फॅशन कशाशी खातात!
२००५ की २००६ साली 'ती' नावाचे एक मासिक चालू झाले त्यात 'फॅशन कशाशी खातात!" ही लेखमाला लिहिणार होते. त्यासाठी हा पहिला लेख लिहिला होता. तो त्या मासिकात प्रसिद्धही झाला पण माझ्याकडचा सातत्याचा अभाव आणि इतर अनेक कारणांन्वये लेखमाला काही होऊ शकली नाही. तोच पहिला लेख थोडी डागडुजी करून इथे टाकतेय. पहिला लेख टाकतेय म्हणजे मी पूर्ण लेखमाला लिहेन असं काही नाही.
-------------------------------------------------------------------
‘‘हल्ली आमच्या कॉलनीच्या गणपती उत्सवात आम्ही अगदी नवनवीन कार्यक्रम करतो बाई! या वर्षी आम्ही फॅशन शो पण करणारोत! आम्हा मोठ्या बायकांचा फॅशन शो बरंका..’’
‘‘हो का? म्हणजे काय करणारात?’’
"तू एवढी ड्रेस डिझायनर (नाही हो मी कॉश्च्यूम डिझायनर आहे!) आणि तुला नाही माहित? अगं आमच्या शेजारची ती अपर्णा आहे ना ती यावर्षी आमचा फॅशन शो बसवून देणारे."
(तो काय नाच आहे बसवून द्यायला!)
काकू उत्साहात सांगत होत्या त्यामुळे ’अरे वा!’ एवढंच म्हणून मी तिथनं सटकले. पण मग शिकलेलं, वाचलेलं सगळं मला म्हणायला लागलं की बये तुला खटकलंय ना, कळतंय ना काकू घोळ घालतायत म्हणून तर मग सांग तरी काय बरोबर आहे ते. कळू तरी देत सगळ्यांना. लिहूनच का नाही काढत तू? हं, कल्पना चांगली आहे असं म्हणून मी हे सगळं डोक्यात घडी घालून नीट ठेवून दिलं. मग आता इथे असं काही लिहिशील का असं विचारल्यावर आळस झटकून लिहायला लागल्याशिवाय पर्यायच नव्हता. असं लिखाण सुरू करायचं ठरलं. आता ही सगळी लेखमाला आपण फॅशन , कपडे, कॉश्च्यूम्स या शब्दांच्या आजूबाजूने झिम्मा घालणार आहोत.
तर श्रीगणेशा फॅशन म्हणजे काय इथूनच करूया. अगदी साधंसोपं म्हणायचं तर त्या त्या ठराविक काळात, ठराविक समाजात लोकप्रिय असणारी पद्धती. मग ती कपड्यात, सौंदर्य खुलवण्यापासून घर, वाहन अगदी वापरातल्या छोट्या छोट्या वस्तूंपर्यंत दिसते. म्हणजे अगदी रविवर्म्याच्या चित्राप्रमाणे नऊवारी नेसण्यापासून ते खाली घसरणारी जीन्स घालण्यापर्यंत सगळं. गुप्तकालात म्हणजे इसवीसनाच्या चौथ्या-पाचव्या शतकाच्या दरम्यान रंगीत कपडे, वैविध्यपूर्ण दागिने घातले जात ती एक फॅशन, स्वातंत्र्यपूर्वकाळात देशभक्तांची ओळख म्हणून वापरली जाणारी खादी ही पण एक फॅशन, पेशवाईच्या काळात नऊवारी साडी नेसून मग रेशमी शेला अंगभर पांघरूनच घराच्या बाहेर पडण्याची पद्धत ही ही फॅशनच. थोडक्यात काय हा शब्द जरी गेल्या काही दशकात आपल्याकडे रूळला असला तरी संकल्पना आपल्याकडेही जुनीच आहे.
कुठलीही पद्धत अशीच उगाचच जन्माला येत नाही. समाजाच्या प्रत्येक कानाकोपर्यात तिच्या जन्माची कारणं दडलेली असतात. कधी गरज असते, कधी एखादा महत्वाचा बदल असतो, कधी एखादा नवीन शोध असतो आणि हे सगळं आपल्यावर परिणाम करत असतं त्यातून आपली सगळ्यांची सौंदर्यदृष्टी घडत असते. कशाला एवढा मोठा शब्द वापरायचा... आपल्या सगळ्यांना काय बघावसं वाटतं, कसं दिसायला आवडतं हे सगळं आकार घेतं ते या वेगवेगळ्या कारणांच्यातून आणि मग त्यातून एक पद्धती जन्माला येते जी समाजमान्य असते किंवा कालांतराने होते.
कळपात किंवा विशिष्ठ गटात असणे ही माणसाची मूलभूत प्रवृत्ती आहे. या प्रवृत्तीतूनच फॅशन जन्म घेते. एखादी पद्धत जन्माला येते काही लोक ती स्वीकारतात. त्या पद्धतीला प्रतिष्ठा प्राप्त होते आणि मग ती पद्धती अनुसरणे हे प्रतिष्ठीत मानले जाऊ लागते. आणि मग त्या पद्धतीची फॅशन होते. म्हणजे कसं की माझ्या आधीच्या पिढीने मुलींनी पँट घालण्यावरून खूप विनोद ऐकले होते पण मी कॉलेजमधे पोचेपर्यंत ते सगळं विरून गेलेलं होतं. सब घोडे बाराटक्के पँट असं न म्हणता जीन्स, ट्राउझर्स, फॉर्मल्स इत्यादी शब्द रूळले होते. आणि आता शिक्षण संपल्यानंतर १०-१२ वर्षांनी मी जेव्हा शिकवायला जाते तेव्हा जीन्स हा तरूणाईचा गणवेश झाला आहे.
जेव्हापासून शरीर झाकण्याची सुरूवात झाली तेव्हापासून फॅशन अस्तित्वात आहे हे बघता हे फॅशन नावाचे प्रकरण केवळ झाकण्या-सजवण्यापुरते मर्यादीत नाहीये हे आपल्या लक्षात येतं. समाजात घडणार्या सगळ्या बर्यावाईट गोष्टींचे परिणाम फॅशनवर होत असतात आणि फॅशन ही ही समाजमनावर परिणाम करत असते. ही देवाणघेवाण खूप गमतीशीर असते. ती थोडीशी समजून घेऊया.
वस्त्रालंकार ही एक चिन्ह व प्रतिकांची भाषा असते जी शब्दांशिवाय त्या व्यक्तीबद्दल खूप माहिती देत असते. त्या व्यक्तीचे लिंग, वय, सामाजिक स्थान, आर्थिक स्थान, व्यवसाय, समाजातील ठराविक गटाचे असणे, वैवाहिक स्थिती, प्रादेशिकता, त्या ठराविक वेळेचे महत्व इत्यादींसाठी संपूर्ण कपडा किंवा त्यातला एखादा भाग हे चिन्ह असते. उदाहरणार्थ नऊवारी साडी म्हणजे मराठी स्त्री मग त्या नऊवारी साडीची नेसण त्या स्त्रीची जात, कामाचं स्वरूप सांगते आणि साडीचा रंग, मंगळसूत्र, जोडवी, हिरव्या बांगड्या हे तिच्या विवाहित असण्याचे सूचन करतात तर नाकातली नथ आणि आंबाड्यावरची वेणी कुठला तरी शुभप्रसंग असल्याचे सूचित करते. इतकं दूर कशाला जायचं जीन्स तीच पण त्यावर गमतीदार रंगाचा तोकडा टॉप कन्या कॉलेजकुमारी आहे हे सांगतो तर कॉटनचा शॉर्ट कुडता व्यक्ती आयुष्यात थोडी स्थिरावल्याचे दाखवतो. अशी काही ढोबळ उदाहरणं..
अशी चिन्हे वापरणारे कळप बनत जातात आणि मग ही चिन्हे असणारे कपडे हे त्या त्या गटाचे गणवेश असल्यासारखे होतात. उदाहरणार्थ; स्वातंत्र्यपूर्व काळात महात्मा गांधींनी पगड्या, मुंडास्यांच्या ऐवजी गांधीटोपी घालण्याचं आव्हान केलं. महात्मा गांधींना मानणारे सर्वजण गांधीटोपी घालू लागले आणि मग गांधीटोपी घालणं हे देशभक्ती आणि स्वार्थत्यागाचं लक्षण मानलं जायला लागलं. देशभक्तीचा शिक्का बसण्यासाठी गांधीटोपी गरजेची पडू लागली. किंवा मग थोडं पल्याडचं उदाहरण, फ्रेंच राज्यक्रांतीनंतर सामान्यत्वाचं प्रदर्शन किंवा सामान्यांच्याबद्दलच्या आस्थेचं प्रदर्शन हे महत्वाचं ठरायला लागलं. अमीरउमरावांच्यासारखे कपडे असणं म्हणजे आपली मान कापून घेणं अशी दहशत पसरल्यामुळे सामान्यांच्या पट्टेरी ब्रीचेस लांब निमुळत्या टोप्या (फ्रिजियन हॅटस किंवा लिबर्टी बॉनेट) अश्या अनेक गोष्टी अमीरउमरावांच्या अंगावर दिसू लागल्या. आता या ठिकाणी मुळातल्या सामान्यत्व दाखवणार्या गोष्टी ह्या एका गणवेशाचा भाग झाल्या आणि त्या कळपात शिरण्यासाठी अमीरांनी त्या गोष्टी आपल्याश्या करून अजून एक वेगळा गणवेश निर्माण केला.
तंत्रज्ञान व शास्त्रात नवनवीन शोध लागत गेले आणि रोजच्या वापरातल्या गोष्टी बदलायला लागल्या. प्लॅस्टीकच्या शोधानंतर कृत्रिम कापड, कृत्रिम कातडं, कृत्रिम फर या गोष्टी बनू लागल्या. त्यामुळे या शोधानंतर १९५० च्या आसपास संपूर्ण कापडउद्योगाचेच रूप पालटले. याचा अर्थातच जगभरातल्या फॅशनवर परिणाम झाला. वेगळ्या प्रकारचे रंग, रेषा, वेगळ्या प्रकारचे कापड आणि वेगळ्या प्रकारचे आकार वस्त्रांच्यात वापरले जाऊ लागले.
फॅशन या संकल्पनेचं समाजाशी असलेलं नातं आहे ते असं. पण मग ज्याला फॅशन जगत म्हणतात ते नक्की काय आहे? शरीर झाकण्या-सजवण्याची सुरूवात झाली तेव्हापासून वेगवेगळ्या पद्धती येत गेल्या आणि कालबाह्य होत गेल्या आणि नवीन रूजत गेल्या. फॅशन डिझायनिंग/ फॅशनचे जगत या घटना मुळात पाश्चात्य. तर तिथे काय नि कसं घडलं त्याचाच धांडोळा घेऊ.
अमीरउमरावांच्या आवडीनिवडी, आजूबाजूची परिस्थिती इत्यादी गोष्टींतून पद्धती बदलत असत. अमीरउमरावांच्या स्त्रिया व राजघराण्यातील व्यक्ती त्यांना कश्या प्रकारची फॅशन हवी हे आपापल्या कुटुरियेंना सांगत असत. कुटुरीये या शब्दाचा अर्थ अत्यंत सुबक आणि सुंदर काम करणारे कपड्यांचे कारागिर असा घेता येईल. उच्च दर्जाचे शिवणकाम, विणकाम, भरतकाम आणि वापरलेल्या वस्तूही अत्युच्च दर्जाच्या असा सगळा हा मामला. अश्या कपड्यांना ऑत कुटूर (Haute Couture) म्हटले जाते. ऑत या फ्रेंच शब्दाचा अर्थ उच्च दर्जाशी निगडीत आहे तर कुटूर चा अर्थ सुबक कारागिरीशी. उच्च दर्जाची सुबक कारागिरी असलेले कपडे म्हणजे ऑत कुटूर किंवा हाय फॅशन. अर्थातच हे फक्त राजघराणी आणि अमीरउमराव यांनाच परवडू शकत होते. या ऑत कुटूर संकल्पनेचा इतिहास अठराव्या शतकातपर्यंत मागे जातो. नवीन पद्धतीचे कपडे चढवलेल्या लाकडी बाहुल्या एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी पाठवून त्यातून त्या त्या पद्धतीचा प्रसार करण्याची प्रथा या काळात होती. पण पद्धती बदलायला हव्या असे सांगणारे किंवा घडत असलेल्या गोष्टींचा आढावा घेऊन नवीन बदल कसा असेल हे सूचित करणारे लोक या ठिकाणी नव्हते.
पद्धती ठरवणारे वा घडवणारे हे एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात अस्तित्वात आले. ज्यांना फॅशन डिझायनर्स अशी संज्ञा मिळाली. १८५८ साली चार्ल्स फ्रेडरीक वर्थ या माणसाने स्वतःचे टेलरींगचे दुकान उघडले वेगवेगळ्या प्रकारचे, रंगांचे गाउन्स बनवून त्याचे खर्याखुर्या माणसांच्या अंगावर त्यांचे प्रदर्शन करण्याची त्याने सुरूवात केली. या नवीन कल्पनेला सर्वांनी उचलून धरले. असा जन्म झाला फॅशन शो या संकल्पनेचा. तस्मात फॅशन शो म्हणजे माणसांनी वेगवेगळ्या पद्धतीने चालून दाखवण्याचा प्रयोग नसून डिझायनरने बनवलेल्या वेगवेगळ्या कपड्यांचे खरेदी करू इच्छिणार्यांसमोर मांडलेले प्रदर्शन. असे प्रदर्शन ज्यात कपडे माणसांच्या अंगावर घातलेले असतात आणि अनेक कोनांतून फिरून ही माणसे ते कपडे कुठल्याबाजूने कश्यापद्धतीने दिसेल हे सर्वांना दाखवत असतात. आपण जेव्हा एफटीव्ही वर एखादा फॅशन शो बघतो तेव्हा त्या फॅशन शो ला त्या त्या डिझायनरचे नाव असते. मॉडेल्सचे चालणे, थबकणे, फिरणे हे सगळे त्या त्या कपड्यातले महत्वाचे भाग, कपड्यातले सौंदर्य उठून दिसावे या पद्धतीने बसवलेले असते. तर अश्या प्रकारच्या फॅशन शोजचा आद्य प्रणेता हा चार्ल्स फ्रेडरीक वर्थ हा होता. याला पहिला फॅशन डिझायनर मानले जाते. १८७० व १८८० च्या दशकात पॅरीस मधल्या फॅशन जगताचा तो सर्वेसर्वा होता.
मोठी मोठी कुटूर हाउसेस, फॅशन सिंडीकेट, वेगवेगळे डिझायनर्स, भारतातलं फॅशन जगत, जगाच्या नकाशावर भारतीय फॅशन या गोष्टींची अजून ओळख आपण पुढच्या काही भागात करून घेणारच आहोत. फॅशन, कापड आणि कपड्यांच्या दुनियेची माहिती करून घेण्याच्या या आपल्या मोहिमेतलं हे पहिलं पाउल. आत्ता कुठे दार थोडसं किलकिलं झालंय आणि आपण तोंडओळखीच्या दालनात प्रवेश केलाय. मग तयार रहा पुढच्या प्रवासासाठी. भेटूया पुढच्या महिन्यात.
संदर्भसूची:
- Survey of Historic Costume: Tortora,Phyllis & Eubank, Keith: Fairchild Publication
- Costumer’s Manifesto: www.costumes.org
- http://www.fashion-era.com
छान लेखमालिका. >>>>> एवढी
छान लेखमालिका.
>>>>> एवढी ड्रेस डिझायनर (नाही हो मी कॉश्च्यूम डिझायनर आहे!) आणि तुला नाही माहित? अगं आमच्या शेजारची ती अपर्णा आहे ना ती यावर्षी आमचा फॅशन शो बसवून देणारे."
(तो काय नाच आहे बसवून द्यायला!) >>>>>>
आणि
>>>>तस्मात फॅशन शो म्हणजे माणसांनी वेगवेगळ्या पद्धतीने चालून दाखवण्याचा प्रयोग नसून डिझायनरने बनवलेल्या वेगवेगळ्या कपड्यांचे खरेदी करू इच्छिणार्यांसमोर मांडलेले प्रदर्शन. असे प्रदर्शन ज्यात कपडे माणसांच्या अंगावर घातलेले असतात आणि अनेक कोनांतून फिरून ही माणसे ते कपडे कुठल्याबाजूने कश्यापद्धतीने दिसेल हे सर्वांना दाखवत असतात. आपण जेव्हा एफटीव्ही वर एखादा फॅशन शो बघतो तेव्हा त्या फॅशन शो ला त्या त्या डिझायनरचे नाव असते. मॉडेल्सचे चालणे, थबकणे, फिरणे हे सगळे त्या त्या कपड्यातले महत्वाचे भाग, कपड्यातले सौंदर्य उठून दिसावे या पद्धतीने बसवलेले असते. >>>>>
.... उत्तर तूच दिलयस की!
मस्त माहिती
मस्त माहिती
उत्तर तूच दिलयस की!<< आँ?
उत्तर तूच दिलयस की!<< आँ?
मामी मलाहि हाच प्रश्न पडला
मामी मलाहि हाच प्रश्न पडला लेख वाचुन.
पण माझ्याकडचा सातत्याचा अभाव
पण माझ्याकडचा सातत्याचा अभाव आणि इतर अनेक कारणांन्वये लेखमाला काही होऊ शकली नाही. >>> काय गं तू अशी...
(प्रस्तावना वाचल्या-वाचल्या आलेली ही पहिली प्रतिक्रिया. लेख संपूर्ण वाचून पुढील प्रतिक्रिया देण्यात येईल. :फिदी:)
दोन्हीमधला फरक कळला नाही का
दोन्हीमधला फरक कळला नाही का मामी? रमेश?
जाउदे गं लले त्याबाबतीत मीच माझ्यावर पाणी सोडलंय...
मला तर का़कु म्हणजे थ्री
मला तर का़कु म्हणजे थ्री इडियट मधील रांचो सारख्या वाटल्या. जसे रांचोने मशिन या शब्दाची अत्यंत सोपी व्याख्या केली तसे त्यांनी " फॅशन शो बसवून देणारे" या वाक्यात सर्व काहि सांगीतले. प्रत्येक माणसाला इतिहास कशाला माहित असायला हवा फॅशन शो म्हणजे काय हे समजण्यासाठी ? सर्वांना फॅशन शो म्हणजे काय हे माहित असतेच साधारणपणे ! आता भुकंप म्हणजे काय हे लोकांना सर्वसाधारण माहित आहेच (म्हणजे प्लेटस सरकरतात वगैरे) पण म्हणुन जर त्यामागची भुगर्भशास्त्राची थेअरी किंवा इतिहास डिटेलमध्येमाहित नसेल तर भुकंप म्हणजे काय हे माहितच नाहि असे नाहि. बाकी माहिती ठिक दीली आहे
दोन्हीमधला फरक कळला नाही का
दोन्हीमधला फरक कळला नाही का मामी? >>> प्लीजच सांग. दोन्ही फॅशन शो आणि दोन्ही बसवून द्यायला कोरीओग्राफर लागतात ना?
चला, लिहिशील तितके वाचूच. या
चला, लिहिशील तितके वाचूच.
या फॅशन एका ठराविक वयोगटातच आता दिसतात नाही का ? (उदा. खाली घसरणारी जीन्स ) त्यामूळे त्या वयोगटात नसलेल्या, लोकांनी त्याला नाके मुरडणे, हि पण फॅशनच !
गणेशोत्सवाच्या फॅशन शो मधे
गणेशोत्सवाच्या फॅशन शो मधे त्या काकू कुठल्या डिझायनरचे कपडे विकण्यासाठी चालणार असतात? कुठल्या फॅशन डिझायनरचा शो असतो तो? कोणत्या प्रकारचे बायर्स येणार असतात?
बसवून देणे एवढ्या एकाच शब्दापाशी रहाण्यापेक्षा त्या आधीचा परीच्छेद वाचला तरी फरक समजू शकतो.
>>> तस्मात फॅशन शो म्हणजे माणसांनी वेगवेगळ्या पद्धतीने चालून दाखवण्याचा प्रयोग नसून डिझायनरने बनवलेल्या वेगवेगळ्या कपड्यांचे खरेदी करू इच्छिणार्यांसमोर मांडलेले प्रदर्शन. असे प्रदर्शन ज्यात कपडे माणसांच्या अंगावर घातलेले असतात आणि अनेक कोनांतून फिरून ही माणसे ते कपडे कुठल्याबाजूने कश्यापद्धतीने दिसेल हे सर्वांना दाखवत असतात. <<<
दिनेशदा जीन्सबाबत अनुमोदन.
दिनेशदा जीन्सबाबत अनुमोदन. कारण त्या ठराविक वयोगटानंतर अंगावर न चढणारी जीन्स अश्या एका वस्त्रप्रकाराचा शोध लागतो.
अग, तु पुढे ते कंसात 'तो काय
अग, तु पुढे ते कंसात 'तो काय नाच आहे बसवून द्यायला' असं लिहिल्यामुळे हा घोळ झालाय. त्यामुळेच 'बसवून' शब्दाकडे लक्ष गेलं माझं. असो.
असो. पण जर साड्यांचे नेसण्याचे विविध प्रकार लोकांपुढे मांडायचे असतील तेही केवळ प्रदर्शनाकरता तर त्या प्रकाराला काय म्हणणार? (प्लीजच नोट : खरच प्रश्न विचारलाय खवचटपणे नाही.)
कॉलनी टाइप फॅशन शोजमधे नाच
कॉलनी टाइप फॅशन शोजमधे नाच बसवणे तसा फॅशन शो बसवणे यापलिकडे काही नसते.
साड्यांचा शो..
टर्म्स काय कशाही वाकवता, बनवता येतात. पण मुळात फॅशन शो ची संकल्पना कलेक्शन डिस्प्ले फॉर मार्केटिंग अश्या पद्धतीची आहे.
हे जे सगळे फॅशन वीक्स मधले शोज किंवा मोठे मोठे हाय एन्ड फॅशन शोज असतात ते मुळात एकेका डिझायनर्सचे असतात. मोठे मोठे बायर्स, सिंडीकेटस तिथून डिझाइन टॅलेन्ट/ कलेक्शन्स इत्यादी निवडतात.
कोरीओग्राफर ज्या काय ये जा बसवतो त्यात ते कपडे, त्यातली कारागिरी, कपड्यातले महत्वाचे फिचर्स, त्या कपड्यांचं सौंदर्य असं सगळं अधोरेखित होणं गरजेचं असतं जेणेकरून विकत घेणारा(जनरली रिटेल कंझ्युमर नव्हे) त्याचा विचार करेल हा उद्देश असतो.
गणेशोत्सवाच्या फॅशन शो मधे
गणेशोत्सवाच्या फॅशन शो मधे त्या काकू कुठल्या डिझायनरचे कपडे विकण्यासाठी चालणार असतात? कुठल्या फॅशन डिझायनरचा शो असतो तो? कोणत्या प्रकारचे बायर्स येणार असतात? >>>
नीधप तुम्हि फार घोळ घालताय असे वाटते प्रोफेशनल फॅशन शो आणी कॉलनीचा फॅशन शो यात. काकु म्हणाल्या की गणेशोत्सवात "फॅशन शो बसवून देणारे" याचा अर्थ त्यांना प्रोफेशनल फॅशन शो मध्ये काय होते हे माहित नसेल असे असु शकत नाहि ना. हौसेचा फॅशन शो वेगळा असणारच. मामी म्हणतात त्याप्रमाणे साड्यांचे नेसण्याचे विविध प्रकार लोकांपुढे मांडायचे असतील तर त्यालाही फॅशन शोच म्हणणार ना!
बर मी घोळ घालतेय. तुमचं सगळंच
बर मी घोळ घालतेय. तुमचं सगळंच बरोबर आहे.
..... पण मुळात फॅशन शो ची
..... पण मुळात फॅशन शो ची संकल्पना कलेक्शन डिस्प्ले फॉर मार्केटिंग अश्या पद्धतीची आहे.
... ह्म्म्म्म्म, ओके.
ही मालिका पुर्ण झाली तर उत्तम
ही मालिका पुर्ण झाली तर उत्तम होईल. माहित नसलेल्या एका जगाची माहिती होईल.
बाकी तू पहिल्या परिच्छेदात लिहिलेले फॅशनशो गणेशोत्सव टाईपच्या उत्सवी कार्यक्रमात भरपुर होतात आणि त्यात फॅशनशो म्हणुन कंबरेला लांबलचक हेलकावे देत चालायचे आणि मंचावर वेगवेगळ्या जागी जाऊन उभे राहायचे एवढेच असते. (माझ्या ऑफिसातही गेल्या दिवाळीला होता). लोक त्याच्याकडे करमणुकीचा कार्यक्रम म्हणुन पाहतात. एके दिवशी बिल्डींगमधल्या लोकांचा ऑर्केस्ट्रा, दुस-या दिवशी व्यावसायिक ऑर्केस्ट्रा, समारोपाला फॅशन्शो. काकुंनाही एवढेच अभिप्रेत असणार. त्याला अर्थातच फॅशनच्या भाषेत फॅशनशो म्हणता येणार नाही. पण जनरल पब्लिक म्हणते कारण त्याला फक्त मॉडेल्सचे हेलकावे देत चालणे दिसते. मला हा सगळा प्रकार अत्यंत विनोदी वाटतो. वस्तु मार्केटात दाखवण्यासाठी व विकण्यासाठी केले जाणारे एक प्रेझेंटेशन हा मनोरंजनाचा आयटेम आहे? पण लोकांच्या मते हा प्रकार मनोरंजक आहे, त्यांना तो उत्सवात ठेवायला आवडतो आणि त्यात भाग घेणा-यांना तर भारीच आवडतो. मॉडेलसारखे चालायची त्यांची इच्छा पुर्ण होते...
मी लिहेपर्यंत भरपुर प्रतिसाद
मी लिहेपर्यंत भरपुर प्रतिसाद आले की
बर मी घोळ घालतेय. तुमचं सगळंच
बर मी घोळ घालतेय. तुमचं सगळंच बरोबर आहे. >>
रमेश तुम्हि पण तीच चुक करताय जी सानी यांनी दुसर्या बाफमध्ये केली. अहो त्याचे बरोबरच असते नेहमी. त्या कसा घोळ घालतील.
असो .मीदेखील तीच चुक करणार आहे आता.
ऑट कुटूर. आधी निदान नीट काय शब्द आहे ते समजून घ्या.
लेख आवडला. तरी बरेच दिवस मला
लेख आवडला.
तरी बरेच दिवस मला हे हॉट कुटुर काय्,त्याचा उच्चार काय काहीच माहिती नव्हते.
तू कितीही अळंटळं केलंस तरी ही लेखमाला पूर्ण लिही.
हॉट कुटुर नव्हे ते साती.
हॉट कुटुर नव्हे ते साती. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ते हॉटे कुटूर आहे. नीट उच्चार करा नाहितर झोडपल्या जाल.
तू कितीही अळंटळं केलंस तरी ही
तू कितीही अळंटळं केलंस तरी ही लेखमाला पूर्ण लिही.
>>>> घाबरू नकोस साती. नी ने पहिला भाग इथे टाकलाय ना? आता तिच्या डोक्यावर बसून बाकी भाग लिहायला तिला भाग पाडूच. भाग के जायेगी कहां?
आता तिच्या डोक्यावर बसून बाकी
आता तिच्या डोक्यावर बसून बाकी भाग लिहायला तिला भाग पाडूच >> म्हणजे आमच्या डोक्याला त्रास
सगळ्या फ्रेंच शब्दांचे उच्चार
सगळ्या फ्रेंच शब्दांचे उच्चार अगम्य असू शकतात. नेटवरच्या डिक्शनरीत त्या शब्दाचा उच्चार 'ओSच' (oht) (च चावलचा आणि त्याआधी किंचित ट चा उच्चार) असा आहे.
तेव्हा मूळ लेखात शिकण्यासारखं काय आहे तिथे लक्ष द्यावे अशी विनंती. उगाच प्रत्येक ठिकाणी वाद कशाला?
तेव्हा मूळ लेखात शिकण्यासारखं
तेव्हा मूळ लेखात शिकण्यासारखं काय आहे तिथे लक्ष द्यावे अशी विनंती. उगाच प्रत्येक ठिकाणी वाद कशाला? >>
हे तुम्हि नीधपना टोमणा मारताय ह मामी!
मामी, तूम्ही मूळ उद्देशाकडेच
मामी, तूम्ही मूळ उद्देशाकडेच लक्ष द्या असे मी तुम्हाला विनवेन. ज्या डुप्लिकेट आयडींचा जन्मच वाद उकरुन काढणे ह्या संकल्पनेतून झाला आहे, त्यांना हे सांगून काय उपयोग ?
हे मुद्दाम शोधून वाद घालतात, त्यासाठी खास डुप्लिकेट आयडी उघडतात. आणि विशेष म्हणजे ह्याचा 'त्यांना' त्रास होतो.
जनांच्या कल्याणा संतांच्या विभूती. ह्याचा ह्याची देही ह्याची डोळा प्रत्यय येईल तूम्हाला.
जनांच्या कल्याणा संतांच्या
जनांच्या कल्याणा संतांच्या विभूती >>
धन्यवाद बागुलबुवा!
नीधपने काहीही लिहिलं तरी काही
नीधपने काहीही लिहिलं तरी काही लोक उगाचच वाद घालतात बुवा.
एवढ्या छान लेखाचा आनंद घ्यायचा सोडून उच्चारा-बिच्चारांचे जुनेच वाद कशाला उकरताय?
गणू,तुम्ही कितीही काड्या केल्यात तरी मी आणि मामी भांडायच्या गेमात उतरणार नाही हो.
>>नेटवरच्या डिक्शनरीत त्या
>>नेटवरच्या डिक्शनरीत त्या शब्दाचा उच्चार 'ओSच' (oht) (च चावलचा आणि त्याआधी किंचित ट चा उच्चार) असा आहे.<<<
हे देवनागरीत कसं लिहायचं सांग, मी बदलते.
फ्रेंच ही भाषा मला कणभरही येत नाही.
इतर कोणीही फ्रेंच भाषा तज्ञ/ फ्रेंच येणारे असतील तर देवनागरीत हा शब्द कसा लिहायचा प्लीज सांगा.
नी, पुन्हा जुकऊ. चांगलंय.
नी, पुन्हा जुकऊ.
चांगलंय. वेगळं काहीतरी वाचायला मिळतंय!
Pages