मासे २९) नळ/नल माखली (माखुल)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 17 May, 2011 - 07:09
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

माखली

लसुण ४-५ पाकळ्या ठेचुन
आल-लसुण, मिरची, कोथिंबीर पेस्ट
हिंग, हळद
मसाला
सुके खोबरे व कांदा भाजुन केलेले वाटण
मिठ
गरम मसाला अर्धा चमचा
तेल
लिंबु किंवा चिंच (ऑप्शनल)

क्रमवार पाककृती: 

माकुल साफ करणे म्हणजे थोडे कठीणच काम असते. माखली दोन प्रकारच्या असतात नळ माखली आणि सर्‍या किंवा मणेर माखली. ही आहे नळ माखली. हिच्या वरती पातळशी साल असते ती काढून टाकायची म्हणजे लवकर शिजण्यास मदत होते. ही साल काढल्यावर अगदी शहाळ्यासारखी माखले दिसु लागतात.

ह्याचे डोके आणि शरीर हाताने सहज वेगळे होते. ते वेगळे करुन घ्यायचे. मग त्याच्या डोक्याच्या भागाला चिकटून काळसर भाग येतो तो काढुन टाकायचा आणि बाकीचा डोक्याचा चांगला भाग म्हणजे शेपट्या आणि मांसल भाग कापुन घ्यायचा.

आता माकुलचा दुसरा भाग नळी सारखाच असतो म्हणुनच त्याला नळ माखुल म्हणत असतील. तो मधुन चिरुन घ्यायचा. चिरल्यावर त्यात एक प्लास्टीकच्या तुकड्यासारखा सरळ भाग निघतो. ते बहुतेक त्याचे हाड असेल. ते काढुन टाकायचे. उजव्या बाजुच्या माखलीत तो भाग मध्ये आहे.

माखलीचे तुम्हाला आवडतील त्या शेपचे तुकडे करुन घ्या. अगदी फुला पानांच्या, कार्टूनच्या आकाराची कापलीत तरी चालेल. मी बाबा चौकोनी तुकडे केलेत.

वातताहेत ना शहाळ्याचे तुकडे ? खाताना खोबर्‍यासारखी वाटते.

ह्या तुकड्यांना आता आल,लसुण्,मिरची, कोथिंबिरच वाटण लावा. हवा असल्यास लिंबु पिळा थोडा. मी पिळते नेहमी त्यामुळे वईसपणा कमी होतो असे मला वाटते.

आता झाले सोप्पे काम, करा सुरुवात कुकर घेतलेत तर अजुनच सोप्पी होते माखलीची रेसिपी. ही शिजायला वेळ लागतो मटणासारखा म्हणुन मी नेहमी कुकरलाच लावते.

कुकरमध्ये तेलावर लसुणाची खमंग फोडणी द्या व त्यावर कांदा गुलाबी रंगावर तळा मग त्यात हिंग, हळद, मसाला घाला.
कुकरमध्ये काढलेला फोटो. फोटो वर जाउ नका रंग कसा दिसतो ते सांगा.

त्या मिश्रणावर आता बाकीचे जिन्नस म्हणजे माखलीचे तुकडे, कांदा-खोबर्‍याचे वाटण, गरम मसाला, मिठ, हवा असल्यास चिंचेचा कोळ (लिंबु घातला असेल तर गरज नाही ह्याची घातलाच तर अगदी थोडा घाला नाहीतर चव जाईल माखलीची) जर रस्सा करायचा असेल तर थोडेसे पाणी घाला जास्त घालु नका कारण माखलीचे पाणी निघते शिजल्यावर. आता हे सगळे मिश्रण ढवळून घ्या.

कुकरचे झाकण लावुन ४ ते ५ शिट्ट्या घ्या व गॅस बंद करा. झाली माखली.

कशी झालेय ? नविन मसाल्याची केलेय.

वाढणी/प्रमाण: 
लहानमुलांना खुप आवडते.
अधिक टिपा: 

माखुल शक्यतो कोळणीकडूनच साफ करुन घ्या. खास तुम्हाला दाखवण्यासाठी मी घरी आणुन साफ केलेय.

कडक असतील अश्याच माखुल घ्या. त्या ताज्या असतात.

माहितीचा स्रोत: 
आई व कोळीणीकडून अर्धी माहीती.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शेवटचा फोटो मस्तच ... Happy
जागूताई माश्यांच्या सिरीजमधल्या माशांपैकी खर सांगू मला हया सिरीजचा पहिला फोटो खरच आवडला नाही. शेवटचा फोटो बघून खाण्याची ईच्छा झाली हे मात्र नक्की

हाच मासा म्हणत होतो मी. याच्याच अंगात ती कडक "पाठ" असते. त्यात भरपूर कॅल्शियम असतो. लव्ह बर्ड्स आवडीने खातात. गोव्यात या नळीसारख्या भागाच्या गोल चकत्या करुन तळतात (स्क्वीड फ्राय).

जुई चुकुन झालय. बदलते. आणि आपल्याला जे रोज खातो तेच बघण्याची सवय असते त्यामुळे वेगळे मासे पाहीले की विचित्र वाटत हे खर आहे. पण त्यांच रुप न पाहता गुण पाहायचे.

जागुले, जुई शी सहमत... पहिल फोटो पाहून इच्छा नाही होत, पण शेवटचा फोटो अगदी छान.. Happy निदान पदार्थ दिसतोय तरी मस्तच..
असो, कुकराला ४-५ शिट्ट्या द्यायच्या ना? आच छोटी की मोठी ठेऊन? Uhoh

मी पिळते नेहमी त्यामुळे वईसपणा कमी होतो >> वईसपणा म्हणजे काय? Uhoh

योगेश मी अधिक टिप्स मध्ये लिहीले आहे त्याप्रमाणे कडक माकुळ घ्यायचे. डोके आणि धड एकत्र असले पाहीजे.

दक्षिणा कधी करणार आहेस ? मी येते हव तर मदतीला, अग लिबु पिळल्यामुळे जो माश्यांना वास येतो तो कमी होतो.

मी तो पहिला फोटो काढुन टाकु का ?

कुणी आयते दिले तर खाऊन बघेन पण घरी आणून करायचे तर माझा पास! स्टार्टर म्हणुन कॅलमारी आवडते रेस्टॉरंटमधली!

<<असो, कुकराला ४-५ शिट्ट्या द्यायच्या ना? आच छोटी की मोठी ठेऊन? << असं विचारतेय जसं उद्या करतेच Proud Lol

मी हा मासा कधी खाल्ला नाही. कुकर मध्ये शिजवण्याईतपत मासा घट्ट/ कडक असतो का? कारण बाकीचे मासे शिजायला जास्त वेळ लागत नाही. पण एकूण तोंपासु Happy

स्क्विड!!!!!!!!!!!!!! एकदम टेस्टी. फ्राय करुन तर एकदम मस्त लागतो.. तोंपासु.. Happy

तोंपासु.......................
तोंपासु......................
तोंपासु......................
तोंपासु......................
तोंपासु......................
तोंपासु......................
Proud

जामोप्या, केश्वे... भाजी, भाजी काय लावलय ? आमच्या मासळीचा घोर अपमान Angry "कालवण " हा शब्द शिका बरं Proud

मी मागे स्क्विड खाल्ले होते जपानमधे पण फारसे आवडले नव्हते. वातट लागतात म्हणुन. इथे मात्र जागु खोबर्‍यासारखे लागतात म्हणत आहे. परत एकदा खाऊन बघायला हव. Happy बाकी जागु तु एक माश्याच्या पाककृती असे पुस्तकच प्रकाशित कर. जबरी खप होईल बघ.

केपी, तू जागूकडे जाऊनच खा. प्रत्येकाच्या करण्याची पद्धत वेगळी, हाताची चव वेगळी. खरोखर खोबर्‍यासारखं लागत असेल तिच्या हातचं.

तो तयार पदार्थ ढोकळी सारखा दिसतेय जरा >> अश्वे मी पण अगदी हेच म्हणणार होते.. Rofl पण म्हणलं या समस्त मासेखाऊंचा पापड मोडेल म्हणून आवरतं घेतलं.. पण तु लिहिल्यावर पार फुटुन हसले Lol

दक्षे, त्यात काय पापड मोडायचा? सोयाचंक्सची भाजी मटणासारखी दिसते असं कुणी म्हटलं तर आपला पापड मोडतो का? Happy

Pages