'पुरुष’मय स्वप्न च्या निमित्ताने
निमित्त आहे मणिकर्णिका यांचं ’पुरुष’मय स्वप्न हे विनोदी लेखन !
सगळ्यात महत्वाचं. हा लेख मायबोलीवर आहे यात काहीच वावगं नाही. हा लेख इतर अनेक वाचकांना आवडला तसा मलाही आवडला.
हा लेख विनोदी नसता तरी तितकाच योग्य आहे. एका व्यक्तीला वाटलेलं स्वप्न, विचार तिने हवे तसे मांडले. आणि माझ्यासकट अनेक वाचकांना ते तितकेच आवडल्याचंही दिसतंय.
माझा मुद्दा आहे त्यावर आलेल्या प्रतिसादांबद्दल.
किंवा त्यापेक्षाही त्यावर न आलेल्या प्रतिसादांबद्दल.
हाच लेख एका पुरुष मायबोलीकराने 'स्त्री' मय स्वप्न असा लिहला असता तर काय झालं असतं?
स्त्रीला एक भोग्य वस्तू म्हणून समजलं जातंय याचा निषेध करणारे अनेक प्रतिसाद आले असते.
विनोदी लेखन या नावाखाली काय वाटेल ते खपवता का असं त्या लेखकाला झोडपलं गेलं असतं.
"या पानावर जाऊन पहा. किती ओंगळ आणि गलिच्छ लिहिलंय. अजूनही स्त्रीयांकडे घाणेरडं बघण्याची दृष्टी जात नाही. चपलेंनं फटके मारले पाहिजे अशा लोकांना" असे संदेश विचारपुशीत दिले-घेतले असते.
"हा लेख विनोदी लेखन नावाखाली सरळ सरळ वेश्या व्यवसायाला उत्तेजन देणारा आहे. तेंव्हा तो काढून टाका आणि तो लिहणार्या व्यक्तीलाही मायबोलीवरून हाकलून द्या" असे संदेश अॅडमीनला गेले असते.
मायबोलीवरचं लेखन स्वातंत्र्य आणि लेखकाच्या मताशी प्रशासन सहमत असेलच असे नाही , हे लक्षात असतांनाही "मायबोलीसारख्या जाहीर संकेतस्थळावर असे विचार लिहूच कसे दिले" या वरून गदारोळ झाला असता.
एका व्यक्तीने त्याचे विचार मांडले आहेत आणि त्याची किंमत तेवढ्यापुरती. ज्यांना आवडेल त्यांनी वाचावं, इतरांनी दूर्लक्ष करावं. ही साधी सोपी गोष्ट विसरली गेली असती.
मानववंशाच्या सुरुवातीपासून, जगाच्या प्रत्येक कानाकोपर्यात, स्त्री पुरुषांबद्दल आणि पुरुष स्त्रियांबद्दल वेगवेगळ्या पातळीवर फॅन्टसाई़झ करत आले आहेत, करत राहतील ही जीवशास्त्रीय/मानसशास्त्रीय गोष्ट बाजूला पडली असती.
खरंच असं झालं असतं? तुम्हाला काय वाटतं?
अजय, माझ्याही मनात आलं होतं
अजय, माझ्याही मनात आलं होतं हे... तुम्हीच लिहिलं ते बरं झालं..
खरंच असं झालं असतं? >>>>> अगदी १०० % झालं असतं !! ह्याच्याही पुढे म्हणजे नेहेमीच्या यशस्वी आयडींनी नेहमीच्या इतर यशस्वी आयडींना (त्यांचा लेख लिहिण्याशी संबंध असो वा नसो) झोडपलं असतं.. "पालथा घडा ब्रिगेड" वगैरे सारख्या टर्म्स अनेकदा वापरल्या गेल्या असत्या किंवा अशाच टर्म्स नविनही जन्माला आल्या असत्या... नेहेमीच्या यशस्वी वाहत्या बाफंवर त्यावर तावातावाने चर्चा झाली असती, चर्चा करून संपल्यावर भरपूर टिंगल टवाळी झाली असती, ते ही करून दमल्यावर "आपण का जगाला सुधारायचा ठेका घेतलाय? .. जाऊ द्या झालं... दुसरं काही बोला" असं म्हणून विषय बदलला गेला असता... विपूंमधून, इमेल वरून, जीटॉकवरून आपापल्या कंपू मित्र-मैत्रिणींना "जरा अमूक नोड वर काय लिहिलय बघ.. त्याचा तमूक लेखक आणि त्याला अनुमोदन / छान म्हणणारा ढमूक आयडी ह्यांचा निषेध नोंदवा.. अॅडमिनच्या विपूत जाऊन तक्रारपण केलीस तर फारच उत्तम" असे संदेश गेले असते... शेवटी तिथली "चर्चा" वैयक्तिक पातळीवर घसरून कोणीतरी तोल ढळून काहितरी बोललं असतं. मग अॅडमिननी एखाद्या आयडीला पुढच्या वेळी "कडक कारवाई" करण्याचा दम भरला असता.. मग "पुरेशी चर्चा करून झाला असल्याने" तो बाफ बंद करावा लागला असता..
>>हाच लेख एका पुरुष
>>हाच लेख एका पुरुष मायबोलीकराने
म्हणजे कोणी? ते फार महत्त्वाचं आहे.
ते कळल्याशिवाय काय झालं असतं हे अजिबात सांगता येणार नाही.
लालू अजय, मणिकर्णिकाचा लेख
लालू
अजय, मणिकर्णिकाचा लेख पटला असं नाही, तसा तर जिल्लेईलाही का कोण, त्या आयडीचाही पटला नव्हता..
अनुभवातून कधीकधी (थोडफार) शहाणपणही येऊ शकतं म्हणजे
अजय, तुम्ही लिहिलेल्या बाजूचा
अजय, तुम्ही लिहिलेल्या बाजूचा विचार डोक्यातही आला नाही. ती बाजू लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद.
पराग, तू म्हणतोस तसंही नक्कीच झालं असतं. पालथा घडा क्लबच्या मेंबरांनी कुठे काय लिहितोय ह्याचा विसर पडून यथेच्छ हात धुवून घेतले असते.
अजय तुझ्या प्रत्येक वाक्याला
अजय तुझ्या प्रत्येक वाक्याला १०० टक्के अनुमोदन , जर एखाद्या पुरुषाने अशा प्रकारचा लेख लिहिला असता तर खुप गदारोळ माजला असता. काय नको नको ते शेरे दिले गेले असते. घाणेरडं काय , गलिच्छ मनोवृत्ती काय , काय काय नावं दिली गेली असती , खरचं स्त्रीयांना प्रत्येक पुरुष हा लंपट , स्त्रीच्या मागे लागणारा वाटतो का ? खरतरं मला पण मणिकर्णिकाचं विनोदी लेखन असलं तरी पटलं नाही पण तरीही त्या लेखणावर मी खेळकर प्रतिसाद दिला . हे म्हण्जे ह्यांनी लिहिलं तर विनोदी लेखन आणि आम्ही लिहिलं तर घाणेरडी मनोवृत्ती , हा कुठला न्याय ?
मला मायबोलीवर व्यक्तीशः ओळ्खणार कोणीही नाही पण तरीही मी नेहमी संयमी प्रतिक्रिया देण्याचा / वागण्याचा प्रयत्न करत असतो.
मध्यंतरी मी एका बीबी वर एक वाक्य खुप लाईटली लिहिलं होतं , खरतरं माझा कुणालाही दुखवायचा हेतू नव्हता , पण तरीही काही आयडींनी माझा निषेध केला , ज्यांनी माझा निषेध केला त्यांच्याबद्दल माझं काहीही म्हणणं नाही , पण काही आयडींनी अगदी खालच्या पातळीवर जाऊन माझ्यावर डिसगस्टींग कॉमेंट (आणि अजुन बरचं काही) वगैरे सारखे (बिनअकली ) शेरे ओढले. मायबोलीवर काही दीड्शहाण्या ( मोजक्या २-३ ) आयडीज आहेत ज्या स्वतःला जास्त शहाण्या समजतात , आणि कुठलाही विचार न करता त्या दुसर्यांवर शिंतोडे उडवतात. पण त्यांना एवढं कळायला पाहीजे होतं की स्त्रीचीच काय पण कुणाचीच मानहानी , अपमान मी करणार नाही. पण उपयोग काय , त्या आयडीज नी वापरलेल्या वाक्यांचा मला खुप खुप त्रास झाला.
पण त्याच बीबीवर काही इतर आयडीज नी मला समजुन घेतलं आणि धीर दिला. मी त्यांचा खुप खुप ऋणी आहे.
पण एक आहे आता जर मला असले फालतु काँमेंटस कोणी पास केले तर कानफडात वाजवणारे प्रतिसाद मी देणार आहे.
असो माझ्या मनात जे आजवर साचलं होतं ते मी आज बाहेर काढलं.
अरे, मला वाटलेलं की
अरे, मला वाटलेलं की त्यावयातील तुमच्या स्वप्नांबद्दल लिहिलेलं असेल.
मेधा तोच लेख मणिकर्णिके ऐवजी
मेधा
तोच लेख मणिकर्णिके ऐवजी दुसर्या कोणी लिहिला असता तरी तुला आत्तापेक्षा वेगळे प्रतिसाद दिसले असते कदाचित.
तुझा मुद्दा "मायबोलीवरचं लेखन स्वातंत्र्य" असा आहे का? तसा असला तर तू ज्या तो पद्धतीने मांडलास त्यावरुन याला पुढे स्त्रिया विरुद्ध पुरुष वादाचा रंग येणार. आणि परागने जे काय लिहिलंय ते याच बाफवर/बद्दल होणार. तसा नसेल तर "पुरुषांच्या लेखनावर स्त्रियांच्या प्रतिक्रिया" असा असेल तरी तेच होणार.
भो आ क फ.
हे मा शे पो.
अनुमोदन सध्या दिल्ली
अनुमोदन सध्या दिल्ली मुक्कामी आहे मग विचार करून प्रतिक्रिया लिहिणार.
मध्ये मी पण एका बाफवर वस्तुस्थिती व्यक्त करणारी पण स्त्रीयांच्या बद्दल सहानुभूती दर्शविणारीच पोस्ट लिहीली होती पण पूर्ण विषय किंवा माझी आत्ता पर्यंतची विचारसरणी याला काहीच महत्त्व न देता ती पोस्ट काहींना खटकली होती.
feminism is a way of life for me and not an option हे तरी माहीत पाहिजे होते असे मला तेव्हा वाटले होते. पण मग व्यक्तिस्वातंत्र्याचा आदर करून सोडून दिल्हे.
अजय, उत्तम पोस्ट. हे सगळे खरच
अजय, उत्तम पोस्ट. हे सगळे खरच नको नको होते. पण व्यक्तिस्वातंत्र्य .....
मायबोलीवर वावरताना
मायबोलीवर वावरताना प्रत्येकाचे एक व्यक्तीमत्त्व समोर आलेले असते. प्रत्यक्षात तो / ती काही वेगळे असू शकतील पण इथल्या लेखांतून, प्रतिसादातून त्या व्यक्तीबद्दल एक धारणा निर्माण होते. विविध विषयांवरील प्रत्येकाची मते वाचून त्या व्यक्तीच्या विचारांचा अंदाज येतो. यामुळेच लेख 'कोणी' लिहिला हे बरेचदा महत्त्वाचे ठरते. ही सापेक्षता अपरिहार्य आहे असं मला वाटतं.
अरे बापरे! हा लेख माझं आणि
अरे बापरे!
हा लेख माझं आणि माझ्या ' विनोदी' पोस्टचं नाव घेऊन लिहीला गेलाय त्यामुळे मला काही खुलासे करणं./विचारणं भाग आहे.
<<’हाच’ लेख एका पुरुष मायबोलीकराने ’स्त्री’ मय स्वप्न असा लिहला असता तर काय झालं असतं?
स्त्रीला एक भोग्य वस्तू म्हणून समजलं जातंय याचा निषेध करणारे अनेक प्रतिसाद आले असते.
माझ्या लेखाचा संदर्भ आहे आणि ’ह्याच’ लेखासारखा लेख म्हटलं आहे म्हणून विचारते- माझ्या लेखात पुरुषाला ’भोग्य’ वस्तू समजावी असं मी काय लिहीलंय? गोल पोळ्या करणं, एकही सुरकुती न ठेवता कपडे झटकून वाळत घालणं, गाद्या घालणं, चिकन-मॅगी करून हाताशी आणुन देणं, आम्ही दत्तक घेतलेली मुलं सांभाळणं, लोणचं-मुरांबे भरून ठेवणं, पापड-सांडगे घालणं???
अरे? हे सर्व तर बायासुद्धा करतात.
मी माझ्या स्वप्न लिहीताना कमरे खालचे विनोद केलेले नाहीत, कोणतीही द्व्यर्थी वाक्यं नाहीत. पुरुष लोकांच्या गालावर खळी, बारीक कंबर, शेलाटी, मोठेमोठे डोळे एटसेट्रा फँटसी असतात (आठवा: पु.शि.रेग्यांची पुष्कळा) त्या धर्तीवर माझी ही पुरुष फँटसी आहे . पुरुषांनी 'ह्याच' धर्तीवर 'स्त्री'मय स्वप्न लिहीलं असतं तर ते स्वप्न राहिलं असतं का? ती तर वस्तुस्थिती झाली असती.
<<या पानावर जाऊन पहा. किती ओंगळ आणि गलिच्छ लिहिलंय. अजूनही स्त्रीयांकडे घाणेरडं बघण्याची दृष्टी जात नाही. चपलेंनं फटके मारले पाहिजे अशा लोकांना
<<"हा लेख विनोदी लेखन नावाखाली सरळ सरळ वेश्या व्यवसायाला उत्तेजन देणारा आहे. तेंव्हा तो काढून टाका आणि तो लिहणार्या व्यक्तीलाही मायबोलीवरून हाकलून द्या" असे संदेश अॅडमीनला गेले असते"
ह्याच लेखावर आधारीत लेख लिहीला गेल्यावर हे म्हटलं गेलं असतं हे जरा अति होतंय अजय. पहिले माझा लेख आवडलाय हे सांगून आणि मग असं लिहून, तुम्ही माझ्या लिखाणावर प्रश्नचिन्ह उभी करताय हे लक्षात येतंय का तुमच्या?
स्त्री बद्दलची पुरुषांची फ़ॅंटसी आपण वर्षानुवर्षे वाचत आलोय. मग ती व.पुंची वन फॉर द रोड मधली असो किंवा साक्षात पु.लंची- ’असा मी असामी’ मधली त्यांना ’एक तरुणी घाटच्या पायरया उतरत उतरत येते आणि आपल्या अंगावरचे कपडे....जाऊद्या" अशा प्रकारचे स्वप्नाबद्दलच्या कल्पना असोत. त्यांच्या कार्यक्रमांना भरभरुन गर्दी करणारया हे सर्व स्त्रियांनी स्पोर्टींगली घेतल्याचे दिसतेय. माझा एक मित्राने त्याच्या लेखात बायकांच्या 'ए.सी., बी.सी, एम.सी' अशा वर्गवारया केलेल्या आहेत, त्याच्या लेखांना स्त्री-वाचकांचा प्रतिसाद जोरदार असतो. या वर्गवारीवर आतापर्यंत कुठल्या बाईने आक्षेप घेतल्याचे ऐकीवात नाही. अजय, मुद्दा तोच आहे नं. कुठे थांबायचं ते कळलं पाहिजे जे बरयाच लोकांना कळत नाही.
पब्लिक फोरमवर एकच माणूस अनेक नावांनी वावरत असेल तर खोडसाळपणा हा होणारच. मर्यादा ओलांडल्या जाणार, त्यावर वादंग होणार. मला नाही वाटत कमरेखालचा एकही विनोद न करता, द्व्यर्थी वाक्यं न टाकता, पाचकळ-आचरट्पणा न करता 'ह्याच' लेखासारखा लेख एखाद्या पुरुषाने लिहीला असता(करीना माझ्यासाठी जेवणाचं ताट घेऊन येतेय किंवा मल्लिका वारा घालतेय) तर कोणतीही 'स्त्री' किंवा कोणीही आक्षेप घेईल. लेख चांगला लिहीला असेल तर मी ही नावाजेनच.
आता श्री. श्री.
<<मध्यंतरी मी एका बीबी वर एक वाक्य खुप लाईटली लिहिलं होतं. खरतरं माझा कुणालाही दुखवायचा हेतू नव्हता , पण तरीही काही आयडींनी माझा निषेध केला , ज्यांनी माझा निषेध केला त्यांच्याबद्दल माझं काहीही म्हणणं नाही , पण काही आयडींनी अगदी खालच्या पातळीवर जाऊन माझ्यावर डिसगस्टींग कॉमेंट (आणि अजुन बरचं काही) वगैरे सारखे (बिनअकली ) शेरे ओढले.
ते वाक्य कुठलं होतं हे लिहीलं असतंत तर आम्हालाही समजायला मदत झाली असती की तुम्हाला मिळालेल्या प्रतिक्रिया न्याय्य होत्या की नाही ते.
<<ह्यांनी लिहिलं तर विनोदी लेखन आणि आम्ही लिहिलं तर घाणेरडी मनोवृत्ती.
मी लिहीलं म्हणून घाणेरडी मनोवृत्ती 'विनोदी लेखनाखाली' खपली असं दर्शवण्याजोगं मी नेमकं काय लिहीलंय हे जर नेमकं बोट ठेवून दाखवलंत म्हणजे मलाही सोप्पं आणि वाचणारयालाही सोप्पं जाईल.
किंवा त्यापेक्षाही त्यावर न
किंवा त्यापेक्षाही त्यावर न आलेल्या प्रतिसादांबद्दल
>>
अजयजी असले निरर्थक लिखाणावर प्रतिक्रिया देण्याऐवजी इग्नोअर मारणे उचित् वाटले असल्यास त्यामुळे न आलेल्या प्रतिसादातून काही शोधण्याचा प्रयत्न करणे व्यर्थ आहे. सोइस्कर पुरोगामित्वाचा आव आणून ठिकठिकाणी प्रसंगपरत्वे आपल्या प्रतिगामीपणाचे पुरावे सोडणार्यांनी मायबोलीवर नुसता धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे मा बो वरचे बरेच लिखाण अदखलपात्र होत चालले आहे. तुमचे नाव वाचून उत्सुकतने पहिल्यान्दा तुमचा बी वाचून नन्तर 'तो 'धागा वाचला. तुम्ही दखल घ्यावी असे काय होते त्यात असे वाटून सखेदाश्चर्य वाटले तुमच्याबद्दल...
ईट वाज जस्ट टाइमपास फॉर सिलेक्टेड ऑडियन्स.
मणिकर्णिका, अनुमोदन. तो लेख
मणिकर्णिका, अनुमोदन.
तो लेख कुठेही खटकला नव्हता.
बाकी कुणी कुठे काय लिहावे हा ज्याचा त्याचा प्रश्न.
अजय्/पराग, अनुमोदन पण
अजय्/पराग, अनुमोदन
पण मनकर्णिकेचा तो लेखहि छानच आहे हां!
>>> किंवा त्यापेक्षाही त्यावर न आलेल्या प्रतिसादांबद्दल
अरे बाजो, त्याला "अनुल्लेख" म्हणायच असेल!
अजय... एका सुजाण व्यक्तीकडुन
अजय... एका सुजाण व्यक्तीकडुन अश्याप्रकारच्या लेखप्रपंचाची अपेक्षा नक्कीच नव्हती...
अजय, नाही पटलं. म्हणजे एरवी
अजय,
नाही पटलं. म्हणजे एरवी मुद्दा योग्य आहे पण मणिकर्णिका च्या लेखाच्या संदर्भाने हा मुद्दा अयोग्य वाटतो.
का आणि कसं हे तिच्या वरच्या पोस्टमधे तिनेच जास्त चांगले मांडले आहे.
बाकी गोल पोळ्या, कपडे सुरकुतीशिवाय वाळत घालणं... इत्यादी अनेक अपेक्षा (स्वप्न नव्हे!) वास्तवात लग्नाच्या वेळेला बाईकडून केल्या जातातच की. आणि त्या अपेक्षांमधे गैर काहीच नाही असं मानलं जातंच ना. मग एक स्वप्न (जे स्वप्न आहे याची लिहिणारीला पुरेपूर जाणीव आहे) म्हणून लिहिलेल्या गोष्टी इतक्या का खटकाव्यात?
बाकी अजून काही लिहिल्यास गदारोळाचा आरोप तुम्हीच कराल. तेव्हा राहुदे.
>>>> बाकी गोल पोळ्या, कपडे
>>>> बाकी गोल पोळ्या, कपडे सुरकुतीशिवाय वाळत घालणं... इत्यादी अनेक अपेक्षा (स्वप्न नव्हे!) वास्तवात लग्नाच्या वेळेला बाईकडून केल्या जातातच की. आणि त्या अपेक्षांमधे गैर काहीच नाही असं मानलं जातंच ना. मग एक स्वप्न (जे स्वप्न आहे याची लिहिणारीला पुरेपूर जाणीव आहे) म्हणून लिहिलेल्या गोष्टी इतक्या का खटकाव्यात?
नी, पुढे दिलेले अजयचे आख्खे वाक्यच "स्किप" करुन देशस्थी घोळ घालू नकोस!
>>>हा लेख विनोदी नसता तरी तितकाच योग्य आहे. एका व्यक्तीला वाटलेलं स्वप्न, विचार तिने हवे तसे मांडले. आणि माझ्यासकट अनेक वाचकांना ते तितकेच आवडल्याचंही दिसतंय. <<<
अजयला कुठेही त्या अपेक्षा वा त्या लेखात लिहिलेल्या गोष्टी खटकलेल्या नाहीत हे वरील वाक्यावरुन उघडच आहे.
त्याचा मुद्दा केवळ असा आहे की एखाद्या पुरुषाने (वा पुरुष आयडीने म्हणा हव तर ) स्त्रीबद्दलच्या कशाही अपेक्षा लिहील्या तर तेव्हा मात्र काहूर उठते असे काहीसे त्याला म्हणायचे आहे.
लिम्बू चाचा , आज चुकीच्या
लिम्बू चाचा , आज चुकीच्या जागी उभे आहेत काय ?
चल खटकाव्यात हा माझा शब्द
चल खटकाव्यात हा माझा शब्द चुकला. त्या संदर्भात मणिचं वरचं पोस्ट वाच. तिने जास्त चांगले मांडले आहे.
ओह, पराग आहे तो, केल दुरुस्त,
ओह, पराग आहे तो, केल दुरुस्त, थ्यान्क्स!
>>>> आज चुकीच्या जागी उभे आहेत काय ?
जागी? अन उभे???? अरे बाजो, गेले दोन दिवस अवसेचे गेलेत, तर काय ना, लिम्बीला तिच्या माझ्याबद्दल असलेल्या "पुरुषमय स्वप्न्नान्ना" सुरुन्ग लागल्याचा बर्याच वर्षान्पासूनचा साठून असलेल्या साक्षात्काराचा स्फोट होऊन अस्मादिक त्यात तिनताड उडालेत, सबब सध्या त्रिशन्कू!
हाच लेख एका पुरुष
हाच लेख एका पुरुष मायबोलीकराने 'स्त्री' मय स्वप्न असा लिहला असता तर काय झालं असतं?>>>
मला नाही वाटत की 'स्त्री'मय स्वप्न असा लेख लिहिला गेला असता; सत्यात उतरलेल्या गोष्टींची कोण कशाला स्वप्न रंगवेल?
बाकी, वर ज्यांनी 'असा लेख लिहिला गेला असता तर तो 'कोणी' लिहिलाय आणि 'कसा' लिहिलाय यावर प्रतिक्रिया अवलंबून आहेत' असं म्हटलंय त्या सर्वांना अनुमोदन
मणिकर्णिकेचं उत्तर अचूक आहे आणि पटलंय.
हळद मीठ लावून... दे घुमाके
हळद मीठ लावून... दे घुमाके !!
चालू द्या... मी वॉचिंग हं
लिम्बूचाचा (आणि समस्त
लिम्बूचाचा (आणि समस्त लिम्बूवर्गीय फळांनो ); त्रिशंक्वातून धाडदिशी खाली आपटल्यावर तू गोल मऊसूत पोळ्या करायला शिकून घे .ते कुठलेसे घड्याळ घे. ऑडी अथवा तत्सम गाडी विकत घे . चिकन बिर्याणी करायला शीक्.अंगण झाडायला शीक. इस्त्री करायला शीक. शिकण्यासाठी अनन्त आभाळ आहे तुला. तरच तुला घरात नोकर म्हणून का होईना रहाता येईल... अर्थात दिल पे मत ले यार. ही केवळ फ्यान्टसी आहे . आणि केवळ रंजनात्मक हेतूने प्रसिद्ध करण्यात आले आहे. तुला नोकरी नसती तर तुला घरकामालाही ठेवले नसते एवढे लक्षात ठेव आणि नोकरी गमावू नकोस. वाल्या कोळ्याला कसा 'डिसओन' केला त्याने नोकरी सोडल्यावर आठवते ना. तू विकलांग झालाच तर 'म्युन्शिपाल्टीच्या गाडीची' डोल्यात प्राण आणून वाट पहा..
तर गड्या (म्हणजे मित्रा; घरगडी नव्हे. उगीच डोक्यात राख घालू नको . हे सगळे खेळीमेळीत आणि निखळ विनोदात आहे) विद्यार्थी हो गुलामा ... (इथे गालगुच्च्यानतरचा 'गुलामा...' शब्द आहे. सगळं सांगावं लागतं.:()
मणिकर्णिका (आणि
मणिकर्णिका (आणि इतरही)
तुमच्या लेखात मला काही ही खटकण्यासारखे वाटले नाही हे मी स्पष्टपणे लिहले आहे. त्यातल्या पुरुषांनी कराव्याश्या कुठल्याही गोष्टी स्रीयाही करतात हे पूर्ण मान्य आहे. म्हणून तुमच्या लेखापेक्षाही त्यावरच्या प्रतिक्रियांवर किंवा नसलेल्या प्रतिक्रियांवर मी लिहले आहे. लेखकाने/लेखिकेने प्रांजळ मनाने लिहलेल्या गोष्टीं कशा उगाच मोठ्या केल्या जातात हे सांगायचे आहे.
माझा मुद्दा.. (किंवा मुद्दे म्हणा)
१. तुमच्या लेखाकडे जितक्या मोकळेपणाने पाहिले गेले (ज्यांना तो आवडला त्यांनी प्रतिसाद लिहले ज्यांना नाही त्यांनी सोडून दिलं) हे भाग्य सगळ्यांनाच मिळतं असं नाही.
२. मी इथे मायबोलीवरच्या वाचकवर्गाबद्दल बोलतो आहे. प्रत्यक्षात तुम्ही दिलेली उदाहरणे मला पूर्ण मान्य आहेत. पण तीच जर उदाहरणे (ते लेखन) समजा आज मायबोलीवर लिहली असती तर प्रतिक्रिया वेगळ्या असत्या का? हो असत्याच असे ठामपणे म्हणून शकत नसलो तरी नसत्याच असेही म्हणू शकत नाही.
३. लेख कुणी लिहला याला आपण इतके महत्व द्यायला लागलो आहोत की साहित्याचा, लेखनाचा निर्मळ मनाने आस्वाद घेण्या ऐवजी त्या लेखकाच्या/लेखिकेच्या पूर्व प्रतिसादांच्या, पूर्व इतिहासाच्या चष्म्यातून किंवा ती व्यक्ती स्त्री आहे का पुरुष याच्या चाळणीतून सगळीकडे पाहतो आहोत का? अगदी हेच माझे विचार दुसर्या कुणी लिहले असते तर त्याला/तीला इतक्या संयत प्रतिक्रिया आल्या असत्या का?
अजय, आत्ता जरा घाई आहे
अजय, आत्ता जरा घाई आहे त्यामुळे तपशीलात उत्तर लिहिणे शक्य नाही. पण तूर्तास माझा इथे रूमाल.
मूळ लेखाशी सहमत आहे.
मूळ लेखाशी सहमत आहे.
स्त्रीमय स्वप्न लिहायला काय हरकत आहे म्हणा?
कुणीतरी लिहा नाहीतर मी लिहितो.
पोटेन्शियल सब्जेक्ट वाटला, स्त्रीमय स्वप्न!
(या शेवटच्या विधानावरच एक मोठा गदारोळ अपेक्षित आहे.)
<<मला नाही वाटत की 'स्त्री'मय
<<मला नाही वाटत की 'स्त्री'मय स्वप्न असा लेख लिहिला गेला असता; सत्यात उतरलेल्या गोष्टींची कोण कशाला स्वप्न रंगवेल? >> अनुमोदन.
पुरुषाची स्वप्ने या त्याच्या अपेक्षा असतात, स्त्रीच्या अपेक्षा स्वप्ने ठरतात.
अमक्या तमक्या अभिनेत्रीसारखी बायको /मैत्रीण हवी अशा आशयाची वाक्ये लेखनात वाचायला मिळाली तर दचकायला होतं का कुणाला? शिरीष कणेकर, संझगिरी यांच्या लेखनात समस्त बॉलीवूड तारकांनी हजेरी लावलीय की.
@लाडकी >अजय... एका सुजाण
@लाडकी
>अजय... एका सुजाण व्यक्तीकडुन अश्याप्रकारच्या लेखप्रपंचाची अपेक्षा नक्कीच नव्हती...
@बाळू जोशी
>तुम्ही दखल घ्यावी असे काय होते त्यात असे वाटून सखेदाश्चर्य वाटले
तुमचा अपेक्षाभंग झाला याचे दु:ख आहे. पण सगळ्या वाचकांच्या सगळ्या अपेक्षा सर्व वेळा कुणालाही पूर्ण करता येईल असं मला वाटत नाही. हे लिहतांना मी पूर्ण विचार करून लिहले आहे आणि तुमचा जो प्रतिसाद आला तसे काही प्रतिसाद येतील याचीही कल्पना होती. पण म्हणून एका मला महत्वाच्या वाटणार्या (इतरांना किती वाटेल ते ज्याचे त्याने ठरवायचे आहे) मुद्याबद्दल बोलायचेच नाही हे मला पटले नाही.
बाजो = LOL >>>> लेख कुणी
बाजो = LOL
>>>> लेख कुणी लिहला याला आपण इतके महत्व द्यायला लागलो आहोत की साहित्याचा, लेखनाचा निर्मळ मनाने आस्वाद घेण्या ऐवजी त्या लेखकाच्या/लेखिकेच्या पूर्व प्रतिसादांच्या, पूर्व इतिहासाच्या चष्म्यातून किंवा ती व्यक्ती स्त्री आहे का पुरुष याच्या चाळणीतून सगळीकडे पाहतो आहोत का?
या चाळणीला "ड्युप्लिकेट आयडीचे" अजुन एक भोक हवे आहे
अजय, मला वाटतं की मणिने
अजय, मला वाटतं की मणिने लिहिला आहे तितका निखळ विनोदी आणि तसा किंवा त्याहीपेक्षा उत्कृष्ट आणि निखळ लेख - 'स्त्री' मय स्वप्न असा कोण्या माबोकराने लिहिला असता, तर त्याला नक्कीच प्रतिसाद आले असते. तुम्ही केलेली सगळीच्या सगळी तुलना फारशी पटली नाही (मणिच्या लेखाचे उदाहरण ग्राह्य धरुन ), तरीही लिखाण कोणाचे आहे - ह्या मुद्द्याला अनुमोदन.
Pages