१) एखादा पदार्थ हमखास जमावा, यासाठी तुम्ही काही युक्त्या (टिप्स) वापरत असाल, तर सगळ्यांना सांगा.
निव्वळ पाककलेतच नाही, पण स्वयंपाकघरात वेळ वाचावा म्हणून, भांडी/उपकरणं स्वच्छ रहावी म्हणून इत्यादीसाठी काही खास टिप्स असतील तर त्याही सांगा.
२) कोणत्या बाबतीत अडला असाल आणि एखादी टिप हवी असेल, तर इथे विचारा. (पदार्थ करताना जमला नाही, तर तो 'माझं काय चुकलं' मध्ये विचारा. इथे त्या व्यतिरिक्त काही असल्यास विचारा)
३) पदार्थांची वेगवेगळ्या भाषेतली नावे, एकाच पदार्थाची एकाच भाषेतली पण वेगवेगळ्या देशातली नावे , कधी त्यात असलेला लहानमोठा फरक या संबंधी माहिती इथे विचारण्याआधी ह्या धाग्यावर पहा- http://www.maayboli.com/node/25383
४) मऊसूत गोल पोळ्या करायच्या आहेत? त्या कशा करायच्या? कोणत्या तव्यावर करायच्या? सुगरणींच्या युक्त्या इथे पहा- http://www.maayboli.com/node/25385
मानुषी ए थॉ होतील म्हणजे
मानुषी
ए थॉ होतील म्हणजे काय?
रुनी, कपड्यांचे ब्लीच नाही
रुनी,
कपड्यांचे ब्लीच नाही वापरलं कधी कसं करतात?
दक्षिणा इथे पहा
दक्षिणा इथे पहा -
http://www.merriam-webster.com/dictionary/thaw
http://dictionary.cambridge.org/dictionary/british/thaw_1
काल एका ख्रिचन फ्रेण्ड ने
काल एका ख्रिचन फ्रेण्ड ने डोसा सारखे पाकिट दिले आहे वाळवलेले पापडासारखे कडक आहेत ती म्हणाली याचे तुकडे करुन त्यावर नॉन वेज रस्सा घालुन भिजवून खातात.
आम्ही घरी नॉन वेज करत नाही त्याच काय करु?
एक साधी घरगुती टिप. दह्याचे
एक साधी घरगुती टिप. दह्याचे ताक करताना, रवीने किंवा हँड ब्लेंडरने, स्टीलचा उभा ड्बा घ्यावा व त्यात दही घालून करावे. सांडत नाही. फोडणी घातली तरी बाहेर उड्त नाही. नो मेस. मला ते ताक करताना बाहेर थेंब उडलेले आवड्त नाहीत.
अमा, पूर्वी ताकासाठी अनेक
अमा, पूर्वी ताकासाठी अनेक घरांमध्ये चिनी मातीची उंच पण मध्यावर फुगीर असलेली बरणी वापरायचे. खाली फरशीवर बसून दोन पावलांत ती बरणी धरायची आणि लाकडी रवीने दही घुसळायचे. किंवा यशोदेचे जसे दही घुसळतानाचे चित्र असते तशी दही घुसळायची दोरीने बांधलेली रवी असायची, दही घुसळताना हाताला व्यायाम व्हायचा. आता भांड्यांच्या दुकानात ताकासाठी उभा गंज मिळतो स्टीलचा, तो वापरायचा मस्त. काहीजण तर मिक्सरमध्ये करतात ताक. पण चव जरा वेगळीच लागते त्याची.
अकु. माझ्याकडे गंज आहे पण
अकु. माझ्याकडे गंज आहे पण त्याची उंची कमी पडते. त्यात ताक केले की एक गोल थेंब पॅटर्न ओट्यावर. सेंट्रिफ्युगल फोर्ससारखे. फिर मेरा भेजा सटकता है.
अमा, ताकाची उंची कमी कर.
अमा, ताकाची उंची कमी कर.
आशूडी गंजाची उंची वाढवा
आशूडी

गंजाची उंची वाढवा किंवा ताकाची उंची कमी करा
घुसळताना हाताला व्यायाम
घुसळताना हाताला व्यायाम व्हायचा.>>>>>
अकु, उभं राहून ताक घुसळायची जी हालचाल आहे, त्याने नुसत्या हातालाच नाही तर मणक्याला सुद्धा खूप चांगला व्यायाम होतो. सर्वसाधारणपणे उजवा पाय पुढे आणि डावा पाय मागे ठेवून कमरेत वाकून (टू बी प्रिसाईज, जवळपास ३० अंशाच्या कोनात) दोन्ही हातानी रविचं कासं पकडून घुसळायची हालचाल हा त्या काळच्या बायकांचा सहजसुंदर व्यायाम होता.
आता आपण उभं राहून ताक करतो, पण ते ब्लेंडरने
शिवाय त्यावेळी एकत्र कुटुंबपद्धतीत जवळ जवळ पाच-एक लिटरची बरणी भरून (कमी-जास्त) ताक लागायचं, त्या बरणीची उंची त्या घुसळण्याच्या व्यायामासाठी एकदम योग्य असायची. आता एवढं ताक करायचं असेल तर आपण बाहेरच ऑर्डर देऊ
म्हणून आताच्या पिढिला स्पाँडीलायसिससारखे विकार जडतात असं आमची आजी नेहमी म्हणते 
किंवा हळूहळू घुसळ
किंवा हळूहळू घुसळ टुबुक्टुबुक. १ तासाने लोणी निघेल पण आजूबाजूला ताकाचा थेंब अज्ज्याबात उडणार नाही
आम्ही पुर्वी बसून यशोदा
आम्ही पुर्वी बसून यशोदा स्टाईलने ताक करत असू. त्या रवीला वरच्या आणि खालच्या दोरीच्या ठिकाणे वळ पडलेले असायचे. त्या दोर्या लाकडी स्टँडच्या एका पायाला कायम बांधून ठेवलेल्या असायच्या. ताकासाठी कासंडी वापरली तरी ताक कमी उडतं.
अश्विनी, आमची कुर्गी शेजारीण,
अश्विनी, आमची कुर्गी शेजारीण, काचेच्या बाटलीत दही घालून, घट्ट झाकण लावून, बाटली हलवून हलवून लोणी काढायची. नो मेस, नो फस.
(हाताला व्यायाम होतो तो वेगळाच !!)
मंजूडी, म्हणूनच तर आता
मंजूडी, म्हणूनच तर आता जिममध्ये जाऊन ताक घुसळण्यासदृश व्यायाम करायला लागतो ना!
के अश्विनी, मी देखील एकदाच असे बसून यशोदा स्टाईलने दोरीने रवीला घुसळत ताक केलं आहे.... जाम मजा आली होती. आता फरशीवर बसून किचनमध्ये काम करणे हेच काळामागे गेलंय. पाटा - वरवंटा, खल-बत्ता, कासंडी-रवी इतिहासजमा झालेत, आणि किचनमध्ये ओट्याशी सतत उभ्याने काम करून पाठीचे विकार तेवढे बळावलेत.
अकु, रहाटाने विहिरीतले पाणी
अकु, रहाटाने विहिरीतले पाणी काढणे, जमीन सारवणे, तांदुळ पाखडणे, पापड/करंज्याचे पीठ कूटणे या सगळ्यात पण मस्त व्यायाम होता.
माझ्या आज्या ९४/९५ वयापर्यंत कार्यरत होत्या.
हो ना, दिनेशदा, गेले बरं ते
हो ना, दिनेशदा, गेले बरं ते दिवस.... तसेही हे प्रकार मी शहरात फारसे पाहिलेले नाहीएत, खेड्यात जास्त बघायला मिळालेत. आता टिचकीभर किचनमध्ये उभे राहून ३६० डिग्रीजमध्ये स्वतःभोवतीच गोल गोल फिरत काम करायचे दिवस आलेत!
काल एका ख्रिचन फ्रेण्ड ने
काल एका ख्रिचन फ्रेण्ड ने डोसा सारखे पाकिट दिले आहे वाळवलेले पापडासारखे कडक आहेत ती म्हणाली याचे तुकडे करुन त्यावर नॉन वेज रस्सा घालुन भिजवून खातात.

आम्ही घरी नॉन वेज करत नाही त्याच काय करु?
च्च च्च... तुला कोरी रोटीचे पॅकेट मिळालेय जे चिकनसोबत खातात. मला वाटते कोरी रोटी मधला कोरी म्हणजे चिकन. हा प्रकार खुप छान लागतो गं... माझ्या शेजारचे मंगलोरी ख्रिश्चन कोरी रोटी खायचे आणि मला खिलवायचे.
आता तु कायतरी मस्त वेज रस्सा कर.. उदा. काळ्या वाटाण्याचे मालवणी सांबार आणि ओरप
धन्स आता रेसिपी द्या मालवणी
धन्स
आता रेसिपी द्या मालवणी पध्दतची.
हो ती म्हणाली होती मंगलोरी लोकांच स्पेशल आहे म्हणुन पण मि पहिल्यादांच पाहिल.
मी व्होल मिल्क आणते, आणि २१
मी व्होल मिल्क आणते, आणि २१ तारखेची एक्सपायरी आहे. एक कॅन आधीच वापरात आहे, तो १९ पर्यंतचा आहे. मी २ दिवस इथे नाहिये. १९ तारीखवालं दूध नक्की संपेल १९ पर्यंत, पण लगेच २ दिवसांत २१ वालं दूध नाही खपायचं. नो पनीर, नो खवा. वेळही नाहिये ती उस्तवारी करायला आता.
तर, काय करू? २१ वालं दूध २२-२३ पर्यंत चालेल का? म्हणजे टिकेल का, आणि ते प्यायलं तर चांगलं का वाईट?
प्रज्ञा दूधाच दही लाव. दूध
प्रज्ञा दूधाच दही लाव. दूध २२-२३ पर्यंत चालायला हवे पण कधी कधी कडवट होतं.
पातेल्यात ओत, चांगलं तापव आणि
पातेल्यात ओत, चांगलं तापव आणि चक्क फ्रीज कर.
प्रज्ञा, २१ तारखेला त्याचे
प्रज्ञा, २१ तारखेला त्याचे दही लावायचे !!
तसे कुठलीच वस्तू, अगदी मध्यरात्री बारा वाजता एक्स्पायर होत नाही, पण शंका आल्यावर ती वस्तू वापरु नये हे उत्तम. दूधच आहे ते चपातीचे पिठ भिजवण्यासाठी, भात शिजवण्यासाठी पण वापरता येईल (मग त्या भाताची दहीबुत्ती करायची.)
मी आताच दूधात रताळे अणि ब्रोकोली यांची भाजी करुन खाल्ली, छान दिसली आणि लागली पण !
दह्याचा पण मोठा डबा आहे. पण
दह्याचा पण मोठा डबा आहे. पण तरी मी घरी लावलं तर ते किती टिकेल?
चांगलं उकळून ठेवणे हा उपाय करते. थोडं दही लावते.
मी पनीरचा कलाकंद बघितल नेटवर, पण त्यात दूध सुद्धा आटवायचंय आणि मग त्यात पनीर घालायचंय.. वेळ कमी आहे म्हणून आता करत नाही ते.
दिनेशदा, मी आधी वरची पोस्ट लिहिली आणि मग तुमची पोस्ट वाचली. हेपण करेन की! जमेल मला आल्यावर.
आइस क्रीम कर.
आइस क्रीम कर.
दही पूर्ण लागल्यावर, एका
दही पूर्ण लागल्यावर, एका मोठ्या गाळण्यात एक रुमाल ठेवून त्यात ओतायचे (खाली भांडे ठेवायचे.) मग हे भांडे फ्रिजमधे ठेवायचे. दोन दिवसात त्याचा घट्ट चक्का तयार होईल. तो सावर क्रीम सारखा वापरता येईल, श्रीखंड करता येईल, कोशिंबीरीत वापरता येईल.
मोठ्या ओव्हनप्रूफ पॅन अर्ध्या
मोठ्या ओव्हनप्रूफ पॅन अर्ध्या उंची पर्यंत भरून ओव्हनमधे ठेव. १७५-२०० फॅरेन्हाईट टेंपरेचरला. उतू नाही गेले पाहीजे पण आटले पाहीजे असे टेंपरेचर.
अशी बासूंदी करते माझी एक मैत्रिण.
किंवा जर स्लो कुकर असेल तर त्यात ठेव रात्रीत बासूंदी होते. - असे माझी दुसरी मैत्रीण करते.
मी यापैकी काहीही केलेले नाही. पण मैत्रिणींनी केलेले पाहिले आहे.
प्रज्ञा संपुर्ण दुध फ्रीज करु
प्रज्ञा संपुर्ण दुध फ्रीज करु शकता. तसचं, न तापवता. कॅनच वरच लीड सैल करुन ठेवा फक्त. घरी आला कि रेफ्रिजरेटर मध्ये थॉ करायला ठेवा. एका दिवसात थॉ होइल. डायरेक्ट प्यायला दुध चवीला बर लागत नाही. पण बाकी सगळ्यासाठी अगदी व्यवस्थित वापरता येते. मी हे कधी केल नाहीये. पण माझी एक बेस्ट फ्रेंड जवळ जवळ सगळ्याच गोष्टी फ्रीज करते. तिच्याकडे पाहिलय.
इथे पुण्यात असं कॅनवालं दुध
इथे पुण्यात असं कॅनवालं दुध मिळतं का? त्याची चव बरी लागते का आणि?
दक्षिणा, परदेशात मजबूरी असते
दक्षिणा, परदेशात मजबूरी असते म्हणून आम्ही असे दूध वापरतो. तूम्हाला ताजे दूध मिळतेय तर कशाला ?
अशा दूधांना अजिबात, ती चव येत नाही. (आणि आम्हाला इथे म्हशीचे दूध मिळत नाही.)
दुधाचं पनीर करताना जसा फॅट
दुधाचं पनीर करताना जसा फॅट कंटेंट चा तुपाच्या प्रमाणाशी असतो तसा त्यातलं फॅट कंटेंट आणि पनीरची क्वांटिटी याचा काही संबंध असतो का ? म्हणजे जर फुल क्रिम दुध असेल तर जास्त पनीर बनेल आणि टोन किंवा डबल टोन दुधाचं कमी ?
काल पनीर बनवताना हा प्रश्न डोक्यात आला होता, कुठे विचारावं कळलं नाही म्हणून इथे विचारतेय.
Pages