'पुरुष’मय स्वप्न च्या निमित्ताने
निमित्त आहे मणिकर्णिका यांचं ’पुरुष’मय स्वप्न हे विनोदी लेखन !
सगळ्यात महत्वाचं. हा लेख मायबोलीवर आहे यात काहीच वावगं नाही. हा लेख इतर अनेक वाचकांना आवडला तसा मलाही आवडला.
हा लेख विनोदी नसता तरी तितकाच योग्य आहे. एका व्यक्तीला वाटलेलं स्वप्न, विचार तिने हवे तसे मांडले. आणि माझ्यासकट अनेक वाचकांना ते तितकेच आवडल्याचंही दिसतंय.
माझा मुद्दा आहे त्यावर आलेल्या प्रतिसादांबद्दल.
किंवा त्यापेक्षाही त्यावर न आलेल्या प्रतिसादांबद्दल.
हाच लेख एका पुरुष मायबोलीकराने 'स्त्री' मय स्वप्न असा लिहला असता तर काय झालं असतं?
स्त्रीला एक भोग्य वस्तू म्हणून समजलं जातंय याचा निषेध करणारे अनेक प्रतिसाद आले असते.
विनोदी लेखन या नावाखाली काय वाटेल ते खपवता का असं त्या लेखकाला झोडपलं गेलं असतं.
"या पानावर जाऊन पहा. किती ओंगळ आणि गलिच्छ लिहिलंय. अजूनही स्त्रीयांकडे घाणेरडं बघण्याची दृष्टी जात नाही. चपलेंनं फटके मारले पाहिजे अशा लोकांना" असे संदेश विचारपुशीत दिले-घेतले असते.
"हा लेख विनोदी लेखन नावाखाली सरळ सरळ वेश्या व्यवसायाला उत्तेजन देणारा आहे. तेंव्हा तो काढून टाका आणि तो लिहणार्या व्यक्तीलाही मायबोलीवरून हाकलून द्या" असे संदेश अॅडमीनला गेले असते.
मायबोलीवरचं लेखन स्वातंत्र्य आणि लेखकाच्या मताशी प्रशासन सहमत असेलच असे नाही , हे लक्षात असतांनाही "मायबोलीसारख्या जाहीर संकेतस्थळावर असे विचार लिहूच कसे दिले" या वरून गदारोळ झाला असता.
एका व्यक्तीने त्याचे विचार मांडले आहेत आणि त्याची किंमत तेवढ्यापुरती. ज्यांना आवडेल त्यांनी वाचावं, इतरांनी दूर्लक्ष करावं. ही साधी सोपी गोष्ट विसरली गेली असती.
मानववंशाच्या सुरुवातीपासून, जगाच्या प्रत्येक कानाकोपर्यात, स्त्री पुरुषांबद्दल आणि पुरुष स्त्रियांबद्दल वेगवेगळ्या पातळीवर फॅन्टसाई़झ करत आले आहेत, करत राहतील ही जीवशास्त्रीय/मानसशास्त्रीय गोष्ट बाजूला पडली असती.
खरंच असं झालं असतं? तुम्हाला काय वाटतं?
अॅक्चुअली असे कोणीतरी
अॅक्चुअली असे कोणीतरी म्हणणार हे मी गृहित धरले होते. पण तुम्ही?
वाईट वाटले जरा. असो.
मणिला/ नीधपला/ भरतमयेकरांना अनुमोदन.
राहता राहिला प्रश्न गदारोळाचा. मायबोलीवर कशाने गदारोळ होईल याचे काही सांगता येते का? आणि तीच तर मेख आहे.
पूर्वग्रहांची (चष्म्यांची) यादीच द्यायची तर त्यात माझ्यामते कंपु (मत मांडणार्याचे नेटवर्क म्हणुयात हवे तर), धर्म, कल्ट, देव, मत मांडणार्यांची पत आणि पद्धत, देशात की देशाबाहेर स्थित इ.इ. हे 'लिहीणारी व्यक्ती स्त्री की पुरूष' या घटकापेक्षा निश्चीत जास्त आढळुन येतात. मग फक्त याच एका घटकाचा उहापोह का?
मायबोलीवर व्यक्ती पाहून जर गदारोळ होत असतील असे गृहितक मांडायचे असेल तर त्यात किती वेळा त्या त्या आयडीचे लेखनही तितक्याच प्रमाणात त्याला कारणीभूत असते? नसतेच असे मी तरी छातीठोकपणे म्हणू शकणार नाही. 'आम्ही वाट्टेल ते लिहू पण तुम्ही संयत प्रतिक्रियाच द्या' हे शक्य तरी आहे का?
>>> मग फक्त याच एका घटकाचा
>>> मग फक्त याच एका घटकाचा उहापोह का?
सिम्पले, कारण हे दोनच घटक पृथ्वीवरील तमाम मानवांस दोन भागात विभागतात.
अन कोणताच मानव (खरे तर) या दोन घटकान्च्या परस्परावलंबनाशिवाय/परस्परान्ची दखल घेतल्याशिवाय वेगळा स्वतन्त्र राहु शकत नाही. (रहायचे असेल तर सन्याशी बनावे लागेल अन ते देखिल महाकर्मकठीण आहे.)
इतर धर्म/कल्ट/देश्/राष्ट्र/भाषा/जात इत्यादिक बाबीन्चे केवळ दोन नाही तर सन्ख्यात्मक दृष्ट्या अनेक प्रकार पडतात. शिवाय भौगोलिकदृष्ट्या एका ठिकाणच्या बाबीचे गाम्भिर्य-तीव्रता दुसरीकडे असतेच असेही नाही.
असो.
बाकी चालुद्यात
> किंवा त्यापेक्षाही त्यावर न
> किंवा त्यापेक्षाही त्यावर न आलेल्या प्रतिसादांबद्दल.
"तसे" प्रतिसाद आले असते तर त्यातुन असे वाटले असते की खरेच असे कुठे घडत असावे. किंवा निदान तसे शक्य तरी असावे. आणि तशी आडुन सुद्धा कबुली देणे म्हणजे केवढी नाचक्की.
स्त्रीयांवर तसाच लेख येता तर मात्र प्रतिसाद आले असते कारण स्त्रीयांबाबत तसे विचार सतत केले जात असतात. त्यामुळे ते लिखाण sensitive व politically incorrect ठरते, खास करुन मायबोली सारख्या ठिकाणी . मायबोली ऐवजी मायापुरी असते तर गोष्ट वेगळी (योग्य की नाही ते लिहीत नाही, पण वेगळी).
विनोद हा exceptions मधुन बनतो. स्त्रियांवरील लेख विनोदी नसता वाटला. त्यात त्यांना साधारणपणे पुरषी समजल्या जाणार्या गोष्टी करायला लावल्या असत्या तरीसुद्धा. कारण वरचेच.
कोणी लिहिले यावर अर्थातच अनेक गोष्टी अवलंबुन नको - पण रोजच्या जिवनाशी विषय निगडीत असले की तसे होणारच. एक सेमी-जोकींग (म्हणजेच सेमी-सिरियस) सुचना: काही दिवसांकरता मायबोलीवर पोस्ट केल्यानंतर २४ तास खरे नाव दिसणार नाही, नुसतेच "निनावी" दिसेल अशी व्यवस्था केली तर? २४ तासांनतर आपोआप खरे नाव (म्हणजे खरे-खोटे जे काय) दिसेल, व त्यादरम्यान बदल पण करता येणार नाही.
अजय , काय झाले असते आणि नसते
अजय , काय झाले असते आणि नसते अशी चर्चा सुरू करण्यापेक्षा तुम्ही जर असा 'स्त्रीमय स्वप्न' टाईप लेख लिहून इथे टाकला असतात , तर प्रत्यक्ष प्रतिक्रीयाच मिळाल्या असत्या की !!
अजुनही वेळ आहे. लिहून टाका असा लेख. आणि अंदाज करत बसण्यापेक्षा प्रत्यक्षातच बघा की काय प्रतिक्रीया येतायेत ते !!
aschig चा प्रतिसाद अतिशय
aschig चा प्रतिसाद अतिशय पटला. १०००% अनुमोदन!!
अंधळ्याला कोणी अंधळा आहेस म्हणले तर त्याला राग येईल, वाईट वाटेल. डोळस माणसाला कोणी असे म्हणले तर तेव्हढे वाईट वाटणार नाही. जसे खालच्या समजल्या जाणार्या जातींच्या लोकांचा 'जातीवरून' उल्लेख केला तर त्यांना राग येईल पण तसा राग उच्चवर्णीयांना येणार नाही.
अजय, मला भावना कळल्या. पण एक
अजय,
मला भावना कळल्या.
पण एक कटू सत्य, आहेच.
मूळ लेखातही हे केवळ स्वप्नरजन आहे, व प्रत्यक्षात उतरण्याची शक्यता नाहीच, असाच समारोप झालाय.
पुरुषांना तशी (म्हणजे स्वप्नातली ) सहचारिणी मिळणे अगदीच अशक्य आहे, असे नाही.
स्त्रीवादी साहीत्य असं वेगळं
स्त्रीवादी साहीत्य असं वेगळं नांव देण्याची गरज का निर्माण झाली असावी ?
ज्यांना सगळं विनासायास मिळतं त्यांच्या राज्यात राज्यकर्त्यांना आपले नोकर बनवणे हा कल्पनाविलास असू शकतो... त्यातून एक असहाय्य विनोद निर्माण होतो जो एन्जॉय करून लाईफ सुसह्य बनवणं यात स्त्रिया माहीर असतात. जरी शब्दात मांडता आलं नाही तरी आपल्या घरातील, नात्यातील स्त्रियांवरून परिस्थितीची खरी कल्पना सर्वांना असतेच कि !!
मग वेगळं काहीतरी.. विकर सेक्शन म्हणूनही प्रोत्साहन दिलं जातं. हेच पुरूषाने लिहीलं तर त्यात काय चार्म असणारे ? लोक जेव्हां म्हणतात आम्ही दु:खं विसरायला सिनेमा बघायला जातो.. तिथंही रोजचंच रडगाणं दाखवलं तर कशाला जाऊ .. असंच काहीतरी..
म्हणजे आता आता पर्यंत तरी. आता स्त्री कमावती झाली म्हटल्यावर फरक पडतोय आणि पडनारै.. तेव्हा हा लेख लिहायचीही गरज नसेल.
स्त्रीमय स्वप्नं असा लेख सत्यात येवो आणि त्याला उस्फूर्त प्रतिसाद लाभोत...असा लेख सुपरहीट होण्यासारखी परिस्थिती निर्माण होवो.... खरच !! आणखी काय पाहीजे ?
ही कविता इथं द्यावीशी
ही कविता इथं द्यावीशी वाटतेय..
बरसले अशी मी, हाहा:कार झाला
======================
इशारे दिले ना, कुणी घात केला
बदनाम झाले मी, बोभाटा झाला
तुमच्या दिव्याने, हा दिन वर आला
सांभाळ लुटल्या मी, रातींचा केला
सदिच्छा या माझ्या, घ्या तुमच्या यशाला
जिथे माझ्या पतनाचा, जयघोष झाला
तुमच्या तेजाचा, इथे बोल बाला
मी चमकून गेले, हा अपराध झाला
अश्रूंचा माझ्या जेव्हा अवमान झाला
बरसले अशी मी, हाहा:कार झाला
संध्या
रैना,डेलिया अश्चिग, जोरदार
रैना,डेलिया अश्चिग, जोरदार अनुमोदन.
उगाच 'यूं होता तो कैसा होता' करत बसण्यापेक्षा एक 'स्त्रीस्वप्न' लेख होउन जाउद्या.
विनोद हा exceptions मधुन
विनोद हा exceptions मधुन बनतो. स्त्रियांवरील लेख विनोदी नसता वाटला. त्यात त्यांना साधारणपणे पुरषी समजल्या जाणार्या गोष्टी करायला लावल्या असत्या तरीसुद्धा. कारण वरचेच. >>>>
जसे खालच्या समजल्या जाणार्या जातींच्या लोकांचा 'जातीवरून' उल्लेख केला तर त्यांना राग येईल पण तसा राग उच्चवर्णीयांना येणार नाही. >>>>
मग वेगळं काहीतरी.. विकर सेक्शन म्हणूनही प्रोत्साहन दिलं जातं. हेच पुरूषाने लिहीलं तर त्यात काय चार्म असणारे ? >>>
यावरुनच लक्षात येते आपण किती अपरिपक्व आहोत अजुनहि. निषेध करणेही सापेक्ष असते. पुर्वी माझ्या एका लेखात मी लिहिले होते - आपल्याला राग नक्कि कशाचा येतो ? प्रत्यक्ष क्रुतीचा की क्रुतीमागच्या अन्यायाचा ? जर अन्यायाचा येत असेल तर त्यात पुरुष, स्त्री, हिंदु, मुसलमान, ब्राह्मण, मराठा असे भेदभाव असु नयेत. पण तसे दिसत नाहि. प्रत्येक अन्यायाचा मग तो कोणीही करो सारख्याच तीव्रतेने निषेध झाला पाहिजे.
अजय तुमचा मुद्दा योग्यच आहे . आणी मला वाटते तुम्हाला हेच म्हणायचे आहे.
मला या लेखाचा हेतू फारसा कळला
मला या लेखाचा हेतू फारसा कळला नाही. म्हणजे मणि चा लेख अयोग्य नाही असे एकीकडे म्हटले आहे. अन त्या अनुषंगाने इथले इतर इन्सिडन्सेस हार्मलेस, निर्मळ स्वप्नरंजनच होते पण प्रतिक्रिया मात्र "अतिरेकी" होत्या असा जनरलायझेशन करणारा सूर मला वाटला. जे मुळीच मान्य नाही. मला पराग चे पोस्ट सुद्धा अजिबात पटले नाही.
मी संयुक्ताच्या "खो खो" च्या दरम्यान मी हा मुद्दा मांडला होता की ज्या स्त्रिया पुरुषी वर्चस्ववादावर काही ना काही विरोध दाखवतात त्यांना नेहमीच दाबण्याचा प्रयत्न होतो, पूर्वी दगडं मारली जायची अन आता थोडे सोफिस्टिकेशन म्हणून टिंगल करणे, कजाग, भांडकुदळ म्हणणे असे चालते.
स्त्रीला एक भोग्य वस्तू म्हणून समजलं जातंय याचा निषेध किंवा अजूनही स्त्रीयांकडे घाणेरडं बघण्याची दृष्टी जात नाही. चपलेंनं फटके मारले पाहिजे अशा लोकांना" असे संदेश यात चुकीचे काय होते ? नेमकी उदाहरणे देऊ शकता का, जिथे एखाद्या आयडीने खरे तर निर्मळ लेख लिहिला होता न इथल्या स्त्री आयड्यांनी मात्र कारण नसताना विपर्यास करून निषेध, चपलेने मारा अशा प्रतिक्रिया दिल्या ??
अजय, तुम्ही लेख लिहिला, नेमकी उदाहरणे अन नेमके मुद्दे न देता, त्यामुळे झाले काय की इथे सगळ्या संयुक्ता ब्रिगेड ची जनरलायज्ड टिंगल करायला कोलित मिळाले पब्लिक ला !! पराग चे पोस्ट त्यातलेच . यशस्वी आयडी (?) असे बोलले असते अन तसे म्हटले असते , अन "शेवटी तिथली "चर्चा" वैयक्तिक पातळीवर घसरून कोणीतरी तोल ढळून काहितरी बोललं असतं." यातून चक्क असा अर्थ निघतो की चर्चेला तोल ढळायला जबाबदार मूळ कमेन्ट नाहीच, तर त्यावर निषेध करणारे स्त्री आयडी !! हे बरंय की !!
चला अजयराव माझा लेख लिहून
चला अजयराव माझा लेख लिहून पूर्ण झालेला आहे. लवकरच प्रकाशित होईल.
या निमित्ताने मला वेळ घालवायला संधी दिल्याबद्दल आपले अनेक आभार!
-'बेफिकीर'!
maitreyee स्त्रीला एक भोग्य
maitreyee
स्त्रीला एक भोग्य वस्तू म्हणून समजलं जातंय याचा निषेध किंवा अजूनही स्त्रीयांकडे घाणेरडं बघण्याची दृष्टी जात नाही. असे तुम्हि म्हणता. >>>>
मुळ पुरुषमयस्वप्न लेखातुन पुरुषाला भोग्य वस्तू (किंवा गुलाम) समजले गेले आहे असे नाहि वाटत तुम्हाला ? विनोदी असु द्या, स्वप्न असु द्या, समजले तर भोग्य वस्तुच आहे ना. यात न कळण्यासारखे काय आहे ?
म्हणुनच मी म्हणले की प्रगल्भता अजुन आली नाही. आपण किती अपरिपक्व आहोत अजुनहि!
प्रत्येक अन्यायाचा मग तो कोणीही करो आणी कोणाविरुद्धही करो - सारख्याच तीव्रतेने निषेध झाला पाहिजे.
माझाही तोच मुद्दा आहे. तो
माझाही तोच मुद्दा आहे. तो मूळ लेख जर पुरुषांवर अन्याय करणारा वाटला तर तसे लिहा की. त्यामुळे आधी स्त्री विषयक गैर कमेन्ट्स किंवा लेखांवर केले गेलेले समस्त निषेध चुकीचे किंवा ओव्हर रिअॅक्ट केलेले असे ठरतील का ? तेही सगळे एकत्र जनरलायज्ड करून ?
त्यामुळे आधी स्त्री विषयक गैर
त्यामुळे आधी स्त्री विषयक गैर कमेन्ट्स किंवा लेखांवर केले गेलेले समस्त निषेध चुकीचे किंवा ओव्हर रिअॅक्ट केलेले असे ठरतील का >>>
मला नाहि वाटत असे कोणी म्हणले आहे.!
दुसरा मुद्दा , जे अजयने लिहिले आहे - तेही बरोबरच आहे.
(लिम्ब्या, शिन्च्या आता मोठी
(लिम्ब्या, शिन्च्या आता मोठी माणसं बोलताहेत इथ तर आपण बोलू नै, नाक/तोन्ड खुपसू नै, नुस्त वाचून काढ बघू! )
ठीक आहे, आता बस करते . आता
ठीक आहे, आता बस करते . आता हपिसात वाचता किंवा उत्तरे देता येणार नाहीत.तेव्हा असो.
एका व्यक्तीने त्याचे विचार मांडले आहेत आणि त्याची किंमत तेवढ्यापुरती. ज्यांना आवडेल त्यांनी वाचावं, इतरांनी दूर्लक्ष करावं.
हे वाक्य छान अहे. फक्त ते नेहमी जमत नाही - मला तरी.हे मात्र खरे.
>>स्त्री पुरुषांबद्दल आणि
>>स्त्री पुरुषांबद्दल आणि पुरुष स्त्रियांबद्दल वेगवेगळ्या पातळीवर फॅन्टसाई़झ करत आले आहेत, करत राहतील
अगदी खरे. पातळ्या वेगवेगळ्या - त्यातली 'खालची' पातळी गाठली की उपरोक्त चपलेच्या फटक्यांचे प्रतिसाद येतात. सर्वसाधारण पातळीवरील लेखाला टोकाचे वाईट प्रतिसाद आल्याचे उदाहरण द्यावे.
त्यातली 'खालची' पातळी गाठली
त्यातली 'खालची' पातळी गाठली >>>>
म्हणजे कोणती हाच तर प्रश्न आहे.अजयचा. जी पातळी स्त्री करता ती पुरुषांकरता नाहि याबद्दल त्याचा मुद्दा आहे असे मला वाटते. आणी हाच लेख जर उलटा असता, तर चपलेच्या फटक्यांचे प्रतिसाद आले असते असे त्याचे म्हणणे वाटते.
मला पराग चे पोस्ट सुद्धा
मला पराग चे पोस्ट सुद्धा अजिबात पटले नाही. >>>>> ओके मैत्रेयी.. तुझं मत कळलं. मी घटनाक्रम मांडला आहे. तुला त्या क्रमापेक्षा काही वेगळं घडेल असं वाटत असेल तर ते जाणून घ्यायला आवडेल.
नेमकी उदाहरणे देऊ शकता का, जिथे एखाद्या आयडीने खरे तर निर्मळ लेख लिहिला होता न इथल्या स्त्री आयड्यांनी मात्र कारण नसताना विपर्यास करून निषेध, चपलेने मारा अशा प्रतिक्रिया दिल्या ?? >>>>> लेख नाहिये. पण काही काही साध्या स्टेटमेंटसचा विनाकारण विपर्यास करून त्यावर अश्या प्रतिक्रिया दिल्या गेल्या आहेत ह्या आधी असं मला वाटतं. निषेध नोंदवणार्यांमध्ये सगळेच जण नव्हतेही. (तू ही नव्हतीस ) उदाहरणं लक्षात आहेत पण इथे देत नाही. कारण ह्यातही परत सापेक्षतावाद येऊ शकतोच.
त्यामुळे झाले काय की इथे सगळ्या संयुक्ता ब्रिगेड ची जनरलायज्ड टिंगल करायला कोलित मिळाले पब्लिक ला !! पराग चे पोस्ट त्यातलेच . >>>> संयुक्ताचं नाव वरच्या ४५ पोस्टस मधे कोणी काढलं नव्हतं. तसच संयुक्ता ग्रुप किंवा त्याचे मेंबर्स ह्याबद्दल माझ्या पोस्टमध्ये काय आहे ही हे अजिबातच कळलं नाही. संयुक्ता अॅडमीनसकट अनेक सदस्यांचे पोस्ट माझ्या नंतर येऊन गेले. त्यातल्या कोणालाही असं वाटलं असेल असं त्यांच्या पोस्ट्स मधून तरी जाणवत नाहीये. त्यामुळे हा मुद्दा अजिबातच कळला आणि पटला नाही.
अन "शेवटी तिथली "चर्चा" वैयक्तिक पातळीवर घसरून कोणीतरी तोल ढळून काहितरी बोललं असतं." यातून चक्क असा अर्थ निघतो की चर्चेला तोल ढळायला जबाबदार मूळ कमेन्ट नाहीच, तर त्यावर निषेध करणारे स्त्री आयडी !! >>>>>> तू तसा अर्थ काढलास तर नक्कीच निघू शकतो. मी जेव्हा लिहिलं होतं तेव्हा मला तरी चर्चेचा तोल ढळायला चर्चा वैयक्तिक पातळीवर घसरणे हे कारण आहे असं अभिप्रेत होतं. चर्चा वैयक्तिक पातळीवर घसरायला, निषेध करणार्या स्त्रीची प्रतिक्रिया हे कारण आहे असं मी कुठे लिहिलं आहे असं मला वाटत नाही.
असो.
अस्चिग यांचा प्रतिसाद आवडला.
अस्चिग यांचा प्रतिसाद आवडला.
बाकी माझ्या मते रोजच्या आयुष्यात बरेचदा व्यक्तीसापेक्ष आपली प्रतिक्रिया बदलते. जी गोष्ट आई चालवून घेइल ती सासू चालवून घेइलच असे नाही. आणि आई जशी खरडपट्टी काढेल तशी सासू काढणार नाही, सौम्य शब्दात नाराजी व्यक्त करेल. मग तसेच काहीसे या आभासी जगात झाले तर नवल का वाटावे. कोणी लिहिलेय या पलिकडे ते कुठल्या संस्थळावर लिहिलय त्याप्रमाणेही तिथे येणार्या प्रतिक्रिया बदलतील. काही ठिकाणी ५ मिनिटात लेख उडेल. तर काही ठिकाणी़ खेळीमेळीत प्रतिसादांची शंभरी होईल. सगळेच सापेक्ष!
>>> अगदी खरे. पातळ्या
>>> अगदी खरे. पातळ्या वेगवेगळ्या - त्यातली 'खालची' पातळी गाठली की उपरोक्त चपलेच्या फटक्यांचे प्रतिसाद येतात. सर्वसाधारण पातळीवरील लेखाला टोकाचे वाईट प्रतिसाद आल्याचे उदाहरण द्यावे. <<<<<
आता या पातळीची व्याख्ख्या काय करणार कप्पाळ?
अहो नुस्ते कुन्कू लावायचा विषय घ्या! माबोवर रामायणे-महाभारते घडलीहेत या विषयावरुन. अन त्यामुळेच, अजय म्हणतो ते पटते ते यासाठीच की मी जर माझ स्वप्न मान्डल की "कुन्कू लावणारी सधवा" बाईच माझी पत्नी असावी (किन्वा खरतर, नेमक्या शब्दात म्हणजे, माझी बायको कुन्कू लावून [निदान माझ्यासमोर तरी] सधवा दिसत असावी), तर त्यावरुन रण पेटण्याची वाट बघायला वेगळा बीबी उघडायला नको! कस?
तरी बर, कुन्कू ही बरीच उच्च पातळी आहे, नै? म्हणजे चार फुटान्च्या वरच हो!
मग नम्बर लागतो नथ आणि मन्गळसूत्राचा.
एकदम नीऽच पातळीवर म्हणजे त्या बिरवली-जोडव्या (पायाच्या अन्गठ्या व करन्गळी शेजारच्या बोटात घालायची चान्दीची वळी), गळ्यातल मन्गळसूत्र अन त्या जोडव्याबिडव्या म्हणजे स्त्रीच्या गुलामगिरीचेच प्रतिक! नै, आजवर इकडे तरि आम्ही हेच वाचित आलोय!
त्यादरम्यान, कानातली, भान्गातली, दन्डातली वाकी, मनगटातल्या पाटल्या-बान्गड्या, कमरपट्टे, पैन्जण-तोडे, वगैरे अनेक बाबी अस्तात, त्यान्चीही गत काय होइल जर मी माझ्या स्वप्नात वर्णन केली तर, हे सान्गायला ब्रह्मदेव नकोय यायला माबोवर. नै का? (आता वीसहजार तोळे दरात स्वप्न बघायला देखिल महाग जातय तो भाग वेगळा )
अन अहो इकडे हे इतके वेळा इतक्या विविध ठिकाणी ऐकुन झालय की हल्ली हल्ली ना, मला तर बोवा भितीच वाटते लिहायची.
म्हणुन तर म्हणतो की लिम्ब्या गप्प बैस मुकाट्यानं! तिकडे तो रुमाल अजुन उचलला जायचाय.
maitreyee | 4 April, 2011 -
maitreyee | 4 April, 2011 - 06:37
मला या लेखाचा हेतू फारसा कळला नाही>>>>
माझे असे झाले असते तर मी तरी इतकेच म्हणून थांबलो असतो. असो!
हेतू स्वच्छ आहेत असे मला वाटते
१. स्त्रीने असा लेख लिहिला, तसाच पुरुषाने स्त्रीमय स्वप्नांवर लेख लिहीला असता तर प्रतिसादकांनी ( यात स्त्री व पुरुष दोघेही आले) त्यात निखळ आनंद शोधला असता की नसता हे विचारणे!
२. लेख कुणी लिहीला आहे यावर येणार्या प्रतिसादांची संख्या अवलंबून असेल का यावर चर्चा घडवून आणणे!
=========================================================
काही मते:
१. अजय यांना असे म्हणायचे असावे (त्यांना काय वाटत असावे यावर बोलल्याबद्दल क्षमस्व!) की ज्यावर तिथल्यातिथे लेखी व जाहीर प्रतिसाद देणे लोकांना शक्य असते अशा आंतरजालीय साहित्य लेखनात कंपूबाजी हा प्रकार सहजपणे व निश्चीतपणे निर्माण होतो व तो मारक आहे.
२. तसेच (हे त्यांना वाटते असे म्हणायचे नसून हे मलाच वाटते की) मायबोलीवरील 'काही' स्त्री प्रतिसादक हे इतरत्र (इतर संकेतस्थळांवर - मी एकंदर पाच इतर स्थळांवर बघितल्यानंतर असे म्हणत आहे) असलेल्या स्त्री प्रतिसादकांपेक्षा अधिक आक्रमकपणे बोलतात. कुणाला आवश्यक वाटत असल्यास मी (माझ्या) धाग्यांवर आलेले प्रतिसाद कॉपी पेस्ट करून देऊ शकेन. अरुंधती कुलकर्णी, दाद असे काही सदस्य कसे संयत लेखन करतात हे त्या स्त्री सदस्यांनी का तपासू नये असे वाटते. आता या मताची स्टॅटिस्टिकल डिटेल्स मागीतल्यास देणे अवघड आहे. पण काही जण निदान मनातल्या मनात तरी माझ्याशी सहमत होतील असे आपले मला वाटते.
आता स्त्रीला आक्रमकता शोभते का वगैरे चुकीचे प्रश्न माझ्या मनात नाहीत. मला तसे म्हणायचेच नाही आहे. मात्र अनावश्यक आक्रमकता कशासाठी?
हे लेखन अवांतर वाटल्यास प्रशाननाने योग्य तो निर्णय घ्यावा. मला असेही वाटते की अजय यांच्या या धाग्यावर माझे हे मत राहिल्यास आनंद होईल.
धन्यवाद!
-'बेफिकीर'!
धतड ततड धतड ततड धतड ततड धतड
धतड ततड धतड ततड धतड ततड धतड ततड..
ढम ढम
धतड ततड धतड ततड धतड ततड धतड ततड
ढम ढम
दे घुमाके..घुमाके !!
भिब्र्याSSS
भिब्र्याSSS
मला वाटतं पूर्वग्रहदूषिततेतून
मला वाटतं पूर्वग्रहदूषिततेतून सहसा कोणतेच लिखाण सुटत नाही. (अजय यांचा हा लेखही त्याला अपवाद नाही.) अगदी वर्तमानपत्रातील स्तंभलेखनापासून ते हलक्या फुलक्या लिखाणापर्यंत. नुसते शीर्षक वाचूनही अपेक्षा निर्माण होतात. लेखक/ लेखिकेचे नाव वाचून किंवा कोणत्या विषयावरील लिखाण आहे त्या अनुषंगाने विशिष्ट अपेक्षा मनात धरून वाचन केले जाते. सुरुवातीच्या एक दोन परिच्छेदात लिखाणाने पकड घेतली नाही तर अनेकदा ते लिखाण बाजूला सारले जाते. नवोदित लेखकांना काही वेळा ह्यातून सूट मिळते तर काही वेळा संशयाच्या व वादाच्या तडाख्यात सापडावे लागते. हा आंतरजालीय कंपूबाजीचा एक प्रकार म्हणता येईल.
आपल्या मताशी विपरीत किंवा आपल्या सर्वसाधारण समजांच्या विरूध्द लिखाण असेल तर अनेक पर्याय असतात :
१. त्या लेखाचे वाचन थांबविणे
२. तो लेख वाचून त्यावर मनन करणे, त्यात मांडल्या गेलेल्या दृष्टीकोनाचा विचार करणे, पण प्रतिक्रिया मनातच ठेवणे. थोडक्यात अनुल्लेख.
३. लेखातील मते पटोत - न पटोत, अनुल्लेख.
४. आपली असहमती नोंदविणे.
५. लेखातील मुद्द्यांविरुध्द असलेले आपले मत इतरांच्या गळी उतरविणे.
६. आपले मत आहे तेच रास्त व इतर मते गैर हे गृहित धरून त्या अनुषंगाने प्रतिक्रिया व कृती.
परंतु एखाद्या विशिष्ट समुदायासंदर्भात (इथे जाती, प्रादेशिकता, लिंग, धर्म इत्यादी हवे ते वर्ग घ्यावेत) वारंवार एकछापाची विधाने, त्याच त्या प्रकारच्या कंटाळवाण्या टिप्पण्या लिखाणातून जेव्हा केल्या जातात किंवा त्यांच्याबद्दल प्रक्षोभक किंवा सवंग (हा शब्द पुन्हा सापेक्ष!) विधाने केली जातात तेव्हा त्या लिखाणाबद्दल वा लेखक/लेखिकेबद्दल स्वतःची नापसंती व्यक्त करणे हेही मग कंपूबाजीचे निर्देशक मानायचे का?
सवंग म्हणजे नक्की काय?
गलिच्छ म्हणजे काय?
घाणेरडे म्हणजे काय?
ओंगळ म्हणजे काय?
शिवी म्हणजे काय?
त्याची काही निश्चित व्याख्या आहे का?
इथे माबोवर अनेक देशांतील लोक एकत्र वावरतात. प्रत्येक देशाची, प्रत्येक संस्कृतीची आणि प्रत्येक राज्य घटनेची वरील शब्दांबद्दलची व्याख्या वेगळी आहे याची जाणीव आपण ठेवतो का? आज जरी आपली भाषा मराठी असली तरी संस्कृती खरोखरीच मराठी आहे का? मूल्ये तीच आहेत का? क्षितिजे तीच आहेत का?
आज आखाती देशांत ज्याला असंस्कृतीचे लक्षण मानले जाईल, जे त्याज्य समजले जाईल तेच इतरत्र समजले जाईल का? किंवा भारतातील छोट्याशा खेड्यातल्या / तालुक्यातील माणसाला जे गलिच्छ वाटेल ते तसेच पाश्चात्य जगात वावरणार्या माणसाला वाटेल का?
प्रश्न हे असे अनेक आहेत. इतरांच्या मतांचा स्वीकार करून तो विषय तिथेच सोडूनही देता येऊ शकतो.
सर्वांचे प्रतिसाद वाचले. अजय
सर्वांचे प्रतिसाद वाचले.
अजय तुम्ही म्हणता आहात ते बरोबरच आहे पण लिखाणात मर्यादा पाळल्या असत्या किंवा विनोदाची लेव्हल संभाळली असती तर तो लेख माबोवरच काय पण सर्वांना अॅक्सेप्टेबल झाला असता.आता एखादा माथेफिरू इथे म्हणेल कि कुठल्याही गोष्टीची मर्यादा पाळण्याचा मक्ता पुरषांनीच घेतला आहे का? पुरूष उघडपणे सरळसोट बोलतात म्हणून ते दोषी काय? अन बायका आडून आडून, मनातल्या मनात जे काही बोलतात ते कुणाला कळतं? फक्त त्या ते इथे मांडत नाही एवढचं. 'भोग' हा उघडपणे सांगायला, लिहायला अमान्य असला तरी तो कुठला पुरषाला किंवा स्त्रीला टाळता आला आहे? जिवनाच्या संवेदनशील अविभाज्य घटकांबद्दल एकाच व्यक्तीला दोषी ठरवून मोकळे होताना या सर्व गोष्टींचा विचार केलाच पाहीजे. नेहमी एका जबाबदार स्त्री कडून ऐकायला मिळतं कि जरा विचार करा " तुम्ही जर स्त्री असता तर " आता याच प्रश्नाचं उत्तर एक पून्हा प्रश्न म्हणून दिलं तर जसे कि "तुम्ही एक पुरूष आहात असे समजून विचार करा". म्हणून त्या माथेफिरूने त्यांच्या विधानाचा 'बाऊ' करत संबंध संकेतस्थळाला जबाबदार धरत कम्प्लेंट करत रहायचं हा मुद्दा खरोखर चुकिचा आहे असं मला वाटतं.
मणिकर्णिका यांचा लेख हा खरोखर गुदगुल्याकरणार्या मोरपिसासारखा होता असे मला वाटते पण म्हणून त्यावर 'स्त्री'मय स्वप्न असा पुरूषी वृत्तीने गुदगुल्या करणारा लेख मी पण टाकावा असा त्याचा अर्थ होत नाही. उद्या मी ही म्हणेल कि माझ्या विनोदाची पातळी थोडी उच्च होती म्हणून पण विनोदनिर्मितीतूनच मी सगळं मांडलं आहे असे ठासून मांडणारे महाभाग पण इथे आहेतच कि.
इथे झटाझट लिहीणारे आणि त्यावर आवर्जून आपल्याच माणसांकडून प्रतिसाद देणारे बोगस प्रतिसादकार आहेतच कि. बाकी 'इच्छापुत्र' वगेरे हे पुराणात ऐकलं होतं बहुतेक त्याच गोष्टीला प्रेरीत होऊन इथे 'ड्युआयडी' नामक शेकडो इच्छापुत्र पहायला मिळतात आणि ह्याचं त्याचं बघून प्रत्येकाला वाटतं कि आपल्यालाही एखादा इच्छापुत्र असायलाच हवा तेव्हा आणि हवा तिथे. आता बर्याच ठिकाणी आळा घालता येतो पण इथे मात्र अशक्य आहे असे मला वाटते.
शेवटी काय पब्लिक फोरमवर आपण लिहितो तेव्हा चांगल्या प्रतिसादाचा फ्रि पास आणि वाईट प्रतिसादांचा टोल हा आपल्याला नक्कीच भरावा लागणार पण आपल्याला जे काही सुचतं आहे त्यावर पून्हा एकदा विचार करून ते प्रकाशित केलं तर नक्कीच त्याचा चांगला परीणाम होईल वाचकांवर आणि पर्यायाने लिहणार्यावर. जर एखादं लिखाणावर नाराजीचा सूर आलाच तर त्याविषयी भांडणे उकरून काढण्यात काहीच हरकत नाही कारण तो लेख ज्या ज्या लोकांनी वाचलाय त्यांना तो खरोखर पटलाच नसेल आणि त्यांनी त्यांचं मत प्रामाणिकपणे मांडलं तेव्हा त्या मताचा आदर राखून आपण आपले भविष्यातले लिखाण त्यांचा मनोवृत्तीच्या पातळीनुसार ठरवू शकतो आणि जर जास्तच वाटले कि नाही मला जे वाटतय ते मी लिहिणारच मग तेव्हा सरळ सरळ ते लिखाण स्वतःच्या डायरीत किंवा ब्लॉगवर लिहायचे आणि ज्याला दाखवायचे आहे त्याला ते बिन्धास्त दाखवायचे. प्रश्न मिटला.
प्रतिसाद देणार्यांनी पण जर एखादा लेख पटला नाही आवडला नाही तर सरळ त्या व्यक्तीला ईपत्र किंवा विचारपुसीतून आपले मत कळवायचे जमल्यास काही बाबी सुचवायचा आणि त्याच्यापलीकडचे लिखाण असल्यास सरळ तो लेख उडवून टाकावा अशी विनंती करायची. शेवटी तुम्ही गदारोळ करणार, कांगावा करणार म्हणून अॅडमिनने येऊन तो लेख उडवावा हे कितपत योग्य आहे ? कारण अॅडमिनला सुद्धा ते अस्त्र इतक्या सहजासहजी वापरता येत नसावं.
वैयक्तीक शांतता आणि वैयक्तीक वैचारीक संतुलन यासाठी 'अज्ञातवास'चा पर्याय निवडला तर तो उत्तमच असतो पण या सगळ्यात जाऊन काहीतरी शिकलं आणि शिकवलं तरंच साधू होता येतं नाही तर उगाच दाढी वाढवून अल्लख निरंनजन करणार 'भोंदू' गल्लोगल्ली फिरताना आपल्याला दिसतातच. तेव्हा त्यांची कुकृपा दृष्टी आपल्यावर पडण्याआधी आपण दिव्यदृष्टीने चांगलं काय नि वाईट काय ते ओळखावं आणि आपल्या पादुकांचं स्थान म्हणून त्या भोंदूचं शिरस्थान निवडावं.
>>माझ स्वप्न मान्डल की
>>माझ स्वप्न मान्डल की "कुन्कू लावणारी सधवा" बाईच माझी पत्नी असावी
हे मत आहे की स्वप्न?
स्वप्न आहे, म्हणजे वास्तव नाही. हा मुद्दा लक्षात घेतला आहे का?
>>पुरुषाची स्वप्ने या
>>पुरुषाची स्वप्ने या त्याच्या अपेक्षा असतात, स्त्रीच्या अपेक्षा स्वप्ने ठरतात. <<
क्या बात है मयेकर! एका वाक्यात दोन्ही लेखांचं सार सांगुन टाकलत.
पुरुषाची स्वप्ने या त्याच्या
पुरुषाची स्वप्ने या त्याच्या अपेक्षा असतात, स्त्रीच्या अपेक्षा स्वप्ने ठरतात. >>> डोन्ट टेल मी!
(पुढे एक डोळा मारणारा बाहुला गृहीत धरावात.)
(अवांतर प्रतिसादाबद्दल क्षमस्व!)
Pages