दरी पावसाळ्यात शक्य नाहीये.. दोन्ही बाजूने वरतून पाणी कोसळते.. शिवाय पाण्याचा प्रवाह असतोच.. सप्टेंबर पर्यंत खूप पाणी असते तिथे.. पावसात गेलाच तर फक्त सुरवातीचाच भाग पाहता येइल.. आत शिरता येणार नाही..
सुकी.. पाठवतो रे लिंक्स..
इंद्रा..
सह्हीच !
सह्हीच !
मस्त लेख नि मस्त प्रचि.. मजा
मस्त लेख नि मस्त प्रचि.. मजा आली!!
आम्ही यो च्या आधी एक दिवस
आम्ही यो च्या आधी एक दिवस जाऊन आलो.. आम्हालाही एक दगड कोसळताना दिसला. तेव्हा आम्ही दोघेजण दरीच्या शेवटी होतो.. आणी बाकीचे अजूनही येत होते.. आमच्या मध्ये कोसळला..छोटासाच होता दगड्...पण तिथूनच आम्ही ५-१० मि पुर्वी आलो होतो... काही दगड असे दिसले की एखादाच दिवस झाला असेल पडून..
थोडक्यात काय तर पहिल्या पावसाच्या आधी आणी पाऊस पडल्यानंतर ३-४ महिन्यांनी तिकडे जावे..
आम्ही जेवताना त्या २ बसेस आल्या होत्या पोतीभर माणसांना घेऊन...
मदन चे नेढे क्लास दिसते तिथून...
GS..आहुपे घाट झाला आहे का? मला कधीपासून करायचा आहे...
आनंद... आम्ही पोहचण्या आधी
आनंद... आम्ही पोहचण्या आधी ज्या दगडावर वरून दगड पडला होता त्या वरिल खुणा पाहून मनात धस्स झालं होत... आजुबाजूला वरून पडलेल्या दगडाचे मोठ मोठे चार पाच तुकडे पडले होते.
सावधगिरी म्हणून आम्ही एकत्र न जाता प्रत्येका मधे १०-१२ पावलांचे अंतर ठेवून चालत होतो... तसेच दगड पडण्याची चाहूल लागलीच तर लगेच आडोसा म्हणून कड्याच्या कपारीत घुसायला सांगितले होते सगळ्यांना...
छाssssssssन लिहिलं आहेस
छाssssssssन लिहिलं आहेस रे!!
फोटॉ कमाsssssल आहेत!!
आनंदा, अहुपे घाट चढून
आनंदा, अहुपे घाट चढून भीमाशंकर हा एक उत्कृष्ट पावसाळी ट्रेक आहे. मी सप्टें. महिन्यांत केलाय. आम्हांला घाट चढतांना गुटख्याच्या पडलेल्या पुड्यांनी वाट दाखवली होती. वर आल्यावर देवराई... वाटेत फक्त कोंढवळ पाडा लागतो. संध्याकाळी भीमाशंकर. दुसर्या दिवशी सकाळी गणपती घाटाने खाली खांडसला उतरून परत घरी....
>>'डुआय' या आयडीधारक
>>'डुआय' या आयडीधारक मायबोलीकराने 'आयकान्ट' हा नविन आयडी धारण केला..>>
योग्या मस्तच रे!! ते सुर्योदयाचे फोटो बेस्ट्च
हेम... अगदी तोच रुट करायचा
हेम... अगदी तोच रुट करायचा आहे मला...फोटो आहेत का? एका दिवसात होतो का? आम्ही पुण्यावरून येणार म्हणजे शुक्रवार रात्रीचा प्रवास.. जर सकाळ सकाळ निघालो तर भिमाशंकर ला संध्याकाळ पर्यंत पोचू शकतो का?
पुण्यावरून तिथे कसे पोचायचे हा प्रश्नच आहे..
मस्त मस्त मस्त!
मस्त मस्त मस्त!
यो विचारायचे राहिलेच. या
यो विचारायचे राहिलेच. या दरीचा जमिनीवरचा भाग कसा दिसतो. त्याचा फोटो आहे का ? मूळात तिथे जाता येते का ?
Pages