मे महीना उलटला नि आकाशात काळ्या पांढर्या ढगांची मैफील जमू लागली.. पावसाचीच चाहूल ती.. साहाजिकच उन्हाळ्यात उकाड्यामुळे मंदावलेल्या ट्रेकर्संना उत्साहाने नव्या जोमाने "तयार" होण्याची वेळ... पावसात कुठे कुठे जाता येइल नि कधी कधी सुट्ट्या टाकता येतील हे तपासण्याची वेळ.. ! पावसात आपले शूज/फ्लोटस धोका तर नाही ना देणार हे बघण्याची वेळ ! सॅकमधील सगळे सामान भिजू नये म्हणून एक भलीमोठी प्लॅस्टीकची पिशवी शोधण्याची वेळ ! पावसाळा सुरु होईल तेव्हा होईल पण जून महिना उजाडला की ट्रेक सुरुच झाले पाहिजेत..
तेव्हा यंदाच्या सिजनमध्ये पहिलाच साधा छोटा ट्रेक करावा म्हणून आम्ही काही भटके मायबोलीकर सांधण दरीला (श्रेणी - सोप्पी) जाण्याचा बेत आखत आहोत..
सांधण दरी हा एक नैसर्गिक आश्चर्याचाच भाग.. उंचच्या उंच सह्याद्री रांगानी वेढलेली अशी ही दरी नाशिकजवळील साम्रद गावाजवळ वसलेली आहे.. अर्थात दरी म्हटली की खोल असणारच.. पण आकर्षण असे की अत्यंत अरुंद मार्ग आहे तिकडून जाण्याचा.. दोन्ही बाजूस उंचच्या उंच कातळ नि त्यातून जाणारी ही अरुंद वाट.. . जमिनीला पडलेली भेग म्हटले तर उत्तम.. दुसरे म्हणजे इथे वाटेत लागणारे पाण्याचा साठा.. पावसात इथे जाणे अशक्य.. थंडीतदेखील कमरेपर्यंत पाणी असते.. तेव्हा आता जाउन यावे म्हणतोय... तेव्हा येणार का ?
शनिवारी रात्री (अंदाजे साडेनऊ वाजता)निघून रविवारी संध्याकाळी परत... उर्वरीत माहिती (कसे जायचे, कुठे भेटायचे, किती वाजता निघायचे इति..) नंतर कळवण्यात येईल..
येत असाल तर पटापट हात वर करा (संख्या १० नाहीतर १५ पर्यंत मर्यादीत)
आमचे नियम :
१. आमच्या ग्रुपचा लिडर आमचा ग्रुपच असतो.. घेतले जाणारे निर्णय सर्वानुमते असतात.. 'पाहीजे तसेच झाले पाहीजे' अशा एकाच गोष्टीवर जास्त अडून बसत नाही..
२.प्रत्येकाने आपापल्या जबाबदारीने यावे.. पण संपूर्ण ट्रेकमध्ये 'एकमेकां साह्य करू नि पुढे जाऊ' हेच तत्व वापरतो.. मग 'कुणाच्या काँफीडन्सची बोंब लागूदे.. वा पॅच करताना कुणाची बोबडी वळूदे..' पण मदत करताना जास्त लाड केले जात नाहीत हेही तितकेच खरे..
३. प्रत्येकाने पाठीवर स्वतःच्या सॅकचे ओझे वाहण्याव्यतिरीक्त ट्रेकमध्ये लागणार्या 'ह्या ना त्या' कामात मदत करणे आवश्यक..
४. ट्रेकमध्ये मद्यपान करण्यास वा मद्यपान करून ट्रेकमध्ये येण्यास मनाई.. धुम्रपान ट्रेकच्या आधी वा ट्रेक समाप्त झाल्यावर..
५. सॅकमधून केवळ स्वतःलाच पुरेल असे खाद्य आणू नये.. इतरांनाही लाभ घेता येइल असे बघावे.. खाताना "लाजायचे नाही.. मागायचे नाही" हे तत्व लक्षात ठेवावे नि सरळ हात मारावा.. नाहीतर उपाशी राहील्यास तुम्हीच जबाबदार !
६. ग्रुपमध्ये चालताबोलता 'हा ग्रुपमध्ये नविन आहे वा जुना आहे' अशा ओळखीची तमा बाळगत नाही..
७. नाक मुरडायची, कपाळ्यावर आट्या पाडण्याची सवय असेल तर आमच्याबरोबर नाही आलात तर उत्तम !
८. ट्रेकसाठी अत्यावश्यक वस्तू सोडल्या तर बाकी दिलेल्या यादीप्रमाणे सर्व सामान/वस्तू आणायचा प्रयत्न करावा.. यादीव्यतिरीक्त अतिरिक्त सामान घेउन येत असाल तर सोबत गडी घेउन यावा
९. ग्रुपसाठी आणलेले सामान वगैरे प्रत्येकाच्या पाठीवर थोडाफार अतिरीक्त भार टाकून आनंदाने विभागण्यात येइल..
१०. ट्रेकमध्ये कुठल्याही प्रकारचा कचरा होणार नाही याची प्रत्येकाने काळजी घ्यावी..
११. ट्रेक मध्ये चालताना मागे राहिल्यास तसेच मागच्या मागे घरी निघुन जावे.. उगीच मोठ्याने येओ येओ करुन जंगलातील पशु-पक्षांना त्रास देऊ नये
१२. फोटोसेशनमध्ये एक तरी उडी घेणे आवश्यक
१३. घरापासून ते भेटण्याच्या ठिकाणापर्यंतचा खर्च सोडला तर ट्रेकमध्ये बाकी होणारा सर्व खर्च (अगदी स्वतःहून आणलेल्या चॉकलेटचा पण) सर्वांमध्ये विभागला जाईल. कुणालाही 'फुकटात खाण्यास' संधी दिली जात नाही
१३. वरिल नियमांस पात्र असल्यास येण्याची तसदी घ्यावी अन्यथा नाही.. बाकी नियम ट्रेकमध्ये आल्यावर कळतीलच..
जल्ला यो तु पुणेकर हाय काय ?
जल्ला यो तु पुणेकर हाय काय ?
चला, संध्याकाळी जोरदार पाऊस
चला, संध्याकाळी जोरदार पाऊस पडल्याने ट्रेकसाठी माहोल तर चांगला तयार झाला आहे....
अरे आज पण गरजतय...
अरे आज पण गरजतय...
इथे पवईत तर राडा पाउस सुरु
इथे पवईत तर राडा पाउस सुरु झालाय ....त्याला पण यायचं आहे बहुतेक आपल्या बरोबर
नुस्ता कोसळतोय... वातावरण
नुस्ता कोसळतोय... वातावरण निर्मिती एकदम जोरदार... धम्माल येणार
पावसात कॅमेरे सांभाळा रे
पावसात कॅमेरे सांभाळा रे
पावसात कॅमेरे सांभाळा रे >>
पावसात कॅमेरे सांभाळा रे >> जस्ट चील !!
नाय जमुचा!!! ११ वा नियम वाचून
नाय जमुचा!!!
११ वा नियम वाचून गडाबडा लोळलो..
वयाबद्दल नियम नाही हे बघून
वयाबद्दल नियम नाही हे बघून मला यायचंच होतं पण ... फॅमिली डॉक्टरना बरोबर यायला नेमका वेळ नाहीय ! पण ट्रेकसाठी शुभेच्छा व आशिर्वाद !!
नियम!!!! ........ अशा जबरी
नियम!!!! ........
अशा जबरी नियमांनंतरही १० लोक्स जमलेत! मानलं बुवा!
ट्रेकसाठी शुभेच्छा!
ट्रेकसाठी शुभेच्छा!
1st monsoon trek awsome.
1st monsoon trek awsome. dhammal keli. purna luxurious trek.
आले का लोक्स सुखरुप मज्जा
आले का लोक्स सुखरुप मज्जा करुन? आता लवकर वृत्तांत येउद्या पावसाळी हवा आहे तोपर्यंत.
आधी फोटू येऊ द्या!! आणि आधी
आधी फोटू येऊ द्या!!
आणि आधी लिहा रे कुणीतरी!!
(मी उशीरा लिहिणार आहे)
चला सुरुवात तर चांगली झाली..
चला सुरुवात तर चांगली झाली.. झकास ट्रेक अन मस्त माहोल....:-)
आता पुढच्या ट्रेकचा प्लान करा.......
फोटो आणि वृ कधी ??????? :फोटो
फोटो आणि वृ कधी ???????
:फोटो आणि वृतांताची वाट पाहणारा बाहुला:
सुरुवात ते शेवट धमाल ट्रेक
सुरुवात ते शेवट धमाल ट्रेक झाला.
@ गिरीविहार >> १३, १४, १५ ऑगस्ट सुट्टी आहे. चला भट्कायला.
अशा जबरी नियमांनंतरही १०
अशा जबरी नियमांनंतरही १० लोक्स जमलेत! मानलं बुवा! >>> मामी... शेवटला त्यात आणखी दोघांची भर पडली... :p
अरे वा ! लवकर येऊ द्या फोटो.
अरे वा ! लवकर येऊ द्या फोटो.
पावसाळी ट्रेक्सची भन्नाट
पावसाळी ट्रेक्सची भन्नाट सुरवात ! साम्रद गावाच्या प्रेमात पडलोय.. चहुबाजूंनी आपली उंची दाखवणार्या विशाल सह्याद्रीरांगा नि त्यांच्यावर इंद्रदेवाने चढवलेली ढगांची आभूषणे... एकटक बघत रहावे असे सुंदर चित्र !! शिवाय सांधण दरी, कोकणकडा, भंडारदरा, घाटघर डॅम इ. आकर्षण होतीच... त्यात नदीत डुंबण्याची मजा, भर पावसात गरमागरम भजी खाण्याची मजा.. आणि खूप खूप मजा केली...
यो, पोरा का रे जळीवतो आमाला?
यो, पोरा का रे जळीवतो आमाला? मी तुला शाप देते, "तु लवकरच सर्व भारत फिरून येशील. आणि आम्हालाही फोटोतून दाखवशील."
रस्ता शोधत - शोधत गाठलेले
रस्ता शोधत - शोधत गाठलेले साम्रद ..... रात्री पाह्लेली काजव्यांची दरी/ झाडे.... रस्त्यावर झोपुन रंगलेले किस्से..... सकाळी ६ लाच सूर्योदयाच्या वेळी उडीबाबा ...... झणझणीत पोहे ... दरीत उतरताना पडलेला दगड... मस्त जेवण..... साम्रद जवळील कोंकणकडा ..... परतीच्या प्रवासात पाणवठ्यावर केलेले जलमे डुबुक-डुबुक... तुफान पावसात कांदाभजी-चहा .... मुंबई पर्यंत सोबत दिलेला पाऊस
ब्येष्ट डेविल!! so u have
ब्येष्ट डेविल!! so u have started जेलसिफाईंग others... लगे रहो!!
मला अजूनही आठवत नाहीये तो दगड कधी पडला आणि मी कसा नाही पाहिला.. सूकिही काल येताना त्याच्याचबद्दल बोलत होता..
हो तो दगड आम्ही बघितला...
हो तो दगड आम्ही बघितला... जल्ला कोणाच्या डोक्यात नाही पडला ते नशीब...
बाकी ट्रेक धम्मालच...
अरे बाबांनो, सर्वजण सुखरुप
अरे बाबांनो, सर्वजण सुखरुप आलात ना ? त्या पडलेल्या दगडाचे नाव नका काढू, मला १२७ अवर्स आठवतो.
exactly!!! काल दरीतून काही
exactly!!! काल दरीतून काही ठिकाणी वर पाहताना 127 hrsच आठवत होता... it was simply beautiful and was complete silence there!!
१३, १४, १५ ऑगस्ट सुट्टी आहे.
१३, १४, १५ ऑगस्ट सुट्टी आहे. चला भट्कायला.>>> डेविल ऑगस्ट पर्यन्त वाट कोण बघणार?
वृत्तान्त सुरू... नियम ११
वृत्तान्त सुरू...
नियम ११ मोड्ला असल्यामुळे विनयला मागे जाण्यास सुचविले असता त्याने हे नियम आपल्यास मान्य नाहीत असे सांगितले! काय करणार विनयच्या गाडीत दस्तुरखुद्द बाजीराव असल्यामुळे विनयला ताकीद देऊन सोडले...
काल दरीतून काही ठिकाणी वर
काल दरीतून काही ठिकाणी वर पाहताना 127 hrsच आठवत होता... अगदी अगदी.......
पण एक भन्नाट ट्रेक म्हणुन नेहमी ध्यानात राहिल.
१३, १४, १५ ऑगस्ट सुट्टी आहे. चला भट्कायला.>>> डेविल ऑगस्ट पर्यन्त वाट कोण बघणार?
खरच एव्हढा धीर कोणाला आहे.
विन्या मागच्या मागे परत गेला?
विन्या मागच्या मागे परत गेला?
Pages