Submitted by निवडुंग on 18 May, 2011 - 12:42
तुझ्या आठवणींच्या कारावासात,
तळमळतोय प्रत्येक क्षण.
तो बरसलेला श्रावण,
तुझं खळाळतं हसू,
ओझरतं अलवार चुंबन,
अन् एकजीव झालेले श्वास.
तुझ्या श्यामल तनूचा,
मोहक वेडावणारा गंध,
अल्लड बटेतून विरघळलेले दोन थेंब,
अन् काळजाचं झालेलं पाणी पाणी.
माझ्या विरहाच्या चाहूलीने,
तुझे कोसळलेले बांध,
खोलवर कातरलेलं हृदय,
अन् ओठावरचं खोटंच हसू.
कठोर होत सोडवलेली,
तुझी अथांग मिठी,
अन् जपून ठेवलेली बुचाची फुलं,
तुझ्या आठवणीत आजही.
सगळं सगळं परत घेऊन जा.
सगळंच,
आणि जमलं तर देऊन जा देणगी,
स्मृतीभ्रंशाची.
असह्य झालंय गं खरंच आता,
फार असह्य,
अन् तुझ्या आठवणीच्या कारावासात,
तळमतोय प्रत्येक क्षण.
एकदाचं मुक्त करून टाक सखे,
तुझ्या हातच्या शेवटच्या प्याल्याने,
संजीवनीचा असो वा हलाहल,
फक्त ओसंडू दे तुझ्याच हाताने.
तुझ्या गळ्याची शप्पथ,
फार असह्य झालंय गं आता..
गुलमोहर:
शेअर करा
.
.
छान , पण हलाहल कशाला पिताय
छान ,
पण हलाहल कशाला पिताय ,
प्यायचच आहे तर सूरा प्या .............
वाह
वाह
खूप आवडली... साधी, सोप्पी
खूप आवडली...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
साधी, सोप्पी आणि हळूवार कविता..
छान..!
किकु, आपजिगा१११, आभार..
किकु, आपजिगा१११,![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आभार..
किकु, सुरा म्हणजे ठर्रा म्हणायचंय काय?
दक्षिणा,![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खूप धन्यवाद..
मुक्ता..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सगळं सगळं परत घेऊन
सगळं सगळं परत घेऊन जा.
सगळंच,
आणि जमलं तर देऊन जा देणगी,
स्मृतीभ्रंशाची.
सही!
सगळं सगळं परत घेऊन
सगळं सगळं परत घेऊन जा.
सगळंच,
आणि जमलं तर देऊन जा देणगी,
स्मृतीभ्रंशाची.
सही!
सगळं सगळं परत घेऊन
सगळं सगळं परत घेऊन जा.
सगळंच,
आणि जमलं तर देऊन जा देणगी,
स्मृतीभ्रंशाची.
सही!
सगळं सगळं परत घेऊन
सगळं सगळं परत घेऊन जा.
सगळंच,
आणि जमलं तर देऊन जा देणगी,
स्मृतीभ्रंशाची.
सही!
तुझ्या श्यामल तनूचा, मोहक
तुझ्या श्यामल तनूचा,
मोहक वेडावणारा गंध,
अल्लड बटेतून विरघळलेले दोन थेंब,
अन् काळजाचं झालेलं पाणी पाणी.
लई झ्याक...
सगळं सगळं परत घेऊन जा.
सगळंच,
आणि जमलं तर देऊन जा देणगी,
स्मृतीभ्रंशाची
आणि हे ते अगदीच खास
कांति, चार वेळा खूप आभार !
कांति,![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
चार वेळा खूप आभार !
चँप !
खूप धन्यवाद..
मला आधी काकाक मध्ये असह्य
मला आधी काकाक मध्ये असह्य वाचून वाटले की कविता असह्य असेल म्हणून...पण छ्या माझा अपेक्षाभंग झाला...खूपच सुंदर कविता निघाली ही...
काकाक मध्ये टाकण्यामागे काही विशेष प्रयोजन?
चँप.. खूप आभार ! काकाक मध्ये
चँप..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
खूप आभार !
काकाक मध्ये टाकण्याचं विशेष असं काही प्रयोजन नाही, मुक्तछंदात लिहिली होती म्हणून इथे टाकावी वाटली..
तसं ही इथे जास्त काही ट्रॅफिक नसतं, त्यामुळे बरंच आहे..
मी पण आधी काकाक मध्येच
मी पण आधी काकाक मध्येच टाकायचो पण माबोकर विशाल कुलकर्णी यांनी सांगितल्यावर कविता विभागात टाकायला लागलो. तिथे आपल्यावर खरपूस टीका होते आणि आपल्याला आपल्या चुका समजतात. काकाकमध्ये सहसा कुणी टीका करायला जात नाही (सन्मानयीय अपवाद वगळता)
धन्यवाद चँप.. आपण म्हणता तर,
धन्यवाद चँप..![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आपण म्हणता तर, हलवतो इथून.. आणि खरपूस टीकेचा (जर झालीच तर) धनी होतो..
आभार !
आणि जमलं तर देऊन जा
आणि जमलं तर देऊन जा देणगी,
!!!
स्मृतीभ्रंशाची......
मस्तच
मस्तच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
गिरीशजी, विशालजी, खूप खूप
गिरीशजी, विशालजी,![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खूप खूप आभार !