माकुल साफ करणे म्हणजे थोडे कठीणच काम असते. माखली दोन प्रकारच्या असतात नळ माखली आणि सर्या किंवा मणेर माखली. ही आहे नळ माखली. हिच्या वरती पातळशी साल असते ती काढून टाकायची म्हणजे लवकर शिजण्यास मदत होते. ही साल काढल्यावर अगदी शहाळ्यासारखी माखले दिसु लागतात.
ह्याचे डोके आणि शरीर हाताने सहज वेगळे होते. ते वेगळे करुन घ्यायचे. मग त्याच्या डोक्याच्या भागाला चिकटून काळसर भाग येतो तो काढुन टाकायचा आणि बाकीचा डोक्याचा चांगला भाग म्हणजे शेपट्या आणि मांसल भाग कापुन घ्यायचा.
आता माकुलचा दुसरा भाग नळी सारखाच असतो म्हणुनच त्याला नळ माखुल म्हणत असतील. तो मधुन चिरुन घ्यायचा. चिरल्यावर त्यात एक प्लास्टीकच्या तुकड्यासारखा सरळ भाग निघतो. ते बहुतेक त्याचे हाड असेल. ते काढुन टाकायचे. उजव्या बाजुच्या माखलीत तो भाग मध्ये आहे.
माखलीचे तुम्हाला आवडतील त्या शेपचे तुकडे करुन घ्या. अगदी फुला पानांच्या, कार्टूनच्या आकाराची कापलीत तरी चालेल. मी बाबा चौकोनी तुकडे केलेत.
वातताहेत ना शहाळ्याचे तुकडे ? खाताना खोबर्यासारखी वाटते.
ह्या तुकड्यांना आता आल,लसुण्,मिरची, कोथिंबिरच वाटण लावा. हवा असल्यास लिंबु पिळा थोडा. मी पिळते नेहमी त्यामुळे वईसपणा कमी होतो असे मला वाटते.
आता झाले सोप्पे काम, करा सुरुवात कुकर घेतलेत तर अजुनच सोप्पी होते माखलीची रेसिपी. ही शिजायला वेळ लागतो मटणासारखा म्हणुन मी नेहमी कुकरलाच लावते.
कुकरमध्ये तेलावर लसुणाची खमंग फोडणी द्या व त्यावर कांदा गुलाबी रंगावर तळा मग त्यात हिंग, हळद, मसाला घाला.
कुकरमध्ये काढलेला फोटो. फोटो वर जाउ नका रंग कसा दिसतो ते सांगा.
त्या मिश्रणावर आता बाकीचे जिन्नस म्हणजे माखलीचे तुकडे, कांदा-खोबर्याचे वाटण, गरम मसाला, मिठ, हवा असल्यास चिंचेचा कोळ (लिंबु घातला असेल तर गरज नाही ह्याची घातलाच तर अगदी थोडा घाला नाहीतर चव जाईल माखलीची) जर रस्सा करायचा असेल तर थोडेसे पाणी घाला जास्त घालु नका कारण माखलीचे पाणी निघते शिजल्यावर. आता हे सगळे मिश्रण ढवळून घ्या.
कुकरचे झाकण लावुन ४ ते ५ शिट्ट्या घ्या व गॅस बंद करा. झाली माखली.
माखुल शक्यतो कोळणीकडूनच साफ करुन घ्या. खास तुम्हाला दाखवण्यासाठी मी घरी आणुन साफ केलेय.
कडक असतील अश्याच माखुल घ्या. त्या ताज्या असतात.
शेवटचा फोटो मस्तच ...
शेवटचा फोटो मस्तच ...
जागूताई माश्यांच्या सिरीजमधल्या माशांपैकी खर सांगू मला हया सिरीजचा पहिला फोटो खरच आवडला नाही. शेवटचा फोटो बघून खाण्याची ईच्छा झाली हे मात्र नक्की
हाच मासा म्हणत होतो मी.
हाच मासा म्हणत होतो मी. याच्याच अंगात ती कडक "पाठ" असते. त्यात भरपूर कॅल्शियम असतो. लव्ह बर्ड्स आवडीने खातात. गोव्यात या नळीसारख्या भागाच्या गोल चकत्या करुन तळतात (स्क्वीड फ्राय).
स्स्स्स्सSss मासा आहे की
स्स्स्स्सSss मासा आहे की काजुकतली
जागूताई ... याला लागणारा वेळ
जागूताई ... याला लागणारा वेळ ५ मिनिटे कशी ?
जुई चुकुन झालय. बदलते. आणि
जुई चुकुन झालय. बदलते. आणि आपल्याला जे रोज खातो तेच बघण्याची सवय असते त्यामुळे वेगळे मासे पाहीले की विचित्र वाटत हे खर आहे. पण त्यांच रुप न पाहता गुण पाहायचे.
परवाच ऐकले होते.. आज पहायला
परवाच ऐकले होते.. आज पहायला मिळाले.. हा प्रकार विकत घेताना कुठली काळजी घ्यावी ते पण सांग ना..
जागुले, जुई शी सहमत... पहिल
जागुले, जुई शी सहमत... पहिल फोटो पाहून इच्छा नाही होत, पण शेवटचा फोटो अगदी छान.. निदान पदार्थ दिसतोय तरी मस्तच..
असो, कुकराला ४-५ शिट्ट्या द्यायच्या ना? आच छोटी की मोठी ठेऊन?
मी पिळते नेहमी त्यामुळे वईसपणा कमी होतो >> वईसपणा म्हणजे काय?
Look at चातक
Look at चातक
योगेश मी अधिक टिप्स मध्ये
योगेश मी अधिक टिप्स मध्ये लिहीले आहे त्याप्रमाणे कडक माकुळ घ्यायचे. डोके आणि धड एकत्र असले पाहीजे.
दक्षिणा कधी करणार आहेस ? मी येते हव तर मदतीला, अग लिबु पिळल्यामुळे जो माश्यांना वास येतो तो कमी होतो.
मी तो पहिला फोटो काढुन टाकु का ?
कुणी आयते दिले तर खाऊन बघेन
कुणी आयते दिले तर खाऊन बघेन पण घरी आणून करायचे तर माझा पास! स्टार्टर म्हणुन कॅलमारी आवडते रेस्टॉरंटमधली!
मासे खात नाही. पण ही भाजी
मासे खात नाही. पण ही भाजी दिसते अगदी झकास. ..
जागु .... मी कधी येऊ रहायला?
जागु .... मी कधी येऊ रहायला?
<<असो, कुकराला ४-५ शिट्ट्या
<<असो, कुकराला ४-५ शिट्ट्या द्यायच्या ना? आच छोटी की मोठी ठेऊन? << असं विचारतेय जसं उद्या करतेच
मी हा मासा कधी खाल्ला नाही. कुकर मध्ये शिजवण्याईतपत मासा घट्ट/ कडक असतो का? कारण बाकीचे मासे शिजायला जास्त वेळ लागत नाही. पण एकूण तोंपासु
जागु एकदम सही रेसिपी..
जागु एकदम सही रेसिपी.. शेवटचा फोटो तर तों.पा.सु.
खरच शहाळ्याचे तुकडे दिसतात
खरच शहाळ्याचे तुकडे दिसतात जणू.
स्क्विड!!!!!!!!!!!!!! एकदम
स्क्विड!!!!!!!!!!!!!! एकदम टेस्टी. फ्राय करुन तर एकदम मस्त लागतो.. तोंपासु..
शहाळ्याचे तुकडे दिसतात जणू.
शहाळ्याचे तुकडे दिसतात जणू. >> अगदी अगदी
जागुले मस्तच ग रेसिपी.. माझ्यासारख्यांना नावे पण नविनच
ए टवळ्यांनो एक दिवस असाही
ए टवळ्यांनो
एक दिवस असाही येईल की मी पण माश्यांच्या रेसिपीज करू शकेन.. हेहे
ह्याच्या आत एक पांढर्या
ह्याच्या आत एक पांढर्या रंगाची छोटी प्लेट असते का?
दक्षिणा, करु तर आताही शकशील.
दक्षिणा, करु तर आताही शकशील. पण खाऊ लागशील त्याचे काय ?
हा प्राणी मॉल्युस्का(स्क)
हा प्राणी मॉल्युस्का(स्क) फॅमिलीतला आहे का?
तो तयार पदार्थ ढोकळी सारखा दिसतेय जरा
तोंपासु......................
तोंपासु.......................
तोंपासु......................
तोंपासु......................
तोंपासु......................
तोंपासु......................
तोंपासु......................
शेवटचा फोटु एकदम टेम्टींग
शेवटचा फोटु एकदम टेम्टींग ....
आरतीऽऽ ! अगं लाळ टपकत
आरतीऽऽ ! अगं लाळ टपकत थेंबांच्या रेघा पण ओढल्यास?
जामोप्या, केश्वे... भाजी,
जामोप्या, केश्वे... भाजी, भाजी काय लावलय ? आमच्या मासळीचा घोर अपमान "कालवण " हा शब्द शिका बरं
केश्वे
केश्वे
मी मागे स्क्विड खाल्ले होते
मी मागे स्क्विड खाल्ले होते जपानमधे पण फारसे आवडले नव्हते. वातट लागतात म्हणुन. इथे मात्र जागु खोबर्यासारखे लागतात म्हणत आहे. परत एकदा खाऊन बघायला हव. बाकी जागु तु एक माश्याच्या पाककृती असे पुस्तकच प्रकाशित कर. जबरी खप होईल बघ.
केपी, तू जागूकडे जाऊनच खा.
केपी, तू जागूकडे जाऊनच खा. प्रत्येकाच्या करण्याची पद्धत वेगळी, हाताची चव वेगळी. खरोखर खोबर्यासारखं लागत असेल तिच्या हातचं.
तो तयार पदार्थ ढोकळी सारखा
तो तयार पदार्थ ढोकळी सारखा दिसतेय जरा >> अश्वे मी पण अगदी हेच म्हणणार होते.. पण म्हणलं या समस्त मासेखाऊंचा पापड मोडेल म्हणून आवरतं घेतलं.. पण तु लिहिल्यावर पार फुटुन हसले
दक्षे, त्यात काय पापड
दक्षे, त्यात काय पापड मोडायचा? सोयाचंक्सची भाजी मटणासारखी दिसते असं कुणी म्हटलं तर आपला पापड मोडतो का?
Pages