सांधण दरी ! येणार का ?

Submitted by Yo.Rocks on 1 June, 2011 - 06:42
ठिकाण/पत्ता: 
सांधण दरी !

मे महीना उलटला नि आकाशात काळ्या पांढर्‍या ढगांची मैफील जमू लागली.. पावसाचीच चाहूल ती.. साहाजिकच उन्हाळ्यात उकाड्यामुळे मंदावलेल्या ट्रेकर्संना उत्साहाने नव्या जोमाने "तयार" होण्याची वेळ... पावसात कुठे कुठे जाता येइल नि कधी कधी सुट्ट्या टाकता येतील हे तपासण्याची वेळ.. ! पावसात आपले शूज/फ्लोटस धोका तर नाही ना देणार हे बघण्याची वेळ ! सॅकमधील सगळे सामान भिजू नये म्हणून एक भलीमोठी प्लॅस्टीकची पिशवी शोधण्याची वेळ ! पावसाळा सुरु होईल तेव्हा होईल पण जून महिना उजाडला की ट्रेक सुरुच झाले पाहिजेत..

तेव्हा यंदाच्या सिजनमध्ये पहिलाच साधा छोटा ट्रेक करावा म्हणून आम्ही काही भटके मायबोलीकर सांधण दरीला (श्रेणी - सोप्पी) जाण्याचा बेत आखत आहोत..

सांधण दरी हा एक नैसर्गिक आश्चर्याचाच भाग.. उंचच्या उंच सह्याद्री रांगानी वेढलेली अशी ही दरी नाशिकजवळील साम्रद गावाजवळ वसलेली आहे.. अर्थात दरी म्हटली की खोल असणारच.. पण आकर्षण असे की अत्यंत अरुंद मार्ग आहे तिकडून जाण्याचा.. दोन्ही बाजूस उंचच्या उंच कातळ नि त्यातून जाणारी ही अरुंद वाट.. . जमिनीला पडलेली भेग म्हटले तर उत्तम.. दुसरे म्हणजे इथे वाटेत लागणारे पाण्याचा साठा.. पावसात इथे जाणे अशक्य.. थंडीतदेखील कमरेपर्यंत पाणी असते.. तेव्हा आता जाउन यावे म्हणतोय... तेव्हा येणार का ?
शनिवारी रात्री (अंदाजे साडेनऊ वाजता)निघून रविवारी संध्याकाळी परत... उर्वरीत माहिती (कसे जायचे, कुठे भेटायचे, किती वाजता निघायचे इति..) नंतर कळवण्यात येईल..

येत असाल तर पटापट हात वर करा Happy (संख्या १० नाहीतर १५ पर्यंत मर्यादीत)

आमचे नियम :
१. आमच्या ग्रुपचा लिडर आमचा ग्रुपच असतो.. घेतले जाणारे निर्णय सर्वानुमते असतात.. 'पाहीजे तसेच झाले पाहीजे' अशा एकाच गोष्टीवर जास्त अडून बसत नाही..
२.प्रत्येकाने आपापल्या जबाबदारीने यावे.. पण संपूर्ण ट्रेकमध्ये 'एकमेकां साह्य करू नि पुढे जाऊ' हेच तत्व वापरतो.. मग 'कुणाच्या काँफीडन्सची बोंब लागूदे.. वा पॅच करताना कुणाची बोबडी वळूदे..' पण मदत करताना जास्त लाड केले जात नाहीत हेही तितकेच खरे.. Proud
३. प्रत्येकाने पाठीवर स्वतःच्या सॅकचे ओझे वाहण्याव्यतिरीक्त ट्रेकमध्ये लागणार्‍या 'ह्या ना त्या' कामात मदत करणे आवश्यक..
४. ट्रेकमध्ये मद्यपान करण्यास वा मद्यपान करून ट्रेकमध्ये येण्यास मनाई.. धुम्रपान ट्रेकच्या आधी वा ट्रेक समाप्त झाल्यावर..
५. सॅकमधून केवळ स्वतःलाच पुरेल असे खाद्य आणू नये.. इतरांनाही लाभ घेता येइल असे बघावे.. Proud खाताना "लाजायचे नाही.. मागायचे नाही" हे तत्व लक्षात ठेवावे नि सरळ हात मारावा.. नाहीतर उपाशी राहील्यास तुम्हीच जबाबदार !
६. ग्रुपमध्ये चालताबोलता 'हा ग्रुपमध्ये नविन आहे वा जुना आहे' अशा ओळखीची तमा बाळगत नाही..
७. नाक मुरडायची, कपाळ्यावर आट्या पाडण्याची सवय असेल तर आमच्याबरोबर नाही आलात तर उत्तम !
८. ट्रेकसाठी अत्यावश्यक वस्तू सोडल्या तर बाकी दिलेल्या यादीप्रमाणे सर्व सामान/वस्तू आणायचा प्रयत्न करावा.. यादीव्यतिरीक्त अतिरिक्त सामान घेउन येत असाल तर सोबत गडी घेउन यावा Proud
९. ग्रुपसाठी आणलेले सामान वगैरे प्रत्येकाच्या पाठीवर थोडाफार अतिरीक्त भार टाकून आनंदाने विभागण्यात येइल..
१०. ट्रेकमध्ये कुठल्याही प्रकारचा कचरा होणार नाही याची प्रत्येकाने काळजी घ्यावी..
११. ट्रेक मध्ये चालताना मागे राहिल्यास तसेच मागच्या मागे घरी निघुन जावे.. उगीच मोठ्याने येओ येओ करुन जंगलातील पशु-पक्षांना त्रास देऊ नये
१२. फोटोसेशनमध्ये एक तरी उडी घेणे आवश्यक Proud
१३. घरापासून ते भेटण्याच्या ठिकाणापर्यंतचा खर्च सोडला तर ट्रेकमध्ये बाकी होणारा सर्व खर्च (अगदी स्वतःहून आणलेल्या चॉकलेटचा पण) सर्वांमध्ये विभागला जाईल. कुणालाही 'फुकटात खाण्यास' संधी दिली जात नाही Proud
१३. वरिल नियमांस पात्र असल्यास येण्याची तसदी घ्यावी अन्यथा नाही.. बाकी नियम ट्रेकमध्ये आल्यावर कळतीलच..

प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, June 4, 2011 - 21:30 to रविवार, June 5, 2011 - 20:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

यो. मज्जा करा. नियमावली मस्तच.
>>>सॅकमधून केवळ स्वतःलाच पुरेल असे खाद्य आणू नये.. इतरांनाही लाभ घेता येइल असे बघावे.. खाताना "लाजायचे नाही.. मागायचे नाही" हे तत्व लक्षात ठेवावे नि सरळ हात मारावा.. नाहीतर उपाशी राहील्यास तुम्हीच जबाबदार ! >>>>>>>:हाहा:
>>>फोटोसेशनमध्ये एक तरी उडी घेणे आवश्यक>>>>> Biggrin
>>>उगीच मोठ्याने येओ येओ करुन जंगलातील पशु-पक्षांना त्रास देऊ नये.>>>>>>>:हाहा:
>>>ते वाघ बघून घेईल... नस्ती चिंता नको >>>>>इंद्र देवा, भारी ऊत्तर.
कवातरी आमाला बी घीऊन जावा की. Proud

खरंच भारी नियम.

साधना तू नाव नोंदवलंयस पाहून मलाही मोह होतोय. दगड धोंड्यांवरुन वर चढवायला तू मागून टेकू लावशीलच मला गेल्याच्या गेल्या वविसारखा Proud पण घरात शनि रवी काढलेल्या सुतारकामाचं काय करु? Sad

शनिवारी रात्री (अंदाजे साडेनऊ वाजता)निघून रविवारी संध्याकाळी परत... >> इथं ही टायपो नाहीये ना?

कारण 5 June, 2011 - 07:00 - 6 June, 2011 - 05:30>> ५ ला माझ्याकडच्या कॅलेंडरात रैवार दि स्तो य म्हणून म्हटलं Proud

डिप्या तो टाईमझोनचा लोच्याआयरे... शनिवारी रात्री (अंदाजे साडेनऊ वाजता)निघून रविवारी संध्याकाळी परत..

अश्वे, आज्जे... आधी नियम क्रं.११ काळजी पुर्वक वाचा आणि मगच निर्णय घ्या :p

इंद्रा, मारीन की उडी. फक्त दगडधोंड्यात नाही मारणार. उडी स्टार्ट करायच्या आधीच हात वर वाकडे करुन पोझ घ्यायची. नंतर उडी मारताना पाय पण वाकडे करायचे एक सेकंद. तो सेकंद टिपायची जबाबदारी तुमची. कारण तो क्षण परत परत येणार नाही. मग सेम दगडूउडीसारखा फोटू येईल. हाकानाका.

बादवे, ह्या आज्जे आयडी कोण?

बरं बरं.. तो रॉक्स काय यूएस ऑफ ए मधनं येणारे का? Wink

सोमवारी सकाळी ११:०० ला एक मिटींग आहे मला. ती व्यवस्थित पार पडेल ना? (नाही आफ्टरइफेक्ट्स असतील तर मिटींग पोस्टपोन करतो Proud )

पण घरात शनि रवी काढलेल्या सुतारकामाचं काय करु?

मी लावलेले टेकु डळमळीत झाले तर सुतारांची गरज पडेल ना तिथे. .. घेऊन ये त्यांनाही. हाकानाका. त्यांना सांग ट्रेकचा खर्च सुतारकामाच्या पैशातुन वळता करुन घेतला जाणार नाही, धावत येतील.

या शनि रविमध्ये काम झालंच पाहिजे असं मीच सांगितलंय त्यांना. हा शनि रवी टाळला तर आठवडाभर परत सगळा पसारा घरभर पडून राहील.

पण खरंच तू जाते आहेस बघून उत्साह वाटतोय जायला.

इथली तारिख नी वेळ कशी कुठल्या देशातली असते देवाला ठाऊक. मुंबईत ५ जुन ला रविवार आहे आणि ६ जुनला सोमवार. सोमवारी मिटींग असणा-या लोकांनी आधी ते कुठल्या देशात आहेत ते पाहावे.

कूल!!! Happy

अरे वा १० जण झाले.. यो हाऊसफुल (गाडीफुल) ची पाटी लाव आता... अजुन कोण आल तर बाल्कनीत (टपावर) बसुन यावे लागेल. Happy

जबरी लिंक आहे... आणि कसली डीटेलवार माहिती दिली आहे.. कोणी नवखा माणूस पण बरोबर जाऊन पोहोचेल तिथे..

गिरी... Lol तो पण नियम अ‍ॅडतो रे...

डुआय.. चालेल रे. मायबोलीकराबरोबर येतोय ना बस्स झाले.. . फक्त वरील दिलेले नियम त्याला माहीत असू दे म्हणजे झाले.. Happy पण लवकर काय ते कळव..

आनंद.. मूड आला तर तो पण उरकून घेउ म्हणतोय... Wink तो आहेच लिस्टमध्ये..

साधना, अके.. पुढच्याखेपेस नक्की या.. तोपर्यंत उड्यांसाठी रंगीत तालीम सुरु करा.. Happy

नियम अगदीच भारी Rofl
>> ट्रेक मध्ये चालताना मागे राहिल्यास तसेच मागच्या मागे घरी निघुन जावे.. उगीच मोठ्याने येओ येओ करुन जंगलातील पशु-पक्षांना त्रास देऊ नये>>> Rofl तुफान हसले

Pages