'पुरुष’मय स्वप्न च्या निमित्ताने
निमित्त आहे मणिकर्णिका यांचं ’पुरुष’मय स्वप्न हे विनोदी लेखन !
सगळ्यात महत्वाचं. हा लेख मायबोलीवर आहे यात काहीच वावगं नाही. हा लेख इतर अनेक वाचकांना आवडला तसा मलाही आवडला.
हा लेख विनोदी नसता तरी तितकाच योग्य आहे. एका व्यक्तीला वाटलेलं स्वप्न, विचार तिने हवे तसे मांडले. आणि माझ्यासकट अनेक वाचकांना ते तितकेच आवडल्याचंही दिसतंय.
माझा मुद्दा आहे त्यावर आलेल्या प्रतिसादांबद्दल.
किंवा त्यापेक्षाही त्यावर न आलेल्या प्रतिसादांबद्दल.
हाच लेख एका पुरुष मायबोलीकराने 'स्त्री' मय स्वप्न असा लिहला असता तर काय झालं असतं?
स्त्रीला एक भोग्य वस्तू म्हणून समजलं जातंय याचा निषेध करणारे अनेक प्रतिसाद आले असते.
विनोदी लेखन या नावाखाली काय वाटेल ते खपवता का असं त्या लेखकाला झोडपलं गेलं असतं.
"या पानावर जाऊन पहा. किती ओंगळ आणि गलिच्छ लिहिलंय. अजूनही स्त्रीयांकडे घाणेरडं बघण्याची दृष्टी जात नाही. चपलेंनं फटके मारले पाहिजे अशा लोकांना" असे संदेश विचारपुशीत दिले-घेतले असते.
"हा लेख विनोदी लेखन नावाखाली सरळ सरळ वेश्या व्यवसायाला उत्तेजन देणारा आहे. तेंव्हा तो काढून टाका आणि तो लिहणार्या व्यक्तीलाही मायबोलीवरून हाकलून द्या" असे संदेश अॅडमीनला गेले असते.
मायबोलीवरचं लेखन स्वातंत्र्य आणि लेखकाच्या मताशी प्रशासन सहमत असेलच असे नाही , हे लक्षात असतांनाही "मायबोलीसारख्या जाहीर संकेतस्थळावर असे विचार लिहूच कसे दिले" या वरून गदारोळ झाला असता.
एका व्यक्तीने त्याचे विचार मांडले आहेत आणि त्याची किंमत तेवढ्यापुरती. ज्यांना आवडेल त्यांनी वाचावं, इतरांनी दूर्लक्ष करावं. ही साधी सोपी गोष्ट विसरली गेली असती.
मानववंशाच्या सुरुवातीपासून, जगाच्या प्रत्येक कानाकोपर्यात, स्त्री पुरुषांबद्दल आणि पुरुष स्त्रियांबद्दल वेगवेगळ्या पातळीवर फॅन्टसाई़झ करत आले आहेत, करत राहतील ही जीवशास्त्रीय/मानसशास्त्रीय गोष्ट बाजूला पडली असती.
खरंच असं झालं असतं? तुम्हाला काय वाटतं?
गणु-डॉट च्या ०२:०८ च्या
गणु-डॉट च्या ०२:०८ च्या पोस्टला अनुमोदन.
या धाग्याच्या प्रतिसादांवरुन माझ्या मते अजयला जे म्हणायचे असावे ते सिद्ध होते.
केवळ स्त्री-पुरुष या अंगांबद्दल न बोलता सर्वसमावेशक सहिष्णुतेबद्दल त्याचा मुद्दा असावा असे माझे मत आहे.
उदाहरण मात्र चुकीचे ठरले असावे.
अनेकदा लेखकाला काय म्हणायचे आहे ते पुर्ण समजुन न घेता आपण तुटुन पडतो. किंवा आपल्याला हवे तसे ते interpret करतो. मी येथे केले आहे तसे.
साधारणपणे सगळ्यांनाच benefit of doubt द्यायला हरकत नसावी (निदान बॅट रेषेवर असावी असे वाटत असतांना.)
<< अजय आणि पराग तुम्हाला तो
<<
अजय आणि पराग तुम्हाला तो लेख पाहून जे वाटलं ती प्रतिक्रिया तिथेच दिली असती तरच योग्य नसतं झालं का ?
मुद्दाम हा धागा काढणे म्हणजे उलट नेहेमीच्या "यशस्वी" लोकांनी येऊन काहीबाही लिहून बीबी बन्द करावा लागणार्या प्रतिक्रिया लिहाव्या त्यासाठी मोकळं मैदान काढलय असं वाटलं.
आता हा बीबी काढलाच आहे तर पराग आणि तुम्ही ज्या प्रकारच्या प्रतिक्रियांची कल्पना करताय, तशा प्रतिक्रिया आधी ज्या व्यक्तिंना आधी इथल्या ज्या ज्या धाग्यांवर आल्या होत्या आणि त्या तिथे खरच " अयोग्य " होत्या , ज्यांना जिथे 'पालथे घडे ' म्हंटलं गेलय ते योग्य नव्हतं याची उदाहरणं देणं "मस्ट" आहे ती उदा. देता येत नसतील तर हा बीबी मा .बो वर असु नये असं माझं मत !![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
पराग नी त्यात कंपुबाजी वगैरे पण अॅड केलय, याचा काय बेस ??
विपु पब्लिक असते त्याचं तुम्ही उदाहरण सापडवु शकाल एक वेळ पण तुम्ही कुठल्या आयडींना (मुलींना) जीटॉक वर असं बोलताना स्वतः पाहिलय का ? कुठल्या स्त्री आयडीने तुम्हाला अशी जीटॉक सेशन्स दाखवली आहेत का ?/ अशा इमेल्स करताना पाहिलय कोणाला पाहिलय का ?
असं खरच पाहिलं असेल तर "आयडीच्या नावासकट" उदाहरणं प्लिज लिहा नाही तर वाचणार्यांना एवढच वाटेल कि मुळात जे स्वतः हे सगळं करतात तेच इमॅजिन करु शकतात.. !
तेंव्हा जर असं कोणी केलय याचं नावासकट उल्लेख इथे करता येत नसेल तर स्त्रीआयडीं विषयी किंवा कोणा विषयी असं जनरीक लिहु नये.. असो ... अजय यांनी जरुर विचार करावा या सगळ्याचा बीबी काढला आहे तर !
मी या पॅरा बद्दल बोलतेय
विपूंमधून, इमेल वरून, जीटॉकवरून आपापल्या कंपू मैत्रिणींना "जरा अमूक नोड वर काय लिहिलय बघ.. त्याचा तमूक लेखक आणि त्याला अनुमोदन / छान म्हणणारा ढमूक आयडी ह्यांचा निषेध नोंदवा..
<<
अजय, तुमचा प्रश्न अगदी साधा
अजय, तुमचा प्रश्न अगदी साधा आणि रास्त आहे. तुमचा हा लेख वाचल्यावर मग जाऊन मुळ लेख वाचला. माझ्या स्वत:च्या मनात जरी तुम्ही मांडलेला हा अँगल लागलीच नाही आला तरी तुमच्या किंवा अन्य कोणाच्या डोक्यात हा अँगल येणे स्वाभाविक वाटते.
लेखी मराठी इतकं चांगलं नाही म्हणून इंग्रजीचा आधार घेतो. पुरुषाच्या लेखिकेला आवडणार्या पुरुषी कॅरॅक्टरिस्टीक्स जशा मिशा, ऊंची, आडवी छाती ह्या घेऊन लेखिकेनी मस्त फँटसाईज केलं आहे. हेच जर उलटं झालं असतं तर तो लेखक/लेखिका झोडपली गेली असता/असती का हा अगदी साधा प्रश्न आहे. आता पर्यंतची कित्येक उदाहरणं बघता ह्या प्रश्नात इतकं वावगं काय आहे काही कळत नाही.
ह्याच्याही पुढे जाऊन तुमच्याकडून नेमक्या वेगळ्या अशा काय अपेक्षा आहेत की जेणेकरुन लोकांचा इतका अपेक्षाभंग झालेला दिसतोय तेही आजिबातच कळले नाही?
उद्या, एखाद्या पुरुषानी फेमिनीन कॅरॅक्टरिस्टीक्स वर गलिच्छपणे नाही पण जरा जास्त स्पष्टपणे भर देत सुद्धा एखादा लेख लिहीला असता तर तो झोडपल्या जाण्याची शक्यता होती.
मग झोडपले जाणे बरोबर की लोकांनी लाईटली घेणे बरोबर?
उत्तर हे कोणी एक माणूस देऊ शकत नाही, तो लेख आल्यावर लगेच त्याचा निकाल लागतोच पण ह्याचा अर्थ प्रश्न रास्त नाही असा आजिबात नाहीये.
माझ्या दृष्टिनी आताच्या काळात स्त्रियांवर येणारे लेख झोडपले जाणार. फक्त स्त्रियांकडूनच नाही तर पुरुषांकडून सुद्धा. ह्याला जवाबदार आहे आपल्या समाजाचे आता पर्यंत झालेले "एवोल्युशन". आत पर्यंतचा समाजाचा इतिहास बघता आणि त्यात स्त्रियांना झालेला त्रास बघता बर्याचशा natural feminine characteristics समजल्या जाणार्या गोष्टींचा सुद्धा स्त्रियांना इतका त्रास झाला आहे की आताच्या काळात,सगळ्या नाही तरी बर्याच feminine characteristics वर फोकस करुन कोणी कौतूकानी लिहायला गेलं, फँटसाइज करायला गेलं तर तो/ती धुतला (बदडला) जाईल. मग हे बरोबर आहे का? परत उत्तर तेच. बरोबर, चूक काही नाही फक्त जसं त्या वेळेसचं सेंटिमेंट आहे तशा रियॅक्शन्स मिळतील.
So far, in the men vs women balance, the mens' pan has been heavy and moving very slowly towards equilibrium. The funny thing is the upward movement of the womens' pan is slow but in the form of the difference between a high upward swing followed by almost equal but a little less downward movement. Can't blame the women if during a huge upward swing some hapless men get slapped around in their pan, can't we?
जसं त्या वेळेसचं सेंटिमेंट
जसं त्या वेळेसचं सेंटिमेंट आहे तशा रियॅक्शन्स मिळतील.>>>
सत्य आहे.
ओबामा काळा होता म्हणुन त्याला
ओबामा काळा होता म्हणुन त्याला सहानुभुतीची मते मिळाली असे समजले गेले. म्हणजे परत balance तुटलाच. परत स्किन कलर effect आलाच. सहानुभुतीने असो की द्वेषातुन असो.!
लंबक कधी स्थ्रिर होउ शकत नाहि. एका टोकाकडुन दुसर्याकडे चालुच रहाणार! लंबक एका टोकाकडे गेला म्हणुन त्याला balance करण्याचा प्रयत्न करणार्यांना कधी तो दुसर्या टोकाकडे गेला हे समजत देखील नाहि.
जेव्हा तो स्थ्रिर होइल तो सुदिन!
गणू अनूमोदन!!
गणू अनूमोदन!!
लंबक कधी स्थ्रिर होउ शकत
लंबक कधी स्थ्रिर होउ शकत नाहि. >>>
काय सांगता?
पण खरे सांगायचे तर मला तुमचे सगळे प्रतिसाद खरच मनापासून आवडतात.
(अती अवांतर - अगदी फोडातून सेफ्टिक आल्याप्रमाणे लिहीता हे सुद्धा!
खरच!)
अती अवांतर - अगदी फोडातून
अती अवांतर - अगदी फोडातून सेफ्टिक आल्याप्रमाणे लिहीता हे सुद्धा >>>
अरे हे तर मी तुमच्या लिखाणाला म्हणले होते. मला वाटले तुम्हि कोपी करणे बंद कराल . पण अजुन चालुच आहे वाटते.
असो. निदान भाषांतर तरी केलेत बरे झाले. तेवढी सुधारणा पाहुन आनंद झाला.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
आणी ते सेफ्टीक नव्हे हो! सेप्टिक म्हणतात त्याला! काय तुम्हि पण!
अरे हे तर मी तुमच्या लिखाणाला
अरे हे तर मी तुमच्या लिखाणाला म्हणले होते.>> म्हणून तर हासलो राव! बघ मी किती प्रामाणिक आहे.
मला वाटले तुम्हि कोपी करणे बंद कराल .>> छे छे?? अहो पोटावर मारू नका???
पण अजुन चालुच आहे वाटते.>>> हो! चालूच आहे.![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
तुम्ही या धाग्याला पार विरंगुळ्याचेच पान बनवायला निघालात राव!![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
म्हणून तर हासलो राव! बघ मी
म्हणून तर हासलो राव! बघ मी किती प्रामाणिक आहे. >>
आधी तरी लिहायचे की राव. आता तुमच्या मनात काय ते आम्हाला कसे समजणार ?
छे छे?? अहो पोटावर मारू नका???>>>
तुम्हि अजुन कोपी करता हे वाचुन बरे वाटले. चालु द्या असेच.
तुम्ही या धाग्याला पार विरंगुळ्याचेच पान बनवायला निघालात राव>>>![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
मग तुमच्या एखाद्या धाग्याला बनवायचे का ? तसे सांगा की राव स्पष्टपणे! आडुनआडुन कशाला ?
दीपांजली, अजय आणि पराग
दीपांजली,
अजय आणि पराग तुम्हाला तो लेख पाहून जे वाटलं ती प्रतिक्रिया तिथेच दिली असती तरच योग्य नसतं झालं का ? >>>>> अजयनी जे लिहिलयं "एका व्यक्तीने त्याचे विचार मांडले आहेत आणि त्याची किंमत तेवढ्यापुरती. ज्यांना आवडेल त्यांनी वाचावं, इतरांनी दूर्लक्ष करावं." ह्याला अनुसरून त्यावर तेव्हा प्रतिक्रीया दिली नव्हती. आता अजयचा हा बाफ आल्यावर <<<<खरंच असं झालं असतं? तुम्हाला काय वाटतं? >>>>> ह्या प्रश्नाला उत्तर द्यावं असं वाटलं म्हणून मी उत्तर दिलं आहे आणि त्यात अजुन काय झालं असतं ह्याचा घटनाक्रम लिहिला आहे.
याची उदाहरणं देणं "मस्ट" आहे ती उदा. देता येत नसतील तर हा बीबी मा .बो वर असु नये असं माझं मत ! >>>> मैत्रेयीला दिलेल्या उत्तरात मी वर लिहीलच आहे. लेखांची उदाहरण नाही पण काही स्टेटमेंट्सचा उगीच विपर्यास केला गेल्याची काही उदाहरणं लक्षात आहेत. ती मी इथे देऊ इच्छित नाही. (हे माझं मत !
)
विपूंमधून, इमेल वरून, जीटॉकवरून आपापल्या कंपू मैत्रिणींना >>>>> Sorry ! इथे 'मित्र' हा शब्द लिहायचा राहिला. मी आधी वेगळं वाक्य लिहित होतो. नंतर एडीट करताना ते अजूनच चूकलं. आत्ता इथे तू देई पर्यंत लक्षात आलं नाही. वर बदलतो. ह्यामुळे फक्त स्त्रीआयडी असं काही करतात असं मी म्हणतोय असा समज होतं असेल तर क्षमस्व.. !
(मुलींना) जीटॉक वर असं बोलताना स्वतः पाहिलय का ? कुठल्या स्त्री आयडीने तुम्हाला अशी जीटॉक सेशन्स दाखवली आहेत का ?/ अशा इमेल्स करताना पाहिलय कोणाला पाहिलय का ? >>>>>
हा प्रश्न अजूनही वॅलिड असेल तर,
स्त्री आयडींची एकमेकींमधली इमेल किंवा जीटॉक सेशन्स मी पहाण्याचा आणि तसा डेटा दण्याचा प्रश्नच नाही. तो पॅरा मी मला आलेल्या अनुभवांनुसार लिहिला आहे. मला अश्याप्रकारचे मेसेजेस आले होते जीटॉकवर आणि इतर काही जणांनाही ते आल्याचं काही जणांनी नमुद केलं होतं. पुन्हा, इथेही नावं द्यावी असं मला वाटत नाही कारण ती मी लिहिलेली क्रमातली एक घटना आहे. मूळ मुद्दा कोण करू शकतं हा नसून काय होऊ शकतं हा आहे.
वाचणार्यांना एवढच वाटेल कि मुळात जे स्वतः हे सगळं करतात तेच इमॅजिन करु शकतात.. ! >>>>> तो वाचणार्यांचा प्रश्न आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अरे हि चर्चा पुन्हा प्रतिसाद
अरे हि चर्चा पुन्हा प्रतिसाद कसे असावे म्हणून आहे का?
मग काय फायदा नाही कारण परत तेच तेच मुद्दे येणार..
पराग, तुमच्या म्हणण्यानुसार
पराग,
तुमच्या म्हणण्यानुसार तुम्हाला नेहमीचे यशस्वी बाफ माहिती आहे असे दिसते जिथे तुम्ही वरच्या प्रतिक्रियेत लिहिलेले प्रकार चालतात. आम्हाला पण सांगा जरा भर पडेल...
बाकी, इथले काहि प्रतिसाद वाचून 'चोर पण तोच आणी साधूही तोच' असे काहिसे आठवले.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
अजय यांचा मुद्दा मला पटला.
अजय यांचा मुद्दा मला पटला. इथे मूळ लेखाचा विषय निघाला आहे व प्रतिसाद न देण्याचाही , म्हणून इथे लिहीत आहे की मूळ लेखाच्या शीर्षकापासूनच काही रीलेट करता आले नाही, त्यामूळे आवडण्याचा प्रश्नच आला नाही. मला स्वतःला असे कुठल्याही वयात पुरुषमय स्वप्ने वगैरे प्रकार झाले नाहीत, फक्त चेष्टा-मस्करी असे असायचे, पण नवरा/बॉयफ्रेंड कसा असावा वगैरे कधीच काही फँटसाईज केले नाही. त्यामुळे मूळ लेख आवडला नाही तरी नक्की का आवडला नाही ते न कळल्यामुळे मुद्दाम तिथे तशी काही प्रतिक्रिया दिली नव्हती, पण अजय यांच्यासारखे विचार साधारण मनात आलेच की हेच जर दुसर्या कोणी लिहीले असते तर कदाचित वेगळे प्रतिसाद आले असते. त्यामुळे न आलेल्या प्रतिसादांचा मुद्दा रास्त आहे.
शिवाय बर्याच जणांनी आवडल्याचे लिहीले तेव्हा ही पुरुषमय स्वप्नरंजनाची (तेही टीपीकल पोळ्या-मुरांबे वालीच) ही गोष्ट आपल्यालाच का खटकली याचे आत्मपरीक्षण चालू केले होते.
अजय यांच्या या लेखाशी सहमत आहे पण प्रतिक्रियांची सहमत आहेच असे नाही कारण बर्याच जणांनी त्यावर वेगवेगळे मुद्दे मांडले आहेत.
या लेखावर आलेले प्रतिसाद
या लेखावर आलेले प्रतिसाद लेखाचे समर्थन करायला पुरेसे आहेत असे मला वाटते.
एक गंमत म्हणून प्रतिक्रिया कशा कशा सरकत गेल्या ते पहा.
काहींना तो मान्य होणं, काहिंना नाही, काहींनी त्याचा दुसर्याच कशाशी तरी लावलेला संबंध, कुणि त्याचा वैयक्तिक अनुभवाशी जोडलेला संबंध, कुणी दुसर्या पानावरून इथे पुढे चालू केलेल्या उखाळ्यापाखळ्या सगळं आलं की
लेख कुठल्याही प्रकारच्या सहिष्णूतेला लागू पडतो (आणि तो पडावा अशी अपेक्षाही आहे). मायबोलीवरच्या कुठल्याही "ग्रूप" ला उद्देशून हे लेखन नव्हते. (म्हणजे हितगूज विभागात जसे ग्रूप आहेत तसे). पण आपल्यातल्याच असहिष्णू वृत्तिला उद्देशून होते. तुम्ही आम्ही (त्यात मी पण आलो) वेगवेगळ्या विषयांवर वेगवेगळ्या पातळ्यांवर असहिष्णू असतो. आणि एकदा असहिष्णू विचार प्रकट होऊ लागले की त्याचे वाढत्या पातळीवर Vicious Circle चालू होऊ शकते.
स्री-पुरूष या विषयावर मुद्दामच लिहले कारण त्यातल्या वादात भाग घेणे कुणालाही सोपे असते. इतर कुठलाही वादाचा विषय घेतला असता तर त्यात माहिती असणार्याच लोकांनी भाग घेतला असता आणि त्यातूनही कुठली माहिती खरी हा आणखी प्रश्न उभा राहिला असता.
माझ्या मते, आलेल्या प्रतिक्रीयांपैकी या काही प्रतिक्रिया, संवाद साधण्यासाठी सगळ्यात घातक आहेत (त्या प्रतिक्रिया देणार्यांना त्याची कल्पनाही नसेल. माझा रोख प्रतिक्रियांवर आहे, त्या देणार्या व्यक्तींवर नाही हे मुद्दाम स्पष्ट करतो. तसा वाटला तर त्यांची क्षमा मागतो)
>अजय... एका सुजाण व्यक्तीकडुन अश्याप्रकारच्या लेखप्रपंचाची अपेक्षा नक्कीच नव्हती...
>तुम्ही दखल घ्यावी असे काय होते त्यात असे वाटून सखेदाश्चर्य वाटले
>अॅक्चुअली असे कोणीतरी म्हणणार हे मी गृहित धरले होते. पण तुम्ही? वाईट वाटले जरा.
मी लेखन केले तेंव्हा माझ्याकडून कुणाच्या काय अपेक्षा आहे याची मला काहीच कल्पना नव्हती. त्यामुळे कुणाचातरी अपेक्षाभंग म्हणजे नक्की काय, हे कळणे मला कधीच शक्य नव्हते आणि त्यामुळे वादात कुठलीही बाजू घेतली असती तरी कुणाचा तरी अपेक्षाभंग झालाच असता. पण या प्रतिसादांमुळे माझ्या मूळ मुद्याकडे दुर्लक्ष होउन मी एक व्यक्ती म्हणून माझे पतन झाले आहे असा भाव निर्माण झाला. आता मी एक गेंड्याच्या कातडीचा आहे (१० वर्षे अॅडमीनगीरी केल्यावर ती होते !). पण कल्पना करा उद्या एखाद्या विषयावर वाद चालू असेल आणि "नेहमीच्या यशस्वींच्या" ऐवजी नवीन विचार असणारा कुणी भाग घेऊ इच्छीत असेल आणि "तुमच्याकडून अशी अपेक्षा नव्हती" असा प्रतिसाद आला तर तो कायमचा पळून जाईल आणि मग तो वाद पुन्हा नेहमीच्या यशस्वींमधे घोळत राहील.
त्यामूळे "तूझे चुकते आहे", "मूर्खासारखे बरळू नकोस" या प्रतिसादापेक्षा " तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती" हा प्रतिसाद जास्त असहिष्णू आहे.
तुमच्या सगळ्यांच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
ते वाक्य कुठलं होतं हे लिहीलं
ते वाक्य कुठलं होतं हे लिहीलं असतंत तर आम्हालाही समजायला मदत झाली असती की तुम्हाला मिळालेल्या प्रतिक्रिया न्याय्य होत्या की नाही ते. >>> मणिकर्णिकाने विचारलं आणि ,
>अजय... एका सुजाण व्यक्तीकडुन अश्याप्रकारच्या लेखप्रपंचाची अपेक्षा नक्कीच नव्हती >>> अशी एक प्रतिक्रिया वाचली . आणि अजयची वरील पोष्ट , ह्याला अनुसरुन, मायबोलीकर तेवढे सुजाण आहेत म्हणुन मी माझा अनुभव सांगतोय.
एका बीबीवर एकाने (पुरुष आयडी) रेसिपी विचारली आणि मी मजेत म्हणुन कॉमेंट टाकली की, " वेळीच लग्न केलं असतसं तर ही वेळ नसती आली." आणि बरोबर स्मायली पण दिली होती.
मी सगळ्या मायबोलीकरांना ( काही सोडुन) विचारतो की तुमची ह्या माझ्या वाक्यावर काय प्रतिक्रिया असती ?
तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती"
तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती" हा प्रतिसाद जास्त असहिष्णू आहे. >>> अनुमोदन! ह्या वादात पडायची इच्छा नव्हती. पण ह्या वाक्यामुळे लिहावे लागलेच.
मला तुम्ही मांडलेली बाजू / काही मुद्दे आवडले. तसेच गणूनेही बरेच चांगले मुद्दे मांडले. त्याच्या बर्याच मुद्यांना अनुमोदन.
इंटरनेटवरील वादात एख्याद्या आयडीच्या इतर लिखानामुळे उगाचच एक मत तयार होऊन बसते व तेच खरे वाटत राहते, जे बर्याचदा चुकही असू शकते / असते हे ध्यानात येत नाही. आणि नेमके त्यामुळे अशा भलत्याच अपेक्षा लादल्या जातात. पण त्यातही गंमत अशी की हे तुम्ही लिहिले असल्यामुळे फार सौम्य भाषेत ह्या प्रतिक्रिया आल्या हे ही तुम्हाला मान्य व्हावे. एखाद्या घडा क्लब मेंबराने लिहिले असते तर त्याचा उहापोह झाला असताच.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पण या प्रतिसादांमुळे माझ्या मूळ मुद्याकडे दुर्लक्ष होउन मी एक व्यक्ती म्हणून माझे पतन झाले आहे असा भाव निर्माण झाला. >>>> खरे आहे. असे काही लोकांना वाटने साहजिक आहे. पण ते 'त्यांचे वाटने' आहे, प्रत्यक्ष तसे नाही हे आपल्याला ठावूक असते. अगदी हाच विचार करून मी देखील त्या बाफवर एक पोस्ट मुद्दाम टाकली, दास होतो अशी. माझ्या त्या पोस्टला देखील एक दोन लोक खरे समजुन बसले ह्याची गंमत बघताना मजा आली. थोडक्यात माणसं पोस्टच्या दर्शनी मुल्यावर त्या व्यक्तीची पारख करतात. काही 'पालथा घडा' लोकांबद्दल मला असे वाटते की ते प्रत्यक्ष जिवनात तसे नसावेत, तर त्यांचे काही बाफ वरील काही पोस्ट त्यांना घडा ठरवायला कारणीभूत ठरले असावेत. वरच्या तुमच्या पतनाच्या मुद्यासारखे. अगदी अश्विनीमामींच्या बाबतीत पण असेच झाल्याचे त्यांनी सांगीतले व श्री ने पण. सखोल विचार न करता उथळ लिहिणारे असे दोष पोस्टकर्त्यांच्या माथी मारून मोकळे होतात.
लिंब्याची कुंकू लावलेलीच बायको हवी हे उदाहरण मोठे चपखल आहे. एखाद्या पालथ्या घड्या टाईप व्यक्तीने कुंकू लावायला हवे असे एके ठिकाणी लिहिले असते तर अनेक स्त्री मुक्ती वादी (स्त्री व पुरूष) त्याच्यावर नक्कीच तुटून पडले असते हे ही मला वाटते.
आणि अशा विषयांवर लिहिले की फक्त ब्लॅक किंवा व्हाईट (म्हणजे पुवडू किंवा ओपन) असेच वर्गीकरण अनेक व्यक्ती करतात. पण असे करता येत नाही, ग्रे शेड भरपूर असतात. मला नाही वाटत, हा लेख लिहून काही गैर झाले किंवा असा लेख लिहून अजय ह्या व्यक्तीचे पतन बितन झाले. अर्थात सगळेच पोस्ट कर्ते ग्रे शेडचे नसतात तर काही खरेच पालथे घडे असतात पण अजय ह्यांनी त्या लोकांसाठी हा लेख लिहिला नाही असे मला वाटले.
असो. हे असेच असणार आहे, ह्यात बदल होणार नाही हे माहिती असताना पण पोस्ट टाकलेच. वल्ड कप संपला आता मायबोली!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
त्यामूळे "तूझे चुकते आहे",
त्यामूळे "तूझे चुकते आहे", "मूर्खासारखे बरळू नकोस" या प्रतिसादापेक्षा " तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती" हा प्रतिसाद जास्त असहिष्णू आहे. >>>>>>> पूर्ण अनुमोदन, अजय. आपण किती सहजपणे दुसर्याच्या खांद्यावर ओझे ठेवतो. (पण मायबोलीवर अनेक वर्षे काढल्यावर कुठली ओझी स्वीकारावीत, कुठली नाहीत हेसुद्धा कळते, गेंड्याच्या कातडीसारखेच
) आपण आपल्यालासुद्धा पूर्ण ओळखू शकत नसताना दुसर्याला ओळखण्याची मात्र खात्री असते. गंमत आहे.
>>>>>> लेख कुठल्याही प्रकारच्या सहिष्णूतेला लागू पडतो (आणि तो पडावा अशी अपेक्षाही आहे)............................ Vicious Circle चालू होऊ शकते. <<<<<<< या परिच्छेदालासुद्धा पूर्ण अनुमोदन.
>>>>> आता मी एक गेंड्याच्या
>>>>> आता मी एक गेंड्याच्या कातडीचा आहे (१० वर्षे अॅडमीनगीरी केल्यावर ती होते !). <<<<<![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
)
अरेच्च्य्या, आईशप्पत, इत्का वेळ मी "अजय" म्हणजे फोटुवाला चित्रे काढणारा सातारी (सातारा बीबीवर असायचा म्हणून सातारी) अजय असे समजुन चाललो होतो!
(तरीच, मला थोडी शन्का आलिच होती तो फोटु/चित्रवाला अजय इतक्या गहन/स्फोटक विषयाला कसा काय हात घालतोय?
>>> " वेळीच लग्न केलं असतसं तर ही वेळ नसती आली." <<<<
वाट पहातोय
बहुधा मी पण जमा असणार, म्हणून मी त्यावर काहीच लिहीत नाहिये) ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
त्यावरल्या वाक्यावरच्या प्रतिक्रिया वाचाय्ला आवडेल.
( [पोळ म्हणून] "सोडून दिलेल्यात"
रूमाल ठेवलेली जागा खूपच मागे
रूमाल ठेवलेली जागा खूपच मागे पडलीये म्हणून इथे लिहिते.
अजयच्या 4 April, 2011 - 11:39 या पोस्टमधल्या या खालच्या मुद्द्यांच्या अनुषंगाने...
>>१. तुमच्या लेखाकडे जितक्या मोकळेपणाने ----- भाग्य सगळ्यांनाच मिळतं असं नाही.<<
>>>२. मी इथे मायबोलीवरच्या वाचकवर्गाबद्दल ----- हो असत्याच असे ठामपणे म्हणून शकत नसलो तरी नसत्याच असेही म्हणू शकत नाही.<<<
>>>३. लेख कुणी लिहला याला ----- इतक्या संयत प्रतिक्रिया आल्या असत्या का?<<<<
शक्य आहे. तू लिहिलायस म्हणल्यावर त्यातल्या गोष्टी पटल्या नाहीत तरी मारामारी झाली नाही. हाच लेख काही इतर विशिष्ठ आयडींनी टाकला असता तर कदाचित डोक्यात गेलाही असता. पण मग त्याचं कारण काय असावं? लिहिणार्याचं माबोवरचं पूर्वसंचित, लिहिणार्याकडून आलेला पूर्वानुभव, ऐकलेल्या गोष्टी?
पूर्वसंचित, पूर्वानुभव, ऐकलेल्या गोष्टी या मुद्द्यांच्या आधारेच वाचणारा लिहिलेल्या मजकुरातलं सबटेक्स्ट शोधत/ वाचत जातो. ही कुणाच्याही नकळत घडणारी सहज प्रक्रिया आहे. माबो किंवा कुठलेही संकेतस्थळ किंवा ब्लॉग या ठिकाणी अर्थातच फक्त लिखित विचार असतात. तेव्हा त्यातला समोर दिसणारा अर्थ आणि आतमधे असलेला अर्थ असं दोन्ही शोधणं होतंच की. लिखित बाबतीतच नाही तर समोरासमोर बोलतानाही होतं. आता ते लिहिणार्यावर/ व्यक्त होणार्यावर अन्यायकारक आहे का? तर हो आणि नाही दोन्ही.
पण हे टाळता येण्यासारखे आहे का? माबोवर वा एकुणात? तर नाही. मला नाही वाटत पूर्णपणे टाळता येण्यासारखे आहे. टाळलेच पाहिजे का? किंवा तसा प्रयत्न असायला हवा का? हो हे उत्तर खूप युटोपियन होईल. आणि प्रत्येक वेळी टाळायलाच हवे अशी गरज मला वाटत नाही.
आपण पूर्वग्रहदूषित (दूषित शब्दाला फारच निगेटिव्ह छटा आहे पण निगेटिव्ह वा पॉझिटिव्ह नसलेला याहून चपखल शब्द सापडत नाहीये!) कितपत असावे किंवा नसावे आणि पूर्वग्रह हा स्वानुभवावर आधारित असावा की ऐकीवावर हा ज्याच्या त्याच्या तारतम्याचा भाग आहे.
आता स्त्री-पुरूष संदर्भातच घ्यायचे झाले तर मधे एका गटगमधे आमची चर्चा झाली होती ज्यात आपण आपलं कर्तुत्व स्त्रीपणात मोजायचं की व्यक्तीपणात या मुद्द्यावर होतो. शेवटी निघालं असं एक व्यक्ती असणं महत्वाचंच पण स्त्री असणं हा त्याचा भाग आहे तो नाकारूनही चालणार नाही. पण स्त्री असणं हा मुद्दा व्यक्ती असणं या मुद्द्यापेक्षा महत्वाचा कधी होऊ द्यायचा हा आपल्या तारतम्याचा भाग आहे. हेच उदाहरण समोरच्या बाजूने बघितलं तर लिहिणारी एक व्यक्ती आहे हे पहिलं महत्वाचं पण त्या व्यक्तीचं स्त्रीपण वा पुरूषपण नाकारण्यात अर्थ नाही असं म्हणता येईलच.
बाकी शास्त्रीय किंवा तत्सम काही सत्य विधाने सोडल्यास सबटेक्स्टशिवाय कुठलीच गोष्ट बोलली/ लिहिली जात नाही. तू जो मुद्दा मांडलास तो वाचलं जाणारं सबटेक्स्ट आणि लिहिणारी व्यक्ती या मुद्द्याची सांगड घालून. सबटेक्स्ट ( कोणीतरी चांगला मराठी शब्द सुचवा कृपया!) अजून अनेक गोष्टींवर अवलंबून असू शकते पण तो इथला विषय नाही.
असो.
केदार, तुझ्या पोस्टमधे एकुणात
केदार, तुझ्या पोस्टमधे एकुणात पोस्टकर्त्याला पूर्णपणे क्लीनचिट दिलेली आहे असं वाटतंय. प्रथमदर्शनी तरी. तुला तसंच म्हणायचंय का?
टाळलेच पाहिजे का? किंवा तसा
टाळलेच पाहिजे का? किंवा तसा प्रयत्न असायला हवा का? >>>>> खूप महत्त्वाचा मुद्दा, नीधप. जर प्रयत्न करायचा नसेल तर तारतम्य आवश्यक ठरते (जे तू मांडले आहेसच). पण ते व्यक्तीसापेक्ष असल्याने परत आपण मूळ प्रश्नाकडेच येतो. या दुष्टचक्रातून बाहेर पडण्यासाठी व्यक्तीनिरपेक्ष भूमिका घ्यावी लागेल. तेव्हा तसे प्रयत्न करावे लागतील असे वाटते. आता आपण समोरच्या व्यक्तीचा लेखाजोखा पूर्वेतिहासावरून मांडतो, हे साहजिकच. पण त्यातला मुख्य धोका 'लेबल' लावण्याचा (वर्गवारी करण्याचा, 'निकाल' देण्याचा) असतो, तो जर टाळता आला तर आणखी काय पाहिजे?
नाही. अजिबात नाही. फक्त रियल
नाही. अजिबात नाही. फक्त रियल लाईफ मधील बेनिफिट ऑफ डाऊट त्याला देण्यात यावा असे मी लिहिले आहे.
काही पोस्टकर्ते महाभयानक लिहतात व ते खरेच तसे (कदाचित!) असावेतही असे अनेकांना वाटू शकते हे मला मान्य आहे. मी वर्गीकरण करण्याबद्दल लिहितोय. ते कोणी करत नाही असेही नाही. काही जण करतात, काही नाही, पण न करणारे कदाचित जोरात असू शकतात. व्यक्तींबद्दल नाही तर मुद्याबद्दल लिहितोय.
पण त्यातला मुख्य धोका 'लेबल'
पण त्यातला मुख्य धोका 'लेबल' लावण्याचा (वर्गवारी करण्याचा, 'निकाल' देण्याचा) असतो, तो जर टाळता आला तर आणखी काय पाहिजे?<<<
भलेभले नाही रे सुटत यातून.. आपण किस झाड की पत्ती!
बाकी लेबल, वर्गवारी, निकाल देणे हे आपण आपल्या आपल्या पातळीवर केल्याशिवाय जगात वावरू शकत नाही. प्रत्येक वेळी केवळ फेस व्हॅल्यूच शक्य नसतेच ना.
तस्मात.. या सगळ्याच गोष्टींना आपण जितकं खलनायक बनवतोय तित्क्या त्या आहेतच का ह्याचाही विचार व्हावा...
आता तर १० % ही नाही
आता तर १० % ही नाही पटले.
म्हणजे 'तुम्ही मुर्ख आहात' अशी प्रतिक्रिया आली तर तो गदारोळ (आणि 'तुम्ही मूर्ख आहात) असे कोणाला म्हणणे खरे म्हणजे आक्षेपार्हच. असो)
आणि 'तुमच्याकडुन ही अपेक्षा नव्हती' अशी प्रतिक्रिया आली तर ती असहिष्णु ?
नवीन विचार असणारा कुणी भाग घेऊ इच्छीत असेल आणि "तुमच्याकडून अशी अपेक्षा नव्हती" असा प्रतिसाद आला तर तो कायमचा पळून जाईल आणि मग तो वाद पुन्हा नेहमीच्या यशस्वींमधे घोळत राहील. >> आणि या ऐवजी 'तुम्ही मुर्ख आहात' अशी प्रतिक्रिया आली की नवीन व्यक्तीला आनंद होईल ?
I don't have an attitude problem, you have a perception problem- is cute only as a Dilbert joke. In real life, every action is going to have an equal and opposite reaction.
मृदुला - अनुमोदन.
@नीधप >आपण पूर्वग्रहदूषित
@नीधप
>आपण पूर्वग्रहदूषित कितपत असावे किंवा नसावे आणि पूर्वग्रह हा स्वानुभवावर आधारित असावा की ऐकीवावर हा ज्याच्या त्याच्या तारतम्याचा भाग आहे.
>बाकी लेबल, वर्गवारी, निकाल देणे हे आपण आपल्या आपल्या पातळीवर केल्याशिवाय जगात वावरू शकत नाही
>या सगळ्याच गोष्टींना आपण जितकं खलनायक बनवतोय तित्क्या त्या आहेतच का ह्याचाही विचार व्हावा...
होतं काय की ऑनलाईन लिहताना नुसती लेबलंच नाही तर त्याही पलिकडे जाऊन कृती करणं आणि त्याच्या परीणामांबद्दल काहीही देणंघेणं नसणं हे इतकं सोपं आहे की माणसातला खलनायक त्याचा नकळत जागा होतो. उद्या जर अशी टेक्नॉलॉजी निघाली घर बसल्या काही पुतळ्यांना डांबर फासायचं आणि नंतर होणार्या दंगलीचं काही देणंघेणं नाही तसं काहीस ऑनलाईन आयडीना करण सहज शक्य आहे.
@रैना
"तूम्ही मूर्ख आहात" म्हटल्यावर एखादा पळून जाईल हे खरे आहे. पण ज्याच्याकडे त्याला उत्तर देण्याची क्षमता आहे त्याला कमीतकमी हा आपल्या विरूद्ध बाजूचा आहे हे कळाले असेल. तुमच्याकडून अपेक्षा नव्हती म्हटले की हा कुठल्या बाजूचा आणि त्याचा नेमका मुद्दा काय आहे हे ही कळत नाही आणि खोडूनही काढता येत नाही.
To Every action, there is equal and opposite criticism -Readers Digest![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अरे ! सुरूवातीचे फोर सिक्सर
अरे ! सुरूवातीचे फोर सिक्सर थंडावले कि काय ?
कि दोन्ही बाजूंनी स्पिनर लावलेत आता ?
आतापर्यंतच्या खेळाचे हायलाईटस :
नादखुळा कुणाकडून खेळताहेत हा गोंधळ होता सुरूवातीला.. पण ते पंच आहेत असं कळलं. अकु यांनी सुनील गावस्कर स्टँडमधून स्टार स्पोर्टस साठी समालोचन करताना फलंदाजीच्या बेसिकचे वर्ग घेतले. पण इथं २० -२० चे बॅटसमन खेळत असल्याने त्यांनी ते मनावर घेतले नाहीत.
रैना खराब चेंडूच्या प्रतिक्षेत आहे. अजय यांच्या बॉलिंगवर ते फेकतात असा आरोप केला गेलाय. त्यांच्या बाजूने पराग ठामपणे उभे आहेत. स्त्रीवादी फलंदाजांचे जोरदार शॉटस पुरूषवादी क्षेत्ररक्षक डाईव्ह मारून अडवताना दिसताहेत.. त्यावरून कुठली टीम जिंकणार याचा अंदाज येतोय.
बेफिकीर अधूनमधून गुगली टाकण्याच्या प्रयत्नात फुलटॉस देताहेत. त्यावर दोन सिक्सर मिळाल्याने गणू यांनी मैदानावरच त्यांच्याशी प्रेमळ संवाद साधायला सुरूवात केलीये.
लिंबुटिंबू अधूनमधून बाटलीबंद पेय आणून देणे, तुटलेल्या बॅटी बदलून देणे अशा कामासाठी हजेरी लावून जात आहेत.
आता फलंदाजी करणा-या टीमचा पॉवरप्ले पहायला मिळेल या प्रतिक्षेत....
ता.क.. :सामन्याचं तिकीट ब्लॅकमधे विकलं जातंय.. संपर्क साधावा.
वरच्या पोस्टसाठी दिवे घ्या
वरच्या पोस्टसाठी दिवे घ्या ...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मला माहीत नव्हते की अजय हे
मला माहीत नव्हते की अजय हे अजय गल्लेवालेच आहेत.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आत्ता पाहिले, जेव्हा वेबमास्टर या आयडीतर्फे प्रतिसाद आला. (यावर विश्वास ठेवावात, गंमत म्हणून लिहीत नाही.)
आता माझा पुर्वग्रह प्रभावित झालेला असणार असे मला वाटते.
इतके पोझिंग आणि पुर्वग्रह-प्रभावित्व आपल्यात का भिनते यावर विचार करायला हवा.
(आपल्यात म्हणजे मला माझ्यात असे म्हणायचे आहे.)
धन्यवाद!
>>>> त्यामूळे "तूझे चुकते
>>>> त्यामूळे "तूझे चुकते आहे", "मूर्खासारखे बरळू नकोस" या प्रतिसादापेक्षा " तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती" हा प्रतिसाद जास्त असहिष्णू आहे. <<<<<
असे माझे मत - त्यान्ना जसेच्च्यातस्से व्यक्त होण्यास "शिमग्याची" वाट वर्षभर बघावी लागत नाही
]![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मला हे वाक्य १००% पटते आहे.
नेटच्या भासमान जगात राहुदेच, प्रत्यक्ष आयुष्यात भेटणारी जितीजागती माणसे देखिल प्रतिक्रियेमधे "सु:स्पष्ट व नेमके (समोरच्याचे हित वा अहिताचे)" न बोलता मोघम बोलतात, मोघम मत व्यक्त करतात वा करतच नाहीत (मौनं सर्वार्थ साधनम). वर त्यास सोफास्टिकेटेड म्यानर्सचे कारण देतात.
पण मनातील उद्भवलेले विचार जवळपास जसेच्या तसे रोखठोक व्यक्त न करता, शब्दच्छल करीत मोघम बोलणे, वा सोकॉल्ड सोफास्टिकेटेड सन्वादाकारणे निरनिराळे ढोन्गी बुरखे पान्घरुन साखरेच्या पाकात घोळवलेले बोलणे हे असत्य बोलण्याइतकेच पातक आहे असे मी मानतो. किम्बहुना, असत्य बोलण्याचे पातक माथी बसू नये/तसा हेत्वारोप होऊ नये म्हणूनच की काय, मनात उद्भवलेली प्रतिक्रिया जशीच्या तशी व्यक्त करण्याचे धाडस व हिम्मत फार थोड्यान्मधे असते. (नशिबात असेल तर) बहुधा आईबापभाऊबहिण व काही जवळची नातेवाईक यापैकी देखिल केवळ काही थोड्यान्मधेच येवढी हिम्मत असू शकते/दाखवतात, बाकीचे केवळ तुम्हांस साजेसे होयबा / वा / (तुमच्या विरोधी मत असेल तर बहुधा) मोघम मत व्यक्त करतात जे ऐकणारांस सर्वात जास्त धोकादायक असते.
आमच्या कोकणी खाक्यानुसार ही वृत्ती म्हणजे अहो, करन्गळीच्या जखमेवर औषध म्हणून करन्गळीभर मुताची धार टाकायला सान्गितली तरी काचकूच करणाच्या वृत्तीची माणसेच "व्यक्त" होण्यात देखिल येवढी कन्जुषी दाखवतात. [बाकी कोकणी माणसान्च्या अन्य व्यावहारिक कन्जुषी बद्दल कितीही बोलले/लिहीले जात असले तरी "अत्यन्त स्पःष्टपणे जसेच्यातस्से व्यक्त" होण्याच्या श्रीमन्ती बद्दल मात्र त्यान्चा हात सहसा कुणी धरणार नाही
असो.
(वरील एकूण पोस्टमधे मी बसिकमधेच काही चूकत असेन, तर चूक उमगल्या उमगल्या सुधारुन घेण्याइतपत माझ्या मेन्दूची वैचारिक कवाडे किलकिली आहेतच)
Pages