Submitted by रामकुमार on 25 February, 2011 - 10:54
म्हणेन हो स्वत:सही लहान एकदा तरी
ठरेन या जगात मी महान एकदा तरी!...१
जळून जात कामना, पुन्हा न येत अंतरी
उरेल ना मनात या तहान एकदा तरी!...२
झिजेन चंदनापरी नुरेन रंचमात्रही
झिजून दावतो-झिजे सहाण-एकदा तरी!...३
असह्य येथ जाहले लबाड,भ्रष्ट लांडगे
चला तयांस मारुया वहाण एकदा तरी!...४
उरात गच्च संचिते पहा कितीक दाटती
घडो नितांत सौख्य ते प्रहाण एकदा तरी!...५
प्रहाण=नष्ट होणे
चुकेल कर्जभार हा असे प्रयत्न रोजचे
नसेल हे खरेदिखत गहाण एकदा तरी!...६
कळेल हे तुला प्रिये, 'जगात दु:ख थोरले'
उरेल भावरम्यता "अहा!" न एकदा तरी !!...७
रामकुमार
गुलमोहर:
शेअर करा
व्वा सारंग!!!!!! तुमच्या
व्वा सारंग!!!!!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तुमच्या गझलेला खरोखर मराठी मातीचा सुगंध येतोय...खुप छान!
उरात गच्च संचिते पहा कितीक दाटती
घडो नितांत सौख्य ते प्रहाण एकदा तरी!...मस्तच...
एक प्रश्न...न च्या ऐवजी तुम्ही ण वापरलेय... (उदा. गहाण, वहाण ) तसे चालते का? हे नियमात बसते का?
अंहं. शब्दांची बरीच ओढाताण
अंहं.
शब्दांची बरीच ओढाताण झाली आहे. गझल आवडली नाही.
ज्ञानेशना अनुमोदन..... तरल
ज्ञानेशना अनुमोदन..... तरल नाही वाटली.
सानी, आभारी
सानी, आभारी आहे!
ज्ञानेश,भुंगा, आपलेही आभार!
न/ण बद्दल स्पष्टीकरण मिळाले नाही.
रामकुमार
महान्,लहान असे काफिये
महान्,लहान असे काफिये घेतल्यावर.....प्रहाण्,गहाण्,वहाण हे वापरणे चूक आहे.
डॉ. ज्ञानेश, डॉ. कैलास
डॉ. ज्ञानेश, डॉ. कैलास ह्यांच्याशी सहमत
वरील प्रतिसादांनंतर रचना
वरील प्रतिसादांनंतर रचना 'कविता' शीर्षाखाली हलवली आहे
अभिप्राय कळवावेत.
रामकुमार
गझलेच्या अंगाने जाणारी कविता
गझलेच्या अंगाने जाणारी कविता आवडली .
मस्त..
मस्त..