'पुरुष’मय स्वप्न च्या निमित्ताने
निमित्त आहे मणिकर्णिका यांचं ’पुरुष’मय स्वप्न हे विनोदी लेखन !
सगळ्यात महत्वाचं. हा लेख मायबोलीवर आहे यात काहीच वावगं नाही. हा लेख इतर अनेक वाचकांना आवडला तसा मलाही आवडला.
हा लेख विनोदी नसता तरी तितकाच योग्य आहे. एका व्यक्तीला वाटलेलं स्वप्न, विचार तिने हवे तसे मांडले. आणि माझ्यासकट अनेक वाचकांना ते तितकेच आवडल्याचंही दिसतंय.
माझा मुद्दा आहे त्यावर आलेल्या प्रतिसादांबद्दल.
किंवा त्यापेक्षाही त्यावर न आलेल्या प्रतिसादांबद्दल.
हाच लेख एका पुरुष मायबोलीकराने 'स्त्री' मय स्वप्न असा लिहला असता तर काय झालं असतं?
स्त्रीला एक भोग्य वस्तू म्हणून समजलं जातंय याचा निषेध करणारे अनेक प्रतिसाद आले असते.
विनोदी लेखन या नावाखाली काय वाटेल ते खपवता का असं त्या लेखकाला झोडपलं गेलं असतं.
"या पानावर जाऊन पहा. किती ओंगळ आणि गलिच्छ लिहिलंय. अजूनही स्त्रीयांकडे घाणेरडं बघण्याची दृष्टी जात नाही. चपलेंनं फटके मारले पाहिजे अशा लोकांना" असे संदेश विचारपुशीत दिले-घेतले असते.
"हा लेख विनोदी लेखन नावाखाली सरळ सरळ वेश्या व्यवसायाला उत्तेजन देणारा आहे. तेंव्हा तो काढून टाका आणि तो लिहणार्या व्यक्तीलाही मायबोलीवरून हाकलून द्या" असे संदेश अॅडमीनला गेले असते.
मायबोलीवरचं लेखन स्वातंत्र्य आणि लेखकाच्या मताशी प्रशासन सहमत असेलच असे नाही , हे लक्षात असतांनाही "मायबोलीसारख्या जाहीर संकेतस्थळावर असे विचार लिहूच कसे दिले" या वरून गदारोळ झाला असता.
एका व्यक्तीने त्याचे विचार मांडले आहेत आणि त्याची किंमत तेवढ्यापुरती. ज्यांना आवडेल त्यांनी वाचावं, इतरांनी दूर्लक्ष करावं. ही साधी सोपी गोष्ट विसरली गेली असती.
मानववंशाच्या सुरुवातीपासून, जगाच्या प्रत्येक कानाकोपर्यात, स्त्री पुरुषांबद्दल आणि पुरुष स्त्रियांबद्दल वेगवेगळ्या पातळीवर फॅन्टसाई़झ करत आले आहेत, करत राहतील ही जीवशास्त्रीय/मानसशास्त्रीय गोष्ट बाजूला पडली असती.
खरंच असं झालं असतं? तुम्हाला काय वाटतं?
इतके वाद
इतके वाद झाले.............किंवा केले गेले........परिणाम काय....?
शेवटी...........अजय यांची अपेक्षा पुर्ण कोणी केली का.........??
हाच लेख एका पुरुष मायबोलीकराने 'स्त्री' मय स्वप्न असा लिहला असता तर काय झालं असतं
श्री. अजय यांनी सांगीतलेले धनुष्या कोणी उचलेल का.......?? की नुसती दरबारात हजेरी लावुन तोंडसुख घ्यायचे.....?????
तसे श्री. बेफिकरांनी ते उचले पण चुकुन दुसरेच हाताला आले.....
सुजाण मबो करांनी आता उचलायलाच हवे.......नुसती चर्चा करुन काय फायदा होनार आहे.......
हे तर असे झाले .......लग्न ठरण्याआधीच घटस्फोटा साठी अर्ज केला ....आणी कारण दिले कि ५ वर्षांनी नवरा मारहाण करुन घरा बाहेर घालवनार आहे..........?????
स्त्री मय स्वप्न लिहा कोणी..........श्री अजय, बेफिकर, भिब्ररा...इ.....अनेक अर्जुन आहेत इथे...
मग अर्जुनांनो कसली वाट बघत आहे.........................श्री कृष्णाने परवाणगी दिली आहे........व्हा पुढे आणी उचला धनुष्य.......
मग बघु कोण कोणती चर्चा होते त्या वर.............
श्री कृष्णाने परवाणगी दिली
श्री कृष्णाने परवाणगी दिली आहे.>> आपण कोण नक्की?
आपण कोण नक्की?>>>>>>>>>>>>
आपण कोण नक्की?>>>>>>>>>>>> त्याने मला सांगितले..................मी आपनास सांगितले........
आता आणखी अर्जुन महाभारत सोडून
आता आणखी अर्जुन महाभारत सोडून रामायणातले धनुष्य उचलायला जाणार म्हणजे झालेच.
श्री कृष्णाने परवाणगी दिली
श्री कृष्णाने परवाणगी दिली आहे.>> आपण कोण नक्की?
>>> मलातर हा शकुनी मामा वाटतोय
उदय वन, माझे नांव
उदय वन,
माझे नांव उल्लेखलेल्याबद्दल आभारी आहे.
स्त्रीमय स्वप्न न लिहिताच माझ्या एका लेखावर 'द एक्स्ट्रॉ मॅरायटल - प्रेमा कतलानी' यावर स्त्री मय स्वप्नावर यावेत तसे काही प्रतिसाद आलेले आहेत.
तरी प्रयत्न करतो, स्त्रीमय स्वप्न लिहिण्याचे!
'वादात या कुणीही सहसा पडू नये' या ओळीशी माझे वागणे विसंगत आहे. मला वादात पडायला हरकत नसते.
म्हणून तसा लेख लिहीतो.
धन्यवाद!
-'बेफिकीर'!
तरी प्रयत्न करतो, स्त्रीमय
तरी प्रयत्न करतो, स्त्रीमय स्वप्न लिहिण्याचे!
>>> वावा आपण टणत्कार केला ...आता होवुनच जाउदे ....
.
कालच एक होता विदुशक मधली " भरलं आभाळ पावसाळी पाहुणा गं " ही लावणी ऐकताना आपण त्या मोहन आगाशेच्या जागी असावं असं " स्त्रीमय स्वप्न मनात आलं होतं
'वादात या कुणीही सहसा पडू नये' या ओळीशी माझे वागणे विसंगत आहे. मला वादात पडायला हरकत नसते.
>>> कधी वाटते मी भिडावे जगाशी , कशाला फुकाचेच वाटे कधी |
कधी मी निवडतो सरळ सोट रस्ता , उगा फोडतो कैक फाटे कधी || ....मी या डॉ. शेराशी सुसंगत वागावे म्हणतो
म्हणून तसा लेख लिहीतो. >>> मी ही लिहितो .:फिदी:
अजय तुम्ही म्हणताय काय चूक
अजय तुम्ही म्हणताय काय चूक झाली कळेल का ?
स्त्री मय स्वप्न लिहा कोणी..........श्री अजय, बेफिकर, भिब्ररा...इ.....अनेक अर्जुन आहेत इथे...
मग अर्जुनांनो कसली वाट बघत आहे.........................श्री कृष्णाने परवाणगी दिली आहे........व्हा पुढे आणी उचला धनुष्य.
प्रयत्न करतो, स्त्रीमय स्वप्न लिहिण्याचे!
'वादात या कुणीही सहसा पडू नये' या ओळीशी माझे वागणे विसंगत आहे. मला वादात पडायला हरकत नसते.
म्हणून तसा लेख लिहीतो.
वावा आपण टणत्कार केला ...आता होवुनच जाउद
>>>>> यातून काही लक्षात येतेय का ?
आता यानंतर मुद्दाम लिहायचा म्हणून कुणी स्त्रीमय स्वप्न असा लेख लिहिला (अॅडमिननीच परवानगी दिलीय लिहायची असे मानून ?!) तर कुणीतरी ऑपोझिट सेक्सबद्दल फॅन्टसाइझ करणे इतका निरागस हेतू असेल का या लेखाचा ?
मला अजिबात वाटत नाही की असे काही व्हावे हा तुमचा हेतू असेल , पण आता या गोंधळाचा फायदा घेऊन अशा कुरापती निघाल्या तर त्याला अंशतः तुमचा हा लेख जबाबदार असेल की नाही ? हे तुम्हाला नक्कीच अभिप्रेत नव्हते (अशी अपेक्षा नव्हे खात्रीच आहे मला)
माझ्यामते तसा लेख लिहिणे हे
माझ्यामते तसा लेख लिहिणे हे अजय यांच्या लेखाच्या आधी सुचले असते तर हा प्रतिसाद आवश्यक वाटला नसता आपल्यालाच!
'जे झाले त्याची जबाबदारी आता अॅडमीनची' आहे असा स्टॅन्ड घेण्याची जरूर नाही असे मला वाटते.
माझ्याबाबत बोलायचे तर मी अनेक विडंबने केलेली आहेत. स्त्री मुक्ती खो खो चेही! ते काही अॅडमीन यांनी सांगितलेले नव्हते. किंवा त्यांच्या लेखानंतर रचलेले नव्हते.
अॅडमीन यांचा हेतू चर्चा घडवून आणण्याचा आहे, आपण त्या चर्चेत काही जणांचे 'आंतरजालीय वागणे' बघा असा काहीतरी रंग भरत आहात असे मला वाटते.
तसे नसल्यास क्षमस्व!
-'बेफिकीर'!
लेख कसे असतात त्यात शब्द
लेख कसे असतात त्यात शब्द प्रयोग कसे असते.........माझ्या मते या वरुनच प्रतिसाद इतर देतात..........अत्यंत सुंदर असे लिखान असेल तर त्याला प्रतिसाद सुध्दा छानच मिळतो..........
मैत्री...... आधी लेख तर येउ द्या.......आधीच कशाला संशय कल्लोळ करावा...........
कुणास ठाउक मणीकर्निका यांच्या सारखा छान प्रतिसाद या येनार्या लेखाला सुध्दा लाभेल..........
सकारात्मक बघा...........
पेशवा , थोडं स्पष्ट करून
पेशवा , थोडं स्पष्ट करून सांगणार का कारण त्यामुळे कशी दिशाभुल झाली आणि चूक झाली? मला ख्ररच समजत नाहीये. >>>
दिशाभुल अशामुळे कि मणि चा लेखावर न आलेल्या प्रतिक्रिया, न आल्यने कुथेतरि पुरुषांवर वा तशा प्रकरचे लेख लिहिणार्य पुरुषांवर माय्बोलिचे वाचक अन्याय करतात असा सुर जाणवला... तो तसा होता का? तुमच्या लेखातील :
मानववंशाच्या सुरुवातीपासून, जगाच्या प्रत्येक कानाकोपर्यात, स्त्री पुरुषांबद्दल आणि पुरुष स्त्रियांबद्दल वेगवेगळ्या पातळीवर फॅन्टसाई़झ करत आले आहेत, करत राहतील ही जीवशास्त्रीय/मानसशास्त्रीय गोष्ट बाजूला पडली असती.
तुम्ही कोठेतरि अशा पुरुष लेखकांचे (त्यांच्या हक्कंचे नाही) समर्थन करत आहात असा भास झाला. त्यामुळॅ बर्याच प्रतिसादकांची दिशाभुल झाली.
कुणालाही काहिहि म्हणायचा हक्क आहे (च) तो लेखकही बजावतात व प्रतिसादकही इतकेच मला वाटते.
हा लेख निवडन्यात काही अंशि चुक अशा अर्थाने वाटले कि पुरुषाने असे स्वप्न रंजन लिहिणे आणि स्त्रिने उघड पणे लिहिणे ह्यात सामाजिक अंतर मोठे आहे. सविता भाभि असु शकते त्याच चालीवर शौकत देवर अस काही ऐकले आहे काय? एका अर्थाने मणि ने असा लेख उघडपणे लिहिणे जास्त समर्थक आहे पुरुषावर अन्यायकारक असले तरि...
लोकांच्य काय अपेक्षा आहेत हे कधिच कळु शकत नाही म्हणुनच अशा प्रतिसादाकडॅ दुर्ल्क्श करावे असे वाटते.
.
.
पेशवा, परफेक्ट !!
पेशवा,
परफेक्ट !!
मैत्रेयी, पेशवा
मैत्रेयी, पेशवा अनुमोदन.
गंमतीनं एखादा लेख लिहिणं आणि विचारसरणी फक्त एकाच केंद्रबिंदूभोवती फिरत असल्यानं/विचारसरणीच तशी असण्यानं सतत असलेच लेख येत रहाणं ह्यात फरक आहे..
ही लाईन ड्रॉ कोण करणार?
तर ती एखाद्या व्यक्तीचे "काही"(संख्यात्मक काही) लेख/त्या व्यक्तीची इतरांच्या लेखावरची मतं वाचल्यावर आपोआप होते.
म्हणूनच मणिकर्णिकेनं कोट केलेल्या पुलंच्या वाक्याला पुलं केवळ ते पुरुष आहेत म्हणून विरोध होत नाही.
अशा विरोधामागे, आपल्याला त्या/आधीच्या पोस्ट मधून कळलेली त्या माणसाची मतंच कारणीभूत असतात.
---मग अर्जुनांनो कसली वाट बघत
---मग अर्जुनांनो कसली वाट बघत आहे.........................श्री कृष्णाने परवाणगी दिली आहे........व्हा पुढे आणी उचला धनुष्य......-----
--आता आणखी अर्जुन महाभारत सोडून रामायणातले धनुष्य उचलायला जाणार म्हणजे झालेच --
अर्जुन महाभारत सोडून
अर्जुन महाभारत सोडून रामायणातले धनुष्य उचलायला जाणार म्हणजे झालेच>>>>>>>
लोकांनो ..............महाभारतात सुध्दा धनुष्य उचलले होते......... महाभारत बघितले नाही का?????????
.
.
Pages