ई मेजवानी

Submitted by दिनेश. on 18 May, 2011 - 15:30

कुणाला कशाचे तर कुणाला कशाचे. मला खाद्यपदार्थांचे, तेही खास करुन स्वतः केलेल्या पदार्थांचे फोटो काढायची हौस आहे.

नेहमीच्या या कामाला मी छंदाचे रुप दिलेय. प्रत्येक पदार्थ दिसायला कसा सुंदर दिसेल. त्याची रंगसंगती कशी आकर्षक दिसेल, असा विचार करत असतो. माझ्यासाठी ती नवनिर्मितीच असते.

पुर्वी मायबोलीवर लिंक देणे मला जमत नसे. त्यामुळे यातले काही फोटो पुर्वी टाकले असतील, तरी ते छोट्या आकारात होते. आता सावलीने शिकवल्यानंतर मला लिंक देणे जमू लागले आहे.
मी ज्या पाककृति लिहितो, त्यासोबत फोटो द्यायचा प्रयत्न करतोच, पण इथे बाकिची मंडळी ज्या पाककृति लिहितात, त्या पण करुन बघायचा प्रयत्न करत असतो. शिवाय यातल्या काही प्रकाशचित्रांशी, काही मायबोलीकरांच्या आठवणी निगडीत आहेत. त्यापण लिहितोच.

तर पानं मांडलीत, या जेवायला.... सावकाश होऊ द्या.

अश्विनीला एकदा पनीरच्या प्रकाराबद्दल लिहिले होते. तर हे पनीर चिली तिच्यासाठी. तसे अरुंधतीला पण पनीर आवडते, ते माहीत आहे.

उपास आहे का कुणाचा ? हे फक्त बटाट्याचे थालिपिठ.

जांभळा कोबी, केशरी गाजरे, हिरवी मिरची आणि पांढरा पास्ता. एक चित्र !

लेकीसाठी केलेला फ्राय लेमन फिश !

आमच्या कडे मिळणारे खास बीन्स. इथे त्याला कोको बीन्स म्हणतात. दिसायला सुंदर आणि चवीलाही छान

आणि हि त्याची भाजी

मिनोतीच्या पॅनकेक वरुन प्रेरणा घेऊन --

शेपू फॅन क्लबची आठवण काढत.

वर्षूचा रवा डोसा..

केनयाचे मूग, केनयाचेच घट्ट दही आणि केनयाचाच चिवडा (इथे त्याला चेवडो म्हणतात ) वापरुन केलेले चाट

साधा वरणभात आणि दह्यातल्या मिरच्या .

केळ्याच्या पानातली गोडाची पानगी

कांदा बटाटा आणि घेवडा बेक. हा पदार्थ मंगला बर्वेंच्या अन्नपुर्णा पुस्तकातला.

तयार कचोरी वापरुन केलेली कोफ्ता करी.

मायबोलीकर कुल (सुभाष) आणि मी, आम्ही दोघांनी नगरच्या रस्त्यावर हा हुरडा खाल्ला होता. आता मानुषी, चंपक, चंपी सोबत खाईन म्हणतो.

कॉर्न आणि ब्रोकोली बेक

साबुदाण्याचे थालिपीठ

माझी आवडती फणसाची भाजी

गोव्यातील खास अनसाफनसाची भाजी (टीमगोवासाठी )

खास वर्षूसाठी
व्हेजीटेबल स्टर फ्राय

छोट्या छोट्या ईडल्या करायचा कंटाळा आल्यावर, त्यच पिठात भाज्या वगैरे घालून केलेली तवा ईडली

जागू आणि साधनाला ला विसरुन कसे चालेल ? गोव्याच्या बांबोलिम बीचवर मित्रमैत्रिणींना खिलवलेले फ्राय फिश.

गुजराथी हांडवो

खाऊन दमला असाल तर चहा घ्या !!

साबुदाण्याची खिचडी

या फोटोबाबत अगदी खास आठवणी आहेत. गिरिराज उभयताचे केळवण आम्ही केले होते. आरतीच्या घरी (इट्स्मी ) त्यावेळी सई (दक्षिणाची ताई ), क्षिप्रा, रुपाली (त्यावेळची सोनचाफा) आणि जी एस होते. पुरणपोळी, करंजी, गुलाबजाम असा जंगी बेत होता.

माझ्या भटक्या मित्रांना विसरुन कसे चालेल. दोन्ही योगेश, रोहन, रोहीत, इंद्रा, आशू आदी मंडळींसाठी. गोरखगडाच्या पायथ्याशी मिळालेली थाळी. (या लेखातला हा एकमेव फोटो, ज्यातले पदार्थ मी रांधलेले नाहीत.)

हा आहे वांगीभात आणि पपईचे सलाद.

हे मामीचे. आलू चलाके

गोव्याच्या पद्धतीचे आंबाड्याचे रायते

ही अवलची गवार ढोकळी (मजहे व्हर्जन )

जागू आणि बागुलबुवा यांच्यासाठी हा मासा !

मला माहीत आहे, काही मित्रमैत्रिणी राहून गेल्यात. त्यांची आवडनिवड कळवली, तर त्यांनाही ई मेजवानी देईनच.

सावकाश होऊ द्या.

गुलमोहर: 

मस्तं रंगसंगति..!!
जांभळा-पांढरा पास्ता सर्वात देखणा !

वॉव दिनेशदा अगदी मस्तच...सगळ्या डिशेस मस्त ....अगदी तोंपासु.

आता मला ह्यातल्या बर्‍याच डिशेसच्या रेसीपी शोधाव्या लागतील .:)

अबाड्याचं रायते म्हणजे आंब्याचे का ?
रेसिपी यो.जा. टा किंवा असेल तर इथे नंबर द्या प्लिज..
मिनि कचोरी आणि पापड टाकलेली करी पण चांगली आयडिआ वाटतीये ( याची पण रेसिपी प्लिज Happy )

व्वाव ! जबरदस्त मेजवानी आहे, दिनेश एकदा तुमच्या कडे चक्कर मारली पाहीजे मेजवानी झोडायला.
आणि इतके बीन्स खाऊन धडामधुडुम होईल ना ! Lol

जबरा! माझं इ-पोट भरलं.. पण खर्‍या पोटाचं काय? आता झोपल्यावर हे सगळं स्वप्नात येणार (किंवा स्वप्नात तरी येउदे Wink )

कसले सह्ही दिस्तायत! सक्काळी सक्काळी अशी जंगी मेजवानी. आता दिवसभर पुरेल. Happy

दिनेशदा, मला लेमन फिश, बेक्ड ब्रोकोली, हांडवो, पपईचा मासा पाठवून द्या.

Pages