Submitted by आनंदयात्री on 11 May, 2011 - 07:34
एकटेपणाच्या कैदेत कुढत असताना
पहिल्यांदाच जाणवला स्वत:च्या दु:खांचा काळागर्द परीघ -
दिवसांमागून दिवस गिळत
तुझ्यासोबत चक्रामध्ये मी फिरत असताना,
जो लाटेसारखा पायापाशी येऊन फुटायचा अधूनमधून!
पण त्यावेळी हे जाणवलं नाही की-
कधी ना कधी ह्या लाटा
आपल्याला एकट्यालाच पार करायच्या आहेत,
कारण -
शेवटी त्या आपल्या स्वत:च्या आहेत!
इतके दिवस तुझी सोबत होती मला
म्हणून कदाचित ते जाणवलं नसेल!
पण हे खरं नाहीये...
खरं हे आहे की, केंद्राशी इमान राखून
त्या चक्रात फिरतांना तळहातावर जपलेली दु:खं -
तुझी होती!
आणि तुझ्या दु:खांपुढे माझी दु:खं छोटी ठरली,
हे सत्य त्या परिघात शिरण्यापूर्वी
कोठडीच्या भिंतींवर कोरून आलोय मी..
- नचिकेत जोशी
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
(No subject)
ही कविता कधीच विसरणार नाही!!
ही कविता कधीच विसरणार नाही!! खूप वाचलो आहे
शॉल्लेट भाऊ !!
शॉल्लेट भाऊ !!
मस्तच जमलिये.. आशय खूप सुरेख
मस्तच जमलिये.. आशय खूप सुरेख आहे.
विशाल, दक्षिणा - thanks!!
विशाल, दक्षिणा - thanks!!
झाड,
मुक्ता,
gr8..
gr8..:)
झक्कास....!
झक्कास....!
नेत्रा, धनेष - धन्यवाद!!
नेत्रा, धनेष - धन्यवाद!!
व्वा ! नचिकेत सही लिहिलं आहेस
व्वा ! नचिकेत सही लिहिलं आहेस एकदम.
आवडली नचिकेत. मस्तच आहे एकदम.
आवडली नचिकेत. मस्तच आहे एकदम.
"तुझ्यासोबत चक्रामध्ये ….. ……
"तुझ्यासोबत चक्रामध्ये …..
…… शेवटी त्या आपल्या स्वत:च्या आहेत!"
.... खूप छान
!
!
नादखुळा, समीर, उल्हासकाका,
नादखुळा, समीर, उल्हासकाका, गिरीश, - धन्यवाद!
वा ! उल्हास, तुमच्या
वा !
उल्हास, तुमच्या वर्तुळाची आठवण झाली
धन्यवाद अवल!
धन्यवाद अवल!
व्वा गुरुदेव. सुंदर कविता
व्वा गुरुदेव. सुंदर कविता आहे. हा अनुभव घेतला आहे.
पण खुप छान.
व्वा ... खरच सुंदर..
व्वा ... खरच सुंदर..
बाजीरावा, मग तुला नक्कीच अजून
बाजीरावा, मग तुला नक्कीच अजून नीट कळली असेल कविता!!
रोमाराव, thanks!!
एक नंबर....छान च आहे..
एक नंबर....छान च आहे..
समथिंग अनसेड...
समथिंग अनसेड...
मानसी, हर्षल,thanks! हर्षल,
मानसी, हर्षल,thanks!
हर्षल, कविता आहे ही!! nothing unsaid