Submitted by चातक on 15 May, 2011 - 12:28
***
सोडुनी आलो दुरवर येथे
नाही मुल्य भावनांस जेथे
काळानेच साधिला डाव हा सारा
सुटला सर्व तो नात्यांचा पसारा
मंद गती ती स्मृतिभ्रंशाची
कारण त्यांस इथली संस्कृती
दोष न दिसे तिचा ही तसा
जोपासली मी तिजं मनातुन येथे..
नाही मुल्य भावनांस जेथे
सोडुनी आलो, दुरवर येथे
वाटे मजला अता यावे परतुनी
कळेना कसा हा भाव आटला
संवेदनांना आतला मार्ग दाखविला
पैशांसाठी पैश्यानेच देश सोडविला
'स्नेह भाव' असे दर्शन न मिळे
जगती माणसे अर्थालाच येथे...
नाही मुल्य भावनांस जेथे
सोडुनी आलो, दुरवर येथे
मोडुनी करार झुगारुन ही बंधने
पुन्हा चारही ॠतुंना बिलगेन मी
मुक्त होउनी या 'मोह पाशा'तुन
माय देशी परतेन मी
माय देशी परतेन मी
***
- चातक
१५०५२०११
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
चातक!!!!! किती छान कविता
चातक!!!!!
किती छान कविता करतोस...वा!
मोडुनी करार झुगारुन ही
मोडुनी करार झुगारुन ही बंधने
पुन्हा चारही ॠतुंना बिलगेन मी
मुक्त होउनी या 'मोह पाशा'तुन
माय देशी परतेन मी!
कविता छान आहे.मायदेशी परतू पहाणार्यांची मनस्थिती अचूक वर्णिली आहे.
चातका मस्त रे !! लिहीत जा
चातका
मस्त रे !!
लिहीत जा कविता. छानच लिहीतोस...
( नक्को ते स्वसंवाद नको लिहीत जाऊस )
मायदेशी परतण्याची तळमळ चांगली
मायदेशी परतण्याची तळमळ चांगली व्यक्त केलेय.
चातका, मनातून नेहमी असंच वाटत
चातका, मनातून नेहमी असंच वाटत राहतं मित्रा. छान शब्दात मांडलं आहेस.
आवडली रे
आवडली रे
मोडुनी करार झुगारुन ही
मोडुनी करार झुगारुन ही बंधने
पुन्हा चारही ॠतुंना बिलगेन मी
मुक्त होउनी या 'मोह पाशा'तुन
माय देशी परतेन मी
माय देशी परतेन मी>>>
हे आवडले.
कविता भावल्याचे कळविल्या
कविता भावल्याचे कळविल्या बद्द्ल सर्व प्रतिसादकांचे मनापासुन आभार!
सानी, आपल्या सुप्त भावना चाळवल्यागेल्या असल्यास क्षमस्व.
(इथे प्रकाशित करण्याचा पहिला प्रयत्न व 'कविता' म्हणुन रचण्याचा दुसरा.)
मोडुनी करार झुगारुन ही
मोडुनी करार झुगारुन ही बंधने
पुन्हा चारही ॠतुंना बिलगेन मी
मुक्त होउनी या 'मोह पाशा'तुन
माय देशी परतेन मी
माय देशी परतेन मी >>>>व्वा. चातका मस्त लिहीलेयस.
हा तुझा दुसरा प्रयत्न आहे हे खरेच वाटत नाही आहे.
चातका..... शुभेच्छा.....
चातका.....
शुभेच्छा..... पुढील लिखाणासाठी.
छान आहे
छान आहे
धन्यवाद शोभा१२३,
धन्यवाद शोभा१२३, मुक्तेश्वर.
हा तुझा दुसरा प्रयत्न आहे हे खरेच वाटत नाही आहे. >> मनांत अश्या रचनांचा तांडव असतोच पण त्यांना शब्दरुप देण्याची प्रेरणा येथे "मायबोलीने" दिली .
एखाद्या ईंग्लिश कवितेचा शब्दशः ओळ अन ओळ केलेला अनुवाद वाटला.... >> भुंगा मी एकुण ५ कडवे या कवितेत रचलेले त्यातील दोनच इथे दिले (ते खुपच वयक्तिक झाले असते). शेवटचे कडवे, त्यातिल भावना सतत माझ्या डोक्यात घाव घालण्याचे काम करत राहतात. आणि तेही माझ्या स्वतःच्या येथील सद्यपरिस्थितुन सुचलेले आहे.
अशी रचना जगात कोणत्याही भाषेत आढळणे केवळ अशक्य कारण मी कुठेही ही अश्या प्रकारे प्रकाशित केलेली नाही. तसे असते तर इथे जरुर नमुद केले असते.
धन्यावाद आपल्या अमुल्य प्रतिसादा बद्द्ल.
चातका छान लिहीली आहेस.
चातका छान लिहीली आहेस.
भावली !
भावली !