देअर ईज स्प्रींग इन माय स्टेप

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

पुढचे आईस एज (अकबरी घोटाळे टाळा) आले की काय असे वाटत असतांनाच वसंताचे आगमन झाले एकदाचे. पर्ण् विरहीत वृक्ष माझा फोटो - माझा फोटो म्हणत नवीन कपड्यांमागे धावते झाले. एका वर्कशॉप करत गळ्यात घातलेला दागीना तसाच राहिल्याने मात्र एका झाडाचे फावले. पण हे शेवटचे पान O Henry च्या कथेतल्या प्रमाणे रंगवलेले मात्र नाही.

cP3282500.JPG
जुने व नवे

cP3282506.JPG
नवेच नवे
crm90P3282508.JPG
असाच एक अमिताभ

मस्त.
अस्चिग, कालच एक संपूर्ण मानवनिर्मित पानाची बातमी वाचली व रात्री एक १२ वर्षीय अमेरिकन मुलगा अ‍ॅस्ट्रो फिजिक्स मध्ये उत्तम कामगिरी करत असल्याचे याहूवर वाचले ( दोन्हीचे काही कनेक्षन नाहीये Happy )
घोटाळे टाळण्यासाठी हिमयुग म्हणता येइल पण ओपनिंगलाच ट्विस्ट छान वाट्त आहे.

पुढचे आईस एज (अकबरी घोटाळे टाळा)

अरे देवा. मी अकबरी घोटाळे काय ह्याचा विचार करत होते. आणि अचानक लक्षात आले Happy
दुसरा फोटो मस्त आहे..

अमिताभ सामान्य वाटला पण त्याच्या पायथ्याशी मात्र मस्त सडा पडलाय... त्याचा नसावा, गवतफुले किंवा इतर काही खुरटी झुडपे असावित...

@साधना, खूप उशीर झाला हे फोटो काढायला - काही दिवसांपुर्वी झाडे जास्त युनिक दिसत होती.

ते झाड उंची साठी अमिताभ आहे, देखणेपणासाठी नाही. ती गवतफुले साधारण ७०-८० फुट अलिकडे आहेत. मागे दिसत असलेली बिल्डींग चांगली दुमजली आहे, व डावीकडची वॉशींग्टोनिया -कॅलिफोर्नीया पामची झाडे कमी उंच नाहीत.

कॅमेरा घेऊन जास्त फिरायला पाहिजे.

@रैना, आज वसंत स्कीप करुन डायरेक्ट उन्हाळ्यावर उडी मारल्यागत गरम होते. त्यामुळे तुर्तास नको.

@अमा, हो, त्या पोरावर लक्ष ठेवायला पाहिजे.