Submitted by सत्यजित on 5 June, 2011 - 08:36
माझ्या कोकणची माती
जशी अत्तराची खाण
नभरस कोसळता
देते सुगंधाचं वाण
आला मेघराज नभी
धरा कुंकवाची डबी
हिरवं सोनं लेउनिया
दिसे नववधू छबी
गोड लागतो खायला
ऐन उन्हाचा व्यायला
बाळंतपण लेकीचं
लागे काळजी आयेला
आता पुरवेल लाड
लाडावेल झाड झाड
उफाळल्या दर्यासंगे
डोलू लागतील माड
हरवता पायवाटा
गावे तेरडा टाकळा
नाही कुणाचंच भय
रवळनाथाचा हा मळा
घेता पागोळ्या ओच्यात
त्यात मिळे पारिजात
मळा मेंदीभरले हात
त्यात तरारेल भात
नभं थेंबानी चुंबता
लाज लाजली लाजाळू
तिला छेडते आबोली
किती किती गं मायाळू
बघ सरेल श्रावण
मग येईल भादवा
माहेरवाशी गौवरया
बाळा गातील जोजवा
माझ्या मायेच्या डोळ्यात
कसा वाहू लागे झरा
असा पाउस पाउस
येतो कोकणच्या घरा...
सत्यजित.
गुलमोहर:
शेअर करा
सत्या, सुरेख
सत्या, सुरेख
क्या बात है सत्या, पाऊस
क्या बात है सत्या, पाऊस जोरात एकदम
आता पुरवेल लाड
लाडावेल झाड झाड
उफाळल्या दर्यासंगे
डोलू लागतील माड>>>हे फारच गोड...:)
अतिशय सुरेख ! आवडली कविता.
अतिशय सुरेख ! आवडली कविता.
सुरेख, सुरेल.....खास कोकणचा
सुरेख, सुरेल.....खास कोकणचा गंध असणारी
खुप आवडली..
खुप आवडली..
लै भारी रे सत्या.... मजा
लै भारी रे सत्या....
मजा आली.......... !!
अप्रतिम.. नाद, लय सगळंच
अप्रतिम..
नाद, लय सगळंच छान..
आता पुरवेल लाड
लाडावेल झाड झाड
वाह!!
(एकदम नलेश पाटील आठवले)
खुप आभर वेळात वेळ काढुन
खुप आभर वेळात वेळ काढुन प्रतिक्रिया दिल्या बद्दल !
सुर्रेख!
सुर्रेख!
छान वर्णन ..... "नभं थेंबानी
छान वर्णन .....
"नभं थेंबानी चुंबता
लाज लाजली लाजाळू" ..... हे अधिक आवडलं.
--------------------------------------------------------
अवांतर ---------
'अष्टाक्षरी' मध्ये रचना केल्याचं जाणवतंय.
१-२ ठिकाणी अधिक अक्षरं आली आहेत.
सत्या, हा खरा आतून आलेला
सत्या,
हा खरा आतून आलेला कवितेचा पाऊस..
खूप आवडली कविता
गजानन, उल्हास, दक्षे खुप
गजानन, उल्हास, दक्षे खुप आभार...
सत्या महा महानोर ... मस्त!
सत्या महा महानोर ... मस्त!
पेशव्यान्नू आभार हां.. बरा
पेशव्यान्नू आभार हां.. बरा वाटला तुमची प्रतिक्रिया पाहुन.. असे येवत रव्हा...!!
सत्याभाई, खासच... कोकण पाऊस
सत्याभाई,
खासच... कोकण पाऊस डोळ्यासमोर आणलात.
व्वाह!!! मस्त कोकणचा पाऊस
व्वाह!!! मस्त कोकणचा पाऊस अनुभवला
हा तुझा खरा बाज आहे. सालस
हा तुझा खरा बाज आहे. सालस लहान निरागस मुलांना समजाऊन सांगणारा .....?? !!
सुं द र
सुं द र
योग, हर्शल, अज्ञात आणि रोहीत
योग, हर्शल, अज्ञात आणि रोहीत आभार..!!!
सालस लहान निरागस मुलांना समजाऊन सांगणारा .....?? >> नाही हो मीच सालस लहान निरागस आहे
सुंदर!
सुंदर!
सत्याभाय....एकदम सही रे !
सत्याभाय....एकदम सही रे !
किती सहज आहे सत्या. बरा वाटला
किती सहज आहे सत्या. बरा वाटला वाचून.
सत्या..... तुझ्या शब्दांतून
सत्या..... तुझ्या शब्दांतून हीच अनुभूती मस्तच.
सत्या, मस्तच.. ओलं कोकण
सत्या, मस्तच..
ओलं कोकण डोळ्यासमोर उभ केलस.
कविता केलित तुम्ही व्व्व्वा!
कविता केलित तुम्ही
व्व्व्वा!
खुप खुप खुप आभार... !!!
खुप खुप खुप आभार... !!!
छानच !
छानच !
एखाद्या गोर्या गोमट्या,
एखाद्या गोर्या गोमट्या, घार्या डोळ्यांच्या, डोईवर पदर घेतलेल्या कोकणातल्या स्त्रीनं लिहिल्यासारखं
भाऊ धन्यवाद,.. पल्ली
भाऊ धन्यवाद,..
पल्ली
मस्त आवडली कविता
मस्त
आवडली कविता
Pages