लेकुरवाळे
आम्ही जेव्हा रत्नागिरीत हा बंगला विकत घेतला तेव्हा तो आम्हाला फारच स्वस्तात पडला. कित्येकानी तर शहरापासून इतक्या लांब घर का घेताय. त्यापेक्षा इथेच फ्लॅट घ्या, याहून स्वस्त पडेल. असे सल्ले दिले होते. पण माझ्या मम्मीला झाडमाड असलेलेच घर हवे होते.
जेव्हा घर घेतले तेव्हा मूळ मालकाने तीन माड लावलेले होते. माड म्हणजे काय इवलाली रोपेच होती ती. बरीच फुलझाड होती. दारात एक फणस होता, सीताफळ, रामफळ आणि चिकू होते. पप्पाना झाडाची भरपूर आवड. घर घेतल्यावर मुद्दाम मलकापूरवरून मातीचा ट्रक आणवून त्यानी सर्व बाग सारखी करवून घेतली. मारूती नावाचा एक गडी खास झाडासाठी म्हणून ठेवला. त्याचबरोबर मम्मीने पण झाडावर भरपूर लक्ष दिलं. तर्हेतर्हेची फुलझाडं, पालेभाज्या, मिरच्या, भेडी, गवार अशी तिची "शेती" चालूच असते. जेव्हा तिने लावलेल्या केळीला "दिवस गेले" तेव्हा आईने पाच सवाष्णी वगैरे बोलावून केळबाईचे डोहाळजेवण केले. (आमची आई पण एक मॅडच आहे ना???)
तीन माड बघता बघता आकाशापर्यंत जाऊन पोचले. एकावेळेला १०० नारळ उतरवता याय्ला लागलेत. या घरात आम्हाला येऊन १० वर्षे झाली असं वाटतच नाही. आज्जीने लावलेल्या आंब्याला दरदरून मोहोर फुटला. कोकीळेच्या गाण्याच पार्श्वसंगीत सकाळ संध्याकाळ चालू झालं. जास्वंद, अबोली, मोगरा, ब्रह्मकमळ अशी परसातली झाडं शांत डोलायला लागली. घरतल्या सर्वाच्या वाढदिवसाचे एक एक झाड अंगणात आले. वाढत्या वर्षाला तेपण वाढायला लागले.
पण मनाला एक रूख रूख अजून लागून होती.
आमच्या दारच्या अंगणावर स्वतःची भली मोठी सावली धरणारा फणस मात्र अजून कधी फळला नव्हता. दरवर्षी या वेळेला येइल फणस असेच वाटायचे.
एकदा मम्मी गावाला गेली होती तेव्हा शेजारच्या काकूनी त्याच्या अंगणात कचरा पडतो म्हणून आमचा हा फणस परस्पर वेडावाकडा कापून टाकला होता. मम्मी आल्यावर अंगण बघताक्षणीच ती हबकली. सर्वानी पोलिस केस करा असे सांगितले. पण पोलिस केस करून तरी फणस पुन्हा होणार आहे का? असा तिचा प्रश्न असायचा.
त्यानंतर दोन तीन वर्षे गेली. कुणीकुणी काय काय सल्ले दिले. चप्पल बांधा, गिराणात झाडाची फांदी तोडा, नजर उतरवून घ्या. सगळे काही मनापासून केले. फणस काही धरेनात.
एकदा माझे सासरे आले होते ते म्हणाले. "कसली वाट बघताय? फणसाच्या लाकडाला किंमत आहे. झाड काढून टाका. तिथे दुसरे झाड लावा,"
माझा भाऊ (सासरे निघून गेल्यावर) म्हणाला "उद्या वडील अंथरूणाला खिळले तर "मारून टाका किमान विम्याचे पैसे मिळतील" असं म्हणायची की काय???"
दारच्या झाडाची इतकी काळजी करणारा लेक बघून आईवडिल सुखावले. उद्या आपल्यानंतर या सर्वझाडाचे काय असा प्रश्न माझ्या आईला कॅथ लॅबमधे सुद्धा पडला होता!!
पण २०१० साल आमच्यासाठी लेकुरवाळं ठरलं. पोफळीला सुपार्या आल्या. आंब्याला कैर्या आल्या. आणि फणसाला कुयर्या आले.
छोटे छोटे इवलाले फणस पानापानामागून डोकवायला लागले. एक दोन तीन चार.... आईला तो एक छंदच लागला.
एखाद दुसरा फणस कधीतरी गळून पडायचा. पण अजून चार फणस झाडावर दिसायचे...
आणि यावर्षी आमचा दारचा फणस तब्बल चौदा फणसानी भरून गेला.
इतके दिवस "या झाडाला फळच नाहिये का? वांझोटं दिसतय" असे कुजकट टोमणे ऐकणार्या फणसाला दारातून येणार प्रत्येक माणूस थाबून बघायला लागला.
आईची अंगणातली बाग एखाद्या नांदत्या घराप्रमाणे लेकीसुनाजावई आणि नातवंडानी गजबजून गेली.
व्वा ! सॉल्लीड रि- एंट्री
व्वा ! सॉल्लीड रि- एंट्री मारलीय नंदिनी !
mastach g nandini. welcome
mastach g nandini.
welcome back.
i love people who love their trees.
अरे वा!
अरे वा!
वेलकम बॅक.. (तेवढं मोरपिसेचं
(तेवढं मोरपिसेचं पण बघुन घ्या! ;))
मस्तच! आवडलं. एकदम नंदिनी
मस्तच! आवडलं. एकदम नंदिनी स्टाईल!
वा छान.
वा छान.
मस्तच.
मस्तच.
(No subject)
वेलकम बॅक नंदीनी. आता दरवर्षी
वेलकम बॅक नंदीनी. आता दरवर्षी वाढीव सख्येने फणस धरणार. इतके कि ओझे नको म्हणून भाजीसाठी काही उतरवावे लागणार. माझ्या आजोळची माती, गुणी आहेच.
सहिच, पण सगळ्याच झाडांचे फोटो
सहिच, पण सगळ्याच झाडांचे फोटो टाकले असते तर मस्त मजा आली असति....

वा. सुरेख.
वा. सुरेख.
मस्तच, समजु शकते आनंद
मस्तच, समजु शकते आनंद
>> वेलकम बॅक.. (तेवढं
>> वेलकम बॅक..
(तेवढं मोरपिसेचं पण बघुन घ्या! >>अक्षर न अक्षर सहमत!!
अजून किती वाट बघायला लावणार??
वैशाली, अगं लिहायचं असं काही
वैशाली, अगं लिहायचं असं काही ठरवलं नव्हतं. त्यामुळे फोटो काढले नाहीत.
पुढच्या वेळेला की नक्की काढेन फोटो.
दिनेशदा, आमच्याकडे फणसाच्या भाजीला खप नाही, पप्पा तर फणसाकडे (फळाकडे) बघत सुद्धा नाहीत. भावाला फक्त गरे आवडतात, त्यामुळे याच वर्षी कुणाला हवा असेल तर फणस घेऊन जा अशी पाटी लावायला लागेल बहुतेक.
आज्जीने लावलेल्या आंब्याला
आज्जीने लावलेल्या आंब्याला दरदरून मोहोर फुटला.>>>>>> नंदिनी दरदरून घाम फुटतो माहिती होतं. पण मोहोरही ? हो पण हेच आवडलं. छान लिहिलंस!
२०१० ला अख्खं घरच लेकुरवाळं
२०१० ला अख्खं घरच लेकुरवाळं झालं म्हणायचं
आवडलं.
मस्त गं नंदिनी! वेलकम बॅक
मस्त गं नंदिनी! वेलकम बॅक
नंदीनी, अगदी मनापासून
नंदीनी, अगदी मनापासून लिहितोय. एखाद्या गरीब कुटुंबाला खरेच द्यावा फणस. एका फणसात त्यांचा दिवस साजरा होतो.
सही! अश्या झाडामाडाच्या गप्पा
सही! अश्या झाडामाडाच्या गप्पा अन त्या करणारी हिरवी माणसं दुर्मीळ होत चाललीत.
(No subject)
> फणसाला दारातून येणार
> फणसाला दारातून येणार प्रत्येक माणूस थाबून बघायला लागला. >>
दृष्ट काढा झाडाची
रत्नागिरीतून ठाण्याला येणारं
रत्नागिरीतून ठाण्याला येणारं कोणी आहे काय? फणस पाठवून देणे
अजून एक पाठवणे. मी मुंबैहून
अजून एक पाठवणे. मी मुंबैहून पुण्याला आणायची व्यवस्था करते.
बरका आहे का कापा?
मस्तच . भाजीसाठी उतरवणार असाल
मस्तच . भाजीसाठी उतरवणार असाल तर ते फणस अन खोट्टे करण्यासाठी चांगली पाने मायबोलीवर विकायला ठेवणार का ? अमेरिकेत शिपिंग किती पडेल
बॅक विथ बँग! नेहमीप्रमाणेच
बॅक विथ बँग!
नेहमीप्रमाणेच मस्त. 
मेधा, खोट्टे म्हणजे काय?
मेधा, खोट्टे म्हणजे काय?
कुणीकुणी काय काय सल्ले दिले.
कुणीकुणी काय काय सल्ले दिले. चप्पल बांधा, गिराणात झाडाची फांदी तोडा, नजर उतरवून घ्या.
<< झाडाला चप्पल बांधायची ??
नजर वगैरे काढणे .. बाप रे... किती अंधश्रध्दा !
ललित लिहिलय चांगलं पण :).
वेलकम बॅक! छान लिहिलंयस गं!
वेलकम बॅक!
छान लिहिलंयस गं!
नंदिनी छान झालाय लेख. वेलकम
नंदिनी छान झालाय लेख. वेलकम बॅक !! सायोला अनुमोदन
वत्सला खोट्टं म्हणजे फणसाच्या पानात केलेली ईडली.
इथे आहे पाकृ अन फोटो
इथे आहे पाकृ अन फोटो
http://www.aayisrecipes.com/2006/10/25/idlis-in-jackfruit-leaveshittukho...
Pages