उजळ कांती हवी

Submitted by webmaster on 3 June, 2008 - 00:45

"उजळ कांती हवी" या विषयावर पूर्वी झालेलं हितगुज इथे वाचा
http://www.maayboli.com/hitguj/messages/103387/107548.html

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी आणलं कालच आणि रात्री लावलं. मला 'उंझा' कंपनीचं मिळालंय. आठ दिवसात फरक दिसतोय का बघेन.

सोन पहीली गोष्ट साबण वापरून दीर्घकाळ टिकणारं गोरेपण येत नाही... मागे लाझूर साबण वापरून बघितलेला... चांगला वाटलेला... पण नंतर स्कीन कोरडी झाली.

फेअर ग्लो साबण मुळीच वापरू नका!!!

मी गेले तिन महिने लाझूर वापरतेय. पण मला काही वाईट अनुभव नाही आला. जर त्या साबणाने त्वचा कोरडी पडत असेल तर मला काही फरक पडणार नाही कारण माझी त्वचा तेलकट आहे.

मी मागच्या कुठल्यातरी पानावर अलोए वेरा जेल वापरुन क्रिम करायची माहिती दिली होती. मी गेले तिन-चार महिने हे क्रिम नित्य नियमाने लावतेय. बाहेर जायचे म्हटले अगदी सकाळी उठुनही जायचे तरीही आधी क्रिम लावतेच. मला खुप छान फरक पडलाय. चेहरा अगदी मस्त गुळगुळीत झाला. तेलकट असल्याने तारुण्यातील पिटिकांचे खड्डे आणि काळसर डाग होते ते गडपले. एका डोळ्याखाली एक मांसाचा गोळा लागायचा हात फिरवल्यास लागायचा. तोही गडपला. तिथेच बाजुला फ्रेकल्ससारखे जरासे व्हायला लागलेले. काल पाहिले तर तेही जरा फिकुटलेत. एकुण परिणाम चांगला होतोय असे दिसतेय. आतापर्यंत ३०० ग्र. क्रिम जिरवलेय Happy

लाझूर तेकट स्कीन टोन वाल्यांन मस्त आहे, अतिरिक्त तेल काढून टाकण्यासाठी! बागेश्री, तुझी त्वचा कोरडी आहे ना? मग जास्त कोरडी झाली तर इरिटेशन होणारच! डव वापर... Happy ट्राईड अँण्ड टेस्टेड!! Happy

लाझूर आहे चांगला पण माझी नॉर्मल टू सेंसेटिव स्कीन असल्याने मला डव च सूट होतो... असो..

साधना तू सांगितलेलं क्रीम मीपण वापरतेय... मला तरी फायदा होतोय अ‍ॅलो जेल वाल्या क्रीमचा! धन्स गं!! Happy

एक भा. प्र> त्यातील सांगितलेली सगळीच्या सगळी तेलं नाही मिळाली/१-२ कमी असली तर प्रभाव नेहमीपेक्षा कमी होतो का?? Uhoh

साधना,माझी त्वचा तेलकट आहे.अनि सावलि आहे,फक्त सावली असती तर काही वाटल नसत्,पन काळे
डाग खुप आहेत्,खड्डे पन पडले आहेत,चेहरा खुप खराब वाटतो ग.अलोए वेरा जेल ने कहि फयदा होईल का?खुप उपाय केले,पन कहि फायदा झाला नाहि .plz चेहरा plain ani
थोडा गोरेपना हि हवा ग्.यावर एक उपाय सुचव.मी नक्की करिन.

मागच्या पानावर तुरटी + गुलाबपाण्याबद्दल बोलले त्याबद्दल बर्‍याच जणींना तुरटीमुळं त्वचा खूप कोरडी पडेल असं जाणवलं. माझ्या ओळखीच्या ज्या बायका हे करत होत्या त्यांना मी ही शंका विचारली.
त्यातल्या दोन बायका तुरटी + गुलाबपाणी + जस्मिन तेलाचे २ थेंब असं मिश्रण वापरतात.
जस्मिन तेलाचे २ थेंब वापरल्यामुळे कोरडेपणा अजिबात जाणवत नाही असं म्हटल्या. जस्मिन तेल मी वापरून पाहिलेलं नाही.

डाबरचं गुलाबपाणी चालायला हरकत नाही.

त्यातील सांगितलेली सगळीच्या सगळी तेलं नाही मिळाली/१-२ कमी असली तर प्रभाव नेहमीपेक्षा कमी होतो का??

नाही होत गं प्रभाव कमी.. आणि तसेही कुठले तेल मिळाले नाही त्यावर अवलंबुन आहे ना ते? उदा. व्हिटजर्म ऑइल चेह-यावरच्या सुरकुत्या कमी करते. आता तु पंचविशीतली असशील तर ते तेल घातले नाहीस तरी चालण्यासारखे आहे, तुला मुळात सुरकुत्याच नसतील. पण तेच ४५शीतल्या व्यक्तीला ते तेल नसले तर फरक पडु शकतो. त्यात आपण जी तेले घालतो त्यांचे स्वत:चे गुणधर्म आहेत त्याप्रमाणे फरक पडणार.

तसेही जैनबाईंनीही एक-दोन तेले नसतील तरी चालेल आणि तेले वापरताना आपल्याला वास सुट होईल अशीच वापरा हे सांगितलेय्च ना.. मला बर्ग्यमॉटचा वास अजिबात आवडला नाहीय. मी ते कुकुंबर जेलमध्ये वापरलेय. अलोए मध्ये वापरले नाहीय.

सोन, तुही फॉर्मुल्याप्रमाणे जेल बनवुन वापर. वर कुंकुमादी तैलं बद्दल लिहिलेय तेही त्वचा उजळ करते. कुठल्यातरी एका गोष्टीवर विश्वास ठेव आणि नियमीत ४-६ महिने वापर. आज वापरले आणि उद्या रुप पालटले असे नाही होणार. थोडा वेळ द्यावा लागेलच.

माझ्याकडे कोकम तेल म्हणून एक गोळा दिलाय मैत्रिणीने ( तिच्या काकूनं पाठवलाय ), तेल म्हणतायत पण ते घन स्वरूपात आहे. इकडे कोणाला कल्पना आहे का की त्याचं काय करायच? कसं वापरायच?
मैत्रिणीलाही माहित नाहीये.

उन्हाळ्यात तेलकट त्वचा अजुनच तेलकट होते. तुरटीचा उपाय ह्या दिवसात केला तर फारसा अपाय न होता चांगला परिणाम दिसेल असे वाटते. मला करुन पाहायला पाहिजे तुरटीचा उपाय. मुलीलाही अपर लिपवर दिसेल इतपत लव आहे. एक सेंटीमिटर भागावर प्रयोग करुन पाहायला पाहिजे.

मी तर उन्हाळ्यात मुलतानी मातीला शरण जाते. रोज संध्याकाळी चेह-याला लेप लावला की दिवसभरातला सगळा चिकटपणा निघुन जाऊन एकदम फ्रेश फिल येतो. मुमा धुवुन टाकल्यावर गुळगुळीत झालेल्या गालांवरुन हात फिरवत बसणे हा माझा आवडता छंद आहे Happy

कोकम तेल रातांब्यापासुन काढतात. आपल्या साधारण तपमानाला ते घन रुपात राहते. म्हणुन तो घट्ट गोळा.

कोकम तेलामध्ये कोको बटरचे गुणधर्म आहेत. त्याच्यामुळे त्वचा नरम होते. म्हणुन भेगाळलेला टाचांवर कोकम तेल लावतात. मी थोडेसे तुकडे चमच्यात घेऊन गॅसवर गरम करते. तुकडे लगेच विरघळतात. मग ते टाचांवर आणि पायाच्या बोटांवर चोळते. दुस-या दिवशी आंघोळ करताना टाचा घासायच्या ब्रशने. असे रोज केले तर तळवे नितळ होतात. पण मला त्याची थोडी अ‍ॅलर्जी आहे. पायाच्या तळव्यांना चोळले तर त्रास होत नाही पण घोट्याच्या आजुबाजुला आणि वर पायाला जर लावले (थंडीत त्वचा खुप कोरडी पडते त्यामुळे कधीकधी लावले जाते) तर पुरळ येते आणि सोबत खुप खाजही येते. हा त्रास मला क्रॅक क्रिम किंवा कैलास जीवन वापरले तरी होतो. बहुतेक त्यांच्यातही कोकम तेल आहे.

अच्छा असं आहे होय, मी आजच वितळवून वापरते कोकम तेल.
हो, आधी थोड्या भागावर तुरटीचा प्रयोग करून बघा, मला तरी नाही काही त्रास झाला.

रिझ्ल्ट कसा वाटतोय तुला?
>>
मला ५% फरक वाटतोय. पण दुकानातली मुलगी म्हणाली, चेहर्‍याला लावायला हेच चांगलं आहे. मला नेमकं 'निशा हर्बल्' आठवेनाच.

हो ग बागेश्री, खरच आवड्तय... माझ्या चेहर्‍यावर फारसे डाग नाहीत Happy , माझी स्कीन फक्त तेलक्ट होते ते ही काही भागातच Sad पण नवरोबाच्या आहेत थोडे, ते घालवण्यासाठी प्रयत्न चालु आहेत... डाग जातील अस वाटतय बघु नियमित वापरुन, छोटे छोटे खड्डे पण जातील काय ग या तेलाने???

अर्पणा
ते तेल असच पायाला लावुन काशाच्या वाटिने घासायच असत. शरिरातिल अतिरीक्त उष्णता कमी होण्यासाठी हे वापरल जात.

मला मेडिकल स्टोर वाल्याने कुंकुमादी लेपम पण दिल. केरळाच्या नागर्जुन कंपनीच. आता ऑफिसहुन पोचल्यावर पहील लेपम लावते मग झोपताना तेलम लावते.
आईला पिगमेंटेशनचे डाग आहेत गालावर. तिला पण दिल आहे कुंकुमादी तैलं लावायला.
बघु काय रिझल्ट येतो ते.

धन्यवाद रीमा, माझ्या अंगात प्रचंड उष्णता आहे ( जास्त वेळ मोजे घातले तरी डोळयांची आग होते ), हे कोकम तेल लावून पहाते पायाला. काशाची वाटी बघते कुठे मिळते का ते.

कुंकुमादी लेपम हे क्रीम आहे का ?

माझ्या पायावर फिक्कट काळे डाग आहेत. पूर्वी गाडी चालवताना बॅककिक बसून/सायलेन्सर लागून भाजायचं किंवा लागून छोट्या जखमा व्हायच्या. मलम लावलं की बरं व्हायचं आणि मग मी दुर्लक्ष करायचे. डाग पडायचे पण खूप स्लोली का असेना...जायचे. आता मात्र ते जायला वेळ लागतोय. मी अमेरिकेत आहे, आणि इथे मिळणारं व्हिटॅमीन ई तेल आणलंय. रोज लावून उपयोग होतोय... पण जरा जास्त लवकर पाय नीट होतील यासाठी काही उपाय?

अर्पणा जनरली देवाच्या पुजेच सामान मिळत तिथे काशाची वाटी मिळते. एरंडेल तेल तळपायाला लाउन काशाच्या वाटीने घासायची. खरच फरक पडतो.

Pages