..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग १)

Submitted by मामी on 6 May, 2011 - 11:31

मध्यंतरी या प्रकारच्या विनोदांचे उदंड पीक आले होते. एक कोणती तरी सिच्युएशन सांगून त्यातील एखादे पात्र अशा प्रसंगी कोणते गीत गाईल? असं ओळखायचं. मस्त धमाल प्रकार होता तो. तर इथे या धाग्यावर आपण अशीच गंमतदार, टाईमपास कोडी घालूया आणि गाणी ओळखूया. काय? Proud

दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@दिनेशदा ~ मायलेकीत "नशा" कुठून येणार ? खरंय, हे डोक्यात त्यावेळीही आलेच होते, म्हणून ? मार्क टाकला होता. थॅन्क्स.

दोन मित्र बेकार होते. पण फक्त एकाला इंटरव्यू चा कॉल आला. पण त्याला ते कॉल लेटर दुसर्‍याला दाखवायचे नव्हते. जाम टेन्शन आले त्याला. ... पहिल्या चार ओळी फिट्ट बसताहेत, गाण्याच्या.
<<<<
चुप चुप खडे हो जरूर कोई बात है...
पहली मुलाकात (इंटरव्ह्यू) है ये पहली मुलाकात है...

>>आता माझा एक प्रयत्न. एक चोराने शहरात धुमाकूळ घातलेला असतो. पब्लिक आणि पोलिस दोघेही हैराण झालेले असतात. शेवटी एके रात्री चोरी करताना तो पकडला जातो. लोक त्याला छताला उलटं लटकावून फटके देतात आणि मग पोलिसांना पाचारण केलं जातं. पोलिस येतात तो काय - चोर आपली सुटका करून घेऊन पळत असतो. मग पोलिस आणि नागरिक त्याचा पाठलाग सुरु करतात. तेव्हा पळताना तो चोर कोणतं गाणं म्हणेल?

प्रतीक, नाही हो. माझ्या डोक्यात हे होतं "आज मै उपर आसमा नीचे, आज मै आगे जमाना है पिछे"

हे कदाचित दुसरा मित्र म्हणेल !!

ज्याला कॉल आलाय तो म्हणेल.

किसीको पता ना चले बात का
के है आज वादा मुलाकात का
बुरा हाल है दिलके जजबात का
के है आज वादा मुलाकात का

हे निशी वर चित्रीत झालेय. तिने पुढे नागिन, जानी दुष्मन वगैरे चित्रपटांची निर्मिती केली.

आता आणखी एक.....मोहन आणि जीवन मित्र असतात. मोहनचं एका मुलीवर जीवापाड प्रेम असतं. पण घरच्यांचा विरोध असल्याने ते पळून जाऊन लग्न करायचं ठरवतात. देवळात भटजी आणि जीवनशिवाय त्यांच्या लग्नाला आणि कोणीच हजर नसतं. भटजींनी मंगळसूत्र कुठे आहे असं विचारल्यावर मोहन चपापतो. त्याने मंगळसूत्र आणलेलं नसतं. तेव्हढ्यात जीवन एक काळे मणी ओवलेली माळ खिशातून काढून त्याच्याकडे देतो. मोहन ती बायकोच्या गळ्यात घालतो आणि म्हणतो आता तू मला दु:ख दिलंस तरी ते मला प्रियच असणार आहे. सांगा पाहू मोहनचं गाणं...

@स्वप्नाराज
"...आज मै उपर आसमा नीचे, आज मै आगे जमाना है पिछे"...!

अरेरे ! मी 'चोर' पुल्लींग धरल्यामुळे मनिषाच्या मागे गेलोच नाही.

@दिनेशदा ~ सुंदर गाणे आहे. मला वाटते ही 'निशी' अभिनेत्री देमार (वा 'बी' ग्रेड) चित्रपटातूनच चमकत होती ना ?

>> एकदा समु आणि मामी भेटायचं ठरवतात. समुकडे मामीची एक वस्तू असते त्याला त्यांनी 'नाम' हा कोडवर्ड दिलेला असतो, जी समुला मामीकडे सोपवायची असते. मामी आणि समु ठरलेल्या वेळी भेटतात पण समु नेहमी प्रमाणे वेंधळेपणा करून ती वस्तू आणायचीच विसरते. समु हे मामीला कसे सांगेल?

आय अ‍ॅम व्हेरी व्हेरी सॉरी तेरा नाम भूल गयी
>>

बरोबर.

जीवन की डोर ! मस्तच.

ट्राय धिस वन् ~
दोन मित्र. कोणत्यातरी क्षुल्लक कारणामुळे भांडले अन् दूर झाले. तरीही एकाच्या मनात दुसर्‍याबद्दल ओलावा असल्याने त्या प्रेमापोटी तो गाणे म्हणतो.

युनियन लिडर कारखान्याच्या मालकाला सांगतो - काल साठ जणांचा मोर्चा काढला, उद्या परत साठ जणांचा मोर्चा काढू. आमचा आवाज इतका बुलंद आहे की तुम्हाला थांबावेच लागेल.

माझं अजून एक कोडं - एक राणी भारी सुंदर असते. तिच्या सौंदर्याची ख्याती सगळीकडे पसरलेली असते. ती ऐकून एके रात्री एक चोर तिच्या महालात घुसतो. राणी तिथे नसते. पण तिचा फोटो तिथे ठेवलेला असतो. तो घेऊन तो चोर निघून जातो. जाताना काय गाणं म्हणेल?

बोथ....माधव आणि स्वप्नाराज ~ छानच आई चॉईस...आणि अर्थपूर्णही, पण माझ्या मनात याच स्टाईलच्या दुसर्‍याच गाण्याने फेर धरला आहे.

चोर ~ "तस्वीर तेरी दिल मेरा बेहला ना सकेंगी...."

बहुतेक नेम चुकलाच आहे...तरीही.

@ माधव ~ 'नया दौर' मधील साथी हे साठी या अर्थाने मनात घुमत आहे, पण ते नसावे.

स्वप्ना,
'तेरी तसवीर मिल गई' का? पण ते सुंदर राणी, चोर वाचून 'रूप की रानी, चोरों का राजा'बद्दल काही लिंक असावी असे वाटते आहे.

@ माधव ~ नोप. फार फेमस आणि तितकेच अर्थपूर्ण आहे ते गाणे.

एक क्लू : शैलेन्द्र यानी वादानंतर सिने क्षेत्रातीलच त्यांच्या मित्राला उद्देश्यून ते लिहिले आणि मग त्या मित्राने ते चित्रपटासाठी वापरले. [किशोरकुमारने गायिले होते]

जो बात तूझमे है, तेरी तस्वीरमे नही
=======
दोस्त दोस्त ना रहा, प्यार प्यार ना रहा
जिंदगी हमे तेरा, ऐतबार ना रहा

युनियन लिडर कारखान्याच्या मालकाला सांगतो - काल साठ जणांचा मोर्चा काढला, उद्या परत साठ जणांचा मोर्चा काढू. आमचा आवाज इतका बुलंद आहे की तुम्हाला थांबावेच लागेल.
<<<<
चले थे 'साठ' मिल के, चलेंगे साठ मिलकर.
तुम्हे रुकना पडेगा मेरी आवाज सुनकर.

स्वप्ना, बहुधा हे आहे.
मै एक चोर, तू मेरी रानी,
चोरी चोरी ले चला मै, तुमको तुमसे ही चुराके..

>>चले थे 'साठ' मिल के, चलेंगे साठ मिलकर.
ओहो, हे आहे होय! मला काही हे सुचलं नसतं __/\__

>>स्वप्ना, बहुधा हे आहे.
मै एक चोर, तू मेरी रानी,

चोक्कस! माझं एकदम आवडतं गाणं आहे हे. पण ते "ओ मेरी रानी" असं आहे.

फोटोबाबत श्रद्धाने निवडलेले गाणे अचूक आहे असे वाटते. स्वप्नाराज सांगतिलच.

@ दिनेशदा ~ दोस्त दोस्त ना रहा....हे गाणे शैलेन्द्रचे आहे, पण मुकेश यानी म्हटले होते. माझ्या मनी असलेले 'किशोरकुमार'ने गायिले आहे.

>>स्वप्नाराज सांगतिलच
कृपया माझा "अहो, जाहो" असा उल्लेख टाळावा Proud मला "स्वप्ना" म्हटल्यास मी मारायला येणार नाही, खात्री असावी. 'स्वप्नाराज' म्हटल्याने उगाचच "अनिता राज" नावाच्या बयेशी काही नातं असावं असं वाटतं. माझ्या भावना दुखवू नयेत Proud

पण ते "ओ मेरी रानी" असं आहे<<< नॉय नॉय... 'तू मेरी रानी' असंच आहे. आत्तापण लिरिक्स बघून खात्री केली. Happy
'मै एक चोर, तू मेरी रानी'वरून मग नंतर शर्मिलाबै 'तू मेरा राजा, मै तेरी रानी' वगैरे म्हणतात. Happy

"मला "स्वप्ना" म्हटल्यास मी मारायला येणार नाही, खात्री असावी. >>>>"

~ ग्रेट, चल आतापासूनच 'स्वप्ना' म्हणायला सुरूवात करतो. आणि मारायला आलीसच तर तू काही अनिताराजला घेऊन येणार नाहीस याचीही खात्री आहे. असो.
आता त्या रुसलेल्या दोन मित्रांबाबत शैलेन्द्रचे गाणे आठव.

Pages