पुस्तक परिचयः "वॉल्ट डिस्ने - द अल्टिमेट फँटसी"

Submitted by आनंदयात्री on 12 May, 2011 - 07:42

राजहंस प्रकाशनने आणलेलं यशवंत रांजणेकर लिखित "वॉल्ट डिस्ने - द अल्टिमेट फँटसी" हे पुस्तक म्हणजे एका असामान्य कर्तृत्त्वाची चरितगाथा आहे.

मिकी माऊस, डॉनाल्ड डक या जगप्रसिद्ध कार्टून पात्रांचा निर्माता आणि अभूतपूर्व अशा डिस्नेलँडचा जनक वॉल्टर इल्यास डिस्ने (संपूर्ण पुस्तकात डिझ्नी ऐवजी डिस्ने हाच शब्द वापरला गेला आहे) या सामान्य कुटुंबात जन्माला आलेल्या, शिक्षण अर्धवट सोडलेल्या एका अवलिया मुलाने पुढील आयुष्यात जी झेप घेतली त्याचं सार्थ वर्णन हे पुस्तक करतं.

आज National Geographic इ.वर दाखवले जाणारे documentaries, बाल हनुमान वगैरे full length कार्टून मूव्हीज, किंवा The Jungle book सारख्या animated serials (in fact the jungle book ची निर्मीती डिस्नेचीच आहे) या सर्व कल्पनांचा मूळपुरूष म्हणजेच वॉल्ट डिस्ने! वॉल्टची कारकिर्द, त्याचा थक्क करणारा प्रवास याचं सविस्तर, वाचकाला खिळवून ठेवणारं वर्णन लेखकाने केलं आहे. अक्षरश: शून्यातून विश्व उभं केलेल्या वॉल्टचा प्रत्येक स्वभावविशेष त्यांनी छान रेखाटला आहे.

मी या पुस्तकावर ज्ज्जाम फिदा झालोय. बरेच वर्षांनी असं motivational, inspirational पुस्तक वाचायला मिळालं.. I loved it... बहुतेकदा आपण सर्वच प्राप्त परिस्थितीला शरण जाऊन ''destined'' मार्ग स्वीकारतो. इथे एक असा माणूस आपल्याला भेटतो, की जो सुरूवातीच्या काळात जवळजवळ नेहमीच व्यावहारिकदृष्ट्या फसवला गेला. आणि त्याचा हा learning period तब्बल १० हून अधिक वर्षांचा आहे!! बहुतांश काळ त्याने जेवढं कमावलं ते नवीन करण्यासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड करताना गमावलं. पण काळाच्या पुढे पाहण्याची वृत्ती आणि ती कालातीत स्वप्नं खरी करण्यासाठी सर्वस्व पणाला लावण्याची तयारी यामुळे त्याने एक प्रकारे क्रांतीच घडवली. या सगळ्याचं रोमांचकारी वर्णन इथे वाचायला मिळतं..

जरूर वाचा!!

तांत्रिक तपशीलः
नावः "वॉल्ट डिस्ने - द अल्टिमेट फँटसी"
लेखकः यशवंत रांजणेकर
प्रकाशनः राजहंस प्रकाशन
प्रथमावृत्ती: मे २००८
पृष्ठे: ३३२, किंमतः २५० रू

- नचिकेत जोशी

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नचिकेत, नक्कीच वाचायला हवं हे पुस्तक. वॉल्ट डिस्नेच्या चित्रपटांचा मोठ्ठा पंखा आमच्या घरात आहे ! Happy
पुस्तकपरिचयाबद्दल धन्यवाद.

धन्यवाद प्रज्ञा, जाजु! Happy

जाजु, कॉपीराईटचा मामला आहे.. त्यामुळे नाही टाकता येणार.. पण पुस्तक लय भारी आहे!

आनंदयात्री, पुस्तकातुन एकही उतारा न घेता खूप छान परिचय करुन दिलाय तुम्ही.. पुस्तक वाचायची उत्सुकता वाढली आहे.. माझ्या माहितीप्रमाणे परिक्षण वगैरे लिहिताना पुस्तकातील एखादा उतारा वगैरे वापरल्यास कॉपीराइटचा भंग होत नाही.. एखादं अख्खं प्रकरण नाही, पण किमान एखादा परिच्छेद टाकाच...

Indian copyright law:
A fair dealing with a literary, dramatic, musical or artistic work (not being a computer programme) for the purposes of

1. for the purpose of research or private study,
2. for criticism or review,
3. for reporting current events,
4. in connection with judicial proceeding,
5. performance by an amateur club or society if the performance is given to a non-paying audience, and .
6. the making of sound recordings of literary, dramatic or musical works under certain conditions.

चिमुरी, मन:पूर्वक धन्यवाद! Happy
पुस्तकात त्यांनी (नेहमीचंच) वाक्य दिलं आहे - की मजकुराचा कुठलाही भाग लिखित, प्रतिमुद्रित... blah blah.. करण्यापूर्वी लेखक आणि प्रकाशकाची लेखी परवानगी आवश्यक आहे... म्हणून मला वाटलं की भंग होईल..
तरीही एखादं पान चालेल का छापून?

आनंदयात्री,
कृपया लेखक व प्रकाशक या दोघांच्याही परवानगीशिवाय पुस्तकातला कुठलाही मजकूर प्रकाशित करू नका. Happy

पुस्तकात त्यांनी (नेहमीचंच) वाक्य दिलं आहे - की मजकुराचा कुठलाही भाग लिखित, प्रतिमुद्रित... blah blah.. करण्यापूर्वी लेखक आणि प्रकाशकाची लेखी परवानगी आवश्यक आहे... म्हणून मला वाटलं की भंग होईल..>>>>>> माझ्या माहितीप्रमाणे एखादा भाग लेखकाचे नाव वगैरे न देता, स्वतःच्या फायद्याकरता, कमर्शिअल परपझ इ.साठी वापरायचा असेल तरच लेखी परवानगी आवश्यक आहे.. आणि अश्या वेलेस तो भाग हा पुस्तकाचा substantial पार्ट असतो बर्‍याचदा..

जर एखादा छोटासा उतारा (काही देशांमधे याची मर्यादा २०० शब्द अशी ठरलेली आहे), जो त्या पुस्तकातील खूप महत्वाचा, अतिशय परिणामकारक नसेल, किंवा जो वाचल्यानंतर पुस्तक पूर्ण वाचण्याची, विकत घेण्याची गरज राहत नाही असे होणार नाही; असा एखादा परिच्छेद परिक्षण/टीकालेखणासाठी वापरला तरी तो कॉपीराईट कायद्याचा भंग होत नाही... अख्खं पान नको, पण एखादा उतारा चालेल... आणि अगदीच रिस्क घ्यायची नसेल तर त्यातील एखादा प्रसंग तुम्ही स्वतःच्या शब्दात पुनर्लिखीत करुन लिहा..... मला तरी हा पर्याय जास्त योग्य वाटतो... Happy

पुस्तक तर वाचायलाच हवं. परिचयाबद्दल धन्यवाद.
अफलातून कार्टून्स व्यतिरिक्तही नॅशनल जिओग्राफीच्या धर्तीवर डिझ्नीने कांही फिल्मस काढल्याचा उल्लेख आहे का पुस्तकात ? मी फार पूर्वी " जंगल कॅट" , "व्हॅनिशींग प्रेअरीज" व "डेझर्ट लाईफ" हे अप्रतिम निसर्गचित्रणाचे सिनेमा पाहिले होते व ते डिझ्नी मूव्हीजचे होते असं आठवतं.

होय भाऊ... वॉल्ट डिस्ने या महामानवाने आपल्या हयातीत केलेल्या सर्व कलाकृतींचं वर्णन आहे त्यात.. मी निवडक द्यायचे म्हणून नॅशनल चा उल्लेख केला फक्त..

चिमुरी, चिनूक्स, धन्यवाद... प्रयत्न करेन...

मी वाचलंय हे पुस्तक. छानच आहे. Happy
वॉल्ट डिस्नेच्या सर्वच चित्रपटांत प्राण्यांचं बारीक सारीक डिटेलिंग कसं काय असतं त्याचं कारण एके ठिकाणी सविस्तर दिलेलं आहे. तो भाग मला प्रचंड अपील झाला.

छान

जाईजुई, ललिता-प्रीति, जामोप्या, चंबू, धन्यवाद!

जाईजुई, हे मराठी पुस्तकच आहे.. अनुवाद कोणाचा?

thanks मुक्ते! नक्की वाच.. Happy

अजुन थोडा मोठा असता तर आवडला असता.. ह्म्म.. म्हणजे आत्ता आवडला नाहीये!! Proud