Submitted by अंजली on 22 December, 2010 - 11:18
ठिकाण/पत्ता:
कॅरी, नॉर्थ कॅरोलिना
वासंतिक कल्लोळ २०११
१३-१४-१५ मे २०११
नॉर्थ कॅरोलिना
परंपरा बरं का परंपरा.... मायबोलीवर परंपरेला असाधारण महत्व आहे. गणेशोत्सव परंपरा, दिवाळी अंक परंपरा, वर्षाविहार परंपरा, एठिएवे परंपरा, अमुकतमुक उपक्रम परंपरा वगैरे. इतकंच काय इथे होणार्या भांडणं-वादांना पण परंपरा आहे.
तर अशा मायबोली परंपरेला अनुसुरून २०११ च्या वासंतिक कल्लोळाची परंपरा पुढे चालवायची जबाबदारी यावर्षी नॉर्थ कॅरोलिनाने घेतली आहे. सर्व मायबोलीकरांना आग्रहाचे आमंत्रण.
कार्यक्रमाची रूपरेषा येणार्या लोकांच्या सूचनेनुसार ठरवता येईल. आमच्या छोट्याशा गावात पहाण्यासारखं फारसं काही नाही, पण इथून बीचवर एखादा दिवस किंवा Smokey Mountains ला एखादा दिवस जाता येईल.
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शुक्रवार, May 13, 2011 - 18:00 to रविवार, May 15, 2011 - 17:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मेन्यू एकदम जबरी
मेन्यू एकदम जबरी

वॄत्तांतांची वाट पाहते आहे
अरे वा कल्लोळकरांनी सकाळी
अरे वा कल्लोळकरांनी सकाळी ब्रेकफास्ट केला तर
सिंडी, सांबारासाठीच्या भाज्या
सिंडी, सांबारासाठीच्या भाज्या सकाळी ताज्या तोडून आणल्या शेतातून. ईबांनी भाज्या निवडून, चिरून लगेच सांबाराची तयारी केली....चट्णीसाठी बुवांनी माडावरून नारळ उतरवला, मग अंजलीच्या मालकांनी तो एका घावेत फोडून दिला. शोनूने तत्परतेने विळीवर नारळ खवून दिला. अंजलीने मग पाट्यावर चटणी वाटली!!
अंजलीने मग पाट्यावर चटणी
अंजलीने मग पाट्यावर चटणी वाटली!! >>> आणि पन्नाने त्या चटणीवर शेजारच्या गोठातल्या गायीचं आदल्या दिवशी दूध तापवून काढलेल्या सायीचं विरजण लावून काढलेलं लोणी कढवून केलेल्या तुपाची फोडणी दिली
दुपारच्या जेवणाचे, मटण कबाब,
दुपारच्या जेवणाचे, मटण कबाब, व्हेज कबाब, जिलबी, मोहनानं आणलेले स्वीट, योगीने आणलेले केक यांचे फोटो काढायचे राहून गेले..
>>> अरेरे.. काय हे... खाण्याच्या नादात लक्ष्यातच नाही राहिले वाटते...
बुवांनां फक्त पनीर टिक्का
बुवांनां फक्त पनीर टिक्का आवडला .. चिकन नाही का? (टेंडरायजर राहिला की पाण्याची वाटी?) :p
असो, फोटो मस्त आहेत!
बुवा, सशलला उत्तर द्या .
बुवा, सशलला उत्तर द्या :फिदी:.
धमाल केलेली दिसतेच आहे गटगला!
धमाल केलेली दिसतेच आहे गटगला!
मेनू झकास!
पदार्थ सगळेच अप्रतिम होते. चव
पदार्थ सगळेच अप्रतिम होते. चव नेमकी मुरलेली, नेमके शिजलेले (कच्चट चामट नाहीत / लगदा नाही), सुवासिक सुग्रास तलम रेशमी अलवार इ.इ. - मला वर्णनसुद्धा करता येणार नाही याहून नीट.
सकाळी नाश्त्याला इडली, सांबार, चटणी. (सांबार मसाला कुठला वापरला ते विचारायचं राहिलं. अंजली?)
(बाराकर वेळेत :P) आल्याचा चहा, मंगळुरी कॉफी.
अॅपेटायझर्स : पनीर टिक्का, तंदूरी चिकन, मटन कबाब, व्हेज कटलेट्स, आईस्क्रीम सोडा (आदित्यचा स्वर्ग!), मोहितो आणि मार्गरिटाज (या व्हर्जिनच होत्या असं मला अजूनही वाटतंय. :P)
लंच : चिकन करी, व्हेज बिर्याणी, दहीवडे, कॉर्न(चं काय म्हणायचं ते?), पो़ळ्या.

डेजर्ट : चॉकलेट केक (आदित्यचा दुसरा स्वर्ग! - हा त्याने मागून आणला परतीसाठी.)
जिलबी!
डेजर्ट (सौजन्य : मोहना) : पाइनॅपल कुलदीप
डिनर (सौजन्य : मधुरिमा) : मुडाखि / तूडाखि, वरून घ्यायला लाल मिरच्यांची फोडणी, फोडणीचं ताक, पापड, काकडीचं सॅलड (पुरुषवर्गाला कदाचित हे होतं हे माहिती नसेल! :P), कच्चा कांदा / शेव, आणि भरभक्कम 'डावी बाजू'! (कैरी कांदा लोणचं, लिंबाचं आंबटगोड लोणचं, तिळकूट, कढीपत्त्याची चटणी, इ.इ.इ.इ.)
सगळी लोणची / चटण्या अ-मे-झिंग होत्या!! मधुरिमा भलतीच 'डाव्या विचारसरणीची' आहे!
डेजर्ट : मिक्स फ्रूट कुलदीप
रविवार सकाळ :
आदित्यच्या फर्माइशीला मान देऊन ऑम्लेट, ब्रेड, चहा
परतीच्या प्रवासासाठी शिदोरी :
मेथीचे ठेपले, अंजलीचं घरचं अफलातून लोणचं, दही, खारे शंकरपाळे, बाकरवड्या,
क्विक टी च्या पुड्या, आणि......
(अंजलीला साष्टांग नमस्कार घालत....) त्या नीट उघडता येत नाहीत म्हणून कात्री!!!!!!
याला म्हणतात हे!!
काही पाहुणे रविवारी लंचलाही होते. त्यांनी तो ही मेनू लिहावा अशी नम्र विनंती!
सांबार मसाला घरी केलेला
सांबार मसाला घरी केलेला होता.
चिकन टिक्का (च ना? की काही निराळं नाव आहे?)>>> तंदूरी चिकन.
मोहितो आणी मार्गारीटाज: बुवा आणि संजय जबाबदार होते. त्यांनी काय घोळ घातले माहित नाही ;).
फोटो मस्त. चवही छानच असणार.
फोटो मस्त. चवही छानच असणार.
स्वाती, तंदूरी चिकन होतं ते
स्वाती, तंदूरी चिकन होतं ते
सगळ्यातच लहान मुलांची सोय एकदम झकास होती. तंदूरी चिकन आणि चिकन रस्सा कमी तिखटाचा वेगळा काढलेला होता. आईस्क्रिम सोडा स्वाती म्हणते तसा स्वर्ग होता (अंजली, रेयोजाटा). आणि ते चॉकलेट कप केक्स पण सॉलिड होते असा रिपोर्ट आहे. (ह्याची पण रेसिपी कळवणे)
रात्रीच्या जेवणात काकडी आणि विविध लोणची, चटण्या हिट ठरल्या!!!
सगळच आवडलं पण पनीर सगळ्यात
सगळच आवडलं पण पनीर सगळ्यात जास्त! सहसा कुठेही पनीर टिक्का खालला की त्याला चव नसते (खराब अशा अर्थानी नाही पण मुळात पनीरला चव नसते त्यामुळे). ह्या पनीर टिक्का वेगळी चव होती. चिक्न तंदुरी, मटण कबाबही भारीच!
(या व्हर्जिनच होत्या असं मला अजूनही वाटतंय. )>>>> अहो, सकाळी इडली चटणी, सांबार मग लाडू आणि नंतर सगळे ग्रीलचे आयटम खालल्यावर मार्गारिटा आणि मोहितो वर्जिनच लागणार!
मोहितो आणी मार्गारीटाज: बुवा
मोहितो आणी मार्गारीटाज: बुवा आणि संजय जबाबदार होते. त्यांनी काय घोळ घातले माहित नाही
<<< स्वतः अर्क प्यायला, इतरांना फक्त ज्युस वाटप केला असणार.. (चो. च्या . हा. जा. कि. )
डिज्जे, तेच ड्रिंक सकाळी चहा
डिज्जे, तेच ड्रिंक सकाळी चहा ऐवेजी दिलं असतं ना तर एक्स्ट्रा स्ट्राँग वाटलं असतं.
अहाहा ! काय फोटो आहेत.
अहाहा ! काय फोटो आहेत.
बाई, लंचची जिलबी विसरलात..
बाई, लंचची जिलबी विसरलात.. अंजली बाईंना आग्रहाची वाढली नाहीस का?
पनीर टिक्क्याची रेस्पी टाका
पनीर टिक्क्याची रेस्पी टाका होस्टिणबाई.
हा "कुलदीप" प्रकार काय
हा "कुलदीप" प्रकार काय असतो?
(नावावरून DDLJ मधला परमीत सेठी आठवला .. "ओय कुलदीपे"!)
>> बाई, लंचची जिलबी विसरलात..
>> आता स्वाती चौथ्यांदा एडिट करेल .. :p
पन्नाने आणलेले लाडू आणि मावा
पन्नाने आणलेले लाडू आणि मावा कपकेक!
ऑम्लेट, टोस्ट. कचोरी, चकली, चहा, कॉफी - हा दुसर्या दिवशीचा ब्रेफा.
हो हो जिलबी! अगं, इतक्या
हो हो जिलबी! अगं, इतक्या पदार्थांत विसरूनच गेले.
पन्नाने प्रवासात भूकलाडू म्हणून आणलेले रव्याखोबर्याचे लाडूही हिट्ट होते एक्दम!
शोनूला हाणलं पाहिजे! सगळ्यात
शोनूला हाणलं पाहिजे! सगळ्यात जास्त फोटो तिच्याच कॅमेर्यात आहेत!
आता स्वाती चौथ्यांदा एडिट
आता स्वाती चौथ्यांदा एडिट करेल .. >> सशल, अजून दुसर्या दिवशीचा ब्रेकफास्ट आणि लंचचे मेन्यू बाकी आहेत
सशल, करावं लागतं. कॉम्पिटिशन
सशल, करावं लागतं. कॉम्पिटिशन वाढली आहे.
कुलदीपचा उच्चार सामान्य लोक कूल व्हिप असा करतात.

रेसिपी अंजलीनेच जुन्या मायबोलीत दिली होती असं ती म्हणाली, तेव्हा तिला लाप्या वाजवा.
कुल दिप म्हणजे पायनॅपल चे काप
कुल दिप म्हणजे पायनॅपल चे काप आणि व्हिप्ड क्रीम यांचे अल्टरनेट लेअर्स. म्हणजे इथे बर्याच पार्टीत तरी तसाच पदार्थ पाहिलाय मी तरी. बरोबर का बाई , अंजली?
बाई , आता शेवटपर्यंत हेच पोस्ट एडीट करणार बहुदा.
चॉकलेट केक योगीने आणले होते.
चॉकलेट केक योगीने आणले होते. त्याच्याबरोबर कुकीज (योगी, कुठल्या ते सांग रे) देखिल होत्या. या सगळ्या गडबडीत लालूने आणलेल्या व्हर्जिनियाच्या वाईन्स ओपन करायच्या राहिल्या. तसंच पन्नानं आणलेले रव्याचे ओला नारळ घालून केलेले लाडू (माझा स्वर्ग!) देखिल होते.
परतीच्या वाटेत खायला ठेपले,
परतीच्या वाटेत खायला ठेपले, दही , लोणचं , शंकरपाळी, बाखरवड्या होतं अंजलीने दिलेलं.
रव्या खोबर्याचे लाडू अन मावा केक दोन्ही यम्मी
शोनू काल जेवणं आवरल्यावर बारक्याला पुस्तक वाचून दाखवता दाखवता झोपून गेली
फोटो संध्याकाळी टाकते
तीच तीच एडिटलेली पोस्ट
तीच तीच एडिटलेली पोस्ट वाचायला लागू नये म्हणून पुन्हा एकदा :
(ही एडिट होणार नाही याची हमी देता येत नाही! :P)
पदार्थ सगळेच अप्रतिम होते. चव नेमकी मुरलेली, नेमके शिजलेले (कच्चट चामट नाहीत / लगदा नाही), सुवासिक सुग्रास तलम रेशमी अलवार इ.इ. - मला वर्णनसुद्धा करता येणार नाही याहून नीट.
सकाळी नाश्त्याला इडली, सांबार, चटणी. (सांबार मसाला कुठला वापरला ते विचारायचं राहिलं. अंजली?)
(बाराकर वेळेत :P) आल्याचा चहा, मंगळुरी कॉफी.
अॅपेटायझर्स : पनीर टिक्का, तंदूरी चिकन, मटन कबाब, व्हेज कटलेट्स, आईस्क्रीम सोडा (आदित्यचा स्वर्ग!), मोहितो आणि मार्गरिटाज (या व्हर्जिनच होत्या असं मला अजूनही वाटतंय. :P)
लंच : चिकन करी, व्हेज बिर्याणी, दहीवडे, कॉर्न(चं काय म्हणायचं ते?), पो़ळ्या.

डेजर्ट : चॉकलेट केक (आदित्यचा दुसरा स्वर्ग! - हा त्याने मागून आणला परतीसाठी.)
जिलबी!
डेजर्ट (सौजन्य : मोहना) : पाइनॅपल कुलदीप
डिनर (सौजन्य : मधुरिमा) : मुडाखि / तूडाखि, वरून घ्यायला लाल मिरच्यांची फोडणी, फोडणीचं ताक, पापड, काकडीचं सॅलड (पुरुषवर्गाला कदाचित हे होतं हे माहिती नसेल! :P), कच्चा कांदा / शेव, आणि भरभक्कम 'डावी बाजू'! (कैरी कांदा लोणचं, लिंबाचं आंबटगोड लोणचं, तिळकूट, कढीपत्त्याची चटणी, इ.इ.इ.इ.)
सगळी लोणची / चटण्या अ-मे-झिंग होत्या!! मधुरिमा भलतीच 'डाव्या विचारसरणीची' आहे!
डेजर्ट : मिक्स फ्रूट कुलदीप
रविवार सकाळ :
आदित्यच्या फर्माइशीला मान देऊन ऑम्लेट, ब्रेड, चहा
परतीच्या प्रवासासाठी शिदोरी :
मेथीचे ठेपले, अंजलीचं घरचं अफलातून लोणचं, दही, खारे शंकरपाळे, बाकरवड्या,
क्विक टी च्या पुड्या, आणि......
(अंजलीला साष्टांग नमस्कार घालत....) त्या नीट उघडता येत नाहीत म्हणून कात्री!!!!!!
याला म्हणतात हे!!
काही पाहुणे रविवारी लंचलाही होते. त्यांनी तो ही मेनू लिहावा अशी नम्र विनंती!
आपण येवढं सगळं हादडलं हे बघून
आपण येवढं सगळं हादडलं हे बघून जरा लाज वाटतेय आता.
डायट बियट सोडून फुल्ल ताव मारला. कुलदीप तर खुप खाललं मी.
रूनी, नितीन, लालू नितीनच्या
रूनी, नितीन, लालू नितीनच्या मित्राकडे जेवायला गेले. दुपारी वेबमास्तर होते जेवायला. आता ते मेन्यू टाकतील की नाही माहित नाही
भरली वांगी, चिंच-गुळाचं वरण, काकडीची कोशींबीर, लोणचं, दाण्याची चटणी, पोळ्या, भात.
Pages