कधी तरी..

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

कधी तरी रात्र संपेल
कधी तरी सूर्य उगवेल
कधी तरी पाऊस पडेल
कधी तरी जीव रमेल
कधी तरी मनासारखं होईल
कधी तरी त्याला आठवण येईल
कधी तरी फोन करेल
कधी तरी माझ्यासाठी झुरेल
कधी तरी असं होईल
कधी तरी तसं होईल..
कधी तरी ....
हम्म!
कधी तरी हा फडतूस आशावाद संपेल,
कधी तरी पाय जमिनीला लागेल...
त्या दिवसाची मी वाट पाहतेय..

प्रकार: 

ऋयाम आशावाद संपला तर वर्तमानात शांतपणे जगता येईल ना आनंदाने.. म्हणून तो संपायची वाट पहायची Happy

बाकी धन्यवाद सगळ्यांना.

योडे परीक्षा संपलीये ना आता Happy

छान लिहिलंय...

आशावाद अजिबात संपवु नये. उद्या उजाडावा अशी इच्छा केवळ आशावादी माणसांनाच होऊ शकते. एकदा तो संपला की आज काय, उद्या काय नी काल काय सगळे सारखेच.. मला तरी आशावादी राहायलाच आवडेल.