..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग १)

Submitted by मामी on 6 May, 2011 - 11:31

मध्यंतरी या प्रकारच्या विनोदांचे उदंड पीक आले होते. एक कोणती तरी सिच्युएशन सांगून त्यातील एखादे पात्र अशा प्रसंगी कोणते गीत गाईल? असं ओळखायचं. मस्त धमाल प्रकार होता तो. तर इथे या धाग्यावर आपण अशीच गंमतदार, टाईमपास कोडी घालूया आणि गाणी ओळखूया. काय? Proud

दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कब तक फ़िराक़-ए-यार के सदमे सहा करूँ
>>> लाजो, त्या गाण्यात असं उर्दुप्रचुर काही नसणार. राजस्थानातली गोष्ट आहे ना ती.

श्रध्दा, बरोबर Proud

>>होय. व्हेरी ट्रू ! पण शेवटी (पडद्यावरील) चित्रलेखा आणि आम्रपाली यानी ज्या ठोंब्यांसाठी आपली झोप हराम करून घेतली ते पाहिल्यावर त्यांच्यापेक्षा पोस्टाच्या पेट्या जास्त आकर्षक वाटल्या असते असे राहूनराहून वाट

मला वाटतं चित्रलेखात प्रदीपकुमार होता ना? तो ठोंब्याच. पण "आम्रपाली" तल्या सुनील दत्तला नका हो ठोंब्या म्हणू.

मामी हे बघ....

from smriti hindi sons lyrics....

kesariyaa baalamaa o rii

* Movie: Lekin
* Singer(s): Lata Mangeshkar
* Music Director: Hridaynath Mangeshkar
* Lyricist: Gulzar
* Actors/Actresses: Vinod Khanna, Dimple Kapadia
* Year/Decade: 1990, 1990s

Back to: main index
View: Plain Text, हिंदी Unicode, image

केसरिया बालमा ओ री
कि तुमसे लागे नैन, नैन रे

रंग लियो मैं आज अंग अंग तेरे रंग में
तन हुआ मन हुआ केसरिया
चाँदनी है रात अब तो आ जा पिया
आ~
चाँदनी है रात अब तो आ जा पिया
केसरिया बालमा ओ री ...

टकरा के सर को जान न दे दूँ तो क्या करूँ
कब तक फ़िराक़-ए-यार के सदमे सहा करूँ
मैं तो हज़ार चाहूँ कि बोलूँ न यार से
क़ाबू में अपने दिल को न पाऊँ तो क्या करूँ
चाँदनी है रात अब तो आ जा पिया
चाँदनी है रात अब तो आ जा पिया, आ जा पिया
चाँदनी है रात अब तो आ जा पिया
केसरिया बालमा ओ री ...

अर हे एक सोप्प गाण मगाशी दिलेल कोणी ओळखू शकत नाही का?

पेशंट सांगतोय "डॉक्टर!!!
मला गॅसेस झालेत
डोक गरगरतय
मन थार्यावर नाही
मला कळत नाहीय पण तुम्हालाही निदान करता येत नाही"

मामी Lol

लाजो, माझ्याकडच्या सीडीवर लतानेच गायलेले या गाण्याचे मूळ व्हर्जन आहे (भारतात आहे ती सिडी)

केसरीया बालमा ओ जी, के बावरी बोले लोग
ना मै जिवती ना मरियो, बिरहा म्हारो रोग

असे काहीतरी शब्द होते. ते पण छानच आहे.

>>> पण "आम्रपाली" तल्या सुनील दत्तला नका हो ठोंब्या म्हणू. <<<

~ चला नाही म्हणत, म्हणजे निदानपक्षी तिथे [आम्रपालीसमवेत] भारत भूषण नव्हता हेही नसे थोडके.

एका मुलाचे पायल नावाच्या मुलीवर प्रेम असते. ती कायम मारुती झेन मधून फिरायची. एक दिवस तिच्या वडलांना हे प्रेमप्रकरण कळते ते तिला घरी डांबून ठेवतात. त्या मुलाला आता ती गाडी गवभर फिरताना दिसायची पण त्यात पायल मात्र नसायची. त्याचे प्रेमच हरवते. मग तो कुठले गाणे म्हणेल?

बॅ जीनांवर तमन्ना नावाची एक सुंदरी फिदा होती. जिनांनी कधी काळी तिला प्रतिसाद दिला असावा. पुढे घटनाच इतक्या वेगाने घडल्या कि दोघांची भेटच झाली नाही. जीना पाकिस्तान मधे गेले तर तमन्ना भारतात. तिने शेवटी जिनांना पत्र लिहीलं, नेहरूंना लिहीलं. भारत सरकारला तिची दया आली आणि तिची पाकिस्ताना रवानगी झाली...

कित्येक वर्षांनी ती जिनांना भेटली. त्यांची झाली.

या वेळी ती कोणतं गाणं म्हणेल ?

@ अक्षरशत्रू

जीना की तमन्ना है की जीना मुझे मिल जाए
चाहे अफगणिस्तान जाए चाहे पाकीस्तान जाए

किंवा

तुमसे मिलने की तमन्ना है
प्यार का इरादा है
और एक वादा है जानम
जो कभी हम मिले तो जमाना देखेगा अपना प्यार
ओ मेरे यार

एका मुलाचे पायल नावाच्या मुलीवर प्रेम असते. ती कायम मारुती झेन मधून फिरायची. एक दिवस तिच्या वडलांना हे प्रेमप्रकरण कळते ते तिला घरी डांबून ठेवतात. त्या मुलाला आता ती गाडी गवभर फिरताना दिसायची पण त्यात पायल मात्र नसायची. त्याचे प्रेमच हरवते. मग तो कुठले गाणे म्हणेल?
=====
पायल की "झेन कार" रस्ते रस्ते, ढूंढे तेरा प्यार रस्ते रस्ते...:हहगलो:

बॅ जीनांवर तमन्ना नावाची एक सुंदरी फिदा होती. जिनांनी कधी काळी तिला प्रतिसाद दिला असावा. पुढे घटनाच इतक्या वेगाने घडल्या कि दोघांची भेटच झाली नाही. जीना पाकिस्तान मधे गेले तर तमन्ना भारतात. तिने शेवटी जिनांना पत्र लिहीलं, नेहरूंना लिहीलं. भारत सरकारला तिची दया आली आणि तिची पाकिस्ताना रवानगी झाली...
कित्येक वर्षांनी ती जिनांना भेटली. त्यांची झाली.

या वेळी ती कोणतं गाणं म्हणेल ?
====

आज फिर "जीना" की तमन्ना है...

बर्‍याच पूर्वी जेंव्हा वाली आणि सुग्रिव यांच्यात सलोखा होता तेंव्हाचा प्रसंगः

एकदा वाली सुग्रिवकडे मुक्कामाला येतो. त्याला दुसर्‍या दिवशी पहाटे निघायचे असते. तर सुग्रिव आपल्या नोकराला गाण्यातून काय सुचना देईल?

अक्षरी बरोबर. रच्याकने हे गाणे नेटवर कुठे मिळेल का? बरीच वर्ष शोधतो आहे.

=====

माधव इथे http://www.youtube.com/watch?v=_YVJ0O1nXrI&feature=related बघा आहे ते गाणं. हे गाणं इतकं जुनं आहे ह्याची मला अजिबात कल्पना न्हव्ती. तुम्ही विचारलं म्हणून शोधलं तर लक्षात आलं.

Pages