मुलं बोलायला लागली एक दिड वर्षाची झाली.. की त्यांची बड्बड..सुरू होते. आपल्या अवती भोवती पाहिलेल्या.. ऐकलेल्या गोष्टींबद्दल त्यांना कुतुहल वाटायला लागतं. आणि मग आपोआपच त्यांचे प्रश्न सुरु होतात. आपण आपल्या परीने... ह्या छोट्या दोन पाच वर्षाच्या बाळांना उत्तरे देतोही. काही वेळा त्यांना ती पटतात तर काही वेळा.. आपल्या उत्तरांमधून नवे प्रश्ण निर्माण होतात. मुलांना खरंही सांगितलं पाहिजे..आणि त्याना पट्लंही पाहिजे.. मग असे करताना अनेकदा गमती होतात्...तर काही वेळा मुलं आपल्याला प्रश्न विचारून भंडावून सोडतात.
पिल्लू : आई गणपती बाप्पा शर्ट का घालत नाहीत ?
मी : ते अंगावर शेला घेतात म्हणून.
पिल्लू : मग आई बाप्पा चप्पल का नाही घालत ?
मी : बाप्पा सिंहासनावर बसलेले असतात ना म्हणून.
पिल्लू : अगं मग आपण नाही का मंदिराबाहेर ओळीत चप्पल काढुन ठेवतो तशी बाप्पांनी पण चप्पल बाहेर काढून बसायचं ना ......
बॉईज च्या पोटात का बेबी नसतं ? फक्त गल्स का बेबी आणतात ?
मी:- कारण बेबी ग्रो होण्यासाठी गल्सच्या पोटात एक बॅग असते. तशी बॉइज ना नसते.
मग कांगारूला असते तशीच ना मग ती आपल्याला का दिसत नाही...
देवारे......
आता काय बोलणार ?
एकदा मला विचारलं .. सगळ्या आज्यांना आजोबा आहेत मग माँ आज्जीचे आजोबा कुठेयत ?
मी सांगितलं ते देवाघरी गेले आहेत.
कुठे असतं देवाघर ?
उंच आकाशात...
काही महिने होउन गेले. मध्ये दोन तिन दा आम्ही प्लेन ने कुठे कुठे जाउन आलो होतो.
तर हा पठ्ठ्या मला एकदा म्हणतो तु खोटं सांगतेस.. देवाघर नसतच...मी बघितलं आकाशात मला कुठेच देवाघर दिसलं नाही. वय वर्षे तिन होतं फक्त.
आई मन म्हणजे काय ग ?
स्पोर्ट्स कोण बनवतं ?
जगात माणसं का असतात ?
असे एक ना अनेक प्रश्न ...
तुमच्याकडेही असतिल ना असे खूपसे प्रश्न ? काय अन कशी उत्तरे द्यायची....
या खोलीत लाईट तु लावलास... मग
या खोलीत लाईट तु लावलास... मग त्या खोलीत अन्धार कोणी लावला......वय सव्वा दोन....
मस्त धागा , माझ्या मनात होतच
मस्त धागा , माझ्या मनात होतच असा धागा काढायचा...
मुल एकदा बोलायला लागले की हा 'क' चा पाढा सुरु होतोच. का ,कस केव्हा ,कशासाठी,किती....
बर एका उत्तराने त्यान्चे समाधान होत नाही त्यातून नवा प्रश्न लगेच तयार...
सुरवातीला हे प्रश्ण आवडायचे आणि त्यान्ची उत्तरे ही सोपी असायची. झोप का येते. रात्री अन्धार का होतो. शाळेत का जातात?
पण वय वाढते तसे हे प्रश्न ही complicated होत जातात. कधी कधी त्याना काय उत्तर द्यावे हे कळत नाही.इथेच खरी कसोटी असते पालकान्ची.इथे जर टाळाटाळ केली तर मग मुलान्चे प्रश्न भरकटत जातात .त्यातून गैरसमज वाढत जातात. चुकीची उत्तर न देता त्यान्च्या मनाला कळतील अशी सोपी पण खरी उत्तरे देण्याचा प्रयत्न करावा.मग मुल जास्त खोलात शिरत नाहीत.
बाळ पोटात कस जात ? मम्मा येवढ मोठ्ठ झाल ना पोटात बाळ तयार होत . जमीनीत बी लवल्यावर झाड उगवत ना तस.. मग मी तुझे पोट फाडून बाहेर आले तर तुला दुखलं असेल ना?:-नाही डॉ औषध देतात न दुखण्याच. मी मोठी झाली की बॉय बनु का म्हणजे मी रोज शर्ट पॅन्ट घालेन ;-अग मुलीना वेगवेगळे कपडे घालता येतात मुलाना नाही. ... मी उभ राहून शू करू का ? नको तुझे कपडे खराब होतील. मग -----त्याचे का नाही होत बॉय ची शू ची जागा वेगळी असते त्यामुळे त्यान्ची शु कपड्या वर पडत नाही.
आमच्या घरातही एक शंकासुर
आमच्या घरातही एक शंकासुर आहे....
एकच प्रश्न घरातल्या सगळ्या सदस्यांना वेगवेगळ्या वेळी विचारून खात्री करून घेतो.समाधानकारक उत्तर मिळालं की मग त्याच्या खेळण्यांना ज्ञानदानाचं कार्य चालू होतं. " अरे बनी, डायनोचे ब्रेन्स वाटाण्याएवढे होते. म्हणून ते टिकू शकले नाहीत. तू कॅरटसोबत बाकीच्या भाज्याही खात जा खूप. म्हणजे तुझा ब्रेन मोठ्ठा होईल आणि तू एक्स्टिंक्ट होणार नाहीस..." 
आकाश असं उलटं आहे तर ते खाली पडत का नाही ?
डायनोसोर्स का गं नाही जगले ? ( हे विचारताना हमखास डोळ्यात पाणी असतं !)
मुलींना मिशी का नसते ?
आकाश निळं का असतं ?
उत्तरं देतादेता पुरेवाट होते. शिवाय क्रॉसचेक करून फिरक्या घ्यायची फार आवड.
पण वय वाढते तसे हे प्रश्न ही
पण वय वाढते तसे हे प्रश्न ही complicated होत जातात. कधी कधी त्याना काय उत्तर द्यावे हे कळत नाही.इथेच खरी कसोटी असते पालकान्ची.इथे जर टाळाटाळ केली तर मग मुलान्चे प्रश्न भरकटत जातात .त्यातून गैरसमज वाढत जातात. चुकीची उत्तर न देता त्यान्च्या मनाला कळतील अशी सोपी पण खरी उत्तरे देण्याचा प्रयत्न करावा.मग मुल जास्त खोलात शिरत नाहीत.>>>>> अगदी !!
शिवाय क्रॉसचेक करून फिरक्या घ्यायची फार आवड. एकच प्रश्न घरातल्या सगळ्या सदस्यांना वेगवेगळ्या वेळी विचारून खात्री करून घेतो.>>>> हो गं. आणि दोन वेगळी उत्तरं मिळाली तर म्हणतात असं नसतं तुला माहित नाही
रुणुझुणु, कसलं क्युट पिल्लु
रुणुझुणु, कसलं क्युट पिल्लु आहे गं तुझं
अन्धार कुणी लावला?>> बापरे..काय उत्तर दिलं मग?
अरे वा खुप महत्वाचा धागा
अरे वा खुप महत्वाचा धागा आहे.... भरपुर लिहायचे आहे यावर फक्त आता मार्क करुन ठेवतो.
डॅफो मस्त बीबी सुरु केलायस ,
डॅफो मस्त बीबी सुरु केलायस , भारी किस्से आहेत सगळ्यांचे.
मुलांना काय प्रश्न पडतील किंवा काय विचार करतील काही सांगता येत नाही ?
माझ्या मुलाने मला सांगितले होते ( विचारले नाही) की पाऊस कसा पडतो.
" सनमुळे ढगांना घाम येतो आणि पाऊस पडतो".
तरी त्याची कल्पना बरीच म्हणायची माझ्या लहानपणी मला वाटायचं आभाळाला भोकं आहेत आणि वरन देवाने नळ चालु केला की पाऊस पडतो आणि रात्री लाईट चालु केला की चांदण्या चमकतात
या खोलीत लाईट तु लावलास... मग
या खोलीत लाईट तु लावलास... मग त्या खोलीत अन्धार कोणी लावला......वय सव्वा दोन....
>>>>>>>>..सेम किस्सा, पुलंच्या "दिनेश" चा, गणगोत पुस्तकामधे

काय उत्तर दिलंत मग? उत्सुकता आहे खरंच.
अन्धार कुणी लावला? स्पोर्ट्स
अन्धार कुणी लावला? स्पोर्ट्स कोण बनवतं ? >>> कित्ती गोड प्रश्न आहेत.
रुणु, "अरे बनी, डायनोचे ब्रेन्स वाटाण्याएवढे होते. म्हणून ते टिकू शकले नाहीत. तू कॅरटसोबत बाकीच्या भाज्याही खात जा खूप. म्हणजे तुझा ब्रेन मोठ्ठा होईल आणि तू एक्स्टिंक्ट होणार नाहीस..."
>>> हे लै भारी गं.
माझ्या मोठ्या मुलीने विचारले,
माझ्या मोठ्या मुलीने विचारले, आपण कीटाणु घालवण्यासाठी म्हणून दात घासतो, मग घासताना ब्रशवर लागलेले कीटाणू कसे साफ करायचे ?
आपण झोपतो तसे Trainपण रुळावर चाकं वरती आणि पाठ खाली अशी झोपते का?
धाकटीने तर बोल्डच केल, काल विचारले, माझे पाय खुप दुखतायत , या वरुन काय सिध्द होतं? (शब्द भांडार बघा..... वय अडीच)
.
.
.
.
मी म्हटलं हरले बाई नाहि येत.
ती म्हणाली, माझे पाय दुखतात या वरुन असं सिध्द होतं की मला सगळं कळतं.
मला वाटतं. जन्म आणि मृत्यू
मला वाटतं. जन्म आणि मृत्यू यांच्या संदर्भातले प्रश्न सोडले तर, शक्य तितकी खरी उत्तरे द्यायची.
त्यांना काय समजतं, अशा गैरसमजात आपल्याला नाही राहता येत आता.
कधी कधी तर त्यांना खरे उत्तर माहित असते, ते आपल्याकडून खात्री करुन घेतात किंवा चक्क फिरकी घेतात.
माझ्या मानलेल्या लेकिशी मी असाच सतत संपर्कात असतो. आता ती फक्त तेरा वर्षांची आहे तरी, एखाद्या जवळच्या मैत्रिणीसारख्या मी तिच्याशी कुठल्याही विषयावर गप्पा मारु शकतो.
माझ्या मुलाचे प्रश्र रामाच नी
माझ्या मुलाचे प्रश्र रामाच नी सितेच आडनाव काय आहे?
माझ लग्न कधी करणार?
माझा भाचा वय नउ...बशीमधे
माझा भाचा वय नउ...बशीमधे शिन्कला. त्याला लगेच आम्हि सान्गितले कि असे करु नये....त्यात जन्तु जातात. तो म्हणाला कि हरकत काय आहे? मीच खाणार आहे. माझे जन्तु मला.....त्याला काय उत्तर द्यावे ह्या विचारात मी अजुनहि आहे.
माझी आई डोकेदुखीवरची गोळी घेत
माझी आई डोकेदुखीवरची गोळी घेत होती. डोकेदुखीचे कारण वय वर्षे ३ शेजारीच उभे होते...
प्र - आज्जी तु कुठली गोळी घेतीये..
उ - अरे माझे डोके दुखतेय ना म्हणून..
प्र - मग तु ही गोळी खाऊन टाकणार का
उ - हो रे गोळी गिळून टाकणार
प्र - मग ती पोटात जाणार तुझ्या.
उ - हो मग आता कुठे जाणार
प्र - तुझे डोके दुखतेय ना मग तु गोळी पोटात का देतीयेस. डोक्यात का नाही
उ - ????????
काय एकेक प्रश्न ! नताशा,
काय एकेक प्रश्न !
नताशा, धन्यु गं. मी त्याला ' क्युट डेव्हिल ' म्हणते.

मामी, तो डायनोसोर सायंटिस्ट होणार आहे. शाळेच्या बुकाच्या पहिल्याच पानावर त्याने तसं लिवलंय.
साक्षी, धाकटीचं लॉजिक लईच भारी
दिनेशदा, १०००० % सहमत. माझा लेक आणि मी सुद्धा अखंड बोलू शकतो...अगदी मित्रांसारखं. बँकेत वगैरे जाताना मी त्याला सोबत घेतलं की नवरोजी हमखास विचारतात, " त्याला कशाला नेतेस ? तो त्रास देईल तिथे."
पण असं कधीच होत नाही. जाताना, येताना , बँकेत सगळीकडे तो एकदम छान असतो. अर्थात प्रश्नमालिका चालू असतेच.
रामाचं आडनाव, माझे जंतु मला

आशिष,
या सर्व मुलांना Calvin and
या सर्व मुलांना
Calvin and Hobbes ची पुस्तके वाचायला द्या
माझा भाऊ लहानपणी मला विचित्र
माझा भाऊ लहानपणी मला विचित्र प्रश्न विचारायचा की ज्यांची उत्तरे मला तेव्हाच काय आतापण नाही सांगता येणार.
१) वाघ आणि सिंहाची मारामारी झाली तर कोण जिन्केल?
२) वाघ आणि हत्तीची मारामारी
३) व्गवेगळ्या प्राण्यांची जोडीजोडिने रेस कोण जिन्केल वगैरे
>>Calvin and Hobbes ची
>>Calvin and Hobbes ची पुस्तके >>
अगदी.
Calvin and Hobbes ची पुस्तके
Calvin and Hobbes ची पुस्तके >> लहानांनाच कशाला.... मोठ्यांनाही आवडतात! एक नंबर!
Calvin and Hobbes.... माझी
Calvin and Hobbes.... माझी अत्यंत म्हणजे अत्यंत म्हणजे अत्यंतच आवडती सीरीज आहे ही आणि सगळी पुस्तकंपण आहेत माझ्याकडे.
Calvin and Hobbes.... माझी
Calvin and Hobbes.... माझी अत्यंत म्हणजे अत्यंत म्हणजे अत्यंतच आवडती सीरीज आहे ही
अरे अगदी अगदी...
माझ्याकडे तर आख्खे कलेक्शन आहे...
कुणाला पाहिजे असेल तर सांगा टप्प्याटप्याने मेल करतो...
आशु, मला पाहिजेत. मीच वाचली
आशु, मला पाहिजेत.
मीच वाचली नाहीत अजून.
सुंदर धागा आहे ! विषयांतर
सुंदर धागा आहे !
विषयांतर नाहि पण थोड्या सिरियस नोट्वर , थोडया मोठया मुलाने विचारलेला हे प्रश्न ( डेक्लन चे song)
http://www.youtube.com/watch?v=NKMoHLxDncU
परवा मुलिनि अगदि साधा प्रश्न
परवा मुलिनि अगदि साधा प्रश्न विचार्ला, तारे कसे चमकतात, मे म्हणल, तार्याना स्वतआचअ प्रकाश अस्तो, आणि रात्रि अन्धार अस्तो म्हणुन ते चमकतात, तर मुल्गि म्हणे म आप्ल्यला प्रकश का नस्तो, मी म्हन्ल आपण starts नाहि, अता रोज रात्रि तारे निरिक्शण अन त्यन्च्यशि गप्पा सुरु अहेत. कधि light बन्द करुन बघ्ते आप्ला प्रकाश पड्तो का ते. वय - ४ पुर्ण, मे वाट बघ्ते हिच्या डोक्यात कधि प्रकाश पडेल.
अनेकदा पालक उत्तरे देत नाहीत
अनेकदा पालक उत्तरे देत नाहीत करण त्यांना माहीत नसतात. अनेकदा त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना पण त्यांच्या लहानपणी डावलण्यात आले असणार.
स्वत:ला उत्तरे माहीत नसल्यास तसे मान्य करा व proactively माहितीचे स्त्रोत शोधा - इंटरेनेट, त्यापेक्षा महत्वाचे म्हणजे पुस्तके, व सर्वात महत्वाचे म्हणजे इतर लोक. इंटरेनेट वरील ०.०१ टक्के पण कंटेन्ट उपयोगाची नसते, नॉनफिक्शन पुस्तके बरीच बरी. महीतगार लोक त्या अनुशंगाने अजुन बर्याच गोष्टी सांगु शकतात.
ज्यांनी ज्यानी येथे प्रश्न लिहिले आहेत त्यांनी exercise म्हणुन का होईना त्या प्रश्नांची सखोल उत्तरे देऊन पहा - लहान वयाच्या शब्दसंपत्तीस साजेशी, व मोठ्यांकरता. लहानांची आकलन शक्ती जबरदस्त असते हे लक्षात ठेवा.
अनेकदा पालक उत्तरे देत नाहीत
अनेकदा पालक उत्तरे देत नाहीत करण त्यांना माहीत नसतात. अनेकदा त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना पण त्यांच्या लहानपणी डावलण्यात आले असणार.
स्वत:ला उत्तरे माहीत नसल्यास तसे मान्य करा व proactively माहितीचे स्त्रोत शोधा - इंटरेनेट, त्यापेक्षा महत्वाचे म्हणजे पुस्तके, व सर्वात महत्वाचे म्हणजे इतर लोक. इंटरेनेट वरील ०.०१ टक्के पण कंटेन्ट उपयोगाची नसते, नॉनफिक्शन पुस्तके बरीच बरी. महीतगार लोक त्या अनुशंगाने अजुन बर्याच गोष्टी सांगु शकतात.
ज्यांनी ज्यानी येथे प्रश्न लिहिले आहेत त्यांनी exercise म्हणुन का होईना त्या प्रश्नांची सखोल उत्तरे देऊन पहा - लहान वयाच्या शब्दसंपत्तीस साजेशी, व मोठ्यांकरता. लहानांची आकलन शक्ती जबरदस्त असते हे लक्षात ठेवा.>>>> १०० % अनुमोदन... बर्याच जणांना वाटते कि वैज्ञानिक स्पष्टीकरण दिले तर त्यांना समजणार नाही, जे बिल्कुल चुकिचे आहे. पण पार्श्व्भुमी माहित नसेल तर , स्पष्टीकरणातुन अजुन प्रश्न येवु शकतात, ते टाळण्याचा प्रयत्न करणे चुकिचे आहे. समजा आपल्याला जमत नाही असे वाटले तर त्या क्षेत्रातील एखाद्या ओळ्खिच्या व्यक्तीची मदत घेता येइल.
लहान मुलांना ' लॉजिकली उत्तरं हवी असतात असा माझा तर अनुभव आहे'. पण तुम्ही टाळाटाळ करता आहात हे त्यांच्या लक्षात आले तर तसे प्रश्न यायचे बंद होतील. जेवढी त्यांची 'जिज्ञासा' वाढेल तेवढेच त्यांची 'विअचार' करायची क्षमता वाढेल. वर दिलेल्या सगळ्या प्रश्नांना त्या त्या वयानुसार समर्प्क उत्तरे आहेत.
आमच्या इथे प्रश्नावली आताशा
आमच्या इथे प्रश्नावली आताशा खूपच लांबलचक होतेय.. ते एकाला एक लागून आली कि खूप विचार करून उत्तर द्यावे लागतात.
कधी तरी मग मी म्हणते कि अरे मला नाही माहिती मी बघून सांगते तुला तर मुलगा म्हणतो .. असं कसं माहिती नाही माझ्या टीचर ला सगळं माहिती असतं तुला पण माहिती पाहिजे..
अस्चीग ...मला वाटतं हे किती हि खरं असलं न तरी हि .. खूप त्रासदायक असत. इतका वेळ काढणं म्हणजे आपलीच परीक्षा आहे.. आपण जितकी उत्तर देवू न तितके प्रश्न वाढत जातात.. आमच्या समोर मोठी ३-४ झाडं आहेत.. इथे हि स्प्रिंग सुरु होतोय त्यामुळे खूप पक्षी येतात.. खारू ताई तर सतत असते...माबो वर फोटो बघून मीच पोरांच्या डोक्यात पक्षी निरीक्षण च खूळ घातलंय आता मला ते लई महाग पडतंय.. पक्षी दिसला कि फोटो काढायला लावतात.. एक तर ते फोटो इथे डकवून माहिती काढावी लागणार नाही तर मला लायब्ररी तून पुस्तक शोधायचं कि नक्की कुठले पक्षी येतात.. हे कुठे थांबवायचं कळत नाही.. म्हणजे एका बाजूने खूप छान वाटतं कि त्यांना डोळसपणे बघता येतंय.. मला बहुतेक बघायची सवय नाहीये म्हणून त्रास होतोय कि मला आधी शिकून त्यांना शिकवावं लागतंय (हा प्रवास मला तापदायक होतोय वाटत
) असो
होम हा मुव्ही बघितला.. दिनेशदा नि लिंक टाकली होती बहुतेक इथे.. त्यावरून आलेले प्रश्नांनी मला सळो का पळो करून सोडलं .. मुलांसमोर हा मुव्ही चुकून बघू नका.. किवा खूप तयारीत रहा .
तो- पृथ्वी कोणाची आहे? (व. वर्षे ५.५.)
मी- सगळ्यांची म्हणजे सगळ्या खंडात राहणाऱ्या लोकांची (त्याला सगळे खंड, महासागर वगैरे माहिती आहे)
तो - पृथ्वीची काळजी कोण घेतात?
मी- आपण सगळ्यांनी घ्यायला पाहिजे
तो - काळजी कशी घ्यायची? तू माझी काळजी घेते तशी?
मी - तशीच पण जरा विचार करून.. पाणी कमी वापरायचं, काही वाया नाही घालवायचं, फेकायच्या आधी ते कोणाला देता येयील का जेणे करून ते अजून वापरता येयील आणि कचरा जास्त नाही होणार ब्ला ब्ला
तो - (थोडा वेळ विचार करून) म्हणजे आम्ही जे मेस करतो त्याने पृथ्वी घाण होते.???
मी - हो, तू , मी आपण सगळे कचरा करतो तो कुठे तरी टाकतो त्यात दाखवलं नाही का .. असं बराच वेळ चालू होतं !!!
-- मग trak दुसरी कडे गेला.. आम्ही व्हेजिटेरियन आहे आणि त्यात दाखवलं आहे कि जवळपास ४०% ग्रेन फक्त जनावरांना खाण्यासाठी देतात..
तो- त्या जनावरांना एकत्र का ठेवलाय.. त्यांना आता मारणार का?
मी- हो बेटा..लोक खातात न म्हणून
तो- शी कित्ती ग्रोस (मी ?????).. पण आपल्याला भाज्या, फळ, दुध मिळतं तसं बाकीच्या लोकांना मिळत नाही का? म्हणून ते खातात का?
मी- काहीना मिळत नाही म्हणून. काहीना आवडतं म्हणून खातात.. इट्स ओके.. खाल्लं कोणी तर
तो- मग मासे पण खातात का ? शार्क आणि व्हेल ला पण पकडतात
मी- हो तर मासे पण खातात .. मोठे मासे पकडत नाही .. ते पकडता येत नाही म्हणजे कठीण असतात ते तुलाच नाही का पकडणार त्यांना पकडायला गेलास तर..
तो - पण मोठे मासे तर छोटे मासे खातात .. मग आपण त्यांना पकडलं तर तो शार्क काय खाणार..
मी- ओशन मध्ये खूप मासे असतात त्यांना पण मिळतात खायला
तो- समजा आपण सगळेच पकडले तर (मनात मी अरे देवा, त्या मुव्ही वाल्याला सांगायला हरकत नाही .. एक तरी जन आहे समजणारा तुझी व्यथा)
मी - अरे असं नाही होत. छोटे मासे तयार होत राहतात.. पण ते संपू शकतात एके दिवशी .. तू बरोबर आहेस
अशा १४-१५ तरी सिरीज झाल्या त्या दिवशी.. झाडं वरच कशी वाढतात.. खाली मुळात का जात नाही वगैरे वगैरे.. जंगल का तोडतात..
मी अगदी अवाक झाले होते..त्याचे प्रश्न बघुन
आणि हे सगळं मुव्ही चालू असताना रनिंग कॉमेंट्री सारखं चालू होतं..
दुसर्या दिवशी नेमकं सासर्यांच श्राद्ध चा घास होता ..इथे गाय वगैरे नसते त्यामुळे दोन्ही घास घरातच होम करून त्यात टाकतो सकाळी परत प्रश्नावली चालू..
सकळच्या घाईत होते, ऑफिस ला जायचं होतं आणि हा काही थांबत नव्हता)
तो - आपण ते फायर मध्ये का टाकतो?
मी- बाप्पाच घास आहे तो म्हणून.. ( २च मीन टा आधी त्याला आबांच्या फोटोला नमस्कार करायला सांगितला होता आणि मी नैवेद्य तिथे ठेवला होता)
तो - आबा बाप्पा आहे?
मी- ते आता आपल्याजवळ नाहीत, ते वारले, बाप्पाजवळ गेले (माझ्या डोळ्यात पाणी अगदी पुसट कारण पुढचा प्रश्न अगदी माहिती होता )
तो - मी, तू पण जाणार ?
मी- हो सगळे कधी तरी जातात.. काही मोठे झाल्यवर जातात.. काही लवकर जातात (मध्ये बरेच प्रश्न झाले आणि तो म्हणतो)
तो- ओह म्हणजे आबा बाप्पा कडे गेले तर त्यांची काळजी ते घेतील न (मी मनात -- ओह वा काय उत्तर आहे ).. तू कशाला त्यांना जेवायला देतेस..
मी - अरे आपण रोज नाही देत.. कधी तरी देतो (ते ह्याच दिवशी क्ष वर्षांपूर्वी गेले हे मी सांगायचं टाळत होते )
तो- (कालचा सगळे प्रश्न आठवून) पण ममा,, काल आपण बघत होतो.. त्यात बाप्पा कुठे राहतो पृथ्वीवर. म्हणजे (मी अगदी अगदी हात जोडायचे राहिले होते ..
मी - ब्रश कर जा आता
अस्चीग ...मला वाटतं हे किती
अस्चीग ...मला वाटतं हे किती हि खरं असलं न तरी हि .. खूप त्रासदायक असत. इतका वेळ काढणं म्हणजे आपलीच परीक्षा आहे.. आपण जितकी उत्तर देवू न तितके प्रश्न वाढत जातात.. >>>
कारण आपण थापा मारतो. ते त्यांना समजते. त्यांचे समाधान होत नाहि म्हणुन. मुळ म्हणजे आपण जे करतो ते आपल्याला देखील समजत नसते तरी आपण करतो . आणी जे आपल्याला समजलेले नाहि ते आपण त्यांना समजावचा प्रयत्न करतो.
उदा. देव म्हणजे काय ह्या प्रश्नावर मुलांना कीतीहि उत्तरे दिलीत तरी त्यांचे समधान होणार नाहि. तुम्हि त्यांना काहितरी सांगुन गप्प जरुर करु शकाल पण ती वेगळी गोष्ट आहे. तुम्हि त्यांचे समाधान करु शकणार नाहि. त्यापेक्षा जर तुम्हि त्यांना साधे सांगीतले की "देव म्हणजे काय हे मला माहित नाहि. मी देखील अजुन शोधतोच आहे" तर त्यांचे पुर्ण समाधान होइल. पण असे उत्तर देणारा मी तरि अजुन कोणी पाहिला नाहि
Children are the most enslaved class of people in human society, the most exploited -- and exploited "for their own sake." The child, if he is free, is going to ask questions which we don't know the answers to. And our ego does not allow us to say, "I don't know" - osho
लहान मुलांना ' लॉजिकली उत्तरं
लहान मुलांना ' लॉजिकली उत्तरं हवी असतात असा माझा तर अनुभव आहे'.>>>१००% अनुमोदन ..
मी कधी थात्तुर मातुर उत्तर दिली न कि माझ्याकडे बघत बसतो.. मग परत सगळं लोजीकली सांगितलं कि तो अंतर्मुख होवून अनालिसिस करत बसतो .. घरात घिरट्या घालत बसतो .. त्यावर विचार करून अर्धा तासाने परत प्रश्न !!!! किवा स्वतःची थेयरी मांडतो.. खूप मज्जा येते ते ऐकायला..
प्रित, असे प्रश्न विचारणारी
प्रित, असे प्रश्न विचारणारी मुले ज्यांना आहेत ते भाग्यवान. मुलांचे कुतुहल शमवता येईल व पुढचे प्रश्न त्यांना विचारावेसे वाटतील असे वातावरण निर्माण केल्या जायला हवे.
प्रत्येक उत्तरातुन आपल्याला हवे त्या दिशेला गाडी वळवता येते - ती भलतीकडे जात नाही याची काळजी घेण्याची जवाबदारी तुमचीच. उत्तरांमधुन तुम्ही त्यांची विचार करण्याची कुवत वाढवु शकता. त्याकरता सगळ्या प्रश्नांची सरळ उत्तरे न देता त्यांना पण विचार करायला लावा. वेगवेगळ्या वयात त्यांची सिचुवेशन प्रमाणे विचार करण्याची प्रगल्भता वेगवेगळी असते, ते ध्यानात ठेऊन त्यांनाच उत्तरे मिळतात का पहा (या बद्दलच्या दोन वयांच्या मुलांचा एक छान व्हिडीओ आहे - लिंक शोधतो - अजुन कुणाला माहीत असल्यास टाकावा - २ पायरेट्स व वार्याने पडणार्या सँडविच बद्दल.)
एक उदाहरण (तुमचेच) पृथ्वी कुणाची - हे कुणाला विचारता यावर बरेच अवलंबुन आहे. प्रत्येक उत्तराने पुढील संवाद बदलणार.
(१) पृथ्वी किटकांची आहे - त्यांचे बायोमास पाहिल्यास, व किती काळ ते येथे आहेत ते पाहिल्यास कळेल
(२) मानवाची (आयतोबा)
(३) कुणाचीच नाही - आपण फक्त इथे राह्तो (गिजुभाईंच्या 'मुले "आपली" नसतात तर केवळ आपल्याबरोबर असतात' या नॉन-कॅपीटलिस्टीक विचाराप्रमाणे)
(४) पृथ्वी इतर अनेक अब्जावधी ग्रहांप्रमाणे एक आहे (किंवा सुर्याची, व मग 'सुर्य तिची कळजी घेतो का?' चे उत्तर न्युटनचे नियम तिची काळजी घेतात वगैरे हवे तिकडे).
प्रश्न डावलण्यात (उत्तरे माहीत नसल्याने) मोठेमोठे (तथाकथीत) पण सुटले नाहीत.
हा याज्ञवल्क्य व गार्गी यांचा संवाद पहा: ब्लॉग अथवा रंगीबेरंगी
किंवा शंभर ही कवीता पहा.
Pages