कुणाला कशाचे तर कुणाला कशाचे. मला खाद्यपदार्थांचे, तेही खास करुन स्वतः केलेल्या पदार्थांचे फोटो काढायची हौस आहे.
नेहमीच्या या कामाला मी छंदाचे रुप दिलेय. प्रत्येक पदार्थ दिसायला कसा सुंदर दिसेल. त्याची रंगसंगती कशी आकर्षक दिसेल, असा विचार करत असतो. माझ्यासाठी ती नवनिर्मितीच असते.
पुर्वी मायबोलीवर लिंक देणे मला जमत नसे. त्यामुळे यातले काही फोटो पुर्वी टाकले असतील, तरी ते छोट्या आकारात होते. आता सावलीने शिकवल्यानंतर मला लिंक देणे जमू लागले आहे.
मी ज्या पाककृति लिहितो, त्यासोबत फोटो द्यायचा प्रयत्न करतोच, पण इथे बाकिची मंडळी ज्या पाककृति लिहितात, त्या पण करुन बघायचा प्रयत्न करत असतो. शिवाय यातल्या काही प्रकाशचित्रांशी, काही मायबोलीकरांच्या आठवणी निगडीत आहेत. त्यापण लिहितोच.
तर पानं मांडलीत, या जेवायला.... सावकाश होऊ द्या.
अश्विनीला एकदा पनीरच्या प्रकाराबद्दल लिहिले होते. तर हे पनीर चिली तिच्यासाठी. तसे अरुंधतीला पण पनीर आवडते, ते माहीत आहे.
उपास आहे का कुणाचा ? हे फक्त बटाट्याचे थालिपिठ.
जांभळा कोबी, केशरी गाजरे, हिरवी मिरची आणि पांढरा पास्ता. एक चित्र !
लेकीसाठी केलेला फ्राय लेमन फिश !
आमच्या कडे मिळणारे खास बीन्स. इथे त्याला कोको बीन्स म्हणतात. दिसायला सुंदर आणि चवीलाही छान
आणि हि त्याची भाजी
मिनोतीच्या पॅनकेक वरुन प्रेरणा घेऊन --
शेपू फॅन क्लबची आठवण काढत.
वर्षूचा रवा डोसा..
केनयाचे मूग, केनयाचेच घट्ट दही आणि केनयाचाच चिवडा (इथे त्याला चेवडो म्हणतात ) वापरुन केलेले चाट
साधा वरणभात आणि दह्यातल्या मिरच्या .
केळ्याच्या पानातली गोडाची पानगी
कांदा बटाटा आणि घेवडा बेक. हा पदार्थ मंगला बर्वेंच्या अन्नपुर्णा पुस्तकातला.
तयार कचोरी वापरुन केलेली कोफ्ता करी.
मायबोलीकर कुल (सुभाष) आणि मी, आम्ही दोघांनी नगरच्या रस्त्यावर हा हुरडा खाल्ला होता. आता मानुषी, चंपक, चंपी सोबत खाईन म्हणतो.
कॉर्न आणि ब्रोकोली बेक
साबुदाण्याचे थालिपीठ
माझी आवडती फणसाची भाजी
गोव्यातील खास अनसाफनसाची भाजी (टीमगोवासाठी )
खास वर्षूसाठी
व्हेजीटेबल स्टर फ्राय
छोट्या छोट्या ईडल्या करायचा कंटाळा आल्यावर, त्यच पिठात भाज्या वगैरे घालून केलेली तवा ईडली
जागू आणि साधनाला ला विसरुन कसे चालेल ? गोव्याच्या बांबोलिम बीचवर मित्रमैत्रिणींना खिलवलेले फ्राय फिश.
गुजराथी हांडवो
खाऊन दमला असाल तर चहा घ्या !!
साबुदाण्याची खिचडी
या फोटोबाबत अगदी खास आठवणी आहेत. गिरिराज उभयताचे केळवण आम्ही केले होते. आरतीच्या घरी (इट्स्मी ) त्यावेळी सई (दक्षिणाची ताई ), क्षिप्रा, रुपाली (त्यावेळची सोनचाफा) आणि जी एस होते. पुरणपोळी, करंजी, गुलाबजाम असा जंगी बेत होता.
माझ्या भटक्या मित्रांना विसरुन कसे चालेल. दोन्ही योगेश, रोहन, रोहीत, इंद्रा, आशू आदी मंडळींसाठी. गोरखगडाच्या पायथ्याशी मिळालेली थाळी. (या लेखातला हा एकमेव फोटो, ज्यातले पदार्थ मी रांधलेले नाहीत.)
हा आहे वांगीभात आणि पपईचे सलाद.
हे मामीचे. आलू चलाके
गोव्याच्या पद्धतीचे आंबाड्याचे रायते
ही अवलची गवार ढोकळी (मजहे व्हर्जन )
जागू आणि बागुलबुवा यांच्यासाठी हा मासा !
मला माहीत आहे, काही मित्रमैत्रिणी राहून गेल्यात. त्यांची आवडनिवड कळवली, तर त्यांनाही ई मेजवानी देईनच.
सावकाश होऊ द्या.
निकिता, tRu असं लिहा.
निकिता, tRu असं लिहा. दिनेशदा, तुमची विपू पाहून नेहमीच आनंद होतो. पण निकिता म्हणताहेत तसं नवाच लेख टाका आणि त्यात ह्या पाकृ लिहा. सगळ्यांनाच उपयोग होईल. खरं तर तुम्ही फळांवर लेखमाला काढली आहे तशी पाकृंवर सुध्दा एक काढायला हवीच.
पानगी मला हिची रेसीपी हवी.
पानगी
मला हिची रेसीपी हवी. घरी हळदिची पानं आहेत.
दिनेशदा.... सहीsssss !! सगळे
दिनेशदा.... सहीsssss !! सगळे पदार्थ बघून तों. पा. सु ! इकडे याल तेव्हा फुरसतीने या.. म्हणजे तुमच्या हातचे खायला मिळेल.. हा आता जिप्सीचे केळवण असेल तर तेव्हाच करू.. हाकानाका
स्वप्ना, या चिली पनीर साठी मी
स्वप्ना, या चिली पनीर साठी मी रेडी मिक्स वापरले होते ग्रेव्हीसाठी. पनीरचे लांबट तूकडे करुन, तेल तूप वगैरे न टाकता तसेच पॅनमधे भाजलेत. मंद विस्तवावर केले तर न करपता, असे सोनेरी होतात. आणि पनीरमधले तूप बाहेर येते. मग लांब चिरलेला कांदा आणि लाल सिमला मिरची पण अगदी कमी तेलात परतली. थोडीशी लागू दिली. मग त्यात ग्रेव्ही मिक्स घातले. नीट शिजल्यावर अर्धे पनीर त्यात घातले आणि बाकीचे वर ठेवले. वरुन केचप सोडलाय.
लेमन फिश (किंवा रिग शार्क) हा न्यू झीलंड मधे मिळणारा मासा आहे. (आपल्याकडे काय नावाने मिळतो, किंवा मिळतो का ते जागूला विचारायला पाहिजे ) पण तो व्हाइट असतो आणि अजिबात वास येत नाही. त्याचे असेच कापलेले फिले आणले होते. मग त्याला लिंबाचा रस चोळून फक्त मिठ, हळद आणि थोडेसे लाल तिखट लावले. खोल पॅनमधे बटर घेऊन त्यात तो मंद आचेवर तळला. डिशमधे काढल्यावर त्यावर थोडे बटर आणि केचप टाकलेय. तळताना पिठ वगैरे लावलेले नाही.
निकिता नक्कीच त्या तृप्तीसाठीच तर, करतो हे. tRuptee.
रुणुझुणू, हा माझा खुप आवडता प्रकार. बटाटा, रताळी, अरारुट अशा कुठल्याही कंदमूळाचा करता येतो.
हे किसून त्यात थोडे मीठ टाकायचे. थोडेसे जिरे. हवी तर हिरवी मिरची. मग त्या किसाला पाणी सुटले, कि पॅनवर पुसटसे तेल टाकून हा किस पसरायचा. हातानेच गोल आकार द्यायचा. आणि मंद आचेवर ठेवून द्यायचे. अधून मधून ते उलथन्याने दाबत रहायचे. म्हणजे तो किस असा चिकटतो. थोड्या वेळाने उलटून टाकायचे. गॅस मात्र मंदच ठेवायचा. तर असा सोनेरी रंग येतो.
लाजो.. फेण्या. अगदी मऊ, लुसलुशीत. त्यावर तेल आणि थोडेसे तिखट.
आणि आता साधना आणि जागू च्या मानसिक दबावाला बळी पडायचे काही कारणच नाही.
फणसाची भाजी, अनसाफनसाची भाजी,
फणसाची भाजी, अनसाफनसाची भाजी, पनीर चिली, बटाट्याचे थालीपीठ या रेसिपी मला हव्यात!
दिनेशदा सही , सगळेच पदार्थ
दिनेशदा सही , सगळेच पदार्थ चवीला मस्तच असणार!
निकिता, पानगीसाठी तांदळाच्या
निकिता, पानगीसाठी तांदळाच्या पिठात लोणी, दूध आणि थोडी साखर घालायची. साखर नको असेल तर हिरवी मिरची. हे सगळे मऊसर भिजवायचे. मग केळीचे पान घ्यायचे. त्यावर थोडेसे तूप लावून हे पिठ पसरायचे. मग त्यावर दुसरे पान झाकण ठेवायचे. आणि हे सगळे तव्यात मंद आचेवर ठेवायचे. एका बाजूने पान जळल्यासारखे वाटले कि परतून टाकायचे. नीट शिजली कि पान आपोआप वेगळे होते.
दिनेशदा रताळ्याच्या गोड
दिनेशदा रताळ्याच्या गोड फेण्या केल्यात का कधी? खरं म्हणजे भीत भीत विचारतीये हा प्रश्न. तुम्ही केल्याच असणार.
रताळं खिसून त्यात पाणी घालून चाळणीतून निथळून घ्या. निर्लेप तव्याला तूप लावा. >>>
पॅनवर पुसटसे तेल टाकून हा किस पसरायचा. हातानेच गोल आकार द्यायचा. आणि मंद आचेवर ठेवून द्यायचे. >>>
याच पद्धतीने हा खीस दाबून दाबून गोलाकार करायचा. झाकण ठेवायचं. १/२ मिनिटांनी उलथण्याने त्याला पलटी मारायची. मग त्यावर पिठी साखर भुरभुरवायची. हलक्या हाताने फेणी प्लेटात घ्यायची...मटकावायची.
दिनेशदा फोटो पाहूनच पोट भरले
दिनेशदा फोटो पाहूनच पोट भरले हो
मस्तच... आणि मला विसरलात.
मस्तच...
आणि मला विसरलात.
वा मस्तच आहे सगळं तरी त्यातला
वा मस्तच आहे सगळं तरी त्यातला त्यात पास्ता आणि पपईचा मासा खरच खूप छान आहे.
झकास फोटो....
झकास फोटो....
ठमे, तुला खायला काय आवडते. ते
ठमे, तुला खायला काय आवडते. ते आत्ता आता कळायला लागलेय.
वत्सला, त्या भाजीला जरा खटाटोप आहे. शोधतोय. नाहीच मिळाली तर लिहिन.
मानुषी, त्या रताळ्याचा आणखी एक प्रकार गोव्यात करतात. रताळी उकडून त्याच्या लगद्याची शेव करुन वाळवतात. आणि मग ती तळून त्यावर पिठीसाखर घालून खातात. वाळवलेली असल्याने ती लगेच तळली जाते. त्याचीच खीर पण करता येते.
दिनेशदा तोंडाला पाणी सुटले.
दिनेशदा तोंडाला पाणी सुटले. प्लीज साबुदाण्याचे थालिपिठ, कचोरीची कोफ्ता करी आणि फ्राईड लेमन फिश ची कृती टाका ना!
जबरदस्त दिनेशदा...एकसे एक
जबरदस्त दिनेशदा...एकसे एक पदार्थ आहे..यातले कितीतरी ऐकले पण नव्हते कधी...बघुनच ढेकर आली...
दिनेशदा... पदार्थ तर तोंपासू
दिनेशदा... पदार्थ तर तोंपासू आहेत आणि ते मस्त गार्निश केल्यामुळे तर डोळे तृप्त होताहेतच पण भूकेची जाणीव वाढीस लागतेय... उत्कृष्ट सजावट!!! १० / १० !!!
पण डिजे म्हणतेय तसं हे उपाशीपोटी पहाणे.. जुल्म है
आणि दिनेशदा.... सगळ्यांची अगदी सगळ्यांची कृती हवीच आहे प्लीज्ज्ज्ज्ज्ज्ज्ज्ज्ज
अगदी लाळ गाळणारे पदार्थ पनीर चिली, लेमन फिश, व्हेजीटेबल स्टर फ्राय, वांगीभात, आंबाड्याचे रायते...
पराठे आणि लेमन फिश अगदी योग्य मस्त खरपूस भाजलेत! कौशल्यच ते! पाहूनच त्याचा मस्त खरपूस घमघमाट जाणवतोय... खुस्खुशीत तुकडा मोडून तोंडात टाकण्याची अनावर इच्छा होतेय!!! अप्रतिम पाककौशल्य आहे. सॅल्युट!!!
दिनेशदा, मला वांगीभात पण हवा
दिनेशदा,
मला वांगीभात पण हवा (रेसीपी). मी वांगी फॅन आहे.
mastch... pan resipi havi
mastch... pan resipi havi
अप्रतीम दिनेशदा!!!!! असंख्य
अप्रतीम दिनेशदा!!!!! असंख्य जणांनी कृत्या मागितल्या आहेतच म्हणुन मी ते लिहीत नाही ... अजुन सकाळचा नाश्ता पण केला नाही.. आता जाऊन निदान पाणी तरी पिते. ...
दिनेशदा!!!!!!
दिनेशदा!!!!!! अहाहाहा!!!!!!!!!!!! डोळ्यांचे पारणे फिटले.... ए.वे.ए.ठि. इतक्या सगळ्या उत्कृष्ट सजावटींनी नटलेल्या तों.पा.सु. पाककृती पाहायला मिळाल्या!
साबुदाण्याचे थालीपीठ आणि खिचडी पाहून तर अगदी राहवतच नाहीये. माझ्याकडचा कधीच संपला आणि इकडे आपल्याकडच्यासारखा साबुदाणा मिळतच नाही. श्रीलंकन लोक ज्यापासून पायासम (खीर) बनवतात तो मायक्रो साईझचा मिळतो जो भिजवला की गिचका होतो, नाहीतर एशियन शॉपमध्ये आपल्या साबुदाण्याच्या तिप्पट आकाराचा 'Tapioca Pearl' म्हणून एक मिळतो. आपण नाही का साबुदाण्याचा चिवडा बनवत? तस्साच सेम टू सेम! मी आणलाय. तो भिजवून खिचडी बनते का? ते आता पाहायचेय... तुम्ही उगाचच माझी साबुदाण्याची भूक चाळवलीत.
दिनेशदा मस्त फोटो.. तोपासु
दिनेशदा मस्त फोटो.. तोपासु :)..
इतकं सगळ कस येतं तुम्हाला.. रेसिपीज सांगा हं प्लीज ...
सगळे पदार्थ एकदम मस्त आहेत पण
सगळे पदार्थ एकदम मस्त आहेत पण ते जर माबोवर असतील तर त्यांच्या लिन्क्स द्या नं नाहीतर यातील सगळ्या पाकृ योजाटा.
मनी
ते गवारीची डाल्ढोकळी अशी
ते गवारीची डाल्ढोकळी अशी कोफ्ता स्टाईलची ....क्रुती हवी
हे तर सगळं आपल्या पार
हे तर सगळं आपल्या पार पलिकडलंच ! दिनेशदा, नेहमीसारखं तुम्हाला दंडवत घालून पुन्हा एकदां हे डोळे भरून बघून घ्यायच !! निव्वळ अफलातून !!
अरेव्वा, सोपी आहे की
अरेव्वा, सोपी आहे की बटाट्याच्या थापिची पाकृ.करून बघते. ( अर्थात ह्यातही मि काहीतरी उद्योग करून ठेवण्याची दाट शक्यता आहे ! :फिदी:)
<< श्रीलंकन लोक ज्यापासून पायासम (खीर) बनवतात तो मायक्रो साईझचा मिळतो जो भिजवला की गिचका होतो, नाहीतर एशियन शॉपमध्ये आपल्या साबुदाण्याच्या तिप्पट आकाराचा 'Tapioca Pearl' म्हणून एक मिळतो.>> सानी, सेम पिंच. माझ्या इकडेही साबुदाण्याचा हाच प्रॉब्लेम आहे. दिनेशदा, मदत....
त्या मोठ्या (नायलॉन)
त्या मोठ्या (नायलॉन) साबुदाण्याची खीरच करता येईल. तूमच्याकडे वेळ असेल तर तो तळून त्याचा चिवडा करता येईल. किंवा पाकातले लाडू करता येतील. शिजवून त्याच्या फेण्या पण करता येतील. (उगाच बाऊ करता, सगळे सोपे आहे हे.)
सानी तो लहान साबुदाणा, भिजत ठेवायचा नाही. नुसता ओला करुन लगेच वापरायचा.
आणि खरं सांगायचं तर या पदार्थांच्या कृति मला खास वाटत नाहीत, म्हणून तर असे एकत्र दिले. आता गवार ढोकळी साठी अवलने पोळी लाटून, शंकरपाळ्या केल्या. त्या ऐवजी (खरेतर लाटायचा आळस आल्याने ) मी गोळे करुन शिजवले एवढेच.
वांगीभातासाठी वांगी वाटाणे आधी तेलावर परतून, त्यात सांबार मसाला घालून शिजवले. थोडी चिंच (माझ्याकडे बाटलीतला पल्प असतो )टाकला, गूळ टाकला. मग त्यावर तयार भात टाकला. फक्त सजावटीसाठी थोडा भात आणि एक वांगे बाजूला ठेवले.
तज्ञ म्हणून नाही, तर एक अनुभवी व्यक्ती म्हणून सांगतो. कुठलाही पदार्थ करणे, मी मनापासून एंजॉय करतो. आणि या सजावटी काही कुठल्या पाहुण्यासाठी केलेल्या नाहीत. माझेच रोजचे जेवण असे सजवून घेतो. भाज्यांचे रंग, त्यांचे आकार यात मी मनापासून रमतो.
आणि असे काही जमले कि हटकून कुणाची तरी आठवण येते. मग त्याला / तिला दाखवण्यासाठी फोटो काढून ठेवतो.
मला वाटते रोजच्या कंटाळवाण्या कामात, जर अशी रंजकता आणता आली, तर अजिबात श्रम वाटत नाहीत.
भाज्यांच्या बाबतीत तर अनेक भाजीवाले माझे गुरु आहेत. चेंबूरच्या (किंवा मुंबईच्या बहुतेक) भाजी बाजारात किती कलात्मकतेने भाज्या रचलेल्या असतात, ते बघायलाच हवे. तिथेच एक डाळिंब वाला असतो. फळाच्या तुर्यापासून सुरुवात करत तो डाळींबाचे पाच समान भाग करतो, ते नेमके त्या पापुद्र्यावरच. एकही दाणा वाया जात नाही.
पेणजवळ टोलनाक्यावर काकडी विकणार्या बायका येतात. त्या अत्यंत सुबकपणे काकड्या कापतात. गोव्यातील देवळात, बायका अगदी साध्या साध्या फूलांचे (गुलबक्षी, शंकासुर) सुंदर हार रचतात. थायलंडमधे तर फळावर अप्रतिम कोरीवकाम केलेले असते. असे काही बघितले कि ते करुन बघायची, मला अनावर इच्छा होते, जमतेच असे नाही.
फार वहावलो...
गवार ढोकळीचा फोटो नंतर अॅड
गवार ढोकळीचा फोटो नंतर अॅड केला का ?
काल दिसला नाही, मस्तं आहे प्रेझेंटेशन पण गवार ऐवजी ग्रीन बिन्स वापरलेत का ?
हो डिजे. आधी अवलच्या बीबी वर
हो डिजे. आधी अवलच्या बीबी वर टाकला होता. गवारी ऐवजी चवळीच्या शेंगा आणि शंकरपाळ्यां ऐवजी, कोफ्ते. एवढेच बदल.
व्वाव्वा..परत आज सक्काळी
व्वाव्वा..परत आज सक्काळी सक्काळी सर्व फोटू पाहिले,, आवडत्या दहात ही टाकून ठेवलेत.. आता जब कभी,जहाँ कहीं वाटलं तर पाहता येतील..
बीन्,कोफ्त्याची सजावट ही मस्त दिस्तीये
रोजचं जेवण असं सजवून घेता?? आता मात्र ____/\____
वाटलेलं कौतुक शब्दात उतरवता आलं नाहीये
फारच सुंदर
फारच सुंदर फोटो!!!
कचोर्यांच्या कोफ्ताकरीला नाविन्यपूर्णतेसाठी १० पैकी १० मार्कं. कृपया पाककृती टाकावी.
Pages