माकुल साफ करणे म्हणजे थोडे कठीणच काम असते. माखली दोन प्रकारच्या असतात नळ माखली आणि सर्या किंवा मणेर माखली. ही आहे नळ माखली. हिच्या वरती पातळशी साल असते ती काढून टाकायची म्हणजे लवकर शिजण्यास मदत होते. ही साल काढल्यावर अगदी शहाळ्यासारखी माखले दिसु लागतात.
ह्याचे डोके आणि शरीर हाताने सहज वेगळे होते. ते वेगळे करुन घ्यायचे. मग त्याच्या डोक्याच्या भागाला चिकटून काळसर भाग येतो तो काढुन टाकायचा आणि बाकीचा डोक्याचा चांगला भाग म्हणजे शेपट्या आणि मांसल भाग कापुन घ्यायचा.
आता माकुलचा दुसरा भाग नळी सारखाच असतो म्हणुनच त्याला नळ माखुल म्हणत असतील. तो मधुन चिरुन घ्यायचा. चिरल्यावर त्यात एक प्लास्टीकच्या तुकड्यासारखा सरळ भाग निघतो. ते बहुतेक त्याचे हाड असेल. ते काढुन टाकायचे. उजव्या बाजुच्या माखलीत तो भाग मध्ये आहे.
माखलीचे तुम्हाला आवडतील त्या शेपचे तुकडे करुन घ्या. अगदी फुला पानांच्या, कार्टूनच्या आकाराची कापलीत तरी चालेल. मी बाबा चौकोनी तुकडे केलेत.
वातताहेत ना शहाळ्याचे तुकडे ? खाताना खोबर्यासारखी वाटते.
ह्या तुकड्यांना आता आल,लसुण्,मिरची, कोथिंबिरच वाटण लावा. हवा असल्यास लिंबु पिळा थोडा. मी पिळते नेहमी त्यामुळे वईसपणा कमी होतो असे मला वाटते.
आता झाले सोप्पे काम, करा सुरुवात कुकर घेतलेत तर अजुनच सोप्पी होते माखलीची रेसिपी. ही शिजायला वेळ लागतो मटणासारखा म्हणुन मी नेहमी कुकरलाच लावते.
कुकरमध्ये तेलावर लसुणाची खमंग फोडणी द्या व त्यावर कांदा गुलाबी रंगावर तळा मग त्यात हिंग, हळद, मसाला घाला.
कुकरमध्ये काढलेला फोटो. फोटो वर जाउ नका रंग कसा दिसतो ते सांगा.
त्या मिश्रणावर आता बाकीचे जिन्नस म्हणजे माखलीचे तुकडे, कांदा-खोबर्याचे वाटण, गरम मसाला, मिठ, हवा असल्यास चिंचेचा कोळ (लिंबु घातला असेल तर गरज नाही ह्याची घातलाच तर अगदी थोडा घाला नाहीतर चव जाईल माखलीची) जर रस्सा करायचा असेल तर थोडेसे पाणी घाला जास्त घालु नका कारण माखलीचे पाणी निघते शिजल्यावर. आता हे सगळे मिश्रण ढवळून घ्या.
कुकरचे झाकण लावुन ४ ते ५ शिट्ट्या घ्या व गॅस बंद करा. झाली माखली.
माखुल शक्यतो कोळणीकडूनच साफ करुन घ्या. खास तुम्हाला दाखवण्यासाठी मी घरी आणुन साफ केलेय.
कडक असतील अश्याच माखुल घ्या. त्या ताज्या असतात.
हे तळूनच छान लागतात. calamari
हे तळूनच छान लागतात. calamari अहाहा.
दक्षे, अश्वे
दक्षे, अश्वे
ह्म्म. हा मासा मला एकदा
ह्म्म. हा मासा मला एकदा शेजारणीने खायला घातलेला.. यक्क्क्क.. मी गुपचुप फेकून दिलेला
जागुने चांगला लागतोय म्हटल्यावर जरा डगमगीत झाल्यासारखे वाटले. आणुन बघावे काय एकदा? मला तर त्याला बघुनच गिळगिळीत वाटते. मला वाटते एकदा आणुन कालवण करण्यापेक्षा रिंग्स कापुन तळावा.
कसला मस्तय गं जागू! आता मला
कसला मस्तय गं जागू! आता मला बोलावच राहायला. हवंतर मामी आणि मी आळीपाळीने येतो.
कलामरी आणि स्क्वीड एकच असतं
कलामरी आणि स्क्वीड एकच असतं का? ...आणि ते म्हणजे हेच का? ... मूळ प्राणी दिसायला काहितरीच आहे. पण कलामरी फ्राय मी अगदी चापून खाते ....
कालवण सुंदर दिसत आहे . मस्त पा.क्रु. जागो.
कलामारी हे इटालियन नाव आहे,
कलामारी हे इटालियन नाव आहे, इंग्रजीत स्क्विड म्हणतात.
लव्हबर्ड्सना देतात ती समुद्रजीभ म्हणजे सेपिया/ उर्फ कटलफिश नावाच्या मॉलस्क मधली असते.
साधना तुझ्या शेजार्यांनी
साधना तुझ्या शेजार्यांनी शिळी माखुल वगैरे आणली असेल चुकुन. तु माझ्याकडे ये खायला. अग मटणाला हा दुसरा पर्याय आहे.
कोमल तु आणि मामी कधी येताय ?
जागु.. हे स्क्विड्स
जागु.. हे स्क्विड्स ना??
आजपर्यन्त मराठी रेसिपी ऐकलीच नव्हती ..मस्त ..लाल्लाल रस्सा.. तुझ्याकडच्या मसाल्याचा वास तोंपासु वास येतोय इथपर्यन्त ..स्लर्प!!!
मी आजतागायत स्क्विड्स च्या चकत्या तळून करत होते.. पण नीट टेंपरेचर नसेल रबरी व्ह्यायची भीती असते..
आता ही रेसिपी करून पाहीन्..पण तुझा मसाला कुठून आणू..
जागु ताई ,तुमच्या घरच्यान्चि
जागु ताई ,तुमच्या घरच्यान्चि मज्जाच होत असेल नाहि ?
जागू एक मत्स्यजत्रा भरव
जागू एक मत्स्यजत्रा भरव बघू
ईटस टू स्क्विडीश
मी एकदाच हे आणून कोळिणीने
मी एकदाच हे आणून कोळिणीने सांगितल्याप्रमाणे करायचा प्रयत्न केला होता; साफ फसला होता तो !
जागूजींच नांव घेऊन पुन्हा नक्की यशस्वी प्रयत्न करणार .
<< जागू एक मत्स्यजत्रा भरव बघू >> अनुमोदन !
माय डँम्म डँम्म डँम्म
माय डँम्म डँम्म डँम्म डँम्म फेव्हरीट...........
मुव्हाआआआ.........
जियो जागु.
मला तर तु अस्सल कोळिन वाटतेयस................?
जागू, हा साफ करताना शाईसारखा
जागू, हा साफ करताना शाईसारखा द्रव मिळतो का आत ?
हो अमित साफ करताना काळपट द्रव
हो अमित साफ करताना काळपट द्रव बाहेर येतो.
तृष्णा मी कोळीण नाही
जागु, याच पद्धतीने दुसरे
जागु, याच पद्धतीने दुसरे कोणते मासे वापरुन हे कालवण करता येईल? यात तू फोडणीसाठी किती कांदा वापरलास? तुला मोरी चे कालवण कसे करतात ते माहित आहे का? माझी एक मैत्रिण आणायची. ते कालवण पण मटणा सारखेच लागायचे.
विद्या दोन कांदे फोडणीला व एक
विद्या दोन कांदे फोडणीला व एक कांदा वाटणाला.
मोरीचे कालवणही वरच्या पद्धतीने करतात.
मोरीला इंग्रजीत काय
मोरीला इंग्रजीत काय म्हणतात...मागे मुंबईत एका मालवणी रेस्ट्~ओरंटमध्ये ट्राय केला..मस्त लागतो....उसात मिळेल का?
जागु माझ्या नवर्^याला कलामारी फार आवडते..तू इतकं डिटेलवार लिहिलंस तर कदाचीत करून पाहीन....चायनीज दुकानात हा पाहिलाय मी पण अजून कधी घेतला नाहीये....
मोरी म्हणजे शार्क ना? तो
मोरी म्हणजे शार्क ना? तो दुर्मिळ असतो म्हणे मग भारतात सर्रास कसा काय मिळतो?
जागुचे सगळेच मासे तोंपासु
जागुचे सगळेच मासे तोंपासु असतात .
मोरी म्हणजे शार्क ना? >>> हायला ! तुम्ही शार्क खाता ? !!
वेका इथे मोरीला मुशी म्हणतात.
वेका इथे मोरीला मुशी म्हणतात. शार्कच तो. कलमारी म्हणजे कोणता मासा? फोटो दाखवशील का गुगलवर सर्च करुन?
मोरी म्हणजे शार्क ना? तो
मोरी म्हणजे शार्क ना? तो दुर्मिळ असतो म्हणे मग भारतात सर्रास कसा काय मिळतो?
मोरी, मुशी म्हणजे बेबी शार्क. कुठे दुर्मिळ आहे, इथे भरपुर मिळतो. त्याचा मसालाही सेम वरच्यासारखा खोबरे भाजुन करायचा. मालवणी माणसे सुके खोबरे जास्त वापरत नाहीत, ओल्या खोब-याचाच वापर जास्त होतो. ओल्या आणि सुक्या खोब-याच्या चवीत खुप फरक पडतो. मोरीचे कालवण म्हणजे स्वर्गसुख..... तसे सगळेच मासे म्हणजे स्वर्गसुख पण त्यातल्या त्यात मोरीचे कालवण, तळलेली कर्ली, बांगड्याचे तिखले इ.इ. गोष्टी जास्त भावखाऊ
मुशीची बुर्जी करते माझी
मुशीची बुर्जी करते माझी मम्मा. काय लागते सांगु..................?
नुसती खातच रहाविशी वाटते. तांदळाची भाकरी आणि मुशीची बुर्जी. कीतीही खाल्ली तरी कमीच.
तृष्णा तू बुरजी म्हणतेस
तृष्णा तू बुरजी म्हणतेस त्याला कदाचीत आमच्याइथे खिमा म्हणत असतील. मुशीचा खिमाही मटणाप्रमाणे करतात.
साधना
छान रेसिपी. बरीच वर्ष झाली
छान रेसिपी. बरीच वर्ष झाली माखल्या खाउन.
जागु, ह्या नळ/नल माखली
जागु, ह्या नळ/नल माखली (माखुल) चे कलामारी हे इटालियन नाव आहे, इंग्रजीत त्याला स्क्विड म्हणतात....वर मेधा ने लिहीले आहे.
सस्मित धन्स. विद्याक बर झाल
सस्मित धन्स.
विद्याक बर झाल सांगितलस नाहितर आता मी कलामारीच्या शोधात राहीले असते.
विद्याक बर झाल सांगितलस
विद्याक बर झाल सांगितलस नाहितर आता मी कलामारीच्या शोधात राहीले असते. >>>>>>> अगं मी पण
गोव्यात या माशाला माणके
गोव्यात या माशाला माणके म्हणतात. माणकेचिली नावाचा पदार्थ इथल्या हॉटेलात मिळतो. हा मासा वापरुन चिकन चिली प्रमाणे बनवतात. ते पण छान लागते.
माकुळ.....वॉव......हे तर माझ
माकुळ.....वॉव......हे तर माझ फेव्हरेट...साफ नाही करता येत अजुन पण बनवता येतं...पद्धत हीच..पण आय अॅम शुअर जागु दी ची टेस्ट जबराट असणार..
सुकी माखली खाल्ली आहे का कोणी....ऑसम, अप्रतीम, सुंदर, चविष्ट अजुन काय काय म्हणु शकाल ते म्हणा.......
पण शिजवताना अती उग्र वास सहन करावा लागतो.... पण सुक्या माखलीच्या कालवणापुढे तो वास नल्ला......
अनु अलिबागला मिळेल का सुकी
अनु अलिबागला मिळेल का सुकी माखली?
प्रिया हॉटेलमध्ये जे क्रिस्पी चिकन मिळत ना मला त्याची चव नेहमी माखली सारखीच लागते.
Pages