कुणाला कशाचे तर कुणाला कशाचे. मला खाद्यपदार्थांचे, तेही खास करुन स्वतः केलेल्या पदार्थांचे फोटो काढायची हौस आहे.
नेहमीच्या या कामाला मी छंदाचे रुप दिलेय. प्रत्येक पदार्थ दिसायला कसा सुंदर दिसेल. त्याची रंगसंगती कशी आकर्षक दिसेल, असा विचार करत असतो. माझ्यासाठी ती नवनिर्मितीच असते.
पुर्वी मायबोलीवर लिंक देणे मला जमत नसे. त्यामुळे यातले काही फोटो पुर्वी टाकले असतील, तरी ते छोट्या आकारात होते. आता सावलीने शिकवल्यानंतर मला लिंक देणे जमू लागले आहे.
मी ज्या पाककृति लिहितो, त्यासोबत फोटो द्यायचा प्रयत्न करतोच, पण इथे बाकिची मंडळी ज्या पाककृति लिहितात, त्या पण करुन बघायचा प्रयत्न करत असतो. शिवाय यातल्या काही प्रकाशचित्रांशी, काही मायबोलीकरांच्या आठवणी निगडीत आहेत. त्यापण लिहितोच.
तर पानं मांडलीत, या जेवायला.... सावकाश होऊ द्या.
अश्विनीला एकदा पनीरच्या प्रकाराबद्दल लिहिले होते. तर हे पनीर चिली तिच्यासाठी. तसे अरुंधतीला पण पनीर आवडते, ते माहीत आहे.
उपास आहे का कुणाचा ? हे फक्त बटाट्याचे थालिपिठ.
जांभळा कोबी, केशरी गाजरे, हिरवी मिरची आणि पांढरा पास्ता. एक चित्र !
लेकीसाठी केलेला फ्राय लेमन फिश !
आमच्या कडे मिळणारे खास बीन्स. इथे त्याला कोको बीन्स म्हणतात. दिसायला सुंदर आणि चवीलाही छान
आणि हि त्याची भाजी
मिनोतीच्या पॅनकेक वरुन प्रेरणा घेऊन --
शेपू फॅन क्लबची आठवण काढत.
वर्षूचा रवा डोसा..
केनयाचे मूग, केनयाचेच घट्ट दही आणि केनयाचाच चिवडा (इथे त्याला चेवडो म्हणतात ) वापरुन केलेले चाट
साधा वरणभात आणि दह्यातल्या मिरच्या .
केळ्याच्या पानातली गोडाची पानगी
कांदा बटाटा आणि घेवडा बेक. हा पदार्थ मंगला बर्वेंच्या अन्नपुर्णा पुस्तकातला.
तयार कचोरी वापरुन केलेली कोफ्ता करी.
मायबोलीकर कुल (सुभाष) आणि मी, आम्ही दोघांनी नगरच्या रस्त्यावर हा हुरडा खाल्ला होता. आता मानुषी, चंपक, चंपी सोबत खाईन म्हणतो.
कॉर्न आणि ब्रोकोली बेक
साबुदाण्याचे थालिपीठ
माझी आवडती फणसाची भाजी
गोव्यातील खास अनसाफनसाची भाजी (टीमगोवासाठी )
खास वर्षूसाठी
व्हेजीटेबल स्टर फ्राय
छोट्या छोट्या ईडल्या करायचा कंटाळा आल्यावर, त्यच पिठात भाज्या वगैरे घालून केलेली तवा ईडली
जागू आणि साधनाला ला विसरुन कसे चालेल ? गोव्याच्या बांबोलिम बीचवर मित्रमैत्रिणींना खिलवलेले फ्राय फिश.
गुजराथी हांडवो
खाऊन दमला असाल तर चहा घ्या !!
साबुदाण्याची खिचडी
या फोटोबाबत अगदी खास आठवणी आहेत. गिरिराज उभयताचे केळवण आम्ही केले होते. आरतीच्या घरी (इट्स्मी ) त्यावेळी सई (दक्षिणाची ताई ), क्षिप्रा, रुपाली (त्यावेळची सोनचाफा) आणि जी एस होते. पुरणपोळी, करंजी, गुलाबजाम असा जंगी बेत होता.
माझ्या भटक्या मित्रांना विसरुन कसे चालेल. दोन्ही योगेश, रोहन, रोहीत, इंद्रा, आशू आदी मंडळींसाठी. गोरखगडाच्या पायथ्याशी मिळालेली थाळी. (या लेखातला हा एकमेव फोटो, ज्यातले पदार्थ मी रांधलेले नाहीत.)
हा आहे वांगीभात आणि पपईचे सलाद.
हे मामीचे. आलू चलाके
गोव्याच्या पद्धतीचे आंबाड्याचे रायते
ही अवलची गवार ढोकळी (मजहे व्हर्जन )
जागू आणि बागुलबुवा यांच्यासाठी हा मासा !
मला माहीत आहे, काही मित्रमैत्रिणी राहून गेल्यात. त्यांची आवडनिवड कळवली, तर त्यांनाही ई मेजवानी देईनच.
सावकाश होऊ द्या.
मायबोलीकर कुल (सुभाष) आणि मी,
मायबोलीकर कुल (सुभाष) आणि मी, नगरच्या रस्त्यावर हा हुरडा खाल्ला होता. >> ह्याची रेसिपी लिहू शकाल का ?
केळवणाच्या ताटांचा फोटो मस्त
केळवणाच्या ताटांचा फोटो मस्त आहे.
मस्तं
मस्तं रंगसंगति..!!
जांभळा-पांढरा पास्ता सर्वात देखणा !
हे उपाशीपोटी पहाणे.. जुल्म है
हे उपाशीपोटी पहाणे.. जुल्म है
वा मस्त!! जांभळा कोबी , स्टर
वा मस्त!! जांभळा कोबी , स्टर फ्राय, कांदा घेवडा बेक यम्मीss दिसतायत
वॉव दिनेशदा अगदी
वॉव दिनेशदा अगदी मस्तच...सगळ्या डिशेस मस्त ....अगदी तोंपासु.
आता मला ह्यातल्या बर्याच डिशेसच्या रेसीपी शोधाव्या लागतील .:)
पुरणपोळीचा, आणि वांगीभाताचा
पुरणपोळीचा, आणि वांगीभाताचा फोटो मस्तच दिसतोय!
मस्त!
मस्त!
जबरदस्त! वेगळे वेगळे पदार्थ
जबरदस्त! वेगळे वेगळे पदार्थ करुन बघायची तुमची हौस तर दाणगी आहेच पण फोटो खुपच भारी. मस्त!
एक-से-एक फोटो आहेत. मस्त.
एक-से-एक फोटो आहेत. मस्त.
खूपच हौशी आहात दिनेशदा...
खूपच हौशी आहात दिनेशदा... सग्गळे पदार्थ आणि सजावट अप्रतिम!!
अबाड्याचं रायते म्हणजे
अबाड्याचं रायते म्हणजे आंब्याचे का ?
रेसिपी यो.जा. टा किंवा असेल तर इथे नंबर द्या प्लिज..
मिनि कचोरी आणि पापड टाकलेली करी पण चांगली आयडिआ वाटतीये ( याची पण रेसिपी प्लिज )
कॉर्न ब्रॉकोली बेक ची रेसिपी
कॉर्न ब्रॉकोली बेक ची रेसिपी हवी...
दिनेशदा, कचोरी वापरून
दिनेशदा, कचोरी वापरून केलेल्या करीची रेसिपी आहे का इथे? नसेल तर टाकाल का?
झकास फोटो दिनेशदा. ह्यातल्या
झकास फोटो दिनेशदा.
ह्यातल्या रेसिपी तुम्ही आधीच लिहिल्या असतील तर त्यांच्या लिंक्स देता येतील का इथे?
सही फोटोज!!
सही फोटोज!!
मला साखि सगळ्यात जास्त आवडली.
मला साखि सगळ्यात जास्त आवडली. दही मिरच्या, केळवणाचं ताट वगैरेही छान आहे. त्यात गुलाबजाम मला दिसले नाहीत
सगळॅ फोटो भारी आहेत तेवढुशी
सगळॅ फोटो भारी आहेत तेवढुशी कमी खिचडी खाऊन खरंच उपवास घडत असेल
काय मेजवानी आहे! वा!
काय मेजवानी आहे! वा!
लईच भारी ईमेज वानी अन्काय
लईच भारी ईमेज वानी अन्काय तर्मग !
मस्तच. पण नुसते फोटो पाहायचे
मस्तच. पण नुसते फोटो पाहायचे म्हणजे शिक्षाच
व्वाव ! जबरदस्त मेजवानी आहे,
व्वाव ! जबरदस्त मेजवानी आहे, दिनेश एकदा तुमच्या कडे चक्कर मारली पाहीजे मेजवानी झोडायला.
आणि इतके बीन्स खाऊन धडामधुडुम होईल ना !
जबरा! माझं इ-पोट भरलं.. पण
जबरा! माझं इ-पोट भरलं.. पण खर्या पोटाचं काय? आता झोपल्यावर हे सगळं स्वप्नात येणार (किंवा स्वप्नात तरी येउदे )
वा मस्तच मेजवानी आहे. रोज एक
वा मस्तच मेजवानी आहे. रोज एक एक पदार्थ येऊन खावा लागेल
एकदम चटपटीत आहेत फोटो. कचोरी
एकदम चटपटीत आहेत फोटो.
कचोरी वापरून कोफ्ताकरी कशी केली?
सगळे फोटो मस्त! फणसाच्या
सगळे फोटो मस्त! फणसाच्या भाजीत हिरवे आहेत ते मटार आहेत का?
कसले सह्ही दिस्तायत! सक्काळी
कसले सह्ही दिस्तायत! सक्काळी सक्काळी अशी जंगी मेजवानी. आता दिवसभर पुरेल.
दिनेशदा, मला लेमन फिश, बेक्ड ब्रोकोली, हांडवो, पपईचा मासा पाठवून द्या.
सगळे फोटो मस्त......bhook
सगळे फोटो मस्त......bhook laga laga bhook laga..........
वॉव!! एक से एक फोटो आहेत.
वॉव!! एक से एक फोटो आहेत. वांगीभात फारच तोंपासू आणि जांभळा पास्ता तर क्लास.
पपईचा मासा भारी! ट्राय करणार
पपईचा मासा भारी! ट्राय करणार नक्की. सर्वच फोटो छानेत.
Pages