मासे २९) नळ/नल माखली (माखुल)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 17 May, 2011 - 07:09
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

माखली

लसुण ४-५ पाकळ्या ठेचुन
आल-लसुण, मिरची, कोथिंबीर पेस्ट
हिंग, हळद
मसाला
सुके खोबरे व कांदा भाजुन केलेले वाटण
मिठ
गरम मसाला अर्धा चमचा
तेल
लिंबु किंवा चिंच (ऑप्शनल)

क्रमवार पाककृती: 

माकुल साफ करणे म्हणजे थोडे कठीणच काम असते. माखली दोन प्रकारच्या असतात नळ माखली आणि सर्‍या किंवा मणेर माखली. ही आहे नळ माखली. हिच्या वरती पातळशी साल असते ती काढून टाकायची म्हणजे लवकर शिजण्यास मदत होते. ही साल काढल्यावर अगदी शहाळ्यासारखी माखले दिसु लागतात.

ह्याचे डोके आणि शरीर हाताने सहज वेगळे होते. ते वेगळे करुन घ्यायचे. मग त्याच्या डोक्याच्या भागाला चिकटून काळसर भाग येतो तो काढुन टाकायचा आणि बाकीचा डोक्याचा चांगला भाग म्हणजे शेपट्या आणि मांसल भाग कापुन घ्यायचा.

आता माकुलचा दुसरा भाग नळी सारखाच असतो म्हणुनच त्याला नळ माखुल म्हणत असतील. तो मधुन चिरुन घ्यायचा. चिरल्यावर त्यात एक प्लास्टीकच्या तुकड्यासारखा सरळ भाग निघतो. ते बहुतेक त्याचे हाड असेल. ते काढुन टाकायचे. उजव्या बाजुच्या माखलीत तो भाग मध्ये आहे.

माखलीचे तुम्हाला आवडतील त्या शेपचे तुकडे करुन घ्या. अगदी फुला पानांच्या, कार्टूनच्या आकाराची कापलीत तरी चालेल. मी बाबा चौकोनी तुकडे केलेत.

वातताहेत ना शहाळ्याचे तुकडे ? खाताना खोबर्‍यासारखी वाटते.

ह्या तुकड्यांना आता आल,लसुण्,मिरची, कोथिंबिरच वाटण लावा. हवा असल्यास लिंबु पिळा थोडा. मी पिळते नेहमी त्यामुळे वईसपणा कमी होतो असे मला वाटते.

आता झाले सोप्पे काम, करा सुरुवात कुकर घेतलेत तर अजुनच सोप्पी होते माखलीची रेसिपी. ही शिजायला वेळ लागतो मटणासारखा म्हणुन मी नेहमी कुकरलाच लावते.

कुकरमध्ये तेलावर लसुणाची खमंग फोडणी द्या व त्यावर कांदा गुलाबी रंगावर तळा मग त्यात हिंग, हळद, मसाला घाला.
कुकरमध्ये काढलेला फोटो. फोटो वर जाउ नका रंग कसा दिसतो ते सांगा.

त्या मिश्रणावर आता बाकीचे जिन्नस म्हणजे माखलीचे तुकडे, कांदा-खोबर्‍याचे वाटण, गरम मसाला, मिठ, हवा असल्यास चिंचेचा कोळ (लिंबु घातला असेल तर गरज नाही ह्याची घातलाच तर अगदी थोडा घाला नाहीतर चव जाईल माखलीची) जर रस्सा करायचा असेल तर थोडेसे पाणी घाला जास्त घालु नका कारण माखलीचे पाणी निघते शिजल्यावर. आता हे सगळे मिश्रण ढवळून घ्या.

कुकरचे झाकण लावुन ४ ते ५ शिट्ट्या घ्या व गॅस बंद करा. झाली माखली.

कशी झालेय ? नविन मसाल्याची केलेय.

वाढणी/प्रमाण: 
लहानमुलांना खुप आवडते.
अधिक टिपा: 

माखुल शक्यतो कोळणीकडूनच साफ करुन घ्या. खास तुम्हाला दाखवण्यासाठी मी घरी आणुन साफ केलेय.

कडक असतील अश्याच माखुल घ्या. त्या ताज्या असतात.

माहितीचा स्रोत: 
आई व कोळीणीकडून अर्धी माहीती.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओके.

Pages